सगळेच मुलांच्या नावावर करू नका

Sglyech Mulanchy Navaavr
सगळेच मुलांच्या नावावर करू नका

आताच्या पिढीला बाप म्हणजे करता पुरुष आहे मान्य पण तो धन देणारा हे एक रूढ होत आहे... कमवणारा...
खूप काही मागे सोडून जाणारा अशी ओळख होऊ लागली आहे...तुम्ही कमवता ते आमच्यासाठीच..तुम्ही जे कमावले ते आमच्यासाठीच... तुम्हाला कमवायचे ते आमच्यासाठीच.... तुम्ही जे काही करत आहात ते आमच्या आनंदासाठीच.... हा विचार आता सगळ्या मुलांच्या मनात रुजत आहे.... वेळीच ह्या गोष्टी जर बापाला कळल्या नाहीत तर तुमच्या हक्काचे जे आहे ते मिळवण्यासाठी न्याय मागण्याची वेळ ही येऊ शकते...

कहाणी काही अशीच आहे..

प्रतापराव सरकारी कर्मचारी ,पूर्ण आयुष्य फक्त मेहनत करण्यात गेले...रात्रपाळी ,दिवस पाळी ,मग इतर छोटी कामे करून करून दिवस रात्र मेहनतीच्या बळावर मुंबई सारख्या ठिकाणी घर घेतले...

दिवस चांगले आले ,त्यात प्रोमोशन झाले... मुलं करती झाली ,आणि त्यांना वाटले आता जरा आराम करावा ,आणि मुलांना घर घ्यायला सांगून वेगळे काढावे ,म्हणजे हे तीन रूमचे घर दोघा नवरा बायकोला पुरे पडेल ,आणि येणारी सून नवीन घरात येईल..

त्यांनी फर्मान सोडला, निलेश आता तू दुसरे घर घे ,हे छोटे पडत आहे...जगा पुरी पडत नाही...त्यात येणारी मुलगी मोठया घरातली आहे आणि तिला हे वातावरण मानवणारे नाही...आम्ही इथेच राहू तुम्ही तुमचे दोघे संसार करा..

निलेश तसा लगेच म्हणाला ,आता तुम्ही गावाकडे जा बाबा ,हे घर आता मला विकायचे आहे ,मी फक्त लग्न जमेपर्यंत थांबलो होतो ,आता लग्न जमलेच आहे तर हे घर विकून मी नवीन घर घेणार आहे...माझे बचत केलेले पैसे मी नवीन घरासाठी ठेवले होते पण विचार आला की तुम्हाला गावी पाठवतो आणि हे घर विकतो ,ते पैसे नवीन घर घेण्यासाठी वापरतो..

निलेश ने तर बाबाला सरळ घरातून बाहेर काढायचे ठरवले होते ,आणि हा प्लॅन नवीन सुनेने नवऱ्याचा डोक्यात भरवला होता ,पण बाबांचे ठरले होते हे घर मी कधीही विकणार नाही.. त्यांनी तसे सांगितले ही..

पण निलेश आडून होता ,पुन्हा मी तुमचे काही एक ऐकणार नाही...आता तसे ही मुंबईत राहून तुम्हाला काय करायचे आहे...गावी घर आहे तिथे सुखाने रहा , मला हे घर विकायचे आहे ,आणि त्यासाठी मी एक agent ला कळवले आहे...सौदा झाला आहे पण तुम्ही आडवे आलात तर मला तुमच्यासोबत वाद ही घालता येईल ,त्यात तुम्हाला कसे ही करून सोडावेच लागेल..

मुलाचे हे बोलणे ऐकून बाबा कोसळले आणि त्यांना अटॅक आला , त्यातून सावरले पण तो धक्का कायम होता ,आपल्याच घरातून आपण निघायचे हे हा कोण सांगणारा...नातेवाईक त्यांना समजावत होते घर मुलाच्या नावावर करून बसू नका, तो शिरजोर होईल हे नक्की आणि तसेच झाले..

कोर्टात ही मुलाच्या बाजुने निकाल दिला तर आपण शेवटी घराबाहेर काढले जाऊच ,पण तरी एकाने सल्ला दिला आणि चांगला वकील मिळाला ज्याला आज ह्या बाबांची बाजू मांडायची होती आणि अश्या मुलाला अद्दल घडवायची होती..

मुलाला वाटले घर आपल्या नावावर आहे कोणी काही करू शकत नाही खुद्द बाप ही...

पण कोर्टात निकाल बापाच्या बाजूने लागला ,जर मुलगा तुमच्याच घरातून बाहेर काढत असेल तर तुम्ही मुलाच्या नावावर केलेली प्रॉपर्टी कोर्टाच्या आदेशानुसार पुन्हा तुमच्या नावावर होऊ शकते...त्यानुसार त्या बापाची प्रॉपर्टी पुन्हा बापाच्या नावावर केली गेली...

मुलाला राग होता पण आता त्याला घराच्या बाहेर जाण्याचे आदेश कोर्टाने दिले होते..

©®अनुराधा आंधळे पालवे