सीड मदर : संघर्ष तिचा भाग ९

A Woman Honoured With Padmashree Award
सीडमदर : तिचा संघर्ष

टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .

कथा : भाग ९

कणाकणाने मोठी होणारी राहीबाई आजूबाजूचं सगळं बघत होती. त्यांना आता तिथे येऊन पाच वर्षे झाली होती. आता ती आठ वर्षांची झाली होती. रोज कोणा ना कोणाबरोबर ती शेतात जात असे. मातीशी बोलत असे. तिथल्या पिकांशी बोलत असे. गड्यांना सारखे प्रश्न विचारीत असे. अगदी सव्वातीन, साडेतीन वर्षांची असल्यापासून ती इथे असल्याने तिचा सगळ्यांना लळा लागला होता. ती फार गोड हसत असे. आणि अतिशय गोड बोलत असे. त्यामुळे तिने कितीही प्रश्न विचारले, तरी कोणालाही राग येत नसे. शेतावरच्या बायका, गडी सगळे तिला त्यांना माहिती असलेली उत्तरं देत. ,

तिचं एक मात्र वैशिष्ट्य होतं. ती चप्पल फारशी वापरत नसे. नाहीच जवळजवळ. मातीचा पायाला होणारा स्पर्श तिला फार आवडत असे. ती हळूहळू शेतीच्या कामात लक्ष घालू लागली होती. हल्ली पाटलांच्या शेतात प्रचंड भरघोस उत्पादन मिळत होतं. जेव्हा पेरण्या असत तेव्हा ती हमखास शेतात जाई आणि छोट्याशा मुठीत ते बियाणं घेऊन अंगणातल्या खोलीत येई. तिची स्वतःची एक छोटी गम्मत होती. शेतात खेळता खेळता तिला मागे एकदा एक लोखंडी पेटी सापडली होती. ती पेटी तिने हळूच घरी आणून फक्त तिच्या दुर्गामावशीला दाखवली होती. त्या पेटीत ती ते बियाणं ठेवत असे. आणि पाऊस आला की, अंगणाच्या कोपऱ्यात पेरत असे. त्यातून इवली इवली रोपटी येत असत. कधी जोंधळे, तर कधी बाजरी. तिने इकडे तो पांढरा मऊमऊ कापूस मात्र पाहिला नव्हता. खरे तर ती खूप लहान होती, पण वयाच्या मानाने तिला शेतीची समज जरा जास्तच होती.

अंगणातल्या कोपऱ्यात तिने केलेलं तिचं हे छोटंसं शेत संभा पाटलांच्या फार कौतुकाचं होतं. ते सतत तिच्याशी खेळत, बोलत, खूप खाऊ देत. तिच्या अनेक प्रश्नांची न कंटाळता उत्तरं देत. त्यांची मुलगी रुक्मिणी कधीतरीच माहेरपणाला येई. त्या वेळी त्यांचा उत्साह बघून बायजाला अनेक प्रश्न पडत. पाटील सखूला देखील सतत काही ना काही देत असत. तिने केलेल्या साध्या चहाचं देखील कौतुक करीत. बायजाशी मात्र ते अजिबात बोलत नसत. तिकडे आटपाडीला असताना निदान किरकोळ गोष्टी विचारत, बोलत. पण इकडे आल्यापासून दोघं जसे अनोळखी झाले होते. इकडे पुरुष माणसं स्वयंपाकघराच्या बाजूला देखील फिरकत नसत. आणि बायजा सतत फक्त दिवसभर तिथेच असे. रात्री पाटील वर जात झोपायला आणि ही पडे माजघरात चटई टाकून. दुर्गा आणि सखू तिची वरचेवर काळजी घेत असत, पण हल्ली ती फार अशक्त झाली होती. तिच्या दोघी जावा देखील सासूबाई नसताना तिची काळजी घेत. पण खरे तर ती मनानेच खचली होती. तिला मिळणाऱ्या वागणुकीने ती दुःखी होती.

दुर्गाची मुले देखील येऊन तोंडदेखलं तिला भेटून जात.

