शादी का लड्डू भाग २..
मागील भागात आपण पाहिले कि नवराबायकोच्या भांडणांना घाबरलेला पार्थ लग्नाला नकार देत होता.. त्यात ऑफिसमधून घरी परतताना त्याला एक मुलगी भांडताना दिसली. आश्चर्य म्हणजे तीच मुलगी त्याला त्याच्या समोरच्या बिल्डींगमध्ये पण दिसते आणि आता ऑफिसच्या बिल्डींगमध्ये सुद्धा.. पाहू आता पुढे काय होते ते..
"ओ मिस्टर.. बरे आहात ना?" पुढे जाणाऱ्या पार्थला आवाज ऐकू आला.
" मला कोण बोलवतय?" विचार करत त्याने मागे वळून पाहिले.. तर खरेच कालची मुलगी होती.. त्याने डोळ्यांची उघडझाप केली..
" तुम्ही बरे आहात ना? मी काहीतरी बोलते आहे तुमच्याशी.." ती त्याच्यासमोर चुटकी वाजवत म्हणाली..
" बोला ना.." पार्थ गोंधळून म्हणाला..
" तुम्ही काय येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला सांगता तुम्हाला लग्न करायचे नाही म्हणून?"
" म्हणजे?"
" आता तुम्ही जे बोललात ते?" ती कंबरेवर हात ठेवून म्हणाली..
" अच्छा ते.. मी जोरात बोललो का?"
" हो.. निदान मला तरी ऐकू गेले.."
" त्याचे काय आहे.. तुम्ही मला काल सिग्नलपाशी दिसलात. मग नंतर माझ्या घरासमोर एक घर आहे जिथे मुली पेईंग गेस्ट म्हणून राहतात तिथे दिसलात.. आता इथे.. मला वाटले मला भास होतोय." पार्थ समजावणीच्या सुरात म्हणाला..
" अच्छा.. काल सिग्नलवर तुम्ही होता का बाईकवर? तरी म्हटले चेहरा का ओळखीचा वाटतो आहे.."
" माझा चेहरा पाहिलात का तुम्ही?"
" न बघायला डोळे फुटलेत कि काय माझे?"
"मी कुठे असे म्हटले?" पार्थ थोडा बिचकून म्हणाला..
" तुम्ही कुठे राहता?" तिने रोखून बघत विचारले..
" मी.. बटाट्याच्या चाळीत.."
" मग बरोबर.. काल मीच होते तिथे.. कसं आहे मी नुकतीच आले आहे इथे. माझी एक मैत्रीण तिथे म्हणजे तुमच्या बटाट्याच्या चाळीसमोर आधीपासूनच पेईंग गेस्ट म्हणून राहते. मग तिनेच माझी तिथे सोय केली.. आणि आता इथे नोकरी पण कन्फर्म झाली.." तिची सुसाट एक्स्प्रेस थांबायलाच तयार नव्हती.. आता हि आपला पूर्ण इतिहास सांगते कि काय असे वाटून पार्थ पटकन म्हणाला..
" मी बोलू का?"
" बोला कि.. मला आवडते ऐकायला."
" मला ना ऑफिसला उशीर होतो आहे मी निघू का?"
" तुम्हीतर असे बोलताय जसे काही मीच तुम्हाला अडवले आहे.." ती खांदे उडवत म्हणाली.. पडत्या फळाची आज्ञा घेऊन पार्थ तिथून सटकला.. चालताना पण त्याच्या चेहर्यावर हसू होते.. कसली भांडकुदळ आहे हि आणि किती बोलते बापरे.. हिचे तोंड दुखत कसे नाही.. आजी काय म्हणायची.. हां.. मातीचे तोंड असते तर आतापर्यंत फुटले असते.. पार्थ हसतच ऑफिसमध्ये आला.. त्याला हसताना बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला..
" मी सांगतो नक्की मुलीची काहीतरी भानगड आहे.." सारंग म्हणाला..
" यांना बर्या मुली भेटतात.." प्रशांतचा चेहरा उतरला होता..
" आता आपले वय झाले.. त्याचे अजून सगळे बाकी आहे.. मग त्यालाच भेटणार ना पोरी.. बरोबर ना राघवा?"
" सर.. माझे तर आत्ताच लग्न झाले आहे.. मी तर तुम्हाला ज्युनियर आहे.. माझे कसे वय होईल?" राघव थोडा लाजत म्हणाला..
" इथे वयाचा प्रश्न नसतो बाबा.. लग्न झाले कि संपले सगळेच.. " प्रशांत सुस्कारा सोडत म्हणाला.. " आज मयुरेश बरा शांत आहे?"
" वहिनी माहेरी गेल्या असतील.." राघव म्हणाला..
" गेल्या असतील कि आल्या असतील?"
इथे पुरूषांची एवढी मस्करी चाललेली असूनही पार्थ स्वतःच्याच धुंदीत होता. जणू तो या जगातच नव्हता.. कंबरेवर हात ठेवून बोलणारी ती जणू रखुमाई भासत होती. तो स्वतःशीच हसत होता..
" आज येताना या पार्थचा स्क्रू पडला कि काय?" राखीने किमयाच्या कानात विचारले.
" बघ ना मगापासून एकटाच हसतोय." वर्षा त्यांच्या टेबलपाशी येऊन बोलली..
" मला बाई याचे लक्षण ठिक दिसत नाही.."
" जाऊ दे आपल्याला काय करायचे आहे.. आपण बरे आणि आपले काम बरे.." सगळा स्टाफ कामाला लागला होता.. पण आज पार्थचे अजिबात लक्ष लागत नव्हते.. तो समोर बसून काहीतरी लिहीत होता.. पण डोक्यात मात्र काहीच जात नव्हते.. शेवटी जे व्हायचं तेच झाले.. आतून त्याला बोलावणे आले.. त्याने दरवाजावर नॉक केले.. आतमध्ये त्यांचे सर फोनवर बोलत होते..
" अग हो.. जरा ऐकून तर घे.. हो जातो मी स्टेशनवर सासूबाईंना घ्यायला.. हो पण.. अग मी.. मी.. मिटींग.. ते... मिठाई... हो.. हो... हो.."
सरांचे बोलणे सॉरी ऐकणे संपेल असे वाटत नव्हते.. त्याने खुणेनेच मी नंतर येऊका? असे विचारले.. सरांनी हताशपणे मान हलवत त्याला बसायला सांगितले.. शेवटी एकदाचा सरांनी फोन ठेवला.. सर डोळे बंद करून दोन मिनिटे बसले.. काय करावे हे सुचेनासं झाल्याने पार्थने हळूच विचारले.. " तुम्हाला बरे वाटत नसेल तर मी नंतर येऊ का?" सरांनी डोळे उघडले..
" काय समजतात काय या बायका स्वतःला?"
" सर, मला काय माहीत? माझे कुठे अजून लग्न झाले आहे?" पार्थ मान खाली घालत म्हणाला.. नजरेसमोर मगासची रखुमाई येत होती..
" अरे काय सांगू? यांच्या माहेरची माणसे येणार असतील तर किती त्या ऑर्डर्स.. एक शब्द बोलू देतील तर शपथ.." हे शब्द ऐकून पार्थला ती धाडधाड बोलत सुटणारी एक्स्प्रेस आठवली.. आणि परत लग्न करायचे नाही हा डळमळीत झालेला निश्चय ठाम झाला..
" सर यासाठी बोलावले ?" त्याने विचारले..
" नाही.. थांब.. या बायकोच्या नादात ना सगळे विसरायला होते.. हा तर.. तू इथे काम करायला येतोस कि टाईमपास करायला?" सरांचा टोन बदलला होता..
" सर, अर्थात काम करायला.."
" हो ना.. मग हे काय आहे?" सर त्याला त्यांचा लॅपटॉप दाखवत म्हणाले. पार्थने ते पाहिले.. त्याने सरांना एक मेल केला होता.. त्यात लिहिले होते..
" मी बोलू का??" पूर्ण मेल या प्रश्नाने भरले होते..
" सर.. सो सॉरी.. हे कसे झाले मला माहित नाही.."
" नशीब.. मलाच पाठवले अजून कोणाला पाठवले असते तर माझी वाट लागली असती.. असे एम्प्लॉईज अपॉइंट केलेत म्हणून.."
" सॉरी सर.. परत असे नाही होणार.."
" होऊ ही देऊ नका.." सर पुढे अजून काही बोलणार तोच त्यांचा फोन परत वाजला.. त्यांनी हातानेच त्याला जायला खुणावले..
" अग हो.. मी मगाशी तुला सॉरी बोललो.. मी कशाला चिडू तुझ्यावर.." कितीही न ऐकण्याचा प्रयत्न केला तरी पार्थच्या कानावर हे एकतर्फी संभाषण पडलेच.. त्याने त्या रखुमाईला टाटा बायबाय करण्याचा निर्णय पक्का केला.. त्यानंतर उरलेला वेळ त्याने मन लावून काम केले.. तो घरी जायला निघाला..
" चल निघतोस का रे?" राघवने विचारले..
" पण तू वहिनींना घ्यायला जाणार ना?"
" हो.."
" मग मी काय करू तुझ्यासोबत निघून?"
" चल रे एकेक चहा घेतला असता.. आणि सकाळी तुला काय झाले ते पण तू सांगितले असते.."
" सकाळी? काय झाले सकाळी?"
"बस काय? मित्र आहे मी तुझा.. तुझे दिवसभर लक्ष नव्हते ते कळत होते मला.. कोण आहे कोण ती?"
" कोणी नाही.. जा तू.. वहिनी वाट बघत असतील.."
" ओय होय.. विषय टाळतो आहेस.."
" नाही.. काम करतो आहे.. तू निघ. नाहीतर वहिनी चिडायच्या उशीर झाला तर.."
" हो रे.. विसरलोच.. चल निघतो मी."
तो गेल्यावर पार्थने काम आटोपले आणि तो घरी निघाला.. बिल्डिंगच्या खाली ती वाटच पहात होती..
" ओ मिस्टर.." तिने हाक मारली..
" काय आहे?" पार्थने आवाजात तुसडेपणा आणायचा प्रयत्न केला पण जमले नाही.. तिला बघूनच त्याचा जीव खालीवर होत होता..
" मला सोडाल घरी?" तिचा अनपेक्षित प्रश्न आला..

काय वाटते, आपला हिरो सोडेल का तिला घरी? पण ती आहे कोण? तिचे नाव काय? बघू पुढील भागात..
कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा