शक्ती -4

Rohan asked Babu about that home ... Rohan and his friends think Babu is prime suspect ..

  भाग -३    https://irablogging.com/blog/shakti--3

अमेयचा प्रश्न बरोबर होता .आधी हे जाणून घेणे महत्वाचे होते कि, तो बंगला कोणाचा आहे . रोहन म्हणाल कि ,त्याला हि  फारसं ठाऊक नाही त्याबाबतीत . सगळे झोपले .गावाकडची सकाळ हि खूप रम्य असते .पाखरांचा किलबिलाट सुरु झाला होता . सूर्याची किरणे अंगणात पसरली होती . सकाळ झाली होती .सगळेच छान झोपले होते .सकाळी उठून चहा पाणी घेतले आणि अमेय, विनोद आणि रोहन ठरल्याप्रमाणे संजू च्या घरी जाण्यास निघाले .आर्य आणि सीमा घरीच थांबल्या ,आज्जी ला मदत करू लागल्या. इकडे रोहन आणि टायसह मित्र संजू च्या घरी पोहचले .

घरी संजू ची आई उदास बसली होती ."काकू ,ओ काकू ....कश्या आहात ?"-रोहन 

"कोण ?रोहन ...ये ये  बस ..मी बरी आहे ....कस येन केलस ?"-काकू .

"काकू ,संजू चा काही पत्ता लागला का ? काय झालाय नेमकं काही कळलं का?"-रोहन .

काकू ना भावना अनावर झाल्या ,"नाही रे बाबा ,देव जाणे कुठे गेला माझा संजू ?..काही कळलं  नाही .तुला तर माहीतच आहे कसा आहे तो ...राग येतो पटकन त्याला कशाचाही ...सगळं काही त्या बंगल्यामुळे .....माझा संजू गेला  तो गेलाच .."-काकू 

"काकू, रडू नका ,त्या दिवशी नेमका काय झालं सांगू शकता का? कदाचित तो कोणत्यातरी संकटात  असेल , तो जिवंत असेल काकू ..काळजी करू नका -रोहन .

"अरे बाबा , त्याला लै हौस तिकडे जायची ..जाऊ नको म्हणून बजावलं तर राग यायला लागला ....नेहमी चिडचिड करायचा .. झापटल्यावानी ...काय हात कोण जाणे ,एकदा तर बाबू ने आणला पकडू माघारी .....तर त्यावर पन  चिडला ...त्याच्या आबांनी  चांगलीच समज दिली संजू ला ...पण संजू काय ऐकणारा नव्हता .... रागाच्या भरत गेला तो गेलाच आलाच नई परत ...बाळ्या म्हणाला  त्याने संजू ला बंगल्याकडे जाताना  पाहिलं व्हतं म्हणून ..."-काकू 

"काकू ,मी ऐकल कि संजू ला कोणतरी मुलगी आवडायची? ...कोण होती ती माहित आहे का तुम्हला काही "-रोहन 

"ए बाबा ,काय बोलतोस ? संजू आणि पोरगी ? हे बघ काहीपण वंगाळ बोलू नको  ...."-आबा ( तेवढ्यात संजूचे वडील तिथे  येतात )

"नाही  आबा ,म्हणजे तस नाही मी जे ऐकलं ते बोललो ...मला संजू चा शोध घायचा आहे ."-रोहन 

"हे बघ पोरा,तू ह्यामधेय पडू नको .आम्ही घेतलाय शोध काही सापडला नाही ...आम्ही तर आता अशाच सोडून दिली आहे ..सरपंचानी बी सांगितलं कि झालं ते विसरून जा ..."-आबा .

"असं कस?  विसरता येत का पोराला?"-काकू रडू लागल्या .

सगळे मित्र तिथून निघतात . त्यांना कळत नाही कि ,आता पुढे शोध कस घ्यायचा तो .... तेवढ्यात अमेय म्हणतो कि ,"मला वाटत कि, आपण बाळ्या ,बाबू आणि तो मुलगा जो पडला होता त्यांची भेट घ्यायला  हवी ..काय रे रोहन हा बाबू कोण आहे ?".

"अरे ,बाबू हा एकटाच असतो. घरात कोणी नाही त्याच्या ..बऱ्याच वर्षांपासून आहे इथे. तसा म्हातारा  आहे, पण खूप जोर आहे अंगात अजूनही !पडेल ती कामे करतो लोकांची आणि पोट भरतो ."-रोहन .

सगळे मिळून बाळ्या ला  भेटतात ,"ये बाळ्या इकडे ये जरा ."-रोहन . 

"काय रे तुला संजू बाबतीत काय माहित आहे ..."-रोहन 

"काही नाही .. तू कशाला विचारतोस ?"-बाळ्या.

"अरे सहजच विचारले ...तू पहिले होते ना त्याला ..?"-रोहन .

"अरे बाळ्या ,तू तर म्हणे खूप हिम्मतवाला आहे .आम्हाला  रोहन सांगत होता कि तू घाबरत नाही कोणाला ? म्हणून तर म्हणालो कि  आलोच आहे गावात तर तुला भेटू ....काय रे ? आमच्याशी  मैत्री करशील का?"-विनोद .

बाळ्या  ला आपलं कौतुक ऐकून छान वाटते ,तो पण मग मित्रम्हणून त्यांच्या सॊबत फिरतो ,विनोद त्याला बरोबर आपल्या बोलण्यात गुंतवतो आणि विचारतो ,"अरे मी ऐकलं आहे ह्या गावात एक भूत बांगला आहे म्हणून ? तू तर इतका धाडसी तू भूत बिट बघितला कि नाही अजून?"-विनोद .

"त्या बंगल्याकडे जात नाही कोणी बी ...आमचे संजू शेठ गेले होते ते आलेच नाहीत ...."-बाळ्या 

"असं ,,तुला कास माहित संजू तिकडेच गेला होता तो ....? त्याच काय आहे ना आम्ही एक पुस्तक लिहणार आहोत त्यामध्ये जर तू आम्हाला माहिती दिली तर तुझं पण नाव लिहू आम्ही ..मग काय लोक तुला ओळखायलाच लागतील ...बघ बाबा विचार कर ."-विनोद 

जरा विचार करून बाळ्या बोलतो ,

"सांगतो ...त्यादिवशी मी सायकल वरून येत होतो ,तेव्हा मी संजू शेठ ना रागाने जातं पाहिलं ते नदी च्या दिशेने जात होते .मी त्यांना आवाज पण दिला पण त्यांनी ऐकलंच नाही .मग मी गेलो त्यांच्या मागे तर ते त्या बंगल्याच्या दिशेने जाताना दिसले .पळत होते . म्या आवाज बी दिला पण त्यांनी ऐकलं नाही लांब होते ,मग मी त्यांच्या घरी सांगायला गेलो "-बाळ्या. 

"अजून काय माहित आहे तुला?"-विनोद 

"मला काय बी माहित नाही जास्त ,सरपंचना सांगू  नका मी सांगितलंय म्हणून ,त्यांनी ह्याबाबतीत कुठेही चर्चा करू नको म्हणून सांगितलंय.अजून एक सांगतो  संजू शेठ ला एक मुलगी दिसायची म्हणे .ती कोण ?कुठून अली? काय बे पत्ता नाय "-बाळ्या.

एवढ बोलून बाळ्या निघून गेला पुन्हा सुई त्या मुलीभोवतीच फिरू लागली ...खूप विचार केल्यावर सगळे  घराकडे आले .जेवण करून पुढचं काय ते ठरवू असा विचार केला त्यांनी .

"काय रे आलात का भटकून? काही कळलं का?"-आर्या

"आलो ना ..तुम्ही काय केलं ते सांगा आधी . काय ओआज्जी काही काम केलं कि नाही ह्यांनी कि नुसतं फक्त गप्पाच मारल्या ?."-विनोद .

"सगळे  गप्पा टप्पा करत जेवूं लागले ..थोडयावेळाने आज्जी पण काम आवरून  आली 

"आज्जी ,गाव खूप छान आहे  हे ... किती शांत आहे इकडे सगळं ... आम्हला काही सांगा ना ह्या गावाबद्दल ..रोहन तर काही सांगत नाही "-सीमा 

"काय सांगू बाई ? गाव ते गावच..! सगळं छान आहे इथे ..लोक आहेत बोलायला ...एक मेकांच्या सोबत उभे राहायला ..गावात एक जुनं मंदिर आहे .नवसाला पावतो बाई आमचा देव . "- आज्जी .

"आज्जी आम्हला बंगल्याविषयी सांगा ना !"-अमेय 

"बंगल्या विषयी काय सांगायचं आहे ? त्यात पडू नका तुम्ही ."-आजी 

"हे बघ आज्जे ,संजू मित्र होता माझा ,तो अजून घरी आला नाही .आणि तू पण मला बंगल्याजवळ जाऊ देत नाही ..सांग तरी नक्की काय प्रकार आहे तो .."-रोहन 

"हे बघ पोरा,तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही .म्हणून सांगते तिकडे जाऊ नका ,शापित हाय ते ......."=आज्जी 

"आज्जी सांगा ना आम्हला जाणून घ्यायचं आहे काय आहे ते ? आम्हला त्यावर लिहायचं आहे अभ्यासासाठी ."=सीमा 

"खूप वर्षांपूर्वी तो बांगला बांधला होता .लोक राहायची तिथे .एक कुटुंब होत जे तिथं येत जात होत .शहरच्या धकाधकी पासून लांब असं कधी कधी शांती मिळावी म्हणून तो बंगला बांधला  होता . पण जी लोक त्यात राहत होती ती अचानक वारली .एक अपघात झाला आणि ती गेली कायमचीच ... आणि अपघात मेलेले लोक भूत बनून फिरतात ...त्यांचाच भूत आहे तिथे ..त्यांची शक्ती असते तिथे .. आपला रामू जेव्हा पडला त्याचा पाय मोडला ,त्याने  म्हणे कोणातरी बयेला पाहिलं होत तिथे . पळतच आला  होता तो, तापाने फणफणला होत पोर ४ दिवस ."-आज्जी 

"आज्जी कोण होती बाई ? अजूनही तिथे असते का ?"-अमेय .

" हो तर तिथेच असणार ती ...बाई म्हणजे वाईट शक्ती च ,संजूला पण म्हणे कोणीतरी बाई दिसायची ..तिनेच ओढलं जाळ्यात त्याला ..."-आज्जी सांगू लागल्या .

आता सगळेच विचार करू लागले  नेमकी हि बाई कोण? रोहन म्हणाला कि," आपल्याला तिथे गेल्याशिवाय हे कोड सुटणार नाही ."

"मला हि तसच वाटतंय "-अमेय .

दुसऱ्या दिवशी सगळे गाव बघायला म्हणून निघतात .मुद्दामच बंगल्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्तावर चालू लागतात . तेव्हा त्यांना बाबू दिसतो .तो लपतछपत कुठे तरी जात असतो .हे सगळे त्याचा पाठलाग करायचा ठरवतात बाबू पुढे पुढे जात असतो आणि एका ठिकाणी थांबतो काहीतरी बघण्याचा प्रयत्न करता असतो .ह्या सगळ्यांना प्रश्न पडतो कि, तो इथे काय करतोय ? कोणाला शोधतोय ? तेवढ्यात तो काहीतरी विचार करून माघारी फिरतो .हे सगळे मित्र लपून हे बघत असतात . त्यांना तिकडे कोणी  दिसत नाही . म्हणून ते पण माघारी फिरतात 

"मला तर वाटत हे सगळं बांबूचं करतोय?"-सीमा 

"हो ना, नेहमी तोच अडवतो सगळ्यांना ,त्याला कास माहित असत कोण तिकडे ,केव्हा निघाला आहे ते?"-विनोद 

"पण बाबू साधा माणूस आहे ...तो कशाला हे सगळं करेल ?"-रोहन 

"साधा माणूस वैगेरे असं काही नसत आजकाल ....ज्या पद्धतीने तो लपतछपत जात होता ते बघून तर या वाटते कि त्याला नक्की काही तरी माहित आहे .."-आर्या

"हम्म ,आपल्याला त्याला भेटलाच  पाहिजे ."-अमेय 

सगळे विचारपक्का  करून बाबू ला भेटायला जातात . "बाबू ये बाबू थांब जरा ..आम्हला बोलायचं आहे "-रोहन 

"काय रे काय बोलायचं ?"-बाबू 

"आम्हाला त्या बंगल्याविषयी जाणून घ्यायचं  आहे ..तुला अजून काय काय माहित आहे तेसांग "-रोहन 

"मला काही माहित नाही ..तुम्ही पण तिकडे जाऊ नका ....अजिबात ह्यात पडायचं नाही ."-बाबू 

असं सांगून बाबू तिथून निघून गेला .सगळे एकमेकां कडे बघू लागले .घरी आले जेवण केलं .सीमा आणि आर्या आज्जी बरोबर गप्पा करण्यात मग्न होत्या .रोहन ,विनोद आणि अमेय परत बाहेर पडले ते सरळ बंगल्याच्या दिशेने ...

"बाबू इकडे काहीतरी पाहत होता ..नक्की कोणीतरी दिसलं असेल त्याला..किंवा तो कोणाची तरी वाट बघत असेल ."-विनोद 

"बघूया आपल्याला काही दिसत का ?"-अमेय 

सगळे त्या दिशेने जात असतात थोडं थांबून बघण्याचा प्रयत्न करतात .त्यांना बंगल्यात काहीतरी हालचाल जाणवते ..

"अरे हे काय ?कोणीतरी आहे बहुतेक बंगल्यात ?कोण असेल ?"-रोहन 

तेवढ्यात रोहनच्या खांदयावर कोणीतरी हात ठेवतो .दचकून मागे बघतात सगळे 

"तू ?"-रोहन .....

(कोण असेल तो ज्याने रोहनच्या खांदयावर हात ठेवला ?बाबुला काय माहित आहे ? बंगल्यात कोण आहे ?पाहूया पुढच्या भागात )

कथा आवडल्यास नक्की like  आणि कंमेंट करा .शेअर  करताना कृपया नावासहित कथा शेअर  करा. 

  

🎭 Series Post

View all