शापित वाडा... लघुकथा स्पर्धा- रहस्यकथा

Ajinky chi badali shaharatun khedyakde zalyamule to purn family la gheun gavat rahayla aala

अजिंक्यची बदली शहरातून खेड्याकडे झाल्यामुळे तो पूर्ण फॅमिलीला घेऊन गावात राहायला आला...


शहरात फ्लॅट मध्ये राहत असल्यामुळे त्यांना इकडे ऍडजस्ट करायला वेळ लागणार होता..


चार खोल्यांच घर भाडयाने घेतलं, अजिंक्यचे आई बाबा, पत्नी मीरा आणि मुलगा आरव इतक्या जणांच कुटुंब तिथे वास्तव्यास आलं..


आल्यावर घर साफ करून घेतलं, सामान लावून झालं..आधीचे दोन दिवस अजिंक्यनी घरूनच काम केलं..
तिसऱ्या दिवशी तो पहाटेच साईटवर गेला.


मीराने उठून अंगण झाडल, थोडं पाणी शिंपडून रांगोळी घातली, फ्लॅट मध्ये अस काही करता येत नव्हतं, आता करता येत म्हणून ती खुश होती..


अंघोळ करून तुळशीला पाणी द्यायला आली तर अचानक तीच लक्ष समोर गेलं...


घराच्या समोर खूप मोठा वाडा होता, त्याकडे बघता अस वाटत होतं की तो वाडा वर्षानुवर्षे बंद आहे, सगळीकडे पालापाचोळा जमा झालेला होता.. सगळीकडे नजर फिरत फिरत एका ठिकाणी येऊन थांबली..


थांबली ती थांबली बराच वेळ हटली नाही,तिथे सत्तरच्या वयाच्या आजी बसल्या होत्या..मीराची नजर त्यांच्यावरच खिळून होती..


बराच वेळ मीरा त्यांच्याकडे बघत राहिली, मीरा तिकडे एकटक बघत आहे हे बघून बाजूची बाई तिथे आली.
“अहो ताई, काय बघताय तिकडे?..”


मीरा दचकून


“हम्म..नाही काही नाही..”


“पण तुम्ही..? तुम्ही कोण?.


“अहो ताई घाबरू नका..मी तुमच्या शेजारीच राहते, कल्पना नाव माझं , बराच वेळ झाला मी तुम्हाला बघतीय तुम्ही टक लावून त्या वाड्याकडे बघताय..”


“हो मला तिथे एक आजी दिसल्या, म्हणून तिकडेच बघत होते..”


“कुठल्या आजी? तिथे कुणीही राहत नाही..” अस म्हणत कल्पना निघून गेली...


मीराही जास्त विचार न करता आत गेली...


सगळी कामे निपटून हॉल मध्ये गेली तर सासू सासरे झोपले होते, आरव मात्र तिला दिसला नाही, कुठे गेला असेल या विचारात ती बाहेर गेली...


बघते तर काय आरव समोरच्या वाड्याच्या आत खेळत होता..
मीरा खूप घाबरली धावत जाऊन त्याला आत घेऊन आली, त्याचा मुका घेऊ लागली...


संध्याकाळी आजोबा आरवला फिरायला घेऊन गेले..
मीराने स्वयंपाक तयार केला आणि ती अजिंक्यची वाट बघत बसली, अजिंक्यला यायला जरा उशीर झाला, तो येईस्तोवर मीराव्यतिरिक्त सगळे झोपले होते..


मीराला त्या वाड्यातून विचित्र आवाज यायला लागले, कुणीतरी ओरडत आहे, किंचाळत आहे असं वाटून मीरा त्या वाड्याच्या  दिशेने निघाली..गेटच्या आत पाऊल टाकणार तोच अजिंक्यने मीराचा हात पकडला,


“मीरा अग इकडे काय करतेस?.कुठे चाललीस?..”


“अजिंक्य मला ना इथून विचित्र आवाज येत होते..”


“मीरा तिथे कुणीच राहत नाही, चल आत चल..”


“अजिंक्य मीराला आत घेऊन गेला, 


दोघांनीही जेवून घेतलं..


अजिंक्य झोपला पण मीराला काही झोप लागेना, तिच्या डोक्यात तेच ते विचार लोटांगण घालत होते...


सकाळ कधी झाली तीच तिला कळलच नाही..
सकाळी उठून पुन्हा तीच कामे आवरून मीरा खरेदीला गेली..
खरेदी करून येत असताना , घराजवळ पोहोचल्यानंतर मीराला आजी बसल्या दिसल्या... त्यांनी मीराला इशाऱ्यानी हाक मारली...


मीराची पावले तिकडे वळली..


मीरा आजी समोर जाताच
 “जिलेबी आणलीस माझ्यासाठी?.”
“नाही काकू, मी मार्केटला गेले होते, काही वाण सामान आणायचं होत”


“काकू नाही आजी म्हण मला, सगळ्यांची आजी आहे मी”
“ आजी तुम्हाला जिलेबी खायची इच्छा आहे का, आणू का तुम्हाला?..
“आजी फक्त हसल्या..”


मीरा घरी गेली, तिनी जिलेबी बनवली आणि आजीकडे नेऊन देण्यासाठी गेटच्या आत गेली तर तिथे कोणीच नव्हत... मीराने आजूबाजूला बघितलं तिथे कुणीही नव्हतं... मीरा पलटुन निघणार तितक्यात तिच्या कानात किंचाळ्या गेल्या
मला मारू नका..मला मारू नका..मला माझ्या नातवंडासोबत खेळायचं आहे.. अजून जगायचं आहे..मला मरायचं नाही आहे..अअअअअअअ  


ते शब्द, तो आवाज, त्या किंचाळ्या मीराच्या कानात गुंजत होत्या, मीराला तो आवाज असह्य होत होता, तिनी कानाला हात घट्ट केला, थोड्या वेळ तिला गरगरल आणि ती खाली पडली...


शुद्धीवर आली तेव्हा तिच्या बेडरूममध्ये होती,अजिंक्य तिच्या बाजूला बसून होता.


“अजिंक्य, मी इथे..अशी..”
“हो, तू समोरच्या वाड्यात बेशुद्ध पडली होतीस..मीरा का गेली होतीस तिथे? तुला कितीदा सांगायचं तिथे जात जाऊ नकोस”
“मला त्या आजींना जिलेबी द्यायची होती, त्या म्हणाल्या तस म्हणून मी  बनवून घेऊन गेले होते..”


“मीरा त्या वाड्यात कुणीच राहत नाही..”


“पण मी मार्केट मधून येत असताना त्या आजींनी मला आवाज दिला आणि खाण्याची इच्छा दर्शवली म्हणून मी..
मीरा बोलता बोलता गप्प झाली, त्यानंतर सगळ्यांनी हा विषय बंद केला.


दुसऱ्या दिवशी कल्पना सहज म्हणून मीराला भेटायला आली, मीराने कल्पनाला सगळं संगीतल तेव्हा तीनेही हेच सांगितलं की त्या वाड्यात कुणीच राहत नाही..


सगळ्यांच ऐकून ऐकून आता मात्र मीराला त्रास व्हायला लागला...तिनी ठरवलं हे सगळं काय चाललंय, शोधायलाच हवं...


दोन दिवसानंतर सासू सासरे आणि आरव बाहेर गेले ह्याच संधीच सोन करायचं म्हणून मीराने वाड्यात प्रवेश केला, दार उघडताच सुऊउऊ असा आवाज आला, नेहा त्या आवाजाने थोडी दचकली, थोड्या समोर गेली तिला सगळीकडे धूसर दिसत होत,नजरेसमोर काहीच स्पष्ट होत नव्हतं...दबकी पावलं टाकत पुन्हा समोर गेली, समोर भल्या मोठ्या पायऱ्या होत्या..

मीरा एक एक पाऊल ठेवत पायऱ्या चढली, पुन्हा एक मोठं दार दिसलं, मीराने दारावरून हात फिरवला, दाराला मोठं कुलूप लावलेलं होत, मीराने ते हलवलं पण कुलूप बंद होत..थोड्या समोर चालत चालत गेली, भिंतीवर एक फ्रेम लटकली होती, मीराला त्याकडे बघून विचित्र वाटलं, तिनी त्यावरची धूळ बाजूला केली,  फ्रेममधली  फोटो बघून मीराला  धक्काच बसला, तिची पावले मागे वळली, ती फोटोकडे  बघत बघत धावत सुटली आणि दारावर जाऊन धडकली..


तिच्या डोक्याला मार लागला, रक्त वाहू लागल..कशीबशी दाराच्या बाहेर आली बघते तर काय आजी त्यांच्याच ठिकाणी हसतमुख बसून होत्या..


“आलीस पोरी, जिलेबी आणली माझ्यासाठी”
 मीराने तोंडावर हात ठेवून घाबरत रडत नकारार्थी मान हलवली..


कशीबशी घरी पोहोचली, आत जाऊन दार लावून घेतला आणि अजिंक्यला फोन केला, अजिंक्य डॉक्टरांना घेऊन आला.
डॉक्टरांनी बँडेज करून आराम करायला सांगितला, डॉक्टर गेल्या नंतर


“अजिंक्य आता आपण इथे नाही राहायचं, हे बघ तुझा विश्वास आहे की नाही माहीत नाही पण मला त्या आजी नेहमीच दिसतात, तिथे कुणीच राहत नाही मग मलाच आजी का दिसतात, माझ्याशीच कस काय बोलतात...”


मीराची स्थिती बघता अजिंक्यने जास्त विचार न करता शिफ्टिंग केलं आणि ते पुन्हा त्यांच्या जुन्या फ्लॅटवर राहायला गेले..


त्यांनतर मीराला कल्पनाच्या सासुकडून कळलं की तिथे एक फॅमिली राहत होती, तिथल्या मुलाने आपल्याच आईला मारून टाकलं होतं, तिला जगायचं होत, पण मुलाने अस केलं म्हणून तिच्या आत्म्याला शांती मिळाली नाही, मुलगा परदेशी निघून गेला, तीच अंत्यसंस्कार देखील केलं नाही, तिचा आत्मा त्याच वाड्यात वास करतो, आणि तुझ्यासारख्या तरुण मुली दिसल्या की तिला तिची नात समजून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, ती सगळ्यांनाच नाही दिसत ज्यांचं मन निर्मळ आहे,ज्या प्रेमळ आहेत त्यांनाच दिसते , ती खूप प्रेमळ होती, मुलाने पैशापायी जीव घेतला...”


हे सगळं ऐकून मीरा सुन्न झाली, तिने त्या वाड्यात जाण्याच ठरवलं,ती गेली आणि सगळं विधिपूर्वक पूजा करून शांती करून घेतली आणि फोटोसमोर हात जोडत म्हणाली,


“आजी या जन्मात आपली भेट होऊ शकली नाही पण पुढल्या जन्मी तुम्हीच माझी आजी बनून या, तुमची नात व्हायला मला खूप आवडेल, आणि तुमच्यासोबत जिलेबी खायला सुद्धा..”


मीराच्या पूजेने आजीच्या आत्म्याला शांती मिळाली..आणि कायदेशीर तो वाडा विकत घेऊन अजिंक्य आणि मीरा तिथे वास्तव्यास गेले..


समाप्त:



ही रहस्यमय कथामालिका  तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका, तुमचा एक लाईक लिहिण्यास प्रोत्साहन देऊन जात...लाईक नक्की करा.

धन्यवाद