शमिका भाग २

शमिका व्याकुळ झाली होती .कोणी तरी जुनी जखम ओरबडून काढत असल्याचे तिला जाणवत होते.स्वतःच्याच खांद्यावर मान ठेवता आली असती तर किती बरं झालं असतं?किती व्याकुळता आणि किती ही लाचारी अश्या मुलीच्या वाट्याला जी नेहमीच सरळमार्गी चालत राहिली. काय घडलं होतं असं की शमिका आज यशस्वी असूनसुद्धा जुन्या आठवणीने व्याकुळ होत होती.
शमिका व्याकुळ झाली होती .कोणी तरी जुनी जखम ओरबडून काढत असल्याचे तिला जाणवत होते.स्वतःच्याच खांद्यावर मान ठेवता आली असती तर किती बरं झालं असतं?किती व्याकुळता आणि किती ही लाचारी अश्या मुलीच्या वाट्याला जी नेहमीच सरळमार्गी चालत राहिली. काय घडलं होतं असं की शमिका आज यशस्वी असूनसुद्धा जुन्या आठवणीने व्याकुळ होत होती.


शमिका शांत झाली आणि विसावली अश्या भूतकाळात जो खूप आनंदी होता.असणारच तिला मिळालं होतं तिचं प्रेम .हो प्रेम.


विराज आला होता आयुष्यात. तो तिच्या कॉलेजचाच होता .कॉलेजमध्ये एडमिशन घेत असतानाच त्यांची ओळख झाली.ओळखही अशी की अगदी चित्रपटाला शोभेल अशी.शमिका कॉलेजमध्ये एडमिशन घ्यायचे म्हणून अगदी सकाळीच उपाशी पोटी रवाना झाली.कॉलेजमध्ये गेली पाहते तर भलीमोठी रांग होती.तब्बल दोन तास कॉलेजच्या रांगेत उभी राहिल्यावर तिला एकाएकी चक्कर आली आणि ती खाली पडणार तोच तिच्या पाठी असलेल्या मुलाने तिला सावरलं. त्याने पटकन त्याच्याजवळ असलेल्या बॉटलमधलं पाणी तिला पाजलं .शमीकाला जरा बरं वाटलं आणि ती उठून बसली.


ज्या मुलाने मदत केली त्याचे तिने आभार मानले.

शमिकाची मैत्रीण विभा धावतच आली.

शमिका खाली बसली हे पाहून तिने शमिका अशी का बसली म्हणून विचारले.


" काही नाही थोडी चक्कर आली गं" शमिका म्हणाली.


"बरं ,आता ठीक आहेस ना तू "
विभा म्हणाली..

"हो गं, आहे ओके मी, हे जे पाठी उभे आहेत त्यांनी मला पाणी पाजले.. " त्या मुलाकडे पाहून शमिका म्हणाली..


तो मुलगा म्हणाला..

"माझं नाव हे नाही हा मिस"

शमिका आणि विभा दोघींना हसू आले..

दोघी एकेमकिंकडे पाहू लागल्या..

तो मुलगा म्हणाला: "माझे नाव विराज"

"माझं नाव शमिका" शमिका म्हणाली.

"माझं विभा" विभा म्हणाली..


"विराज तुमचे खूप खूप आभार" शमिका म्हणाली..

"आभार ठीक आहे पण तुमचे नको म्ह्णू..तू म्हण.तसही आपण एका वयाचे आहोत.."


"Sure" शमिका म्हणाली.

विराजने हात मिळवण्यासाठी हात पुढे केला.
आणि म्हणाला "फ्रेंड्स?"जर तुम्हा दोघींची हरकत नसेल तर..

विभा आणि शमिका एकमेकीकडे पाहू लागल्या.

दोघी एकेमकींकडे पाहत आहे हे पाहून विराज पटकन म्हणाला "ईट्स ओके, जर तुम्हाला मैत्री नको असेल तर"


विभा:"नाही नाही,असं काही नाही"

तिने विराज बरोबर हात मिळवला
शमिकानेसुद्धा हात मिळवला..

