** शांता आत्या भाग एक

स्त्रियांची नाती

राज आणि राणी.एक नव विवाहित जोडपे.दोघेही जॉब करणारे लग्नानंतर जॉब साठी म्हणून पुण्यात रहायला आले होते. " थोडेसे स्थिरस्थावर झाले की,आम्ही येऊच तुमच्या भेटीला ,असे आश्वासन राजच्या आईने दिलेच होते दोघांना . पुण्या मध्ये वन बी एच के फ्लॅट आधीच बुक करून ठेवला होता.लग्ना नंतर च्या मजेच्या,हिंडण्या फिरण्याच्या सुट्ट्या नंतर लगेचच दोघे तिकडे शिफ्ट झाले होते. त्या दिवशी राणी सकाळ पासून च छान,फ्रेश मुड मध्ये होती.कारण त्या दिवशी तिचे सासरचे म्हणजे राज चे आई, पपा,मोठा भाऊ,त्याची बायको,त्यांच्या छोट्या ला घेऊन राज आणि राणी ला भेटायला येणार होते. राणी तशी अगदी लहान पना पासून च हौशी , चलाख,अन् होतकरू ही होती.नवीन संसार,चांगल्या रीतीने मॅनेज करू शकेल ,असे शिक्षण आणि संस्कार तिच्या कडे होतेच.त्यामुळे दोघांच्या ही घर वाल्यांना तशी फारशी काळजी करण्याचे कारण नव्हते . सकाळी सकाळी लवकर उठून ,राणीने पटकन कामाला सुर वात ही केली.सासरचे लोक घरी येण्याच्या आतच सगळ आटोपून बसायचे ,छान हसत मुखाने स्वागत करायचे ,व्यवस्थित पाहुणचार करायचा ,सगळ्यांकडून कौतुकाची थाप मिळवायची असा राणीने मनोमन बेत योजलाच होता. प्रथम दर्शनी सुंदरसा मोठा हॉल ,मध्यवर्ती किचन रूम आणि लागूनच बेड रूम,बेडरूम ला हवेशीर गॅलरी ,अशी छान आरेंज मेंट होती. स्पेशल मेनू काय करायचा हे राज आणि राणी दोघांनी ठरवले आणि त्याप्रमाणे राज थोडेसे स्नॅक्स आणि मिठाई घेऊन येण्यासाठी बाहेर गेला. राणीने ही लगोलग कामाला सुर वात केली.आणि कोणालाही काहीही बोट दाखवायला किंवा शंका ,काळजी करण्यास जागा सोडायची नाही,अशी तिची सुंदर इच्छा होती. मस्त गाण्यांची रेकॉर्ड लावून ,स्वयंपाकाचे पाहिले प्रिप्रेशन चे काम हवेशीर गॅलरीत करावे म्हणून ,स्वयंपाकासाठी लागणारे सगळ्या वेजीस( भाज्या ,मसाले) घेऊन गॅलरीत येऊन बसली. एकदा का निवडणे,टिपणे,कापणे,चिरणे,ही आधीची कामे झाली की,किचन मध्ये जाऊन पटापट फोडण्या देऊन टाकू असा विचार तिने केला. कांदा,लसूण, कोथांबिर,टोमॅटो,काकडी,अन् लागणारी सर्व जिन्नस गॅलरीच्या दारात घेऊन बसली. मनावर कसलेच टेन्शन ,तणाव,नव्हते.मस्त गाणी एका बाजूने ऐकू येत होती.दुसऱ्या बाजूने सकाळची सुंदर फ्रेश हवा रूम मधील वातावरण आल्हाद दायक करत होती. निवडणे,कापणे,जवळ जवळ पूर्ण होत आले होते. तेव्हड्यात वाऱ्याची एक छोटीशी जोराची झुळूक आली.राणीने कापून ठेवलेले कांदा लसणाचे टरफले हवेने वरच्या वर उडाले.आणि काही पटकन हालचाल करण्याच्या आतच वाऱ्याची दुसरी जोरदार झुळूक परत रूम मध्ये आली ,आणि कांद्याची टरफले आता ह्या वेळेस जरा जास्तच वेगाने घरभर अस्ताव्यस्त उडून पसरली गेली...... कथेचा पुढील भाग वाचूया भाग -२ . ©® Sush.

🎭 Series Post

View all