Login

शांत

Shant
शांत

शांत झालेल्याला ठेवायला जातात
जिवंत असताना मरण यातना देतात

सगळ संपल्यावर शब्दांना अर्थ नाही
असतांना बोलण्यास शब्द नाही

पैशाच्या बाजारात माणसाला किंमत नाही
जवळच्याला पैसा परत आणू शकत नाही

चार प्रेमाचे शब्द औषध नाही का
साधस जेवण पार्टी होत नाही का

थोड हसून विनोदाने विसरला असता वेदना
आजकाल नाही समजत बऱ्याचशा संवेदना

विसरून थोडे जास्त सहन केल असत
औषधांच काम प्रेमाने झाले असत

कदाचित थोडे दिवस तुमच्या सोबत राहिला असता
काही दिवस जवळच्यांना आधार मिळाला असता