*शीर्षक - पित्याची सावली*
कधीच पित्याची सावली
सोडत नाही ही साथ
नेहमीच वाटे डोक्यावर
राहावा त्यांचा हात
सोडत नाही ही साथ
नेहमीच वाटे डोक्यावर
राहावा त्यांचा हात
निराशेतून दाखवतात
माझे बाबा अशी वाट
जणू संकटाच्या रात्रीनंतर
उगवते सुखाची पहाट
माझे बाबा अशी वाट
जणू संकटाच्या रात्रीनंतर
उगवते सुखाची पहाट
वडिलांना समजणे
नसते सोपे काम
आपल्या मुलांसाठी
रात्रंदिवस गाळे घाम
नसते सोपे काम
आपल्या मुलांसाठी
रात्रंदिवस गाळे घाम
सर्वांना फक्त देणे
हाच असे विचार
त्यांच्या सहवासात
दुःख होते सारे पार
हाच असे विचार
त्यांच्या सहवासात
दुःख होते सारे पार
निरोगी अन् आनंदी
माझे वडील राहावे
त्यांच्या सोबतीनेच
पुढचे जग पाहावे
माझे वडील राहावे
त्यांच्या सोबतीनेच
पुढचे जग पाहावे
© विद्या कुंभार
कायमस्वरुपी ऋणी असलेल्या प्रत्येक जन्मदात्याला ही कविता समर्पित!
सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा