शक्तीची उपासना
शुभ्रा ने घाई घाईने स्कुटी स्टँडला टेकवली. भरभर लिफ्ट पाशी येत बटन दाबले लिफ्ट खाली येई पर्यंत तिला धीर धरवत नव्हता. तिनेपरत बटन दाबले.
लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर पोहोचली. बाहेर येत जवळ जवळ धावतच ती घराकडे वळली.

कॉरिडॉर मध्ये निलीमा काकू फेर्या मारत होत्या. एरवी हसून गप्पा मारणारी शुभ्रा .आज काय झाले हिला? ह्याचा विचार त्यांच्या मनात आला.
दार उघडून शुभ्रा ने सरळ बाथरूम गाठली. इतक्या वेळ रोकून ठेवलेली मळमळ उलटी वाटे बाहेर पडली.
चूळ भरून ती कशीबशी बाहेर आली व सोफ्यावर येऊन आडवी झाली. पाच दहा मिनिटे तशीचशांतपणे डोळे बंद करून.

दाराची बेल वाजली, तिने कसेबसे उठून दार उघडले.नवरा राहुल होता.
काय झालं ग चेहरा का उतरला?? विचारत आत आला, त्याच्या मागोमाग निलीमा काकू पण होत्या.
"शुभ्रा काय ग झाले तुला?? न बोलता आली तेव्हाच वाटलं."
हो काकू खूप ऍसिडिटी झाली मळमळत होते उलटी झाली आता जरा बरं वाटतंय पण डोकं खूप जड..,.
थांब मी आलेच म्हणत नीलिमा काकू घरी परत गेल्या.येताना एक ग्लास भरून कोकमचं थंडगार सरबत घेऊन आल्या.
हे घे, पिऊन घे, पित्त झाले तुला बरं वाटेल.
सरबत पिऊन झाल्यावर शुभ्रा ला थोडं बरं वाटलं.
"दिवसभरात काय खाल्लं होतं" राहूल न विचारलं.??
काही नाही ,चहा घेतला होता,दोन तीनदा आणि शेंगदाणे खाल्ले होते...
उपास होता का??
हो..
कोणी सांगितलं होत?राहुल चिडून म्हणाला.
अरे नवरात्र सुरू झालं शुभ्राने सांगितले.
"बरं-- आता जरा आराम कर, मी खिचडी करून आणते."उपास सोडायचा आहे न?
"मी करतो ना काकू...
राहूल ."
अरे आणते रे मी म्हणत काकू निघून गेल्या.

आठ वाजता काकू लिंबाचं लोणचं आणि मुगाची खिचडी घेऊन हजर .
हे खा बरं, राहूल घे तू पण. थोडीशी खिचडी खाऊन शुभ्राला बर वाटल.
"एक विचारू राहुल??" तुमच्या घरी नवरात्राचा कुलाचार वगैरे आहे कां"??
हो-- पण तो मोठ्या घरी आईकडे नाही.
मग उपास वगैरे करतात का नऊ दिवस?
" नाही आई फक्त एक पहिला दिवस आणि अष्टमीचा करते.
"मग शुभ्रा तुझ्या माहेरी आहे कां??
नाही काकू, ते काय आहे ना-- ऑफिसमध्ये सध्या मैत्रिणींमध्ये चर्चा चालली होती, नऊ दिवस देवीचे ,नऊ रंगाच्या साड्या किंवा ड्रेस घालायचे व उपास .
एक सांगू शूभ्रा बघ तुला पटतंय का ,"नवरात्रात देवीचे आगमन असते .नऊ दिवस ती नऊ रूपात वावरते देवीच्या उपासनेसाठी नवरात्र शुभ मानतात.
प्रत्येक रूपात तिची पूजा केल्याने प्रसन्नता येते,कष्ट दूर होतात, यश प्राप्ती होते आपली मनोकामना पूर्ण होते अशी मातेची महिमा आहे .
त्या नऊ दिवसात
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्र घंटा,कुष्मांडा,स्कंद माता,कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री,अशी नऊ रुपात देवीची पूजा करतात,
केळ,गायीचं तूप,खीर,, पंचामृत,गूळ,नारळ अश्या साध्या सोपा प्रसाद देवीला नेवेद्य पुरतो
नवमीच्या दिवशी खीर,पूरी,चण्या चा प्रसाद. येवढं ही पुरत.

अशी ही माताती भक्तांचे कष्ट दूर करते. पुष्कळजणांकडे अखंड ज्योत असते अखंड ज्योती सकारात्मक ऊर्जा पसरवते
या नऊ दिवसाच्या नवरात्र उपवास नाही जमले तरी उपासना करावी आणि ती आपल्याला जमेल तशी करावी.
म्हणजे काकू उपास नाही केले तरी चालतं ?
हो --बघ, तुझी श्रद्धा महत्वाची. बाकी तू पूजा कर ,त्या रंगाच्या साड्या नेस, रोज रांगोळी काढ जमेल तसं. रोज देवीचा" बीज मंत्र" आहे त्याचा जप कर, प्रसाद म्हणून त्या त्या दिवशी लागतो तो ठेव ,एकूण काय मन प्रसन्न ठेवून जे शक्य असेल ते कर,
"उपवास नाही त्या शक्तिची उपासना कर." शरीराचे हाल नको, देवी हे शक्तीच प्रतीक आहे आपल्यात असलेल्या शक्तीला जागृत करायसाठी .जी प्रत्येकात असते. तिला जागृत करायसाठी मातेची आराधना करायची.
मग बघ हे नऊ दिवस किती छान वाटतिल एक नवीन चैतन्य जाणवेल.. बर चल झोप तू आता शांत मीही झोपते.
झोपताना शुभ्रा च मन खूप हलक झालं,
सकाळी सकाळी नीलिमा काकू फुलांची परडी घेऊन शुभ्राकडे आल्या. दारात सुंदर रांगोळी आणि घरांमध्ये" मंजुळ स्वरात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते"जपाची रेकॉर्ड लागलीहोती.
शुभ्रा प्रसन्न चेहऱ्याने ऑफिसमध्ये निघण्याची तयारी करत होती.
तिच्या हातावर प्रसाद देत,राहूल च्या हातातगजरा देवून इशारा करुन काकू प्रसन्न पणे हसत बाहेर गेल्या.
आजचा रंग लाल,म्हणजे. माता प्रसन्न वाटत ह्या राहूल भक्ता वर लाल रंगाची साडी नेसलेल्या शुभ्रा कडे कौतुकाने पहात राहुल म्हणाला.
हो बरं मी निघते ,माझा डबा मी घेतलाय तुझा डब्बा भरून ठेवला आहे म्हणतशुभ्रा प्रसन्न पणे ऑफिसला जायला निघताना राहुल ला म्हणाली "संध्याकाळी चलशिल ना रे देवी दर्शन करायला ?तिथे डांडिया खेळ पाहू.
जेवण बाहेरून करून येऊ या कां? राहूल म्हणाला. चालेल?
, मै तो भूल चली बाबूल का देश पिया का घर प्यारा लागे गुणगुणत शुभ्रा बाहेर आली.
-------------------------------------------