शक्ती -2

Rohan found something strange ...he shared all things with his friends .Rohan's friend sanjay is missing .

सगळे जण रोहन ला  शोधत असतात . पण तो कुठे हि दिसत नाही . अचानक सीमा  म्हणते,' ये आपण लायब्ररी त बघूया एकदा .'सगळे जातात आणि रोहन त्यांना तिथे एका खडकीतून बाहेर बघत असलेले दिसतो .विनोद "रोहन, अरे कुठे होतास तू ?आम्ही तुला सगळीकडे शोधल. काय झालं मित्रा.. ? ""हे बघ रोहन, आम्ही मस्करी केली ,पण त्यात एवढ चिडायला काय झालं ?"-सीमा .तेवढ्यात लिब्ररीअन त्यांना बाहेर जाण्यास सांगतो . सगळे बाहेर निघतात ,रोहन अजून हि कोड्यात पडलेला  असतो ."ए  रोहन,बस झालं आता , चल बोल तू काय म्हणत होतास ?"-अमेय सगळे एका ठिकाणी बसतात. रोहन बोलू लागतो ," मी गावकडूनल्यापासून तुमच्याशी बोलत नाहीये कारण मी एका विचारात पडलोय .मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत  पण कश्या सांगू आणि सांगू कि नको ह्या विचारात मी होतो आणि  मग मी तुम्हाला सांगायचे ठरवले आणि म्हणून मी आलो होतो ,तर तुम्हाला काही ऐकायचाच नव्हता .""ए  बाबा ए  ,आता बोला ना !ठीक आहे, आम्ही नव्हत ऐकलं पण तूच बोलत  नव्हतास ,जाऊ दे, ते नको पुन्हा. तू काय बोलणार होतास ते सांग आता आधी ."-आर्या."ठीक आहे सांगतो . मला माहित नाही तुमचा विश्वास बसेल  कि नाही? तुम्ही काय विचार कराल पण मला तुमच्याशी बोलल्याशिवाय चैन नाही पडणार . तुम्हाला तर माहीतच आहे कि, मी आजी कडे गेलो होतो . माझी आज्जी एका लहान गावात राहते .ते गाव काही सुधारलेला गाव नाहीये .अगदी छोटस गाव आहे .तिथे बऱ्याच वेळा वीज हि  नसते .पण मोकळं वातावरण आणि शुद्ध हवा असते .मला खूप आवडते तिथे .शांती मिळते एकप्रकारची म्हणून मी जात असतो . आमच्या गावात एक घर बंद आहे खूप दिवसांपासून .खरं म्हणजे तो एक बंगला आहे . खूप दिवसांपासून बंद आहे तो . त्याघरात भूतांचा वास आहे ,असा समज आहे गावात आणि म्हणून कोणी तिकडे जात नाही . बायकांना तर सक्त बंदी आहे तिकडे फिरकायल .कोणी कधी जात नाही . एकदा मी आणि माझ्या काही मित्रांनी  जाण्याचा प्रयत्न  केला होता पण पकडले गेलो आणि खूप रागावले गावातले सगळेच .पण उत्सुकता काही थांबली नाही कधी .त्यातच  एक घटना घडली .एक मुलगा खेळता खेळता तिकडे गेला होता. पण मग अचानक त्याच्या किंचाळण्याचा आवाज आला आणि तो तिथून पळून गेला . गाववाल्यानी त्याला कसं बस शोधला तेव्हा त्याच्या अंगात खूप ताप भरलेला होता .त्याच्या पायाला खूप लागला होता .त्याला त्याच्या घरी नेलं तेव्हा त्याचा पाय  मोडला हे कळलं . असे एक नाही दोन ,तीन किस्से घडले आणि मग कोणी तिकडे कधी फिरकलेच नाही . मलाही आज्जी ने बजावून सांगितले होते कि, तिकडे जायचे नाही . पण ह्यावेळेस जरा वेगळेच वाटत होते .माझा मित्र संजू गायब झाला .लोकांचा संशय आहे कि, तो त्या बंगल्याकडे गेला असेल आणि त्यामुळे भूताने त्याला गायब केलं . मला काही हे खर वाटेना .मी हयाच विचारात जात होतो .जात जात माझे पाय त्यबंगल्याकडे कधी वळले ते कळलेच नाही .मला तो बंगला  दिसत होता .मला वाटले कि, आता जाऊन बघून यावं पण अचानक बाबू ने थांबवले .मला म्हणाला, "इथे काय करतोस ?तुला माहित आहे ना तिकडे जायचं  नाही ."मी त्याला सांगितले कि संजू गायब आहे आपण त्याला इकडे शोधला पाहिजे . बाबू ने रागाने मला ओढला आणि म्हणाला,"ए बाबा ,कशाला जिवाशी खेळतो ? तिकडे जी व्यक्ती जाते ती च्यासोबत काहीतरी वंगाळ घडतंय ,ठाव हाय ना ? चाल  जा !."त्याने मला जाऊ दिल नाही ..असे बरेच प्रश्न आहेत ज्यांचा मी गेले काही दिवस विचार करतोय?"-रोहन "अरे पण मग तू ह्या गोष्टीचा शोध का नाही घेतला ?"-आर्या."आणि कशावरून संजू ला काही झालं असेल ?तो पळून गेला असेल ...घरी काही झालं असेल त्याच्या .."-विनोद " मला तर वाटतंय कि ,त्या घरात नक्की धन ,सोनं,असं काहीतरी असणार ...कोणाचा बांगला आहे तो माहित आहे का तुला ?"-सीमा ."एक मिनिट , हे बघा पहिली गोष्ट म्हणजे त्या बंगल्या जवळ गेल्यावर काहीतरी घडत असा समज आहे ,दुसरी म्हणजे  त्या छोट्या मुलाने काय पहिले ज्यामुळे तो किंचाळला ? आणि तिसरी म्हणजे संजू गायब आहे आणि कोणी त्याचा शोध घेत नाही ..."-अमेय ."हो ना मी हि तोच विचार करतोय आल्यापासून  ..ह्या गोष्टींचं एकमेकांशी काही संबंध आहे का ?  का हा एक योगायोग असावा? पण मग संजू चा काहीच का पत्ता लागत नाही ...म्हणूनच तर तुमच्याशी बोलायच होत ..."-रोहन ."हं ,रोहन, संजू तुझा मित्र मग तू काही शोधल नाही ? तो काय करायचा ?कुठे जायचा ?तुला अंदाज असेल ना ? "-सीमा "अग मी प्रयत्न केला ,पण मला काहीच माहिती मिळाली नाही. त्याचे आई वडील त्याच शोध घेत होते .पण त्यांना काही हाती लागले नाही . कोणीतरी त्यानं सांगितले कि, तो त्या बंगल्याच्या दिशेने गेला होता आणि मग नंतर गायब झाला . म्हणून तर मी जात होतो पण मला जाऊच दिले नाही बाबू ने ..नंतर मी परत प्रयत्न केला पण कोणी ना कोणी मध्ये येत राहिलं. मग बाबू माझ्यावर लक्ष ठेवून होता .त्यामुळे जात आलं नाही आणि मग मी इकडे आलो ,म्हंटल तुमच्याशी बोलावं आणि मार्ग काढावा ."-रोहन .

(काय झालं असेल त्या बंगल्यात ? संजू कुठे गायब झाला ?त्याला काय झालं असेल? हे सगळे मित्र आता काय करतील?पाहूया पुढच्या भागात )तुम्हाला लेख आवडल्यास फोल्लोव करायला आणि कंमेंट करायला विसरू नका हं ..


🎭 Series Post

View all