शक्ती -१0

Ajay searching truth and try form connection between the facts and people .in the mean time they cought one person as per the description given by sanjay

https://irablogging.com/blog/shakti--9

दुसऱ्या दिवशी पोरं परत शहरात जाण्यासाठी निघतात ....संजू ला भेटावं म्हणून घरी जातात .तिथे त्यांना सबनीस हि भेटतात ..

"नमस्कार सर ,संजू कसा आहेस ?"-रोहन 

"मी बरा आहे .  सगळे कोण आहेत ?"-संजू 

"हे सगळे माझे मित्र आहेत .मी जेव्हा तुझाशोध घ्यायचं ठरवलं तेव्हा हेही आले तुला शोधायला .."-रोहन सगळ्यनाची ओळख करून देतो 

"चला तर मग संजू साहेब आम्ही निघतो .तुम्ही ह्या माणसाला ओळखल्याबद्दल धन्यवाद ..बघू पुढे काही हाती लागतंय का ?"-सबनीस 

"हे कोणाचं चित्र आहे ."-अमेय 

"हे त्या माणसाचे आहे ज्याला संजू ने पाहिलंय आणि जो त्याच्या सोबत होता ."-सबनीस 

सगळेजण ते चित्र बघतात आणि सबनीस सगळ्यांचा निरोप घेऊन बाहेर जातात . सगळे मित्र संजूशी गप्पा करतात आणि मग तेही जायला निघतात .घरी जातात .सगळं आटोपून निघतात 

"पोरांनो परत या ,खूप छान  वाटले  इतके दिवस ..पोरींनो घरी आमची आठवण सांगा ."-आज्जी 

"हो आज्जी आम्ही परत येऊ ,आम्हला खूप आवडले इथे .."-सीमा 

सगळे निघतात .निघताना पोलीस स्टेशन ला जाऊन अजय ची भेट घेतात . 

"काय मग निघालात ..जपून जा ...आणि हो पोलिसांची मदत घेत जा ..एकट्यानेच संकट ओढवून घेऊ नका .."-अजय 

"हो नक्की ...येतो  आम्ही .."-विनोद,रोहन 

"दादा ,एकदा घरी ये आई ला सांगेन मी सगळं ....मला माहित आहे तुला नाही आवडत जास्त दादा म्हंटल तर पण तरीही आज म्हणते कारण खरच तू आम्हला खूप मदत केलीस "-सीमा .

सगळेजण निरोप घेऊन निघतात .इकडे अजय ,सबनीस सरपंचाचा आणि त्यांच्या मुलाचे काय रहस्य आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतात ...

............................................................................................................................................................................................

दोन चार दिवसात अजय परत एकदा बंगल्याची पाहणी करायला जातो .तिथे त्याला घराच्या मागे असलेले चेंबर उघडून परत मध्ये जायचं असते . तिथे अजून काय आहे हे बघायचे असते .तो खाली उतरतो ..बारकाईने पाहणी करतो .खालची जागा म्हणजे मोठा हॉल असतो ."हा "हॉल कश्यासाठी बांधला असेल ?काय असेल खास ह्यामध्ये ?" तो स्वतःशीच  विचार करत असतो . पाहणी  करता करता एका ठिकणी  म्हणजे हॉल च्या मागच्या एका कोपऱ्यात त्याच पाय खाली जातो .पायाखालची माती भुसभुशीत असते ...तो थोडी  पाहणी करतो ...थोडासा खोदून काढतो ... त्याच्या लक्षात येत कि खाली काही तरी खोदलेला आहे ..जे कि नंतर कोणाला कळू नये म्हणून बुझवलं गेलं आहे .  तो अजूनच त्याला खोदतो तर मोठा खड्डा दिसतो .टॉर्च च्या मदतीने बघतो पण हाती काही लागत नाही .त्याच्या सोबत असणाऱ्या माणसांना बोलावून घेतो आणि मग बराच खोद  काम केलं जात  ..अचानक मातीमध्ये काहीतरी चमकत तो ते उचलून बघतो .ते तर एक सोन्याचं नं असतं. त्याला आठवत त्यादिवशीपण त्याला असाच एक नाणं सापडलेलं असतं .तो हेही नाणं तपासायला पाठवतो .आणि माघारी फिरतो .

रात्री बसली बसल्या विचार करत असतो . सगळ्या घडामोडी एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करतो . 

संजू -ती बाई -बंगला -रोहन न फ्रेंड्स -बाबू -सरपंच -विजय (सरपंचाचा मुलगा )

विचार करतच त्याला झोप लागली ..दुसऱ्यादिवशी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर 

"काय मग सबनीस ..काही कला का संजू ने सांगितलेल्या माणसाचं ?"-अजय 

"हो साहेब , काम चालू आहे मासा जाळ्यात येईलच ...तो एक टोळीचा साथीदार आहे ..हि टोळी देह व्यापार करते ..मुलींना पकडून आणतात आणि विकतात .."-सबनीस 

"हं ,सरपंचाच्या मुलाचं काय झालं ?"-अजय 

"चौकशी केली त्याची हि पण तो तिथे नव्हता ..सरपंच काल भेटले नाही परत बघतो काय ते ?"-सबनीस 

ठीक आहे ,मी बाबू कडे जाऊन येतो .."=अजय .अजय बाबू कडे जातो 

"आहे का  कोणी घरात ?"-अजय 

"कोण? साहेब तुम्ही ..या या .कस काय येन केलं ?-बाबू 

"मला सांगा सरपंच आणि त्यांचा मुलगा विजय काय माहिती आहे तुम्हाला ?"-अजय 

"काय सांगू  साहेब ,विजय उनाड पोर आहे ... बाप सरपंच आहे म्हणून संपूर्ण गावभर दादागिरी ....आणि सरपंचाचा काय ते तर लोभी माणसं... पैसे बघितला  कि झालं सगळं ....तो मुलगा बी तसलाच ..पण एकदा अचानक दोन तीन दिवस तो दिसलाच नाही ..मग गावात चर्चा सुरु झाली ...असं कळलं  कि तो शहरात गेलाय शिकायला ..पण मला खरं नाही वाटत  .....काही तरी नक्क्की गडबड आहे .."-बाबू 

"हं ,असं आहे तर ..आणि बंगल्याचं काय ? सरपंच आणि बंगला काही माहिती आहे का ?"-अजय 

"तुम्ही मानत  नाही साहेब , पण वाईट शक्ती असते ..मी स्वतः हा नजर उतारा  केलाय त्या जागेचा .....सरपंचांना भी नाही आवडत तिकडे कोणी गेलेलं म्हणूनंतर आमच्यावर हल्ला झाला ना .. आणि मी तर ऐकलंय कि विजय च्या शहरात जाण्याआधी तो सुद्धा बंगल्यात च गेला होता ..नंतर  कोणाला दिसलाच नाही तो .."-बाबू 

"ठीक आहे ..बघू "-अजय .तेवढ्यात सबनीस चा फोन येतो 

"साहेब ,मासा जाळ्यात आला बर का ..उद्या पर्यंत आणतील त्याला इकडे "-सबनीस 

"अरे वा ,छान "-अजय "  'आता बरेच प्रश्न सुटतील' ..अजय स्वतःशीच बोलतो . संजू ने वर्णन केलेल्या माणसाला पकडण्यात आलं होत .जे वर्णन संजू ने केलं ते पोलिसांनी त्यांच्या गुनगरी लोकांशी जुळवून बघितले होत आणि त्यात त्यांना तो सापडला होता .तो शहरात असल्याची खबर पोलिसांच्याच्या खबर्यांनी दिली होती ..त्यामुळे त्याला पकडण्यात यश आलं होत ..  अजयने आता परत एकदा सगळ्या मुद्द्यांची जमवाजमव केली कामाची आखणी केली .

१) संजू ने वर्णन केलेल्या माणसाला पकडण्यात आलेलं यश ,सगळ्यात आधी त्याची माहिती काढून घेणे 

२) सरपंच आणि त्याच्या मुलाची माहिती घेणे ..विजय शोधणे खूप महत्वाचे होते 

३) ते सोन्याचं नाणं तिथे सापडला म्हणजे तिथे अजून काही असण्याची शक्यता ...आणि त्याचा शोध ...

सगळं विचार करून आणि आखणी करून त्याने शहरात फोन केला आणि जो पत्ता सरपंचानी  विजय चा दिला होता तिथे अजून माणसं पाठवली आणि माहिती जमा करायला सांगितली .अजय आता दुसऱ्यादिवसाची वाट बघत होता .....

(त्या माणसाकडून अजून काय माहिती मिळते ?विजय सापडतो का? पाहूया पुढच्या भागात ..)

🎭 Series Post

View all