आशय नसलेले विषय...

Reality of Seriels



आशय संपला की विषय भरकटतो. सांग तू आहेस कां? मालिका, सांग तू पाहतोस कां ?असा प्रश्न पडणे इतपत झाली आहे. मुळात अंधश्रद्धा निर्मूलनावर जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर झाले तरीही अशा मालिकांना परवानगी कशी मिळते,अंधश्रद्धा पसरविण्याचं, याचेच नवल वाटते.
याच्यात अदृश्य व्यक्ती बोलतात, गळा आवळतात, खुन करण्याचा प्रयत्न करतात. भूताशी बोलतात, भूत व माणसे एकमेकांना काहीही करू शकतात.विराज चे आजोबा खुन्या कडे बोट दाखवतात पण ते इतकं हालतं की ते कुणाकडे बोट दाखवतात हे कळतच नाही, पाटीवर लिहूनही संमती घेता येते, पण मालिका वाढवायची म्हणल्यावर थोडा निर्बुद्धपणा करायलाच हवा.
फँटसी म्हणजे स्वैराचार नव्हे, हवं ते दाखवायला. अघोरी प्रकार, काळा दोरा सांगू शकतात कां? असं करता येतं कां, आत्मेे आपल्याशी बोलू शकतात का?
असें असते तर किती प्रश्नांची उकल झाली असती. मग ते दाखवतात कां? प्रत्येक भानामतीच्या मागे कोणी ना कोणी असते हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सिद्ध केले आहे.
जादूटोणा,मंत्र यांनी एखाद्याचा गळा आवळता आला असता तर विरोधकांनी केव्हाच सत्ताधाऱ्यांचा गळा आवळला असता, मग हे दाखवायचे कशाला? स्वैराचार पहायला परवानगी आहे, मात्र करायला नाही.अतार्किक गोष्टी दाखवून काय साध्य होतें, त्याच्यावर सेंसार का नाही घेत आक्षेप,.हे सगळे प्रश्नच अनाकलनीय व अनुत्तरीत आहेत. जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी मालिकेतील पात्रावरही ही करायला हवी.
वैज्ञानिक दृष्टिकोन पुस्तकात व अंधश्रद्धा समाजात हे चित्र आहेे. कुणी काय दाखवांव हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असू शकत नाही, पण कोणी काय पहावं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असू शकतो.
एकेकाळी साहित्यावर पोसलेली पिढी, कल्पना वैभवात जगलेली पिढी आज कल्पना दारिद्र्यात जगत आहे.
समाजातल्या प्रश्ना ऐवजी मालिकेतल्या प्रश्नांनी सगळ्यांना भेडसाऊन सोडले आहे.
शहरात मोठे होर्डिंग लावायला बंदी असतांना ते लागतात कसे? याला जसं उत्तर नाही, अंधश्रद्धा अजून जात नाही याला हीउत्तर नाही.
सोहळ्याला प्रचंड गर्दीचं बंधन असताना प्रचंड गर्दी होतेच कशी? पैसा आणि सत्ता यापुढे दंड,सजा तग धरत नाहीत.निसर्गाचा धबधबा पाहायला लोक प्रचंड गर्दी करतात, बंदी असूनही, या प्रश्नांना जशी उत्तरं नाहीत तशी मालिका मधील प्रश्नांनाही उत्तरं नाहीत.
सहनशक्ती व अन्याय सहन करणारी पिढी संघर्ष करूच शकत नाही अशी परिस्थिती आज आली आहेे.
सत्तेपुढे माणसे दुबळी पडत आहेत. नैसर्गिक झऱ्याप्रमाणे संस्कार झिरपायला पाहिजेत, त्याएवजी विकृतीची ढगफुटी ,विकृतीची दरड आज कोसळत आहे.
कुटुंबात जे चालतं ते मालिकेप्रमाणेच असतंं, पण त्याच्या विरुद्ध कोणी ओरड करत नाही. मालिकेमधील पात्राविषयी मनमोकळे बोलता येतं कारण त्याच्यावर बोलून मन मोकळं करता येतं.
कुटुंबात मन मोकळं करता येत नाही हीच आजच्या कुटुंबाची शोकांतिका आहे. मन मारून मनातल्या असंख्य प्रश्नांना दाबून व्यक्तिमत्व घडत आहेत हे थांबायला हवं. मन मोकळं करण्याची संधी कुटुंबात नाही म्हणून मालिका पाहण्याशिवाय अनेकांना पर्याय नसतो. रिमोट म्हणजे संयमाचं हत्यार आहे पण सगळेच वापरत नाहीत.
मालिका हसवतात, रडवतात, घडवतात आणि बिघडवतातही.
टी .आर .टी चे परिमाण जोपर्यंत बदलणार नाहीत तोपर्यंत परिणाम मनासारखे होणार नाहीीत.
टीआरपी म्हणजे टॉलरन्स रेट की टॉर्चर रेट हे ठरलं पाहिजे.
बौध्दिक वर्ग टी.आर.पी.च्या वाटेला जात नाही पण टी.आर.पी मधून, ते पाहून केवळ चर्चा करतात.
अंधश्रद्धा मालिकेतून, चित्रपटातून, साहित्यातून बंद झाली तरच समाजात पुन्हा बंद होईल
पण आधी झिरपली त्याचं काय हाही एक प्रश्न राहतो.
अनेक मालिका पाहून अनेक प्रश्न निर्माण होतात. येऊ कशी कशी नांदायला मध्ये त्या मुलाचा चष्म्याचा काच किती दिवस फुटलेला दाखवणार? तेवढेही पैसे या कुटुंबाकडे नसावेत कां? पुन्हा मावशी नेहमीच चिंताग्रस्त व कंबरेला खोचलेला टावेल ते किती दिवस दाखवणार. त्याच्या एका नायकाचं टोचून लोकलमधून पाडणं ,असली दृश्य दाखवून पुन्हा समाजामध्ये ते पसरलं व तसेच व्हायरल झालं तर त्याला दोषी कोण धरणार? विकृती नुसती झिरपतच नाही तर ती रूजते हे भयानक आहे. आपले नायक कधीही वॉचमन होतात, मालिकेतलं कुटुंब छान रस्त्यावर येतं.माणसं आणि भूतं एकमेकाला शक्ती काय प्रदान करतात. मालिकेतली भुतं सुद्धा भरजारी साड्या, भारी साड्या लिपस्टिक लावलेल्या असतात.
अनेक मालिकेत शहरी संस्कृती दाखवली जाते मात्र बोलणं ग्रामीण असतं.
आता बिग बॉस पुन्हा निर्बुद्ध लोकांनी निर्बुद्ध लोकांसाठी चालवलेली मालिका घेऊन येत आहेत.
कशाला एवढ्या महागड्या आलिशन फ्लॅट मध्ये पैसे देऊन लोकांना बिगबॉस मधली निष्फळ बडबड, कशाला दाखवायची, त्यातले
अश्लील दृश्य आणि निरर्थक चर्चा, तेही पैसे कलाकारांना देऊन आणि लोकांचे पैसे घेऊन हे थांबत कां नाही?
कोण होणार करोडपती मधून सामान्य ज्ञान तरी झिरपतं, असें व इतर माहितीपूर्ण मनोरंजन करता येतं.
अगबाई सुनबाई हा अग बाई सासुबाई चा रिमेक अनेकांनी पाहिला नाही. येऊ कशी कशी मी नांदायला नें असंख्य नको ते प्रश्न निर्माण केले आहेत.या पेक्षा भातुकलीचा खेळ बरा असं वाटेल. तुम्ही रटाळ आशय लोकांना द्याल तेवढे लोक पाहणार नाहीत हे आता नवीन घडू पाहतंय.
डॉ.अनिल कुलकर्णी