Nov 30, 2021
थरारक

शापित वळण!

Read Later
शापित वळण!

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

त्या शापित वळणावर  ,ती उभी आहे  प्रतिक्षेत . . आजही. . किती आशा तिला. . त्याच्या येण्याची?
तो येईल. . कधीही. . केव्हाही ,कदाचित आजही!
सुखी संसाराचं स्वप्न उरी बाळगून जाणार्‍या  त्या दोघांना   या वळणाने तर अपघातात विलग केलं कायमचं!
तिच्या शरीराचा चेंदामेंदा झाला पण आत्मा घुटमळली.
तो दवाखान्यात. . मृत्युच्या दाढेत!
किती वाट पहायची त्याची. . ?
ती घुटमळतेय त्याच वळणावर अजूनही!
पण तो येईपर्यंत  मात्र येणार्‍या  कुठल्या ना कुठल्या तरूणाला ती बोलावतेच तिच्याकडे. . तोच आहे असं समजून. . ते आंधळं वळण शापित झालंय आता. . त्याचं नामकरणच झालय. . शापित वळण असं!
जोडपी भीतातच तेथून जायला. . पण ही अजूनही तिथेच . . त्या शापित वळणावर. .!
त्याच्या प्रतिक्षेत. . तो येईल ही आशा. . कधीही. . केव्हाही, अगदी आतासुद्धा!

© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे, सखी
दिनांक ०४. ०२.२१

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 24 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.