Feb 23, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

* शपथ...*

Read Later
* शपथ...*


शपथ......एका संघर्षाचा शेवट,दुसऱ्या संघर्षाची सुरवात ...!!


विनय आणि संध्या च्या लग्नाला दोन वर्ष झाली होती.
रोज सकाळी सोबतच कामाला जायचे आणि सोबतच घरी यायचे.
सासू घरात असतानाही संध्याने तिच्या दीड वर्षाच्या बाळाला सांभाळण्यासाठी केअर् टेकर ठेवली होती.

संध्या काळच्या पुढे किचन आणि तिच्या बाळाला ,संध्या च सांभाळायची.
संध्याला घरी सोडून ,विनय लगेच बाहेर जायचं.
रात्री उशिरा यायचा तेव्हा संध्या आणि तिचे बाळ झोपलेले असायचे.

" अरे विनय बाळा,आज उशीर झाला का रे तुला..." संध्याची सासू बडबडत दार उघडायची.
" ताट करू का,रे बाळा ..? जेवतोस ना बाळा..? की आलास बाहेरून खाऊन...? अशी चौकशीही करायची.

मुड प्रमाणे,कधी जेवायचा तर कधी " नको" म्हणून लगेच बिछान्यात जाऊन उताणा पडायचा..
विनय चे बाहेर जाणे दिसेंदिवस वाढतच चालले होते....
आणि बाहेर पत्ते खेळण्याचा खर्च ही वाढतच चालला होता....
बँक बॅलन्स हळू हळू कमी होत होत,संपत गेला होता....
संध्याची चिंता वाढत चालली होती.....
" संध्या आज मला थोडे पैसे दे ग, उद्या परत देतो तुला....."
आता हे नेहमीचेच व्हायला लागले होते......
पैसे द्यायचे पण परत मिळण्याची आशा सोडावी लागायची....

" विनय,आज माझ्या कडे पैसे नाहीत,तुझे तू संपवतोस आणि माझ्या पगारात पूर्ण महिना काढावा लागतो.इथून पुढे पैसे मागत जाऊ नकोस मला.मी देणार नाही...."

" संध्या आज फक्त मला दोन हजार दे, उद्या खरंच तुला परत देतो."

" नाहीयेत विनय...."

" बरं उद्या तुला दोनचे चार देईन...."

" अरे नाही आहेत ,विनय सांगते ना.."

" संध्या हे बघ, आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, उद्या नक्की परत देतो.......
......असे बोलत विनय ने संध्या च्या कडेवर असलेल्या शोनू बाळाच्या डोक्यावर हातच ठेवला.....


हे बघताच संध्या चा राग अनावर झाला.ती पोटतिडकीने ओरडली.....
....." विनय बाजूला हो आमच्या पासून....!!!!!!"

संध्याचा चढलेला पारा बघून,विनय चा अहंकार भलताच दुखावला.

त्याने कसलाही विचार न करता, सनकन संध्या च्या कानाखाली लावून दिली.....,

अन् ती काही बोलणार ,इतक्यात चालता झाला...

संध्या एकदम निर्विकार झाली होती.
तिने कडेवरच्या शोनू बाळाला खाली ठेवले.
आणि पटापट कपाटा तले कपडे काढून बॅगा भरल्या.आणि तशीच बाहेर जायला निघाली.

" अग संध्या,हे काय .कुठे निघालीस !?? बाहेर बसलेल्या सासू ने विचारले......

" आई आम्ही चाललोय ह्या घरातला जीवन संघर्ष संपवून,नवीन संघर्षाची सूर्वात करायला..."
" संध्या....अशी कशी अचानक चाललीस.....??"

" आई,मी मनाने तर फार आधीच गेले होते,आताफक्त शरीराने जाताना तुम्हाला दिसत आहे......"

" संध्या,अग विनय बाळ आल्यावर काय सांगू मी त्याला,काय वाटेल त्याला,कसे सांभाळू मी त्याला.....????

" मी पण तेच ठरवलंय आई, ज शी तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी आहे ना,तशी मला पण माझ्या शोनू बाळाची काळजी आहे.हे मी तुमच्या कडूनच शिकले आई..."
" संध्या तू असे कसे बोलू शकतेस....??

" आता तुमच्या विनय बाळाची आणि माझी भेट कोर्टातच होईल.कायद्याच्या संमतीने मी हे करू शकते.मी आधीच दिवोर्स साठी अर्ज केलेलचा आहे.""

" संध्या..... संध्या....!!!!!"

" अरे शोनू बाळा,बाय बाय करा आज्जीला ...."""

असे बोलत बोलतच संध्या ने \" मनाने तुटलेल्या नात्यांचा \"जिना उतरलाही होता...
......परत कधीही न चढण्यासाठी.....!!!
©™ Sush.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sush

Writer.Blogger.

Something Different

//