घरातील बाकीची मुले मोठी झाली होती आता. ती देखील घरातील कारभारात आता लक्ष घालू लागली होती. मुलींची लग्न लागून त्या आपापल्या घरी गेल्या होत्या. पाटलांचे वडील आता थकत चालले होते. सासूबाईंना आताशा उठता बसता चक्कर येई. त्यांच्या दिमतीला यमी आता सतत असे.

हळूहळू सासूबाई अंथरुणाला खिळल्या. जागच्या उठेनाशा झाल्या. पाटलांचे वडील देखील आता सगळा कारभार तीन मुलांवर सोपवून त्यांच्या खोलीत पडून असत. राहीबाई आता अकरा वर्षांची झाली होती. आजूबाजूला शाळेत जाणारी मुलं ती आधीपासूनच बघे. तिलाही शाळेत जावंसं वाटे. पण सखूने तिला एकदाच सांगितलं होतं. " आपुन गरिबांची साळा ही दुनिया हाये पोरी! नगं म्हनूस कंदी की तुला साळंला जायाचं हाये त्ये. वावरातली माती तुला बक्कळ अक्कल देईल".

तिने आईचे बोल लक्षात ठेवले होते.

ती आता शेतीच्या बऱ्याच कामांमध्ये प्रवीण झाली होती. दुर्गाची भक्कम साथ, तिची स्वतःची निरीक्षण करण्याची वृत्ती, नवीन शिकण्याची जिद्द तिला अजून ज्ञान मिळवून देत होती. एवढीशी होती, पण तिला बियाणं आणि खतं ह्यातलं खूप ज्ञान होतं. आणि त्याचा वापर ती तिच्या अंगणातल्या तिने लावलेल्या छोट्या शेतात करीत असे. गोठ्यात असलेलं शेण ती मातीत कालवून उन्हात वाळवीत असे, आणि मग तिच्या शेतातल्या छोट्या रोपांना देत असे. त्यांना भरघोस कणसं लागत असत. ती कणसं पाखरांनी खाऊ नयेत म्हणून तिने एक भारीच युक्ती केली होती. पाटलांच्या घरातल्या मुलींनी तिला दिलेल्या बाहुल्या ती तिथे काठीला बांधून उभ्या करून ठेवत असे. त्यामुळे पाखरं येत नसत. तिच्या ह्या छोट्या शेतात फेरफटका मारायला घरातले सगळे हळूहळू येऊ लागले. फक्त पाटलांचे आई वडील सोडून सगळे बघून जात. तिचं फार कौतुक होई. शाळा नसली तरीही तिचं कुठेच अडत नव्हतं. ती मस्त मजेत तिच्या शेतात रमली होती. तिला असलेली अजून एक आवड म्हणजे नथ. तिला घरातल्या बायकांच्या मोठ्या नथी फार आवडत. ती तिच्या आईला म्हणायची देखील, " आये, म्या मोठी झाले ना की, म्या बी अक्षी मोठी नथ घालनार बग". ती असं म्हणाली, की सखू कौतुकानं हसत असे. कैक वेळा ती त्या नथींकडे टक लावून बघत बसे. आता सखू तिला घरातल्या कामाला सुद्धा जुंपायला लागली होती. आईने सांगितलेली कामं चटचट करून ती शेतात पळत असे.

त्याच काळातभारतात हरित क्रांतीने जोर धरला होता. वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरावे ह्यासाठी शेतीत असंख्य प्रयोग होत होते. जवळजवळ रोज एक नवे संकरित बियाणे बाजारात येत होते. रासायनिक खतांचा भरमसाठ वापर वाढला होता. त्याने खूप उत्पादन होत होते. पण त्याचा मानवी आयुष्यावर होणारा परिणाम फक्त द्रष्ट्या मंडळींना दिसत होता. ह्याबाबत जनजागृती करण्याचे थोडे प्रयत्न होऊ लागले होते.

त्याच द्रष्ट्या मंडळींमध्ये होती एक निरागस पण ज्ञानी मुलगी. कोण होती ती? ह्यावर काय म्हणणे होते तिचे? काही उपाय करणार का ती? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all