तिघांची आता मैत्री झाली होती.


ऍडमिशन झाले. विभा आणि शमिका दोघीही घरी जायला निघाल्या. विराज आला.

विराज:"आपण बाहेर चहा घेऊया का?"


विभा:"हो चालेल"

शमीका:"अगं विभा नको, आधीच उशीर झाला आहे".


विराज:"शमिका ,असंही तुला चक्कर आली होती.. थोडंस तू खाऊन घे .म्हणजे तुला बरं वाटेल"


विभा त्याला दुजोरा देत म्हणाली:"हो ,विराज बरोबर बोलतो आहे, आपण थोडं खाऊन घेऊयात.तुला बरं वाटेल"


शमिका:"चालेल"


तिघेही कॉलेजच्या कँटीनमध्ये गेले.विराज ऑर्डर देण्यासाठी गेला.

इथे शमिका विभाला म्हणाली :"अगं काय गरज होती गं तुला हो ला हो करायची"


विभा:"का काही चुकीचे बोलले का मी"

शमिका:"अगं ,आपण दोघी कुठेतरी गेलो असतो ना .तुला माहीत आहे ना मला मुलांसोबत कम्फर्टेबल वाटत नाही"


विभा:"okk, काय गं शमिका ..आता तू काय लहान राहिली आहेस का?.तू गर्ल्स स्कूल मध्ये होती हे मला माहीत आहे .पण आता तू कॉलेजमध्ये आली आहेस .हे असे चालणार नाही हा.तुला स्वतःमध्ये बदल करायला लागणारच. हे असे लाजाळू सारखं राहायचे नाही आता.आणि असंही तुझं काय विराजसोबत लग्न लावायला आणलं नाही .इथे आपण फक्त नाश्ता करायला आलो आहोत. सो तू रिलॅक्स रहा


शमिका:"ए विभा, तू जरा हळू बोल गं.काहीही काय बोलते"

"रिलॅक्स डिअर " विभा खांदे उडवत म्हणाली


तोच पाठून विराज ऑर्डर घेऊन आला.


विराज:"काय ,माझी चर्चा चालू आहे की काय ?"


शमिका:"नाही नाही, आमच्या दुसऱ्या गप्पा चालू आहेत"


विराज:"गम्मत केली हा"

विभाने वीराजची चौकशी करायला सुरवात केली..

विभा:"तू कुठे राहतोस?

विरज:"मी दादरला राहतो आणि तुम्ही दोघी ?

विभा:"आम्ही परेलला"

विराज:"ओहह ,ग्रेट म्हणजे आपण बाजूबाजूला राहतो की"

विभा:"हो ना,आपण शेजारी आहोत, ये कधी घरी"


विराज:"हो नक्कीच,बरं निघू का मी आता ?जरा महत्वाचे काम आहे.लवकरच भेटू आपण कॉलेज सुरू झाल्यावर,बाय "



विराज निघून गेला.


शमिका तोंड पाडून होती.

विभा:"शमिका काय झाले, तू तोंड पाडून का बसली आहेस ? विराज गेला म्ह्णून"

शमिका :"काहीही हा विभा"

विभा:"बरं, चल सांग काय झाले?"


शमिका:"अगं ,तो विराज मघाशी असं का म्हणाला आपल्याला की माझी चर्चा चालू आहे, त्याने आपलं बोलणं तर ऐकले नाही ना??जर ऐकले असेल तर काय वाटेल त्याला.छे काय हे... तुला पण नाव विभा खरंच कळत नाही गं, काय गरज होती त्याचे नाव घ्यायची?"


विभा:"हो हो शांत हो शमिका.इतकी का तू पसेसिव्ह होत आहेस. ऐकलं तर ऐकू दे..त्याने काय फरक पडणार नाही.."


