शापित अप्सरा भाग 44
मागील भागात आपण पाहिले की सुगंधा मंदिरात जायला नकार देते. केशर तिला काही नियम आणि धोके समजावते. तर तिकडे गुणवंताबाई काही क्रूर मनसुबे रचत आहेत. आता पाहूया पुढे.
देवीची यथासांग पूजा आटोपून सगुणाबाई आणि सुभानराव बाहेर आले. सगळा गाव त्यांचा आदर करत होता. सगुणाबाई हे सगळे पाहून सुखावल्या होत्या. तेवढ्यात एका बाईचे बोलणे त्यांच्या कानावर आले.
"गंगे,नवरा वाटून घ्यायचा यासारखी दुसरी जखम नाही बाईच्या जातीला."
सगुणाबाईंनी हे शब्द ऐकताच त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला. त्या सरळ जाऊन मेण्यात बसल्या. भोई मेणा उचलून चालू लागले आणि मग त्यांनी आपल्या अश्रूंना रोखले नाही.
इनामदार घराण्यातील पुरुषांची भ्रमर वृत्त्ती त्यांना कायम अस्वस्थ करायची. सुगंधाच्या रूपाने आपल्या सुखात आलेला भागीदार सगुणाबाईंना सहन होत नव्हता. काहीही झाले तरी सुगंधा ह्या महालात फार काळ राहता कामा नये. त्यांची विचारांची आवर्तने थांबत नव्हती. मेणा संथ लयीत पुढे चालत होता.
"सुभानराव, चला. मंदिरातले विधी संपले." गुणवंताबाईंचा आवाज ऐकताच सुभानराव भानावर आले.
"आम्ही जरा शास्त्रीबुवांशी बोलून येतो."
त्यांनी उत्तर दिले.
त्यांनी उत्तर दिले.
"आता काय बोलायचे आहे? जागरण गोंधळ मुहूर्त काढता काय?"
गुणवंताबाई खोचकपणे म्हणाल्या.
गुणवंताबाई खोचकपणे म्हणाल्या.
"आम्ही इनामदार आहोत. आम्हाला काय बोलायचे ही प्रत्येक गोष्ट सांगण्यास आम्ही बांधील नाही."
सुभानराव गरजले.
सुभानराव गरजले.
गुणवंताबाई संतापाने बाहेर पडल्या.
गंगाधर शास्त्री पूजाविधी आटोपून बाहेर आले. सुभानराव मागे थांबलेले पाहताच त्यांनी ओळखले काहीतरी खास कारण असणार. सुभानराव आणि गंगाधर शास्त्री मंदिराच्या आत असलेल्या गुप्त दालनात गेले.
"बोला सुभानराव बोला. इतके अस्वस्थ का आहात तुम्ही?"
शास्त्री म्हणाले.
"महाराज,मी सुगंधाला महालात आणले तरी माझ्या मनात एक अनामिक भीती आहे."
सुभानराव बोलून गेले.
"भीती कसली? कोणापासून?"
गंगाधर शास्त्री सावध झाले.
"तुम्ही इनामदार घराण्याचे अनेक पिढ्या पुरोहित आहात आणि वंशावळ देखील लिहीत आहात. तुमच्यापासून काही लपलेले नाही."
सुभानराव अंदाज घेत होते.
"सुभानराव,आमचे काम फक्त नोंदी ठेवायचे आहे."
गंगाधर शास्त्री तोलून एकेक शब्द बोलत होते.
" त्याबद्दल मला आदर आहेच. पण आजवर इनामदार पुरुषाने केलेल्या दुसऱ्या लग्नातून एकदाही वंश वाढला नाही हे सत्य आहे ना?"
इनामदार थोडेसे थांबले.
" तुम्ही ह्या गादीचे मालक आहात. सत्य तर तेच आहे."
गंगाधर शास्त्री म्हणाले.
"मग ह्या सगळ्या स्त्रिया गेल्या कुठे? एकही स्त्री आई झाली नाही हे कसे शक्य आहे?"
सुभानराव एकापाठोपाठ एक प्रश्न विचारत होते.
" काही रहस्य त्या महालाच्या आत बंद आहेत. आमच्यापासून खूप दूर."
शास्त्री हळूवारपणे म्हणाले.
"गंगाधरराव आम्हाला सुगंधा हवी आहे आमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत."
सुभानराव निर्धाराने म्हणाले.
"मी यात काय मदत करू?"
गंगाधर शास्त्री सावध झाले.
"मला फक्त मागच्या सगळ्या नोंदी हव्या आहेत."
सुभानराव म्हणाले.
"ठीक आहे. पण अत्यंत गुप्तपणे त्या पाहता येतील. आज रात्री ह्याच मंदिरात."
एवढे बोलून शास्त्री बाहेर पडले.
सुगंधा ध्यानाला बसली आणि तिला आसपास नकारात्मक ऊर्जा जाणवू लागली. काहीतरी अतृप्त असे आसपास असल्याची जाणीव तिला होत होती. ध्यान संपवून ती तशीच केशरला भेटायला गेली.
"केशर,आता मी ध्यानात असताना.."
"तुला आसपास नकारात्मक ऊर्जा जाणवली ना?"
केशरने उत्तर दिले.
केशरने उत्तर दिले.
"म्हणजे तुलाही तेच जाणवले तर?"
"हो,म्हणूनच अमर होण्याचा ग्रंथ लवकर सुरक्षित ठेवायला हवा." केशर म्हणाली.
"केशर,तू तो ग्रंथ बरोबर घेऊन जा." सुगंधाने सुचवले.
"नाही,सुगंधा तुझ्याएवढ्या शक्ती कोणाकडेही नाहीत. तो ग्रंथ घेऊन प्रवास करणे शक्य नाही."
केशर आपली असमर्थता व्यक्त केली.
"म्हणजे तू जाणार आहेस तर?"
"हो अजून पंधरा दिवसांनी. त्या आधी ही आपल्याला झालेली जाणीव काय आहे शोधुया."
केशरने सुगंधाला आश्वस्त केले.
इकडे सगुणाबाई महालात शिरल्या आणि त्यांनी स्वतः ला पलंगावर झोकून दिले. आतापर्यंत रोखून धरलेले उसने अवसान गळून पडले आणि त्या आक्रोश करू लागल्या.
त्यांच्या पाठोपाठ आलेल्या गुणवंताबाई आत आल्या. त्यांनी दालनात असलेल्या सगळ्या दासी बाहेर काढल्या आणि दरवाजा बंद केला.
"सूनबाई उठा. रडणे थांबवा."
अत्यंत करारी आवाजात गुणवंताबाई म्हणाल्या.
सगुणाबाई रडणे थांबवून उठल्या.
"आता एवढेच आमच्या हातात आहे."
सगुणाबाई खोल आवाजात म्हणाल्या.
"सगुणाबाई तुम्ही इनामदार घराण्याची सून आहात. अशा अनेक बाया येतात आणि जातात."
गुणवंताबाई गरजल्या.
"आत्या,पण आता काय करावे? सुगंधा नावाची माझ्या संसाराला लागलेली कीड कशी संपवू."
सगुणाबाई चिडल्या.
"नीट ऐका सूनबाई,आजपासून फक्त एकच करायचे जेव्हा सुभानराव तिच्याकडे जातील त्यावेळी तिथे गेलेल्या विड्यात मी दिलेली वस्तू टाकायची."
क्रूर हसत गुणवंताबाई म्हणाल्या.
" काय आहे ती वस्तू? त्याने काय होईल?"
सगुणा अधिरतेने म्हणाली.
"सुनबाई,पुरुषाला बाई जवळ आल्यावर त्याचे पुरुषपण साजरे करायचे असते. ते अपुरे राहिले की तो आपोआप दूर होत जातो. सध्या एवढेच ध्यानात ठेवा."
गुणवंताबाई जाताना एक कुपी देऊन गेल्या.
सुभानराव आणि सुगंधा बराच वेळ बोलत होते.
"सुगंधा,आम्ही आज जरा महत्वाच्या कामासाठी जातोय. चालेल ना?"
सुभानराव तिचा हात हाती घेत म्हणाले.
"मी इथे सुरक्षित आहे. तुम्ही काळजी करू नका. माझ्यासाठी कामेही थांबवू नका."
सुगंधा त्यांना समजावत होती.
"कदाचित रात्री आम्ही येणार नाही. सांभाळून रहा."
सुभानराव बाहेर पडले.
त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. त्यांनी गावाजवळ येताच घोडा तिथेच सोडला आणि आपला पाठलाग होत नाही याची खात्री केली. दुरून देवीच्या मंदिराचा कळस दिसत होता. गंगाधर शास्त्री तिथे वाट पहात उभे होते. सुभानराव येताच त्यांनी मंदिराच्या मागील बाजूला यायची खूण केली.
मागच्या बाजूने वर चढून गेल्यावर त्यांनी कळसाच्या जवळ येताच त्यांनी गुप्त कळ दाबली आणि वर जाणारा जिना उघडला.
वर जाताना सुभानराव आश्चर्याने बघत होते. सात वेगवेगळी चिन्हे दिसत होती. वर एक छोटी खोली होती. त्यात पुष्कळ ग्रंथ ठेवलेले होते.
"गंगाधरराव, आता वर येताना जी चिन्हे दिसली त्यांचा काय अर्थ आहे?"
सुभानरावांनी विचारले.
" तो एक गुप्त मंत्र आहे. तंत्र विद्येतील एक महान ग्रंथ वाचण्यासाठी हा मंत्र माहीत असणे आवश्यक आहे."
शास्त्री म्हणाले.
"पण मग असा मंदिराच्या आत तो का कोरला आहे? मंत्र ग्रंथात लिहिलेला हवा ना?"
"सुभानराव,जगात काही अघोरी शक्ती आहेत. त्यांच्याशी लढणारे योद्धे अशा प्रकारे त्यांचे ज्ञान संरक्षित करत. आजवर हा मंत्र वाचायची गरज आम्हाला पडली नाही. परंतु आमच्या प्रत्येक पिढीतील मुलाच्या अंगावर तो गोंदला जातो. जर मंदिर काळाच्या ओघात नष्ट झाले तरी हा मंत्र सुरक्षित रहावा."
"ठीक आहे. आता मला सांगा इनामदार घराण्यात आलेल्या ह्या स्त्रिया कुठे गेल्या आणि त्यातील एकही स्त्री आई का झाली नाही?" सुभानराव नजर रोखत बोलले.
"सुभानराव,आजपर्यंत आलेल्या स्त्रिया महालात आल्यावर एक वर्षाच्या आत महाल सोडून गेल्या किंवा गायब झाल्या. त्यामध्ये एकच स्त्री महालात जवळपास पाच वर्षे टिकली."
गंगाधर शास्त्री बोलत होते.
गंगाधर शास्त्री बोलत होते.
"पुतळा...बरोबर ना?"
सुभानराव पटकन बोलून गेले.
"हो,मागील पिढीचे मला माहित नाही पण तुमचे वडील माझे खूप जवळचे मित्र होते. त्यामुळे मी तुम्हाला त्याबाबत सांगू शकेल."
"अशी काय गोष्ट आहे?"
सुभानराव अधीर झाले होते.
"ऐका तर,पुतळा ह्या महालात आल्यावर त्यांचे तसे संबंध येऊच शकले नाहीत."
गंगाधर शास्त्री एकदम शांत झाले.
"काय? कसे शक्य आहे?" सुभानराव ओरडले.
"हो,कारण जेव्हा ते महालाच्या बाहेर असत तेव्हा त्यांचे संबंध अगदी सामान्य असत. त्यानंतर तुमच्या वडिलांनी महालातून बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर काय झाले सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे जे काही आहे ते महालातून होते एवढे लक्षात ठेवा."
गंगाधर शास्त्री गप्प झाले.
"गंगाधर शास्त्री, सुगंधा याचा बळी होता कामा नये."
सुभानराव काळजीने म्हणाले.
"सुभानराव सुगंधा नक्कीच सामान्य नाही. मला तिच्या आसपास असामान्य ऊर्जा जाणवते. तरीही तुम्ही सगळ्याचा शोध घ्या आणि सावध असा."
सुभानराव बाहेर पडले.
सुभानराव बाहेर पडले.
स्मशानात चिता जळत होती आणि ती मोठ्याने मंत्र उच्चारण करत होती. मंत्र विधी पुढे जाऊ लागला आणि तिचा कापलेला हात पुन्हा उगवू लागला.
"सुभानराव इनामदार मी सोडणार नाही तुला. लवकरच तुझ्या संपूर्ण घराण्याचा मी नाश करेल."
चितेची उष्ण राख हातात घेत ती रागाने ओरडली.
तिने स्माशनाच्या बाहेर पाऊल ठेवले आणि तिचे रूपांतर एका सामान्य खेडूत स्त्रीमध्ये झाले. एक संकट इनामदार महालाच्या दिशेने झेपावू लागले. तर इकडे सुभानराव महालात नक्की काय घडते याचा शोध घ्यायचा असा निर्धार करूनच मंदिराच्या बाहेर पडले.
केशर आणि सुगंधा ग्रंथ कुठे ठेवतील?
सुभानराव रहस्य शोधू शकतील का?
सगुणाबाई त्यांच्या योजनेत यशस्वी होतील?
चेटकीण नक्की आहे तरी कोण?
वाचत रहा.
शापित अप्सरा.
©®प्रशांत कुंजीर.
©®प्रशांत कुंजीर.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा