शक्ती -8

Ajay finds that there something suspious about sarpanch .. his son and may be he himself is behind all such things but ajay is not sure ....so hi continues with his search ..

https://irablogging.com/blog/shakti--7

फोन चा आवाज ऐकून सगळे मागे बघतात .अजय थोडस बोलून फोन ठेवून देतो . आबा आणि संजुची आई उठून उभे राहतात .

"हे संजू चे  आई वडील आणि हे इन्स्पेक्टर अजय .."-रोहन ओळख करून देतो .

"नमस्कार ,बस ना तुम्ही ..संजू तुमचा मुलगा ना ..मग तुम्ही तो हरवला त्याची complaint  का  नाही केली ?"-अजय 

"हे बघा ,आम्ही साधी माणसं. संजू रागाच्या भरात घर सोडून गेला .नंतर कळले कि तो त्या बंगल्यात गेला आणि मग काय आम्ही सगळी अशाच सोडली ..एकदा वाटले कि जाऊन बघावं काय आहे ते .पण सरपंचानी समजावलं ..म्हणाले संजू तर गेलाच आत तुम्ही कशाला जीव धोक्यात घालताय ... आणि पोलीस च्या भानगडीत पडायचं नाही ...गावात पोलीस अली नाही पाहिजे .."मग काय करणार होतो आम्ही ..सरपंचाच्या पुढे काय चालत नाही बघा कोणाचं .."-आबा 

"ज्या दिवशी तो गेला त्या दिवशी आणि त्याच्या आधी काय काय झालं होत ?"-अजय 

"आमच्या मुलाचं काही लफडं नाही कोणाशी ?माझ्या कानावर आला होत कि त्याला मुलगी आवडते पण असं काही नाही .आमची जरा वादावादी झाली होती ह्यावरून त्याला परत तिकडे जाऊ नको म्हणून सांगितलं होत ...त्यामुळेच तो राग मनात ठेवून निघून गेला होता .त्याच वागणं जरा बदललं होत काही दिवसांपासून ..बरेचदा ह्या ना त्या  कारणाने तो बंगल्याचा विषय काढायचा आणि मग ना राहवून मी चिडलो त्या दिवशी ..पोराची काळजी वाटत  होती दुसरा काही नाही ..बदनामी झाली असती तर कस झालं असता आमचा ..म्हणून .."-आबा 

आबांना गहिवरून आलं होत .

"शांत व्हा आबा ,,तुम्ही म्हणता तस बंगल्यात काही शक्ती नाही ..आणि म्हणूनच मला वाटत कि संजूला काही झालं नसेल ."-अजय 

आबा आणि काकू च्या चेहऱयावर आनंद दिसतो ."खरंच ..खूप बर होईल हो ..देव  करो न तुम्ही जे बोलला सा ते खरं होवो "-संजू ची  आई आणि ते निघून जातात .

"सीमा त्या दिवशी तू जी गाडी पहिली त्या बद्दल अजून काय सांगशील ?"-अजय 

"ती गाडी जरा भरधाव वेगात होती .त्यात कोण आहे हे काही बाहेरून दिसत नव्हते .पण एक काच थोडी उघडी असावी .कारण गाडीतुन काही बांगड्यांचे तुकडे पडलेले दिसले .ती काळ्या रंगाची सुमो होती ."-सीमा 

"ठीक आहे . आता मी काय सांगतो ते ऐका ."-अजय 

सगळे ऐकायला लागतात .

"मी इथे  फक्त सीमाच्या सांगण्यावरून आलो नाही .माझ्या कडे एक case आली होती .त्या case  चा संदर्भ या गावाशी आहे .म्हणून मी ह्या गावाची माहिती काढतच होतो .त्यात मला बऱ्याच गोष्टी आढळल्या आणि त्यातच योगायोगाने  सीमा चा फोन हि आला .म्हणून मी सगळ्या परवानगीसह इथे येऊ शकलो .आता पर्यंत जी गोष्ट मी बघितली त्यातून मला असे वाटते कि त्या बंद बंगल्याचा कोणीतरी गैर वापर करत आहे . तिथे काहीतरी वाईट शक्ती आहे ,भूत आहे ह्या सगळ्या अफवा  मुद्दाम पसरवल्या गेल्या असल्या पाहिजे .  आताच आलेल्या फोन मधून सीमा ने ज्या गाडीचं वर्णन केलं आहे तशीच एक गाडी आम्हाला  सापडली आहे आणि त्याची पाहणी सुरु आहे असं मला कळलंय ."-अजय 

"पण मग संजूच काय? त्या बांगड्या कोणाच्या ? हल्ला का झाला ?"-अमेय 

"त्या सगळ्याचा लवकरच उलगडा होईल ."-अजय 

"म्हणजे आता आपल्यासमोर काही गोष्टी स्पष्ट झाल्यात कि तो बंगला  भूत बांगला नाही किंवा तिथे कोणी वाईट शक्ती नाही .दुसरं म्हणजे सरपंच ह्या सगळ्या मध्ये सामील आहे ."-आर्या

"हं  ,तिथे कोणीतरी बाई राहत होती आणि कदाचित अजूनही काही लोक राहत असावीत ...पण मग ते कधीच कोणाला का दिसले नाही ?"-विनोद 

"तुम्ही आता जास्त विचार करू नका ..झोपा सगळे उद्या बघू अजून काय सापडतंय"-अजय 

दुसऱ्या दिवशी सगळे उठतात आणि कामाला लागतात इकडे अजय पोलीस स्टेशन मध्ये येतो आणि सरपंचांना  चौकशी साठी घेऊन यायला सांगतो.

सरपंचांना पकडून आणलं जात "या या सरपंच साहेब ,,आम्ही तुम्हाला सांगितलं होत कि आमची मदत करा पण तुम्ही काही ती केली नाही "-अजय 

"हे बघा ,गावात आमची इज्जत आहे .तुम्ही हे असं आम्हाला इथे आणायला नको होत .."=सरपंच 

"आता तुम्ही फक्त आमच्या प्रश्नांची उत्तर द्या ..नाहीतर तुमची उरली सुरली इज्जत पण वेशीवर टांगेन..काय कळलं का ?"-अजय जरा ओरडुनच बोलतो .  सरपंच पण घाबरतात .

"काय मग, त्या बंगल्याविषयी तुम्हाला काय माहित आहे "-अजय 

"हे बघा साहेब ,तो बंगला  शापित आहे .तिथे कोणी येत जात नाही ..बाकी काही नाही "-सरपंच 

"तुम्ही संजूच्या गायब झल्याची तक्रार का नोंदवू दिली नाही "-अजय. 

"आम्ही काही सांगितलं नाही ...तो तिकडे गेला आणि तिथे गेल्यावर कोणी  परत येत नाही ...उगाच पोलिसाची भानगड  आणि बदनामी नको म्हणून सुचवलं होत त्यांना ..पण तक्रार करू कि नको ,हे सांगणार मी कोण ?"- सरपंच 

"तुमचा मुलगा शहरात का असतो ? तुम्ही त्याला गावात बोलावत नाही म्हणे .."-अजय 

"त्याचा ह्याच्याशी काय संबंध ?तो तिकडे शिकायला ठेवला आहे ... त्याला नाही आवडत गावात राहायला ..."-सरपंच 

"हे लॉकेट ओळखता का ? तुमच्या मुलाचाच  आहे ना?"-अजय 

"नाही मला काही माहित नाही ..ते माझ्या मुलाचं नाही ..तो इथे नसतो तर त्याच लॉकेट  इथे कस येणार ?"-सरपंच माथ्यावरचा घाम पुसत बोलतात 

"तेच तर विचारतोय ना ,हे इथे कस आलं? आणि नीट बघा सरपंच ह्यामध्ये जो फोटो आहे तो तुमच्या बायकोचा आहे ,हो कि नाही ?"-अजय 

सरपंच गप्प बसतात ."आता बोलता कि नाही ....का करू सुरु ?"अजय 

"हे बघा  साहेब हे लॉकेट जरी माझ्या मुलाचं असला तरी ते इथे कस आलं ते मला माहित नाही .माझा मुलगा गेली ५-७ वर्ष गावाबाहेर आहे . आणि त्याच  लॉकेट तेव्हाच  हरवलं होत "-सरपंच .

"चला म्हणजे हे तर तुम्ही मान्य करता कि हे लॉकेट तुमच्या मुलाचं आहे ..मग आता मला सांगा हि घड्याळ सुद्धा तुमच्या मुलांचीच आहे ना .."-अजय 

सरपंच पुन्हा गप्प बसतात ..."बोलता का ?"-अजय 

"हो , ती पण त्याचीच आहे ."-सरपंच  घाबरतच काबुल करतात 

"म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीं मागे तुमच्या मुलाचा हात आहे तर ..नक्की सांगा आता बंगल्यात काय काय चालत ते ?आणि तुमचा मुलगा कुठे आहे ते ?पत्ता द्या त्याचा .."-अजय 

सरपंच त्याचा पत्ता देतात ."हे बघा साहेब ह्या वस्तू जरी त्याच्या असल्या तरी आमचा ह्या गोष्टींशी आणि संजूच्या गायब होण्याशी काहीही संबंध नाही ."-सरपंच 

तेवढ्यात अजय ला  फोन येतो .  फोनवर बलून अजय परत येतो आणि विचार करून सरपंचना सांगतो "ठीक आहे . आत्ता तुम्ही जाऊ शकता, पण गाव सोडून जायचं नाही. माझा एक माणूस तुमच्यासोबत असेल जोपर्यंत मी पुढचं काही सांगत नाही तोपर्यंत  ."-अजय .

सरपंच निघून जातात .

सबनीस आपल्याला निघावं लागेल .गाडी काढा .आणि हो बंगल्यावर नजर ठेवायला सांगा . अजय आणि सबनीस निघतात . 

"साहेब  आपण कुठे निघालोय ? "-सबनीस 

"तालुक्याच्या हास्पिटल मध्ये .."-अजय 

(फोन कोणाचा असेल ? हॉस्पिटल मध्ये कोण आहे ? सरपंच आणि त्याचा मुलगा ह्याचा सगळ्या प्रकरणाशी काही संबंध आहे का कि विनाकारणच ते गुंतले ह्या प्रकरणात ?पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत मला फोल्लोव करा आणि माया कथा आवडल्यास माझ्या नावासहित शेअर करा 

🎭 Series Post

View all