शक्ती -6

Babu explians evrything ..Rohan and firends visit to that house and found something strange .

"अरे हि फार जुनी गोष्ट आहे . मंदिराची जागा हि आमच्या घराण्याची जागा  होती . सगळं छान चाललं होत .ती जागा खूप फलदायी आहे ,शुभ आहे .जेव्हा आमच्याकडे ती जागा होती तेव्हा आमचं सगळं छान होत ,पण आमच्या आप्पानी देवीवर असणाऱ्या भक्तीपोटी ती जागा गावाच्या मंदिरासाठी देऊ केली . तिथे मंदिर उभे रहिले . सरपंचाचे वडील आणि आमचे अप्पा चांगले मित्र होते .सरपंचांच्या घरच्यांचा डोळा   त्या जागेवर होता कारण ती जागा म्हणजे लक्ष्मी होती .त्यासाठी बरेचदा गोडबोलून त्यांनी हि जागा आम्हला द्या, आपण त्यावर काहीतरी करू असं विचारले होते .पण अप्पानी त्या जागेवर मंदिर बांधणे पसंत केले .तेव्हापासून सरपंच आणि त्याच्याघरचे ,आमच्या घरावर खार खाऊन आहेत .अजूनही ती जागा जर त्यांना मिळाली तर हवीच आहे . म्हणून मला त्यांच्यातला कोणी तिथे पुजारी म्हणून नको होता आणि आमची वादावादी सुरु झाली . आमचे अप्पा असेपर्यंत त्यांनी खूप त्रास दिला .आमची जमीन बळकावली . असो . "-बाबू 

"अरे बाबू पण आता ती जागा त्यांना कशी मिळणार ?आता तर मंदिर उभे आहे ना तिथे ."-रोहन 

"हे सगळं ठीक आहे ,पण त्या बंगल्याचं आणि तुमचं काय नातं आहे  ?तेही सांगा "-अमेय 

"आर बाबा ,माझं काही नातं नाही त्या बंगल्याशी .काही वर्षांपूर्वी तो बांगला एका माणसाने    बांधला .तो शहरात राहत असे .त्यांची ती जागा होती .पुराणिक नाव त्यांचं . हे पुराणिक कुटुंब कधीतरी सुट्टी मध्ये  येत असे राहायला .पण एका अपघातात त्यांचं संपूर्ण कुटुंब संपलं आणि मग तो बांगला रिकामाच राहिला .खर म्हणजे ,ज्या जागेवर बांगला बांधलाय ती एक शापित जागा आहे .तिथे वाईट शक्ती चा वास आहे .ते कुटुंब जेव्हा पण यायचे त्यांच्या घरात काहीतरी कुरबुर होतच असायची .त्यांना  सांगितले होत कि, जागा बंधू नका पण त्यांनी हे ऐकलं नाही आणि मग परिणाम भोगावे लागले .आजही तिथे कोणी तरी बाई दिसते कधी कधी .संजू ला बाई दिसायची .तो मला बोलला होता .एकदा  त्या दिशेने फिरताना त्याला एक सुंदर बाई दिसली होती पण मग नंतर ती कोणाला दिसली नाही .मग मी त्या बंगल्यावर नजर ठेवू लागलो एक दोन दा मलाही तिथे कोणीतरी असल्याचा भास झाला. त्यातच ज्या दिवशी संजू गायब झाला त्या दिवशी पण ती बाईचं त्याला दिसली होती म्हणे .फार वाईट शक्ती आहे ती .आपल्या ला  जाळयात ओढते ती म्हणूनंतर मी तुम्हाला जाऊ दिल नाही तिकडे ....."-बाबू बोलत  होता .

"पण मग त्या पूजेचं काय ? काल तू तिथे कोणती पूजा केली "-आर्या .

" अरे मी काही काला जादू नाही केला ,संजू च्या गायब झाल्यानंतर मी लक्ष ठेवून होतो .मला अचानक परवा तिकडे काहीतरी हालचाल दिसली .म्हणून मग बघत होतो ,तर एका बाईची पाठमोरी आकृती  दिसली.ती बाई अजून कोणाचा वाईट करू नये म्हणून, तिची नजर लागू  नये म्हणून , काल त्या जागेचा  नजर उतारा केला  ...आणि आज तेच बघायला गेलो होतो कि तिथे कोणी दिसत का ? नजर  उतारा केला कि, वाईट शक्ती नाहीशी होते ..."-बाबू 

"हं. असं आहे तर ...हे बघ बाबू .आपल्याला बंगल्यात जावंच लागेल तेव्हाच कळेल  खर काय ते ?आम्ही जाणार आहोत ..तू येणार आहेस का?"-रोहन 

"काय ?नाही रे बाबा, तू तिथे जायचं नाहीस ...सांगून ठेवते .."-आज्जी.

