सावली

Short Poem On Shadow


सावल्यांना फुलांसारखच गंध असतो का...
सुगंध त्यांचा वेचता येतो का...?
सावल्यांना बोलके डोळे असतात का...
भाव तयातील टिपता येतात का...?
सावल्यांना सहवास असतो का...
त्या सहवासात रमता येत का...?
सावल्यांना मनं असतात का...
गुज मनातली त्यांच्या कळतात का...?
सावल्यांना भावभावना असतात का
घाव बोचरे छळणारे त्याही देतात का....?
सावल्यांना श्वास असतात का...
आपल्यासारखेच श्वास त्यांचे मिटतात का..?

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे