सीड मदर : संघर्ष तिचा भाग २४

A Woman Is Honoured With Padmashree Award


सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .

कथा : भाग २४

एकदा तिला एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की, बियाणं संकरित करताना तर देशी बियाणंच घेतली जातात. मग त्या देशी बियांणापासून तयार झालेलं संकरित बियाणं त्रासदायक कसं? ह्यावर तिने जे उत्तम उत्तर दिलं, ते ऐकून कोणाचाही विश्वास बसला नसता की, ही बाई शाळेत गेली नाही. तरीही हिला विज्ञान पूर्ण समजलं होतं.

तिने त्याला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं. तिने जे सांगितलं ते असं की, जेव्हा एखादे लग्न होते, तेव्हा होणारे ते मूल आई वडिलांसारखे, किंवा आईच्या माहेरच्या मंडळींसारखे किंवा वडिलांच्या घरातल्या मंडळींसारखे असते. जेव्हा त्यांची जात एकसारखी असते, तेव्हा होणारे संस्कार देखील तसेच असतात. रंगरूप देखील तसेच असते.

परंतु हेच जर आई परदेशी गोरीपान असेल, निळ्या डोळ्यांची असेल आणि वडील सावळे भारतीय असतील, किंवा हेच उलट असेल, तर होणारी संतती ही संकरित असेल. कदाचित ती भारतीय वडिलांचा रंग घेईल आणि आईचे डोळे घेईल. संस्कार देखील मिश्र असतील. तिची पुढची पिढी अजून वेगळे शारीरिक गुणधर्म दाखवेल.

बियाणांची संकरित करण्याची प्रक्रिया अशीच असते. एका वाणातला एक गुण तर त्याच प्रकारच्या पण दुसऱ्या जातीच्या वाणाचा गुण मिळून तिसरंच संकरित बियाणं तयार होतं. पण ते होतं प्रयोगशाळेत.

त्यामुळे काही गुणधर्म हे नाहीसे होतात.

त्या मुलाला ते पटल्याचं दिसलं. बाकीच्यांना सुद्धा ते पटलं.

त्यावर तिने तिच्याशी जोडल्या गेलेल्या काही आदिवासी स्त्रियांची माहिती त्या सर्व विद्यार्थ्यांना दिली.

तिने दिलेली उदाहरणं फारच बोलकी होती.

त्यावर तिने तिच्याशी जोडल्या गेलेल्या काही आदिवासी स्त्रियांची माहिती त्या सर्व विद्यार्थ्यांना दिली.

तिने दिलेली उदाहरणं फारच बोलकी होती.

नगर जिल्ह्यात अकोले हा निसर्गाने समृद्धी बहाल केलेला तालुका आहे. येथील आदिवासी महिलांनी परसबागांमधून विविध दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण देशी पीक वाणांचे जतन करून त्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यासह सेंद्रिय शेतीला चालना देत कुटुंबाचे सक्षमीकरण करीत सामाजिक व आर्थिक स्तरही उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. शांताबाईंची परसबाग नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराचा रम्य परिसर आहे तो. पावसाळा संपल्यानंतर सारं रान आबादानी होऊन गेलेलं असतं. खाचरात डोलणारी भात पिकं सगळीकडे दिसतात. निसवत चाललेल्या भाताचा सर्वत्र भरून राहिलेला अनोखा गंध वाऱ्यावर पसरत असतो. डोंगरावरील नागमोडी सडक आणि उताराच्या बाजूला वसलेली चिमुकली आदिवासी गावं दिसतात. त्यातीलच एक आंबेवंगण गाव. त्यात पारंपरिक पद्धतीचे शांताबाई धांडे यांचे कौलारू घर आहे. शेजारीच नवीन पद्धतीच्या घराचे सुरू असलेले बांधकाम दिसते. घराभोवताली उपलब्ध जागा आणि उतार लक्षात घेऊन विविध प्रकारची झाडे लावलेली दिसतात. बांधांवर पसरलेले काकडीचे, घराच्या भिंतीपर्यंत पोचलेले दोडक्याचे वेल, कारल्याचा मांडव दिसतो. उजव्या हाताच्या मोकळ्या जागेत फुले, आंबा, अंजीर, पपई, शेवगा, सीताफळ, फणस, वांगी, टोमॅटो, इ. दिसते. एका बाजूला ओळीत वाल, घेवडा. सर्व भाज्या स्थानिक किंवा देशी लावलेल्या असतात. घरच्यासाठी उत्पादीत मालाचा वापर होतो. शिल्लक माल विक्रीसाठी बाजारात नेला जातो. शांताबाईचे पती खंडू सांगतात की, दूरवरून विविध लोक अगदी परदेशी पर्यटकही आमची परसबाग पाहायला येतात. शांताबाईंचा एम.ए.बी.एड. झालेला मुलगा सोमनाथ यालाही आईचा खूप अभिमान वाटतो. दुर्मिळ वाणांनी समृद्ध परिसर दुर्मिळ किंवा लुप्त होत चाललेल्या पीकवाणांनी समृद्ध असा हा परिसर आहे. येथे कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन समिती कार्यरत आहे. बायफ या स्वयंसेवी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली येथील शेतकरी समितीचा कार्यभार चालवतात. हैबतराव भांगरे समितीचे प्रमुख आहेत. देशी बियाणे संवर्धनाला मुख्यत्वे भागातील आदिवासी महिलांचा हातभार लागला आहे. यात शांताबाई यांच्यासह ममताबाई भांगरे, हिराबाई गभाले, जनाबाई भांगरे आदींचीही नावे घेता येतील. आदिवासी महिला बचतगटाच्या माध्यमातून एकत्र येत सेंद्रिय शेती व देशी बियाणे संवर्धनाची चळवळ त्यांनी सुरू केली आहे. अन्नाबाबत स्वयंपूर्ण ममताबाईंची शेती आंबेवंगणच्या पुढेच देवगाव ही आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची भूमी आहे.