"आज्जी हे बघ आता तिथे जावंच लागेल नाहीतर काहीच कळणार नाही .आम्हला काही होणार नाही .मी एकटा नाहीये .आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे ."-रोहन 

बरीच तू तू मी मी झाल्यावर बाबू  म्हणतो, "सरपंचांना ह्यातला काही कळता कामा  नाही ".

आणि तिघे मित्र जाण्याचं ठरवतात  ,संध्याकाळ झालेली  असते .बाबुही त्यांच्यासोबत असतो  . सगळे बंगल्याच्या गेट जवळ पोहचतात .आता तिथे काही हि  हालचाल नसते . हळूच ते गेट उघडतात . गेट चा आवाज होतो .बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याने त्या गेट वर गंज चढलेला असतो ,आणि त्याचा कर्कश असा आवाजही होत असतो .ते लोक सांभाळून  सांभाळून  मध्ये जात असतात. तेवढ्यात गवतातून काहीतरी सर्रकन गेल्याच जाणवते ....एक सरपटणारा प्राणी तिथून निघून जातो .हे हळूच दाराजवळ जातात .दारावर कुलूप असत, तेही खूप जुनं असत .इकडे तिकडे बघत असतात बंगल्याची पाहणी चालू असते .त्यातच अमेय ला एक खिडकी फुटलेली  दिसते . तो डोकावून पाहू लागतो .अंधार असल्यामुळे त्याला काही फारस दिसत नाही .बाबू एक मोठा दगड उचलतो नि कुलूप   तोडण्याचा प्रयत्न करतो .बऱ्याच प्रयत्नानंतर ते कुलूप तुटत .ते मध्ये  जातात  .बाबूच्या हातात  कंदील असतो . अमेय ने टॉर्च आणलेली  असते .ते मध्ये जातात  .बंगला मोठा असतो .एका भिंतीवर एक फोटो असतो कदाचित त्या पुराणिक कुटुंबाचा असावा ..खूप धूळ जमलेली असते त्यावर ..सगळेजण बारकाईने पाहणी करत असतात . सगळ्या ठिकाणी धूळ आणि माती असते. जाळे लागलेले असतात ."

असं वाटत  कि इथे  बऱ्याच वर्षांपासून कोणीच कधी राहील नाही ."-विनोद

"हं ,हे बघ इथे धूळ पायांमुळे पुसल्यागेलीसारखी वाटते ,नाही का  ?"--अमेय

ते वरच्या खोलीत जायला निघतात .जिना चढताना भीती वाटत  असते पण काहीही झालं तरी आज ह्या प्रकरणाचा छडा  लावायचाच हे ठरवलेलं असता. इकडे  आज्जी ने देवासमोर जप-जाप सुरु केले असतात . आर्या आणि सीमा  सुद्धा विचार करत बसलेल्या असतात .

विनोद,रोहन,अमेय आणि बाबू सगळे जिना चढून  वर पोहचतात  .सगळी दार बंद असतात .वरच्या दोन खोल्या उघडून बघतात .पण त्यांना काही सापडत नाही .वरच्या खोलीच्या खिडकी मधून ते बघतात .खूपच मोहक दृश्य असते .पूर्ण गाव तिकडून दिसत असते .देवीचं मंदिर हि दिसत असते . लांब डोंगरांच्या माळा दिसत असतात.

किती सुंदर जागा आहे नाही ?"-अमेय 

"हो ना, उगीचच नाव ठेवतात लोक ...इथे किती छान वाटत असेल राहणाऱ्याला "-विनोद 

तेवढ्यात कशातरी आवाज होतो .काहीतरी पडल्यासारखे जाणवते .सगळे दचकतात . हळूच बाहेर येतात आणि जिना उतरतात .जिना उतरून हॉल मध्ये येतात त्यांना अजून एक दरवाजा दिसतो .बाबू चा तर रामनामाचा जप चालूच असतो  . दार उघडतात  आणि सगळे थक्क होतात .

त्या रूम मध्ये एक ,दोन पलंग  टाकलेले  असतात .त्यावर चादर टाकलेली असते . मध्ये जाताना  अचानक रोहनच्या पायाला काहीतरी लागत  .हलकाच  आवाज होतो .टॉर्च मध्ये बघतात तर काही काचा असतात .बांगड्या फुटल्यावर तुकडे होतात तसे तुकडे असतात .रोहन ते उचलून बघतो .तोपर्यंत अमेय अजूनपाहणी करतो 

"असं वाटतंय  कि इथे कोणीतरी राहत होत ?"-अमेय 

"पोरांनो लवकर चला ,बाहेर जोराचा वारा सुटलाय .नक्कीच काहीतरी होणार आहे .."-बाबू 

"थांब रे ! हे बघा ,इथे नक्कीच कोणीतरी बाई राहत असणार , गळ्यातला हार.."-विनोद 

"बाई नाही ,मुलगी पण असू शकते ,हे बघ कानातले पडलेत,आणि हि बघ हि ओढणी  ."-अमेय

"ये थांब कशाला हि हात लावू नको "-विनोद  

तेवढ्यात रोहन तिथे असणारं अजून एक दार उघडतो . जोरदार हवेचा एक झोत आता येतो . 

'हे काय इथून तर बाहेर पडता येत .. मागचा दरवाजा आहे हा .."-विनोद .

हे सगळं काय आहे? इथे तर कोणी नाही .सगळे तिथून बाहेर पडतात .मागच्या अंगणात येतात .तिथे काही गाडीच्या चाकांची ठसे दिसतात .म्हणजे नक्कीच इथे कोणीतरी राहत होत .रोहन म्हणतो .

"कदाचित सीमा नि जी गाडी पहिली ती तर नसेल? "-विनोद 

सगळे  पाहणी करू लागतात . अंधारात काही सापडणं  मुश्किल आहे .दिवस असताना यावं लागेल एकदा, असं वाटतंय . त्या झाडांमध्येच  अचानक रोहन ला एक घड्याळ दिसते .तो ते उचलतो ,"मी हे घड्याळ कुठेतरी पाहिलंय ..पण कुठे ?"

"संजू घड्याळ  वापरायचा का ?"-अमेय 

"हो ,पण हे संजूच नाही ,,हे थोडं महागडं आहे आणि बघ ना खूप जुनं  झालेलं पण दिसतंय ,माती आणि गंज चढला आहे .... .."-रोहन 

"असं घड्याळ मी पाहिलंय कुठेतरी ..."-बाबू .

" मला असे वाटते कि ,इथे नक्की काही लोक राहत असली पाहिजे .हे बघ किती कागद कचरा पडलाय ..लपवलंय झाडांमध्ये ."-विनोद 

सगळे तिथून आता निघायच्या तयारीत असतात . परत घरात  येतात  . इकडे तिकडे नीट बघतात .एका कोपऱ्यात त्यांना काहीतरी औषधाचे गोळ्यांचे कव्हर दिसते ."ये हात नका लावू"-अमेय .

रोहन तिथेच थांबतो हात लावत नाही ..."मला असे वाटते कि, आपण पोलिसांना कळवायला  हवे  ."-विनोद .

सगळे विचार करून बाहेर पडतात. गेट च्या बाहेर पडल्यावर अचानक रस्त्यात  त्यांच्यावर हल्ला होतो .रोहनच्या डोक्याला लागत .अमेय ला पण मार बसतो पण बाबू च्या मदतीने ते गुंडाना पळवून लावतात आणि काय बस घरी येतात .

"अरे देवा ,हे काय झालं ?"-सीमा 

"रोहन ,,अरे बाबा रोहन सांगितलं होत ना जाऊ नकोस .."-आज्जी रडताच रोहन शी  बोलते.

"आग,आम्ही ठीक आहोत .काळजी करू नको आजी ,थोडं लागलाय  बस  .."-रोहन 

"कोण होते ते ? तिथे कोणी राहत होते का ?त्यांनीच केलं का ?"-आर्या

"काय माहित ग ?"- विनोद 

"मी माझ्या मावस भावाला सांगते सगळं तो पोलीस मध्ये आहे ,तो नक्की आपल्याला मदत करू शकेल "-सीमा सुचवते .

"हो मलाही असच वाटत  कि आता आपण पोलिसांची मदत घेतलीच पाहिजे ."-आर्या 

सगळे असं विचार करून झोपायला जातात .बाबू हि घरी जातो .आज बरच काही घडलेलं असत .

(काय झालं आले?कोणी हल्ला केला असेल?) पाहूया पुढच्या भागात ..

माझ्या अनेक कथा वाचण्यासाठी मला फोल्लोव करायला विसरू नका हं.! 

🎭 Series Post

View all