Login

लेखिका शरयू महाजन : लेखनकलेची अजोड साथ

शरयूजींच्या प्रतिभासंपन्नतेला सलाम ...!!
लेखिका शरयू महाजन : लेखनकलेची अजोड साथ …!!

ईराने सर्व स्तरातील लेखकांना लिहतं केलं आहे. अनेकांचे अनमोल विचार वाया जाणार होते, बुद्धीला गंज चढणार होता. वेळ आहे पण लिहायचे कुठे ? अशावेळी ईरा व्यासपीठाचे नाव कानी पडते आणि पंढरीच्या वारीला जसा वारकरी आनंदाने जातो तशी ईराकडे लेखकांची रांग लागते …! या व्यासपीठानं लहानथोरापासून सर्वांना सांभाळून घेतलं आहे.सगळेजण या कुटुंबात लिहण्यासह जीवनाचा अलौकिक आनंद घेत आहेत. सवांदाच्या रेलचेलीतून सुंदर नात्यांची गुंफण निर्माण होत आहे. हा महिमा अगाध आहे. अशाच ईराच्या ताफ्यातील अनुभवी लेखिका आदरणीय शरयू महाजन या आहेत.

छंद मानवाला जगण्याचं नव बळ देतो. छंदामुळे मानवी जीवनाला आकार मिळतो. अशाच छंदात रमणा-या शरयूजी यांनी विविध छंदातून आपले जीवन सार्थक केले आहे. टाकाऊ वस्तूपासून त्यांनी अनेक टिकाऊ वस्तू बनवल्या आहेत. हा त्यांचा उपक्रम अनुकरणप्रिय आहे. याबरोबर त्यांनी लेखनाचा छंद मनापासून जपला आहे.

ईरा व्यासपीठावर त्यांचे विविध प्रकारचे लेखन लक्ष वेधून घेते. चॕम्पियन स्पर्धेतील त्यांचा सहभाग प्रेरणादायक आहे. नुकत्यात संपलेल्या चॕम्पियन स्पर्धेत त्यांची अलक वैविध्यपूर्ण विचारणीय होती. चॕम्पियन आॕफ द सिरीज व अद्भुत फेरीमध्ये त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची लेखनकलेची आवड खूप प्रभावी आहे.

प्रेमळ, दिलखुलास, मनमिळावू, सतत कामात व्यग्र असणा-या सातत्यपूर्ण लेखन करणा-या शरयूजी यांना पुढील आरोग्यदायी जीवनासाठी खूप शुभेच्छा ..!! त्यांचे लेखन असेच बहरावे हिच सदिच्छा …!!

शरयू : महान व्यक्तिमत्व

आनंदाने आयुष्य जगले
कांही क्षण रमले
कांही क्षण शिकले
संकटाना मनापासून भिडले

छंदाला हे जोपासले
शब्दांना गोंजारले
लेखणीने भारावले
प्रतिभेने सारे चित्र रेखाटले

सत्कर्म करत गेले
आयुष्य सरत आले
अध्यात्मात रंगले
समाधान जीवनाचे वाटले

सौख्याचे दिवस आले
चांगल्या माणसांना ओळखले
सार्थक जीवनाचे झाले
शरयू व्यक्तीमत्वच आवडले

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ..!!