रस्त्याच्या कडेलाच काहीसे टेकाड चढून गेल्यानंतर ममताबाई भांगरे यांचे कौलारू घर व बाजूला पडवी आहे. घरापुढे बोगनवेलीचा ऐसपस मांडव आहे. त्यामुळं प्रसन्न वातावरण असते. घराच्या सभोवताली इंचन् इंच जागेचा लागवडीसाठी केलेला वापर दिसतो. दोडके, भोपळे, कारले यांचे उंचावर गेलेले वेल बघता येतात. बांधावर पसरलेले डांगर दिसते. रताळे, सुरण, हळद, टोमॅटो, वांगी, अशा असंख्य भाज्या दिसतात. बारा प्रकारचे वाल लावलेले आहेत. एका कोपऱ्यात अनेक रानभाज्या आहेत. जाई, करजकंद, बडघा, कवदर, कांदा, पाचुट कांदा, चंदन बटवा, कोहिरी, काळी आळू, मेतं, चिचुडी, इ. जोडीला फळझाडे. थोड्याफार पालेभाज्या. सासू-सासऱ्यांमुळे रानभाज्यांचे ज्ञान झाले. पूर्वी रानातून त्या तोडून आणायचो. आता घराजवळच लागवड केल्याचे ममताबाई सांगतात. चहा, साखर, तेल, मीठ सोडले तर धान्य, भाज्या, हळद, मिरची सर्व काही घरचे असते.

गांडूळखताचे लहान गोळे करून ते वाळवून ब्रिकेटप्रमाणे त्यांचा वापर ममताबाईंनी सुरू केला. अपेक्षित परिणाम मिळाला. त्यांच्या या कल्पकतेची खूप प्रशंसा झाली. घरात राहून बियाणे बँक सुरू करून कुटुंबाचा चरितार्थ चालवताना सात्विक धान्य पुरविण्याचे काम त्या करतात. बायफ संस्था त्यांच्याकडून देशी बियाणे विकत घेते. त्यातून त्यांना मासिक उत्पन्न मिळते. त्यांच्या शेतात काही वाणांच्या चाचण्या घेतल्या जातात. त्या बदल्यातही मानधनाची रक्कम दिली जाते. याशिवाय बियाणे संच (सीड कीट) विक्रीतूनही अतिरिक्त उत्पन्न मिळते.

ती हे सुद्धा सांगत होती की, तिच्याकडे सातत्याने विविध लोक शेतमाल वा बियाण्यांसाठी येत असतात. भीमथडी किंवा अन्य प्रदर्शनातूनही त्या भाग घेतात. अशी होते देशी वाणांची शेती.

घराभोवतीच्या काही गुंठ्यांत योग्य नियोजनाद्वारे विविध देशी पीक वाण घेतले जाते.

हंगामी आणि बहुवर्षांयू अशा दोन्ही पिकांचं स्थानिक वाण एकत्र करून त्यांचा बियाणे संच (सीड कीट) तयार केला आहे. यात भेंडी, मिरची, टोमॅटो, वांगी, लाल व दुधी भोपळा, घोसाळे, कारली, दोडका, काकडी, शेपू, पालक, मेथी, चाकवत, मुळा, करजकंद यासारख्या वीस ते बावीस प्रकारच्या भाज्यांचे शुद्ध बियाणे समाविष्ट आहे.

बहुवर्षांयू प्रकारात पपई, शेवगा, हातगा, लिंबू, पेरू, सीताफळ, अंजीर, चिक्कू, आंबा, कढीपत्ता, इ समाविष्ट आहे.

त्यातून आदिवासी कुटुंबांना दररोज शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक अन्न मिळते. यातून विविध विकार कमी होण्याबरोबरच कुपोषणही दूर होते.

देशी वाण असल्याने बियांचा पुनर्वापर होतो. रोग, किडींना प्रतिकारक, खाण्यासाठी रुचकर, आरोग्यदायी घटकांनी भरपूर असे हे वाण शेणखत, गांडूळ खत आदींचा वापर करून पिकवले जाते. देशी वाणांचा प्रसार ही आता प्रतिष्ठित गोष्ट झाली आहे. काळभाताचेही मोठ्या प्रमाणावर बियाणे या महिलांनी उत्पादीत केले आहे. त्यातून कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक स्थरही उंचावला आहे. ममताबाईंचीही समृद्ध बियाणे बँक आहे. देशी वाणांचा प्रसार करण्याचे काम या महिला व्याख्यानाद्वारे करतात. या भागातील लुप्त होत चाललेले डांगी जनावर, काळभात आदींना पुनरुज्जीवीत करण्यासाठीही इथल्या शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प अकोले तालुक्यातील दहा गावांमध्ये सुरू आहे.

🎭 Series Post

View all