शाळा आणि तो

When you are in love,,then everything is right is not compulsory...

शाळा आणि तो...

नवव्या वर्गात शिकणारी करिश्मा,,खूपच शांत स्वभावाची,प्रत्येक विषयात रस असणारी,थोडी घाबरट,तर थोडी धीट...मैत्री मध्ये जीवाला जीव लावणारी ती...

सात मैत्रिणीचा त्यांचा पक्का ग्रुप,ग्रुप मध्ये करिश्माच्या सिंहाचा वाटा.. सात मैत्रिणी मध्ये करिश्मा अगदीच साधारण दिसायला,पण अभ्यासात मात्र अव्वल ...प्रत्येकीला अभ्यासात करिश्मा मदत करी,...करिश्मा ला अभ्यासा सोबतच मैत्री ही फार जवळची....

शाळेत त्यांचा ग्रुप नेहमीच अॅक्टिव असायचा, सात मुलींमध्ये सर्व जणी कशात न कशात हुशार होत्याच,...रीमा ही ग्रुप मधली च ...पण करिश्माच्या घराजवळ राहत असल्यामुळे करिश्मा आणि रीमा उठता बसता सोबत असायच्या,...

एक दिवशी रीमा आणि करिश्मा शाळेत जात असताना कुणीतरी पाठलाग करतय,असे करिश्मा ला जाणवलं,...तिने मागे वळून पाहिले असता,तिच्या घराशेजारीच असलेला आकाश होता,....तिने त्याला विचारले,,काय दादा कुठे चालला...आकाश ने उत्तर दिले....थोडे काम आहे,पूर्ण करायला चाललो,.,..

करिश्मा आणि रीमा रोजच सोबत शाळेत जायच्या,त्यामुळे रीमा ला आकाश विषयी शंका आली की हा रोजच आपला पाठलाग करतोय,तिने करिश्मा ला सांगितले असता करिश्मा ने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले...जाऊ दे असेल त्याला कोणते काम,असे म्हणून तिने स्वतःची समजूत काढली....

पण आकाश हा रोजच करिश्मा चा पाठलाग करत होता,,...ही बाब करिश्मा च्या ग्रुपमध्ये सर्व मुलींना माहीत झाली,सर्व मुली करिश्मा ला त्याच्या नावाने मस्करी करत होत्या....

एके दिवशी,...आकाश पाठलाग करत शाळेत आला,ही गोष्ट रीमा ने ग्रुप मधल्या सर्व मुलीना सांगितली,,करिश्मा सोडून ग्रुप मधल्या सर्व मुली आकाश सोबत बोलायला गेल्या,,...त्यांनी आकाश ला पाठलाग करण्याचे कारण विचारले,आकाश काहीच उत्तर न देता तिथून निघून गेला...

रीमा ही दिसायला सुंदर असल्यामुळे सर्वांना वाटत होते की आकाश हा रीमा च्या मागे लागलाय...अन् रीमा ही मनोमन खूप खुश होती,कारण आकाश मध्ये नापसंत करण्यासारखे काहीच नव्हते,दिसायला देखणा,घरचा श्रीमंत,..हुशार असा आकाश कुणालाही आवडेल ...

तो काहीच बोलत नाही म्हणून एके दिवशी रीमा ने च त्याला प्रपोज केले पण त्याचे उत्तर एकता च रीमा खूप नरवस झाली....आकाश ने उत्तर दिले की त्याचे करिश्मा वर प्रेम आहे,,त्याला करिश्मा खूप आवडते,..

रीमा ने करिश्माला सर्व सांगितले पण करिष्माचा प्रेमा बीमा वर विश्वास नव्हता,तिने रीमाला स्पष्ट शब्दात सांगितले की माझे त्याच्यावर अजिबात प्रेम नाहीये,,
रीमा देखील आकाश च्या घराशेजारीच राहत असे त्यामुळे त्याने रिमाला मदत मागितली,काही करून माझी एक भेट करिश्मा सोबत करून दे,,..रीमा ने होकार दिला....

दुसऱ्या दिवशी शाळेत रीमा ने ग्रुप मधल्या सर्व मुलींना विचारले की उदयाला रविवार आहे ,,आणि खूप दिवसा पासून आपण सर्वजणी कुठेच भिरायला गेलेलो नाहीत,...तर मग उदयाला आपण सर्वजणी माझ्या शेतात डबा पार्टी करायला जायचे का?...मस्त पैकी बोर आहेत,पेरू आहेत शेतात ,तोडताना खूप मज्जा येईल...काय मग जायचे ना...

