Login

शल्य मनातले...

बोचणारे दुःख

दोन्ही मुलं लंडनला स्थायिक झाल्यावर
काका काकूंना स्वतःजवळ येण्यासाठी फार आग्रह करत होते
दोघांचे वाढतं वय लक्षात घेता
ते फार गरजेचंही होतं
पण हे ना ते कारण सांगून काकू सतत नकार देत होत्या
एके सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी
भरल्या डोळ्यांनी काकू देवाजवळ बोलल्या
'आयुष्यभर हा माणूस घालून पाडून दुसऱ्या समोर बोलत राहिला मला
निदान आता सुनांसमोर तरी नको
मी इथेच बरी आहे माझ्या पांडुरंगा जवळ'
मनातील शल्य अश्रुतुन बाहेर आले होते...

*©®मीनल सचिन*