शक्ती -१

its a story of town where few srtrange things happens ..... The boy get disturbed ..and discuss the issue with his friends ...

"आज मला थोडं बोलायचं आहे ."- रोहन  गंभीर चेहरा करून म्हणाला . तस सगळे एक -मेकांकडे बघू लागले . "काय बोलायचं आहे मित्रा ? काही नवीन ज्ञान देणार आहेस का ?"- अमेय म्हणाला  आणि हसला तस सगळेच हसले ." ए ,रोहन प्लिज जरा हसरा चेहरा करून बोल, काही होत नाही .बर  का .. मागच्या ४-५ दिवसांपासून बघतोय तुझा पडलेला चेहरा ."-आर्या म्हणाली .



" तुम्ही ऐकणार आहात का  ? आणि ४-५ दिवसापासून बघताय ना ..मग तरी हि तुम्हाला मस्ती सुचतेय .."-रोहन .



"अरे मग काय ?,तुला प्रेत्येक गोष्टीच टेन्शन घ्यायची सवय आहे .काहीतरी न्युज  बघतोस , वाचतोस आणि मग टेन्शन घेतो ."-सीमा



" नाही ग ,टेन्शन नुसतं घेत नाही देतो पण ...."आर्या आणि हसली .



"तस हि गावाकडून आल्यापासून तूच तर गप्प होतास आम्ही बोलावलं तरी तुलाच तर बोलायचे नव्हते आणि आमच्यासोबत यायचे हि नव्हते ."- विनोद .



तुम्हाला ना काही ऐकूनच घ्यायचे नाही ,फक्त नावापुरते मित्र .माझ्यासोबत काय होते आणि काय नाही ह्याची कोणालाच पडली नाही ...जाऊ दे ना मी तरी कोणाला सांगतो ,उद्या माझं काही बार वाईट झालं ना मग कळेल तुम्हाला .."-रोहन .(रोहन तिथून निघून जातो )



सगळेच विचार करतात हा असा का वागतोय ?"ए नक्कीच त्याला काहीतरी सांगायचे असेल ,आपण ऐकायला हवे होते ."-सीमा 



"हो का ?मग तू का नाही ऐकले ?"- आर्या .



"हेय ,chill हे बघा आपण थोडीशी गम्मत केली त्याची पण तो ज्याप्रकारे गेला ते बघून असे वाटते कि, आपण त्याच ऐकायला हवं , तो काय म्हणतो ते तरी बघू ? चला ."-विनोद .



सगळे त्याला कॉलेज मध्ये शोधतात पण तो सापडत नाही .



सीमा ,आर्या ,विनोद ,अमेय ,रोहन हे एका कॉलेज चे .चांगले मित्र जीवाला जीव देणारे .अमेय थोडा प्रॅक्टिकल आणि विनोद स्वभावाने थोडा गमतीशीर .सीमा आणि आर्या ह्या दोघीही  हुशार आणि स्मार्ट मुली ,रोहन हा थोडा स्वप्नाळू , समंजस आणि हुशार मुलगा . अमेय ला नेहमी काहीतरी शोधायला ,डोकं लावायला आवडत असे ,विनोद आपला मस्त ,जास्त  काही विचार नको,डोक्याला शॉट नको ,सीमा साधी पण हुशार मुलगी ,डान्स आवडायचा तिला ,आर्या ला दुसऱ्यांची थोडी खेचायला आवडत असे .दिसायला सुंदर त्यामुळे थोडा भाव खाणारी ,आणि जश्याला तशी वागवणारी. रोहन  ला पुस्तके वाचायला आवडायची . तो वाचन करत असे .त्यात हि त्याला थोड्या रहस्यमयी  कथा वाचायला  जास्त आवडते असे . असा त्यांचा ग्रुप .सगळेच छान मित्र होते . सगळ्याच गोष्टीत ते एक मेकांच्या सोबत होते . कुठे जायचे असेल किंवा कॉलेज चा अभ्यास असेल ते सगळे मिळून करायचे . रोहन ला आई वडील नव्हते पण एक आजी होती गावाकडे .काही दिवस आधी रोहन त्याच्या गावी आजी कडे गेला होता .तिथून आल्यापासून तो थोडा गुपचूप असायचा. कमी बोलत असे ,नेहमी विचारातच असायचा ,पण काहीतरी विचार करून त्याने आज मित्रांशी बोलायचं असं ठरवलं होत आणि म्हणून तो त्यांच्याशी बोलायला आला होता .



ते सगळे मिळून रोहन ला शोधू लागले . 



रोहनला काय सांगायचे असेल? रोहन नाराज होऊन कुठे गेला असेल ?पाहूया पुढच्या भागात ..



(क्रमशः:)






🎭 Series Post

View all