जवळपास सर्व मुलींनी होकार दिला फक्त करिष्माची इच्छा नव्हती,,तिने नाही म्हटले...आणि  अभ्यासाचा बहाणा केला,,

रीमा ला काहीही करून करि श्मा ला न्यायचे होते,..तिने बाकी मुलींना समजाऊन सांगण्यास सांगितले,,,खूप कालावधी नंतर करिष्माने होकार दिला...

आज रविवार सात मैत्रिणी ठरल्याप्रमाणे शेतात जायला निघाल्या तेवढ्यात करिश्मा ला जणू कुणी तरी पाठलाग करत आहे असा भास झाला,दुसरा तिसरा कुणी नसून तो आकाश होता,,,,करिश्मा ने लागलीच रीमा ला विचारले 
अग रिमा....हा आकाश इथे काय करतोय??

आला असेल त्याच्या शेतात...जाऊ दे ना...रीमा ने उत्तर दिले.

सर्व मैत्रिणी रिमाच्या शेतात फुल टू धमाल मस्ती करत होत्या,,शिवाय करिश्मा च्या....
तिला कसली तरी भीती वाटत होती,.... विचारा विचारात ती एकटी इतर मुलींपेक्षा थोडी लांब जाते,अन् समोर बघते तर आकाश उभा....ती थोडी अचकते,थोडी घाबरते,अन् लगेच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते,तर आकाश चक्क तिचा हात धरतो अन् तिला प्रपोज करतो.... करिष्माला काहीच सुचत नाही,काय करावे अन् काय नाही,...

ती एकच प्रश्न त्याला करते,,जगात येवढ्या सुंदर सुंदर मुली आहेत मग मी च का??...

अग हो तूच...अन् का,,याचे उत्तर माझ्याकडे नाही...पण मी खरोखर तुझ्यावर प्रेम करतो,,काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल...

काहीच नाही....अन् हो प्लीज मला सोडून दे,,मला असल्या गोष्टीत अजिबात आवड नाहीय,...
अन् ती तिथून परत येते,,ती ही गोष्ट कुणालाच सांगत नाही अगदी रीमा ला देखील...

सर्व मैत्रिणी आपापल्या घरी येतात,,करिश्मा अभ्यास करण्याकरिता तिच्या टेरेस वर जाते ,तर तिची नजर खाली सहज पडते...समोर आकाश तिला काहीतरी हातद्वारे करत असतो,,तिला त्याचे इशारे कळतात पण ती मुद्दाम दुर्लक्ष करते अन् अभ्यासाला लागते,,

दुसऱ्या दिवशी पुन्हा आकाश शाळेत येऊन करिश्मा ला हो किवा नाही विचारतो.....ती वारंवार त्याला नाही म्हणते,,  सर्व मुली तिला समजून सांगतात ....करिश्मा तू हो म्हण ,त्याच्यात नाही म्हणण्यासारखे काहीच नाही,तू नशीबवान आहेस तुला इतका परफेक्ट बॉयफ्रेंड मिळत आहे...

खूप विचार करून शेवटी एके दिवशी करिश्मा आकाश ला हो म्हणते,...जेव्हा ती त्याला होकार देते त्या क्षणापासून ती त्याच्यावर मनापासून प्रेम करते,...

दोघांमध्ये भेटीगाठी वाढतात, करिश्माचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते,तिला फक्त आता आकाश च महत्वाचा वाटतो,प्रत्येक ठिकाणी आता फक्त आकाश च दिसतो,,..तिला रोजच आकाशला भेटवेसे वाटते,..त्याच्या करिता काय करू अन् काय नाही,असे होते....

दोघे सोबत असताना करिश्माच्या मैत्रिणी सारख्या तिला म्हणायच्या तू खूप लकी आहेस तुला आकाश भेटला,,आणि कदाचित म्हणूनच करिश्मा ला आकाश आपल्याला धोका तर देणार नाही ना,असे कायम वाटायचे...