शमिका:"म्हणजे खरंच त्याने ऐकले असेल का?


विभा जोरजोरात हसायला लागली.

"अगं नाही गं ,तो खूप लांब उभा होता, त्याला कसं ऐकू येणार. काळजी करू नको"


शमिका:"खरंच ना??

विभा:"हो शंभर टक्के खरं"

शमिका:"नशीब, त्याने ऐकले नाही.. नाही तर त्याने काय विचार केला असता.."

विभा:"शमिका ,तू किती विचार करतेस गं. खूप म्हणजे खूपच विचार करतेस बघ.इतका विचार करणे चांगले नाही हा..शरीरासाठी आणि मनासाठीही.तू जर अशीच राहिलीस तर तुझा निभाव कसा लागणार?"


शमिका म्हणाली विभा मी अशीच आहे गं" मला जास्त विचार करायची सवयच आहे आणि विचार करता करता मी असा विचार करते की, मला खूप टेन्शन येतं मला समजतच नाही की मला कुठे थांबायला हवं पण काय करू मी खुप प्रयत्न करते स्वतःच्या विचारांवर कंट्रोल ठेवायचा पण होतच नाही बघ.

विभा म्हणाली "तू काही आता काळजी करू नको ते तू माझ्यावर सोड मी तुला शिकवेल की टेंशन फ्री कसं राहायचे.

विभा म्हणाली "शमिका उद्या संध्याकाळी तुला घरी यायचा आहे "
उद्या काय आहे? शमिका म्हणाली वाटलंच मला तुला असेही काही लक्षात राहत नाही विभा लटक्या रागातच तिला म्हणाली शमिकाने जीभ चावली आणि म्हणाली "विभा आय एम सॉरी मी या वेळीही विसरले .तुझा वाढदिवस आहे ना उद्या"


विभा:" सॉरी आता राहू दे ;पण उद्या तुला यायचं आहे हे विसरू नकोस . मी नक्की येईल अजिबात विसरणार नाही .

विभा म्हणाली
"बरं तू आता माझ्यासोबत येते आहेस का?

शमिका : "कुठे?"


विभा गंभीर चेहरा करत म्हणाली .."अगं मी खूप दिवस झाले हाच विचार करत होते तुला सांगू की नको..पण आता सांगते.. हो पण तू कोणालाही सांगणार नाहीस हे वचन दे आधी..

ते ऐकून शमिका खरं तर टेंशन मध्ये आली ,ही काय बोलणार आहे..

विभा शांत बसली.

शमिका :"अगं ,विभू काय सांगणार होतीस ते सांग"


विभाने शमिकाचा हात पकडला. आणि म्हणाली:"विभा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, त्याचीच ओळख करून द्यायची आहे"


शमिका:"अगं वेडी झालीस की काय, काय हे तुझं नवीन खेगांट विभा,तू खरंच बोलते आहेस का की गम्मत करते आहेस"


विभा:"अगं, शमिका काय गं मी ह्या बाबतीत मस्करी करेल का?


शमिका:"विभा,तू ना फुल्ल कॉम्प्लिकेटेड आहेस, मला तर ना तुझ्याशी कसं बोलायचे आणि कसे वागायचे ते कळतच नाही बघ"


विभा:"तू माझं ऐकणार आहेस का??


शमिका:"बोल आता"

विभा:"तो ना माझ्या एरियात राहतो, कॉमन फ्रेंडमुळे आमची ओळख झाली. पहिल्यांदा त्याला पाहिलं तर मी त्याच्या प्रेमात पडले खूपच हँडसम असा होता आणि मी लहानपणापासून जे माझ्या राजकुमाराचे स्वप्न पाहत आले अगदी असाच वाटावा असाच होता तो. त्याला पाहिलं आणि असं वाटलं आता माझा शोध संपला म्हणून.

