Dec 05, 2021
सामाजिक

शहर आणि गाव यातील फरक

Read Later
शहर आणि गाव यातील फरक

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
मी मूळची मुंबईची, लग्न करून देवरुख - रत्नागिरी इथे स्थायिक झाले, सुरवातीला थोडे दिवस गाव ची हवा, वातावरण छान वाटत गेलं, पण नंतर थोड्याच दिवसात मुंबई च्या गजबजाटाची आठवण येऊ लागली, दिवस संपता संपेना, मे महिन्यात इकडे आल्यावर, थोड्याच दिवसात जुन मध्ये पाऊस सुरु झाला, गावचा पाऊस म्हणजे जोरजोरात गडगडाट, आणि पाऊस सुरु झाला कि 2,3 तास थांबत च नसे, विजांचा कडकडाट खूप असे, मला तर घरा बाहेर पडायला हीं खूप भीती वाटू लागली, सारखी मुंबई ची आठवण येऊ लागली, एकतर मुंबईच्या मानाने इकडे कपडे, किंवा इतर खरेदी हीं खूप महाग वाटू लागली, आमच्या घरा समोरच मराठी शाळा आहे, तिथे सायकल वर लांबून येणारी मुलं बघितलं कि अस वाटायचं कि आपण शहरात किती सुख सोयीनी सज्ज होतो, शाळा पण किती जवळ, जवळ होत्या, हीं मुलं शिक्षणासाठी एवढे कष्ट घेतायत, ह्या सर्व गोष्टींची मी सारखी मनातल्या मनात तुलना करू लागले. जरा पाऊस मोठा चालू झाला कि महावितरण वाले काही वायर वैगरे तुटू नये म्हणून lights घालवत असतं, आणि शहरात म्हणजे मुंबई ला तर light जास्त जायची च नाही आणि गेली तरी लगेच पुन्हा येत असे, इथे 2,3 तास light नसे त्यात पक्ष्यांचा आवाज, खूप भीती वाटू लागली होती. सारखं वाटे कशी इथली लोक इथे एवढे वर्ष राहू शकतात, पण म्हणतात ना काळ सर्व गोष्टीवर औषधं असतो, असच काळ पुढे सरकत राहिला, आणि मग शहर आणि गाव ह्यातलं अंतर कमी वाटू लागलं. शहर आणि गावामध्ये वाढणे, त्यातील त्रुटी, महत्व समजू लागले.. कालांतराने सगळ्या गोष्टी routine ला येऊ लागल्या, आणि गावची भीती असणारी मी गावी सेट झाले.. आता काहीच वाटत नाही, गरजेनुसार मग इन्व्हर्टर आला, इथे चांगल्या शाळा सुरु झाल्या आहेत, हळू हळू सर्व सुख सोई होऊ लागल्या, मग शहर आणि गाव मधले अंतर कमी होत गेले,........ नमस्कार.. आज इथेच थांबूया... पुन्हा लवकरचा भेटू 1 नवीन विषय घेऊन........... सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे.....

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mrs. Sonal Gurunath Shinde

लेखिका

MA - Economics And Sociology