ती रोजच आकाश ला भेटायची,पण आकाश मात्र तिला भेटायला बरेचदा टाळाटाळ करायचा,..कोणी पाहिलं तर काय म्हणेल असे कायम तिला सांगायचा...एक दिवस तिने त्याला म्हटले की आपलं एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही...आज ना उद्या आपल्याला लग्न करायचे आहेस...यावर मात्र आकाश काहीच बोलला नाही...

त्यानंतर करिश्मा सारखं आकाश ला लग्नाविषयी विचारायची पण विषय बदलून आकाश या विषयावर काहीच बोलत नव्हता....

तो सारखं तिला जवळ येण्यासाठी प्रवृत्त करत होता,ती या सर्व गोष्टी लग्नानंतर असे उत्तर द्यायची,,...त्याला तिचा खूप राग येत होता कारण ती त्याला जे हव आहे ते द्यायला नकार देत होती...
वारंवार तो तिला जवळ येण्याची मागणी करी,आणि ती त्याला लग्न झाल्यानंतर सर्व काही असे उत्तर देत होती,,या विषयावरून दोघां मध्ये वादविवाद होत होता..

करिश्मा आकाश ला नेहमी लग्न कर ना रे माझ्यासोबत असे  म्हणायची,पण एकदा कंटाळून आकाश ने तिला लग्नासाठी सरळ नकार दिला,,...त्यावेळी करिश्माच्या डोळ्यातील अश्रू आवरत नव्हते,तिने त्याला रडत रडत विचारले....अरे,पण तुझे तर माझ्यावर खूप प्रेम आहे ना...मग लग्नाला का बरं नकार देतोस...

प्रेमाचा अर्थ लग्न होत नाही,,मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही कारण माझे आईवडील आपल्या लग्नाला होकार देणार नाही,...

हे सर्व प्रेम करण्याअगोदर का नाही समजले तुला,,त्यावेळी का माझ्या मागे लागलास ...मी नाही म्हणत असताना सारखा मागे लागलास....किती बदल लास तू...तुला मी आवडलीच नाही,उगाच टाईम पास का केलास...मला याचे उत्तर हवयं....करिश्मा रडत रडत त्याला विचारत होती...

तू पण इतर मुलांप्रमाणे स्वार्थी निघालास,,तुला पण सुंदर गोरी मुलगी पाहिजे मिरवायला....म्हणूनच मी तुला सारखे नाही नाही म्हणत  होती,पण तू च माझ्या मागे हात धरून लागला होता....

आकाश अगदी रागात करिश्मा ला उत्तर देतो....तुझ्या मागे लागायला मी काय मूर्ख आहे का,ते तर माझ्या मित्रांनी माझ्यासोबत पैज लावली होती की ही अभ्यासू बाई तुला हो म्हणणार नाही,,आणि म्हणूनच मी तुझ्या मागे लागलो,,अन् हो माझे काही तुझ्यावर प्रेमबीम नाही बरं का...सो प्लीज यानंतर तुझा मार्ग वेगळा अन् माझा वेगळा...

हे सर्व एकल्यावर् करिश्माच्या पाया खालची जमीन सरकते,,तिला स्वतःच खूप राग येतो,..या आकाश वर का म्हणून आपण विश्वास केला याचा पश्र्चाताप होतो,,सर्व मुलांना सुंदर,देखण्या मुलीच हव्या असतात,असा तिचा निर्धार होतो,अन् ती रडत रडत तिथून निघून जाते....

आकाश मात्र जसे की काहीच झाले नाही,असे वागतो...त्याला काहीच फरक पडत नाही,,तो सर्व काही क्षणात विसरून जातो...
करिश्मा मात्र बरेच दिवस त्याच्या आठवणीत दिवस काढते,,नंतर मनाची खंबीर होऊन विसरण्याचा प्रयत्न करते,..

ज्याला दुसऱ्याच्या भावनांची कदर नाही,अशा व्यक्तींना आठवणीत ठेऊन तरी काय फायदा....अशी मनाची समजूत काढून ती आयुष्यात पुढे जाते,,नंतर घरच्यांच्या पसंतीने लग्न करून ती तिच्या संसारात सुखी राहते...व आकाश हा आयुष्यातील काळा भूतकाळ कायम स्वरुपी विसरते....


कथा आवडल्यास नक्की लाईक आणि शेयर करा.


Ashwini Galwe Pund..