स्वार्थी विचार...

This is my own experience ofpregnancy and childbirth during corona virus.

मला आठवा महिना संपला आणि नवव्या महिन्यात काही दिवस राहण्यासाठी मी माहेरी आली.  आठ दहा माहेरी राहून मी पुन्हा सासरी आले... त्यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढत चालला होता... शासनाने भारतात लाॅकडाउन जाहीर केला..... त्यामुळे सगळे घरीच होते .... घरातील सर्वचजण माझी काळजी घेत होते त्यात कोरोनाचा वाढता प्रभाव बघता डॉक्टरांनी सुद्धा गर्भवती महिलांची अधिक काळजी घ्यायला सांगितली होती.... माझी नवव्या महिन्याची सोनोग्राफी काढली.... सगळं नॉर्मल होत ... माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मला थोडी भीती वाटत होती.... त्यातही हे कोरोनाचं संकट सर्वांसमोर होत.. म्हणुन मी कदाचीत जरा जास्तच काळजी करत होते... मला नववा महिना लागून वीस दिवस झाले..... गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या पोटात दुखू लागलं.... मला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले..... माझी नाॅर्मल डिलीव्हरी झाली.... मला छानशी मुलगी झाली व आम्ही दोघीही व्यवस्थित होतो.... घरातील सर्वजण खूप आनंदात होते.... मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही खूप खुश होतो... कारण डिलीव्हरी च्या दोन तीन दिवस आधी आम्हाला वाटत होत की माझी डिलीव्हरी गुढीपाडव्याच्या दिवशी व्हावी आणि झालेही तसेच त्यामुळे आम्ही जास्तच आनंदात होतो....  लाॅकडाउन असल्यामुळे नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये येण्याची परवानगी नव्हती... आणि सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते योग्यच होते .... माझ्याजवळ माझ्या सासुबाई व मिस्टर होते... दुसर्‍या दिवशी माझी आई व भाऊ हॉस्पिटलमध्ये आले... तिसऱ्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला व मी माझ्या माहेरी राहायला आले... मला दिवस गेल्यापासून आम्ही दोघांनी येणाऱ्या बाळासाठी खूप स्वप्न रंगवली होती आणि प्रत्येकजण तसं करत असतो.... किती आनंदाचे क्षण असतात ते...येणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट बघत असतो.... बाळासाठी हे घ्यायच 
बाळासाठी ते घ्यायचं... मी तर सगळ्याची यादीच बनवली होती.... बाळाची पाचवी, बारसे अगदी छान पद्धतीने साजरे करायचे.... परंतु असे काहीच झाले नाही... दुकान बंद असल्यामुळे आम्हाला काहीच घेता आलं नाही... सुदैवाने माझ्या मोठ्या बहिणीला माझ्या वीस दिवस आधी मुलगा झाला आणि तीसुद्धा बाळंतपणासाठी माहेरी आली होती. .... तिच्या बाळाचे जास्तीचे कपडे व इतर गोष्टी माझ्या लेकीसाठी वापरता आल्या.... माझ्या चुलत बहिणीच्या मुलीचा पाळणा माझ्या काकीने दिला.... परंतु आपल्या लेकीसाठी आपल्याला काहीच घेता आलं नाही याची मला वाईटही वाटत होतं व रागही येत होता... आपल्याच वेळेस अस का झालं याचा मी विचार करत होती.... जेव्हा आपण आई होतो तेव्हा आपण फक्त आपल्या बाळाचा विचार करतो.... प्रत्येक आई ही आपल्या बाळासाठीस्वार्थीच असते त्याला मीही अपवाद नव्हते... इकडे दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत होते... बातम्यांमध्ये दाखवत होते... काम बंद असल्यामुळे, हातात पैसे नसल्याने लोक आपल्या कुटुंबासह, लहान लेकरांसह  आपआपल्या गावाकडे पायी चालत जाताना दिसतात... त्यात ऊन्हाचे दिवस... काही ठिकाणी गरोदर स्त्रियासुद्धा कितीतरी अंतर चालत जातात... प्रसुतीसाठी दवाखान्यात जाण्यासाठी त्यांना वाहने मिळत नाही....सरकार, डॉक्टर , पोलीस इतर सर्वजण या परिस्थितीत सर्वांना मदत करतात....स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता आपली कर्तव्य बजावतात.....ही सगळी परिस्थिती बघून डोळ्यात पाणी आले.... आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत असं वाटत त्यावेळी  आपण फक्त आपला विचार करतो याची मला जाणीव झाली.... प्रत्येकाने आपला स्वतःचा विचार न करता सर्वांना एकत्र घेऊन एकमेकांना मदत करत कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्याची गरज आहे... आपली वैयक्तिक गरज बाजूला ठेवून सामाजिक जबाबदारी पार पाडायची आहे.... माझ्या प्रसुतीच्या वेळी मला सगळ्या सोयी सुविधा लगेच  उपलब्ध झाल्या.... परंतु काही गर्भवती महिलांना त्या वेळच्यावेळी मिळाल्या सुद्धा नाही.... प्रत्यक्षरित्या नाही परंतु अप्रत्यक्षपणे आपण यांना मदत करण्याचा निर्णय मी व माझ्या मिस्टरांनी घेतला.... फक्त एक आई म्हणून नाही तर एक सुजाण नागरिक म्हणून  सामाजिक जबाबदारीची जाणीव मला झाली..... 
धन्यवाद! 
( माझी अस काही लिहिण्याची पहिलीच वेळ आहे. तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा.)