Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

शक्तीरूपेन संस्थिता...

Read Later
शक्तीरूपेन संस्थिता...

शक्तीरूपेन संस्थिता...

 

आई, मुलगी, सून, बहीण, नणंद, पत्नी, प्रेयसी , मैत्रिण अशा निरनिराळ्या रूपात आपण स्त्रीला ओळखतो. पण स्रीचे रूप एवढ्यापुरतेच मर्यादित आहे का?  तर नाही,  या स्त्रीत्वाची व्याख्या याहीपेक्षा अधिक मोठी आहे.

 

स्त्री म्हणजे नेमके काय? तिचे अस्तित्व काय? ती जन्मदात्री, आई, बहीण, मुलगी, सखी बस इतकीच मर्यादित आहे का, तर मुळीच नाही! तर त्याहीपेक्षा अधिक तिची महती आहे.

 

ते तिची त्याग व समर्पणाची भावना जाणतात. पण, आजही स्त्रिला अबला नारी समजले जाते. अशक्त व गौण मानले जाते. त्यांचा वापर करू पाहतात, याच समाजात आई जगदंबेला आदि माया, शक्ती देवी म्हणून पूजले जाते आणि दुसरीकडे त्याच देवीचे रूप असलेल्या स्त्रीला मात्र भोगवस्तू व फक्त वापरण्याची वस्तू म्हणून उपयोग केला जातो.

 

स्त्री जर प्रेम आणि मायेपोटी सर्वस्व त्यागू शकते तर ती स्वतःच्या अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी ती दुर्गेचा अवतारही धारण करू शकते. 

स्त्रीचा आदर सन्मान करणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे. स्त्री ही कायम कर्तव्याचं ओझं घेऊनच जगत आली आहे. मग हीच कर्तव्य पुरुषानेही पार पाडावीत. स्त्री ही भावनेत वाहून अत्याचार सहन करणारी अबला नारी नसून, पुरुषांना जीवनात लढा देत पुढे कसे जायचे हे शिकविणारी जीवनदर्शिका आहे. तिच प्रत्येक परिस्थितीत पुरुषांची साथ देते, त्याग करते, मग तीच्या या त्यागाचा सन्मान करण्याऐवजी तिचा अनादर होतो.

 

एक आई तिच्या मुलांसाठी काहीही करू शकते.

 

याचंच एक उदाहरण म्हणजे कमला..

 

कमला इतर घरी घरकाम करून  उदरनिर्वाह करायची आणि घर चालवायची.

 

नवरा दारुडा होता, तो कोणतही काम करत नसे. कमलाचं सगळं करायची. दोन मुली,एक मुलगा, नवरा आणि म्हातारी सासू एवढं कुटुंब होतं. घरात अठराविश्व दारिद्र्य असूनही तिने कधीच तिच्या मुलींना बाहेर जाऊन काम करायला पाठवलं नाही. नवरा दारू पिऊन पडून असायचा. काही कमवत नसे, उलट दारूसाठी त्याने उधारी करून ठेवलेली होती. देणेकरी घरी यायचे कमलाला त्रास द्यायचे. कमला सगळं त्रास सहन करायची आपलाचं शिक्का खोटा अस म्हणून गप्प राहायची. इतर बायासारखं तिलाही वाटलं सोडून द्यावं सगळं पण नवरा नवराच असतो त्याच्याशिवाय आयुष्य कसं घालवणार, नवऱ्याला सोडून राहणे म्हणजे इतर माणसांना निमंत्रण देणे अस तिला वाटायचं. 

 

सगळं सहन करत दिवस काढत होती.

 

एक दिवस ती घरी गेली, तर एक देणेकरी तिच्या दारात येऊन उभा होता.
त्याला बघताच ती चिडली,
"मी नसताना यायचं नाही सांगितलं नाही. तरी का आलास तू?"
दोघांची वादावादी झाली, आणि त्या माणसाने कमलावर  हात टाकला.

हे बघून तिची मुलगी धावली, तिघांमध्ये थोडी झटापटी झाली. त्यात कमलाला जोरात धक्का लागला आणि ती दूर जाऊन भिंतीला आदळली, तिच्या डोक्याला मार लागला.
ती खाली पडली. तिला असं बघून तो माणूस तिच्या मुलीकडे बघू लागला. त्याच्या डोळ्यातली वासना तिला दिसू लागली. तो पुढे पुढे येऊ लागला तशी ती मागेमागे सरकत होती.

ती भिंतीला जाऊन चिपकली.
"आता कुठे जाशील" असं म्हणून तो तिच्या अंगावर धावला.
ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली.
काही क्षणाने कमला उठली, तिने बघितलं. तो तिच्या शरीराशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे, तशी तिने बाजूला असलेला कोयता उचलला आणि त्याच्या अंगावर धावली.
"माझ्या मुलीवर हात टाकतोस हरामी." असं म्हणून तिने त्याच्यावर सपासप वार केले. आज तिने तिच्या मुलीसाठी चण्डिकेचं रूप धारण केलं. आज ती तिच्या मुलीसाठी दुर्गा बनली.

स्त्री अबला नारी आहे हा समज ठेऊन पुरूषवर्ग या समाजात वावरत असतो.

लोकांच्या मनातले स्त्री बद्दलचे गैरसमज खोडून काढावेच लागतील. यासाठी कुणी एकीने नव्हे तर प्रत्येक स्त्रीला लढा द्यावा लागेल.

कुणावरही अन्याय करणं पाप आहे तर अन्याय सहन करणं हे तेवढेच मोठे पाप आहे.

आपण स्त्री आहोत याचा आपल्या माता-भगिनींना अभिमान हवा. स्त्री ही समाजाचा पाया आहे. पायदळी तुडवली जाणारी वस्तू नाही. झाशीची राणीही एक स्त्रीच ना, परंतु, तिने गाजवलेले शौर्य पुरुषांपेक्षा कमी नाही.

इतिहासातील तिचे कार्य स्त्री जातीसाठी नवीन दिशा व प्रेरणा आहे.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//