शमिका अगदी कान टवकारून ऐकत होती तिला तर फारच आश्चर्य वाटत होतं .विभा पुढे बोलू लागले.


विभा अगदी रंगवून-रंगवून शमिकाला सांगत होती . त्याचे नाव रवी. एकाच एरियामधे राहत असल्यामुळे त्याची आणि माझी भेट सतत होतच राहायची. रवी आणि मी अनेक वेळा भेटतच राहिलो.

रवी अगदी माझ्यासारखाच एकदम बिनधास्त आणि मी त्याच्याकडे आकर्षित होत राहिले ते माझे मलाच कळले नाही. तो समोर आला की अगदी छातीत धडधड वाढत असे. त्याच्या समोर माझे शब्दच फुटत नव्हते. बडबड करनारी मी, तो समोर आला की गप्पच होत असे.


शमीका म्हणाली "खरंच का गं विभा? हे असं सर्व होतं का? हे आपण सर्व चित्रपटात पाहतो ना आणि खऱ्याखुऱ्या आयुष्यात असं नक्कीच होत असेल का? याची मला शंकाच आहे पण आता तुझ्या सारखी मुलगी असं म्हणते आहे म्हणजे खरंच काहीतरी तथ्य असावं असं मला वाटतं आहे"..


विभा अजूनच गंभीर होत म्हणाली "शमिका तुला काय वाटतं मी खोटं बोलत असेल? हे असंच होतं. आपल्याला असं वाटतं की हे सर्व चित्रपटात होतं पण खरंच जेव्हा आपण सर्व अनुभवतो तेव्हा खरंच कळतं की हे वास्तवात होते".


शमिका तिला म्हणाली "मला तर अजूनही विश्वास होत नाहीये की तू प्रेमात पडली आहेस,"

विभाने तिला जोरात चिमटा काढला आणि म्हणाली "काय गं मला काय दोन शिंग आहेत? मी पण तुझ्या सारखीच आहे की अगदी नॉर्मल. मला काय प्रेम होऊ शकत नाही का? का फक्त प्रेम हे पिक्चर मधले हीरो हीरोइनने करायची गोष्ट आहे. आपण सामान्य माणसं नाही करू शकत का प्रेम"


शमिका तिला म्हणाली "सर्व ठीक आहे गं पण तुला काही भीती वाटत नाही का ?आणि तू घरच्यांना याच्या बाबतीत काही सांगितलं आहेस का?तुम्ही लग्न वैगेरे करणार ना पुढे जाऊन?"

विभा जोरजोरात हसत तिला म्हणाली अगं शमिका जरा शांत हो तुझ्या प्रश्नांची लिस्ट इतकी मोठी आहे ना की मी काही त्याची उत्तर सध्या तरी देऊ शकत नाही पण इतकच म्हणेल की "प्यार मे और जंग मे सब कुछ जायज है"


विभाला मॅसेज आला. तिने मेसेज पाहिला आणि शमिकाला म्हणाली "शमिका आज काही रवीला भेटता येणार नाही तो महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार आहे.

शमिका हसतच म्हणाली म्हणजे आज आमच्या जिजुंना भेटता येणार नाही.

विभा म्हणाली " हो साली साहेबा आज काही तुमच्याशी भेट होत नाही.भेटण्याचा योग जुळून आला नाही; पण आज आपण मार्केटमध्ये जाऊया मला भरपूर भरपूर शॉपिंग करायची आहे..

शमिका काही बोलणार तोच विभा म्हणाली हो तू आधी आईला विचारणार असशील ना? शमिका म्हणाली तुला बरं सगळं कळतं गं विभू माझ्या मनातलं, ग्रेट आहेस तू "

"ते तर मी आहेच फक्त ही ग्रेटनेस माझ्या घरच्यांना माहित नाही " विभा म्हणाली .


शमिका म्हणाली " थोडं अभ्यासाकडे लक्ष दे म्हणजे तुझी ग्रेटनेस कळेल घरच्यांना"

ह्यावर विभा बोलू लागली "शमिका तुला तर माहित आहे ना माझा आणि अभ्यासाचा छत्तीसचा आकडा आहे. ईट्स नॉट माय कप ऑफ टी.जेमतेम पास झाली तरी मिळवलं .आता मूळ मुद्दा हा आहे की तू माझ्यासोबत शॉपिंगला येणार आहेस आणि काकूंना तुला फोन करायचा आहे, तुला परमिशन घ्यायची आहे ना काकूंकडून" विभा म्हणाली

शमिका म्हणाली " हो हो थांब मी लगेच आईला फोन करुन विचारते शमिकाने आईला फोन केला आणि विभा सोबत शॉपिंगला जाण्यासाठी विचारले विभाने वाढदिवसाला घालण्यासाठी छान रेड कलरचा वन पीस घेतला त्यावर मॅचिंग आणि छान हाय हिल सँडल सुद्धा घेतली विभाला शमिकाचे चॉईस खूप आवडायची म्हणून ती शमिकाला घेऊन आली होती.. मनपसंत शॉपिंग झाल्यामुळे विभा खूप खूप खुश झाली होती. तिला सगळं मनासारखं हवं होतं तेच मिळाले होते..


दोघीही तब्बल चार तास शॉपिंग करून थकल्या होत्या.
विभा म्हणाली "शमिका मी खूप थकले आहे गं, असं वाटतं छान कडक चहा पिऊया सगळी मरगळ दूर होईल बघ .शमिका म्हणाली "हो मॅडम घेऊयात ना चहा आपण"
दोघी चहा घेत-घेत गप्पा मारू लागल्या . शमिका तिला म्हणाली तू अजून कोणाला बोलवलं आहेस उद्या .

विभा म्हणाली "जास्त कोणी नाही गं, आपल्या घरातलेच आहे सर्व"

विभा म्हणाली:"शमिका अजून एक महत्त्वाचं कारण आहे, ते तुला उद्या सांगते पण तू उद्या ये हा शमिका " हे ऐकून शमिका तिला म्हणाली "काय आहे ते सांग, लगेच सांग बरं "

विभा म्हणाली "नको नको तू उद्या ये मग मी सांगते"
शमिका आता तिच्या पाठी लागली." सांग ना प्लीज असं करू नकोस ,काय आहे ते सांग"

विभा म्हणाली " मी तुला म्हणाले ना उद्या सांगते"

"तू आता सांगतेस की नाही? नाहीतर मी उद्या येणार नाही हा" शमिका प्रचंड अस्वस्थ झाली होती तिला पाहून विभाला हसू आले विभा स्वतावर कंट्रोल करत म्हणाली असं काही नाही गं , ते उद्या आमची मावशी येणार नाही ना तर मला तुझ्याकडून भांडी घासून घ्यायची आहे" असे म्हणून विभा जोर-जोरात हसू लागली. शमिकाने तिला चिमटा काढला आणि म्हणाली "तू ना खरंच इम्पॉसिबल आहेस यार, खरंच काहीही बोलत राहतेस,तुझी ही मस्करी माझ्या डोक्याच्या वर जाते कधीकधी "

"शमिका यार गंमत करत होते किती टेन्शन घेतेस" विभा म्हणाली
शमिका म्हणाली " तुझी गंमत तर वेगळीच असते , तुझं बोलणं असं असतं की, कोणीही तुझ्यावर चटकन विश्वास ठेवेल बघ .


विभा "आणि तू अशी आहेस की कोणावरही चटकन विश्वास ठेवशील, पटकन विश्वास ठेवून खूप महागात पडेल तुला.ही सवय बदल"

शमिका विभाला म्हणाली "आपण चांगलं तर जग सुद्धा चांगलं असतं "

विभा म्हणाली "हा गैरसमज आहे आधी तो दूर कर, स्वतःच्या दृष्टीकोनातून जग बघण्या पेक्षा वास्तविक आहे तसं बघायला शिकली तर बरं होईल. जर ते तुला पाहता आले तर तुझा निभाव लागणार आहे.

"आपण सरळ मार्गाने चालत राहायचे सर्व चांगलं होतं,काहीही असू दे आपण आपलं चांगलं वागायचं सोडायचं नाही असं माझं ठाम मत आहे शमिका पुढे बोलतच होती.


विभा म्हणाली "तू जे बोलते आहेस ते फक्त ऐकायला बरं वाटतं ,जेव्हा परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येते ना ,तेव्हा आपला स्वभाव कधी बदलतो आपल्याला सुद्धा कळत नाही. शमिका परिस्थिती खूप बदल घडवून आणते"

शमिका म्हणाली "परिस्थिती बदलली म्हणून आपला जो स्वभाव आहे ,तो आपण बदलायचा नसतो "

विभा:" आपल्या हातात नसतं बदल घडत असतो"

शमिका म्हणाली "विभा मला ना तुझे खरंच आश्चर्य वाटत कधी कधी इतके खोलवर विचार करून बोलतेस आणि कधी कधी अगदी बालिश होते दोन विरुद्ध टोकाचे तुझं वागणं आहे ते काही माझ्या समजण्या पलीकडेच आहे . कसं बरं जमतं तुला मला हेच कळत नाही तुझी पर्सनालिटी फारच वेगळी आहे मला तो अपरिचित चित्रपट आठवतो तुला पाहून त्यात तो हिरो कसा पटकन वेगळे रूप धारण करायचा जेव्हा राग येईल तेव्हा त्याचा एक वेगळा चेहरा असायचा .अंगावर काटा यायचा आणि जेव्हा नॉर्मल असायचा तेव्हा अगदी त्याच्या प्रेमात पडावं असंच वाटायचं .अशीच आहेस तू त्याच्यासारखीच अगदी जराही फरक नाही.


विभा म्हणाली "मग तुला नॉर्मल अपरिचित भेटेला का प्रेमात पडायला ..का विराज चालेल?


शमिका म्हणाली "विभा तू ना खरंच खरंच खरंच खरंच तू वेडी आहेस, काहीही बोलत राहतेस"


विभा डोळे मिचकवत म्हणाली हो गं मी वेडीच आहे शमिका आणि मला असंच आवडतं वेडं म्हणून जगायला"


शमिका म्हणाली "वेडा बाई तुमचा चहा पिऊन झाला असेल तर आपण घरी जाऊ या का? खूपच उशीर झाला आहे आणि मला घरी जाऊन अभ्यास करायचा आहे"

विभा शमिकाला म्हणाली "तुला घरी जाऊन अभ्यास करायचा आहे, अगं बाई जरा तरी त्या पुस्तकांवर दया कर किती त्यांना त्रास देतेस. आता जरा रिलॅक्स राहा . कॉलेज सुरू झाल्यावर तर अभ्यासच करायचा आहे. तू पण ना तू काही टॉप रँक सोडणार नाहीस"


शमिका हसतच म्हणाली" ते तर आहे टॉपला राहण्याची एक वेगळीच मजा असते "


विभाने कॉलेजची बॅग खांद्यावर घेतली आणि म्हणाली चला आता टॉपर घरी जाऊया .

दोघीही घरी गेल्या.


विभा आणि शमिका दोन वेगळ्या स्वभावाच्या मैत्रिणी .मैत्रीच्या बंधनात गुंफल्या होत्या. स्वभाव वेगळे तरी मैत्री ही निर्मळ होती. म्हणतात संगतीत आयुष्य बदलण्याची ताकद असते. आपण ज्याच्याबरोबर जास्त वेळ राहतो आपणही तसेच होतो, त्याचे गुण आपल्यात येतात .
क्रमशः.

अश्विनी कुणाल ओगले.





🎭 Series Post

View all