** शांता आत्या..**भाग -३

स्त्रियांची नाती


मला ह्या शांता बाई बद्दलभेटण्याआधी वाटायचे की,फेमिनिझम फक्त उच्चभ्रू,उच्चशिक्षित, कार्पोरेट,स्त्रियांच्या मधेच दिसून येते.कारण ह्यास्त्रिया पुरुषप्रधान संस्कृती विरोधात काहीतरी लढा तरी देऊ शकतात.त्यांच्या तल्या आत्म् निर्भय ते मुळे त्यांना कदाचित हे शक्य होत असावं.पण शांताबाई ला ओळखण्या नंतर माझे मत पूर्ण पने बदलून गेले.प्रत्येक स्त्री ही जशी जन्मतःच स्त्रीत्व,ममता,जिव्हाळा घेउन जन्म घेते ,तशीच ती जन्मतःच तिचे अस्तित्व,आत्मसन्मान,घेऊनच जन्माला आलेल्या असते.स्त्री मध्ये फेमिनिस्ट पना म्हणजे स्त्री वादी पना हा अंगभूत च असतो.फक्त तो दाखवण्याचे प्रकार आणि उद्येश भिन्न असतात. पण असतात मात्र नक्कीच.

किती ही छोटीशी गोष्ट ,पण किती मनाला किती चटका लावुन जाते.माधुरी आणि आईलाही हे चांगले पटले.त्यांच्या मनाने त्यांना काय ग्वाही दिली कुणास ठावूक....
माधुरीने तर मनातल्या मनात ठरवलं की,ती परत सासरी किंवा नवऱ्या कडे गेल्यावर तिच्या घरी बाळाला सांभाळणाऱ्या वा मदतनीस असणाऱ्या ना आत्या च म्हणायचे.....आत्या सुध्दा कुणाचीतरी मावशी,आई असतेच की,तिच्यात ही जिव्हाळा,ममता,आपलेपणा असतोच की.....
बघुया तरी प्रत्येक घरातील पुरुष वर्गाचे काय म्हणणे आहे यावर......त्यांची प्रतिक्रिया बदलू शकते का.......एकच स्त्रीच्या नात्यांची नावे बदलून पुरुषी अहंकाराला स्त्रियाचीच ही नात्यांची नावे ही जबाबदार तर नसतील ना....... पुरुष्रधान व्यवस्था विरूध्द लढा देणाऱ्या आपणच स्त्रिया आज पर्यंत आपल्याच घरातून पुरुष प्रधान संस्कृती मात्र चांगली जोपासत तर नाही ना......???

पुरुषां सोबत भांडताना स्त्रिया नेहमी एक वाक्य बोलतात च की,तुला आई बहीण नाही ये का.?याचा सरलसोपा अर्थ असतो की,पुरुष स्वतःचे आई बहिणीचा जितका आदर करतात तितका स्त्रियांच्या नात्यांचा करत नाहीत......स्त्रियांना त्यांच्या नात्यानं प्रमाणे वेगवेगळी वर्तणूक केली जाते..जसे की,एकच घरातील आई,बहिण,आणि पत्नी...,.पण स्त्रिनी मात्र आज पर्यंत पुरुषांना त्यांच्या नात्यांच्या नावाप्रमाणे न वागवता सगळ्यांना सारखाच आदर, मान,सन्मान दिला आहे ....जसे की स्त्री जितका मान तिच्या पतीला देते तितकाच वडील अन् भावाला ही देत असते.....!!!
आच्छा तर शांता आत्या संध्याकाळचा चहा तरी घायला हरकत नाही ना तुमची."
आणि आई,माधुरी, पपा अन् माधुरीचा भाऊ,आणि शांता आत्या चहा घ्यायला लागले...- *सुश्मा*

🎭 Series Post

View all