सगळेच आपले नसतात

Sglech Aple
किती दिवस झाले आरोही खूप उदास रहात होती....
college संपून ती नौकरी करत होती ,रोजचा दिवस छान मजेत जात होता,ती जास्तीतजास्त गुरफटून गेली होती कामात, वेळेच ,खाण्याचे, झोपण्याचे ही भान विसरुन गेली होती ती, कोणाचे वाढदिवस ,सण समारंभ, लग्न, कार्य जणू ती विसरलीच होती ,तिला मनापासून वाटले तरी ती कोणाकडे जाऊ ही शकत नव्हती? ह्या दरम्यान खूप काही नाती तिच्याकडून बोलायची ,जोडायची,टिकवून ठेवायची ,जोपासायची राहून गेली.

आरोही स्वतः इतकी व्यस्त होती की तिला निवांत दोन घास खाण्याची ही फुरसत नव्हती, आणि तिच्या ऑफिस चे काम lockdown नंतर तर घरात बसूनच करावे लागत होते, लोकांना वाटायचे ही यर घरी आहे तरी केलेल्या call ला ही reply द्यायला वेळ नाही ,असे कोणते मोठे काम करते की कॉरोनाच्या काळात इतरांना दोन काळजीचे शब्द ही तिला विचारपूस म्हणून ही बोलावेसे वाटले नाही.

आरोही नवीन नौकरी वर रुजू झाली होती, त्यामुळे इच्छा असून ही जोपर्यंत तिचा कामावर जम बसत नाही ,staff आणि वरिष्टांचा विश्वास मिळवत नाही तोपर्यंत ती permrnant होणार नव्हती, घरी कमावणारे ती आणि बाबाच होते, मग खर्च चालवण्यासाठी तिला हे काम ही नौकरी टिकवून ठेवणे भाग होते. त्यामुळे ती कुठे जाऊ येऊ शकत नव्हती, इतकी की तिने MA ची परीक्षा ही पुढे ढकलली होती.

त्यात तिच्या बद्दल मैत्रिणी,नातेवाईक, यांचा गैरसमज होत होता. ती जेव्हा घरी होती तेव्हा ती सगळ्यांना वेळोवेळी फोन करत होती,त्यांच्या भेटी गाठी घेत होती. पण जेव्हा तिच्या वर आर्थिक संकट आली आणि तिने जेव्हा ह्याच हक्काच्या लोकांकडे मदत मागितली तेव्हा मदतीला या पैकी कोणी आले नाही, त्यांना वाटले आपण मदत करू ही पण ही परत कशी करेन ,एक तर तिचे बाबा कमावणारे , मग पैसे देऊन वाट बघण्यापेक्षा मदत न केलेली बरी. तिला तिच्या मित्र मैत्रिणी, आणि ह्याच भारंभार नातेवाईकांनी कोणतीच मदत केली नाही.

नौकरी नंतर आरोहिला फक्त काम आणि तिचे ध्येय समोर दिसत होते त्यामुळे जो काही वरील होता ती स्वतःला बदलण्यात सत्कारणी लावत  होती, ती खूप बदलली होती मग कोण काय तिच्या बद्दल म्हणत आहेत याचा विचार करायला ही तिला वेळ नव्हता, स्पर्धा फक्त तिची तिच्याशीच होती.

आधी निदान कोण्या मैत्रिणींचे ,नातेवाईकांचे फोन येत, पण ते तेव्हा येत जेव्हा ही फोन करत ,पण आता तिने फोन विचारपूस केली नाही तर कोणी ही तिची विचारपूस केली नाही, त्यांना वाटले तिने जर पैसे मागितले तर आपण काय उत्तर देणार, त्यापेक्षा न बोलले बरे

आरोहिला आता लोकांच्या वागण्याचा मानसिक ताण येत होता ,मन खिन्न झाले होते ,उदासी वाढत होती ,आपण आपले म्हणणारे ते असे वागू शकतात याची तिला चीड येत होती. आईने तिला धीर दिला त्यातून बाहेर काढले ,समजावून सांगितले जे आपले नसतात ते तुटलेले बरे असतात ,काही वाटा प्रगतीच्या मोकळ्या होतात .

न राहून आरोहिला नौकरी शिवाय पर्याय नव्हता, तिला स्वतःची मदत स्वतः करण्याची वेळ आली होती. सगळे जवळचे असतात पण वरील आल्यावर कोणी आर्थिक मदतीला येत नसतात हे मनाला सांगून तिने नौकरी स्वीकारली.

त्या नौकरी मूळे का असेना तिचे हक्काचे पैसे घरात येऊ लागले, ती व्यस्थ झाली ,कोणापुढे हाथ पसरण्याची वेळी तिला परत आली नाही.

पण लोक मात्र तिच्या पासून तुटत गेली, पण एका आर्थी चांगलेच झाले, जे तुमचे नसतात ,जे ऐन वेळी मदतीला येत नाहीत पण तुम्हाला नावे ठेवायला पुढे असतात ते तुटलेले बरे असतात.

आपल्या प्रत्येकामध्ये एक आरोही दडलेली असते, नात्यांना जोडणारी, जोपासणारी, टिकवणारी ,आवर्जून भेट घेणारी, पण एका वळणावर तीला असे काही अनुभव येतात की तिला जेव्हा गरज असते तेव्हा तिच्या वेळेला कोणी ही साथ देत नाही,आणि परिणाम ती नको त्या नात्याला नको तितकी किंमत देत नाही, ती आपल्या वाटेवर एकटी चालत राहते ,पण जे तोडून गेले त्यांना परत सोबत राहण्याची साद घालत नाही, हे आजकाल सर्रास दिसत आहे,......मानसिक ताण करून घेण्यापेक्षा दुरावा बरा का ...?  हे योग्य वाटते का .?