सीड मदर : संघर्ष तिचा भाग ३८

A Woman Is Honoured With Padamshree Award
सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच.

कथा : भाग ३८

तिचं भाषण संपल्यावर किती तरी वेळ टाळ्या वाजत होत्या. त्या संपल्यावर स्वतः श्री श्री रविशंकर जी उठले आणि त्यांनी माईक हातात घेतला.

सगळे उत्सुकतेने ऐकू लागले. त्यांनी अत्यंत छान शब्दात तिचे फार कौतुक केले. तिचा साधेपणा हाच तिच्या ज्ञानाचे कोंदण होता. त्यांनी तिला स्टेजवरच जवळ बोलावले आणि स्वतःच्या हाताने तिला तिच्यासाठी शाल आणि श्रीफळ दिले. तिला हा तिचा मोठा बहुमान वाटला.

त्यानंतर मुख्य मैदानाकडे सगळे वळले. तिथे जवळजवळ दोन हजार शेतकरी जमले होते. अनेक शेतकऱ्यांनी तिथे स्टॉल्स लावले होते. देशी बीज देवाण घेवाण प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने व्यापक व्हायला लागली होती. अनेक शेतकरी दुर्मिळ बीज घेऊन आले होते. जवळपास सर्व राज्यातील शेतकरी तिथे उपस्थित होते.

त्या कार्यक्रमात बरीच गर्दी ही हौस म्हणून बागकाम करणाऱ्या मंडळींची देखील होती. त्यांनी देखील बरेच बियाणे खरेदी केले. फार मोठी आर्थिक उलाढाल आणि देशी वाणांची खरेदी विक्री तिथे झाली.

तो कार्यक्रम संपवून राहीबाई परत हॉटेलवर आली. एकूणच तिला ह्यात असलेला थाटमाट आवडला नसला तरी एवढया भव्य मेळाव्याची संकल्पना मात्र फार आवडली होती. तिच्या गावात असं काही करता येईल का, ह्याचा ती विचार करत होती.

ती जेव्हा परत तिच्या गावी आली, तेव्हा हेच सगळे विचार तिच्या मनात रुंजी घालत होते. पण ह्यासाठी लागणाऱ्या पैशाच्या व्यवस्थेचा विचार मनात आला की, जणू कोणी तिचे विचार ब्रेक मारून थांबवत होतं.

अशीच काही वर्षे गेली. तिच्या मुलाने तिला मदत करता करता उच्च शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिचे आई बाबा आता फार थकले होते. अधून मधून ती त्यांच्याकडे जाऊन येत असे. पण आताशा ती देखील थोडी थकत होती. पण तरीही BIAF बरोबर असलेला व्यवहार चोख चालू होता. त्यातून होत असलेला आर्थिक लाभ आता बऱ्यापैकी वाढला होता. अचानक एका संध्याकाळी ती घराबाहेर शांतपणे बसली असताना तिला हाक ऐकू आली. एक वयस्कर म्हणजे सत्तरी पार केलेले आजोबा, तिच्या घरापाशी येऊन तिला हाक मारत होते. तिला वाटलं की, कोणी बियाणं घ्यायला शेतकरी आले असावेत. तिने त्यांना आत बोलावलं, पाणी दिलं. कसलं बियाणं हवं आहे हे विचारलं.

त्यावर काही बोलायच्या आधीच त्या आजोबांच्या डोळ्यांत पाणी होतं. ते म्हणाले, " पोरी, मला वळखलं न्हाईस तू! म्या तुज्या दुर्गामावशीचा पोरगा".

हे ऐकल्यावर मात्र क्षणभर तिला काहीच सुचेना. पटकन भानावर येऊन तिनं त्यांना वाकून नमस्कार केला. तिनं खरंच ओळखलं नव्हतं. तिला सगळ्या आठवणी तिच्याभोवती फेर धरून नाच करतायत असं वाटू लागलं. तिच्या लाडक्या दुर्गामावशीची आठवण येऊन तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. तिने सोमाला हाक मारली. त्यांची ओळख करून दिली. ते शेजारच्या गावात आले होते त्यांच्या काही कामाकरिता. पण हिची भेट घेतल्याशिवाय त्यांचं पाऊल उचलेना. त्यांना तिने आग्रहाने ठेवून घेतले. जेवणे झाल्यावर खूप गप्पा झाल्या. सकाळी लवकर उठून आवरून ते परत निघाले. तिचाही गळा भरून आला होता. तिने निघताना नमस्कार केल्यावर तिच्या हातात एक छोटा पितळी डबा ठेवला. त्यात दुर्गाचे दोन दागिने होते. तिची नथ आणि कुड्या. राहीबाईने तो डबा छातीशी घट्ट कवटाळून धरला आणि ती हमसून हमसून रडू लागली.

काही वेळाने सगळं शांत झाल्यावर ते आजोबा गेले. हिचं मात्र मन थाऱ्यावर नव्हतं. त्याच तिरिमिरीत तिने दुर्गाची जमीन परत मिळवायचा निश्चय केला.

दोन दिवसांनी ती आणि सोमा परत आटपाडीला जायला निघाले. तिचा मनसुबा जाणलेली आणि तिच्या जवळची अशी गावातली चार प्रतिष्ठित माणसं देखील त्या दोघांबरोबर निघाली. हेतू हाच की, त्या माणसावर जरा वजन पडावं आणि त्याने ती जमीन विकायला नाही म्हणू नये.

आटपाडीला पोहोचायला त्यांना संध्याकाळ झाली. पाटलांचा वाडा तिकडे ओस पडला होता. त्याच वाड्यात सगळे उतरले. पाटलांच्या राहिलेल्या एकुलत्या वंशजाने हिला त्याची किल्ली दिली होती. कारण तिथे रहाण्याचा प्रश्न होता. तिथे उतरल्यावर मात्र तिला तिचं सगळं बालपण आठवलं. दुर्गामावशी तर हलेना डोळयांसमोरून! रात्री त्यांनी कंदील लावले आणि राहीबाईने बरोबर आणलेल्या शिध्यातून पिठलं भात केला. शेजारून पाणी आणलं आणि चादरी अंथरून सगळे झोपले. तिला काही झोप येईना. बरीच रात्र झाली होती. विचार करता करता पहाटे गार वाऱ्याने तिचा डोळा लागला.

उजाडलं तशी सगळ्यांना जाग आली. चटकन आवरून खाऊन पिऊन सगळे त्या माणसाच्या घरी निघाले. त्याच्या घरी पोहोचल्यावर राहीबाईने रामराम केला आणि तिच्या येण्याचा उद्देश अगदी सरळ शब्दात सांगून टाकला. मागे एकदा पण ही जमीन तिने परत मागितल्याची आठवण तिने करून दिली.

काही वेळ कोणीच बोलले नाही. शेवटी त्या जमिनीचे मालक म्हणाले की, त्यांना ही जमीन विकणं शक्य नाही. कारण ते त्यांचं उत्पन्नाचं साधन आहे. राहीबाईने तिची ह्या जमिनीशी असलेली भावनिक गुंतवणूक देखील सांगितली. पण ते ऐकेनात.

बरीच चर्चा होऊन देखील तो माणूस काही तयार होईना. पैसे मार्केट रेटने द्यायला देखील सोमा तयार होत. शेवटी त्यावर सोमाने त्यांना एक तडजोडीचा उपाय सांगितला. उपाय असा होता की, तेवढीच जमीन जर तिथे आसपास असेल तर सोमा ती विकत घेऊन त्यांना देईल. म्हणजे त्यांनाही जमीन राहील आणि दुर्गाची जमीन ह्यांना परत मिळेल. त्यालाही तो माणूस तयार होईना. शेवटी त्याने गावातली इतर माणसं बोलावली आणि त्यांना सगळं सांगितलं. पाटलांच्या वेळची जुनी माणसं अगदी अभावानेच त्या गावात शिल्लक होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच गावकऱ्याची बाजू घेऊन जमीन विकणार नाही, असे स्पष्ट केले. राहीबाईने तिचे सगळे प्रयत्न केले, पण ते व्यर्थ गेले. निराश होऊन ते परत पाटलांच्या वाड्यात आले. जेवले आणि विचार करू लागले की, काही करता येईल का?

संध्याकाळी सगळे बाहेरच्या कट्ट्यावर बसले असताना तो जमिनीचा मालक, बरोबर पोलीस आणि गावातली इतर मंडळी घेऊन तिथे आला. आणि त्याने ह्या सहाजणांवर जमिनीसाठी धमकवल्याचा आरोप केला. ते ऐकून हे थक्कच झाले. हरप्रकारे पोलिसांना सांगून हे सगळे दमले, पण पोलिसांची काही समजूत पटेना.

तितक्यात राहीबाईने तिच्या ओळखीचा उपयोग करून घ्यायचे ठरवले आणि तिने थेट तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. ते तिच्या चांगल्याच ओळखीचे होते. त्यांनी सगळी परिस्थिती समजून घेतली आणि पोलिसांशी थोडं बोलले. एका क्षणात पोलीस माफी मागून तिथून निघून गेले.

त्या गावातल्या माणसांना कळेना की, ही नक्की कोण आहे! तिने पुन्हा तिच्याबद्दल, तिच्या कार्याबद्दल सांगितले. तिच्या ओळखी तर त्यांनी पाहिल्याच होत्या. काहीही न बोलता ते तिथून निघून गेले. रात्र अशीच अस्वस्थेतत गेली. सकाळी सगळे आवरून परत चर्चा करत बसलेच होते की, कालचीच माणसे परत आली.

ह्यांनी त्यांना वाड्यात घेतले. पाणी दिले आणि येण्याचे कारण विचारले. ती माणसे त्यांच्या येण्याचे कारण सांगत होती आणि ....

काय झालं पुढे? काही अनुचित प्रकार घडणार का? की तिला जमीन परत मिळणार? उत्तरं पुढच्या भागात.

क्रमशःसीडमदर : तिचा संघर्ष

क्रमशः

🎭 Series Post

View all