Jan 20, 2021
रहस्य

सिक्रेट लव्ह भाग 7

Read Later
सिक्रेट लव्ह भाग 7

सिक्रेट लव्ह.. भाग 7

"मी तुला रियाकडे सोडू का..?" रोहन

"हं.." अनन्याचं लक्ष नव्हतंच तो काय विचारतोय या कडे.

तो डोळे मिटून बसली म्हंटल्यावर रोहन ही आणखी काही बोलला नाही. त्याने तिला रियाकडे सोडलं. तिच्या घरी जातानाच फोनकरून तिला थोडीफार कल्पना दिली होती. अनन्याची काळजी घ्यायला सांगून त्याने कार आपल्या घराकडे वळवली.

आता पुढे:

अनन्याला सोडून रोहन त्याच्या घरी आला. त्याच्या मॉम डॅडना अर्जुन बद्दल सगळी महिती होती. त्यामुळे हे असे प्रसंग त्यांना नवीन नव्हते. रागात असताना अर्जुनला एकटं सोडणं धोक्याचं असतं, म्हणून रोहनने वेदांतला त्याला त्याच्या घरी घेऊन जायला सांगितलं होतं.

रोहन घरी आला तर अर्जुन सोफ्यावर डोकं पकडून बसला होता. समोरच्या टीपॉयवर लिंबूपाणी होतं. त्याने ते घेतलं नव्हतं. वेदांत फोनवर बोलत होता. रोहन आल्याचं समजलं तसं त्याने फोन बंद केला.

"अर्जुन.." रोहन काही बोलणार तोच अर्जुनने त्याला हाताचा पंजा दाखवला.

"रितेश शर्मा..एका वीकमध्ये मला याची पूर्ण महिती हवी आहे." अर्जुन

रोहन आणि वेदांत दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले. रोहन बोलणार तोच

"माझं बोलणं संपलं नाहीये अजून.." अर्जुन म्हणाला

"रितेश आणि ईशानीची एंगेजमेंट झालेली तुम्हाला माहिती होतं..?" अर्जुन

"आम्ही तुला सांगणारच होतो. हे बघ.." रोहन

"येस ओर नो..?" अर्जुन

"हो.." रोहन

"मला मुद्दाम समजू दिलं नाही. राईट..?" अर्जुन

"स्टोप इट अर्जुन. बस कर आता ईशानीचा चापटर. प्लिज.. त्या अनन्याला पण रागात किती काही बोललास. बिचारी किती रडत होती. कुणाचा राग कुणावरही काढायचा का..? " वेदांत ओरडून म्हणाला

"नाहीतर काय.  कशी हालत झाली होती तिची." रोहन

"सॉरी.." अर्जुन म्हणाला तसं दोघांनी चमकून त्याच्याकडे बघितलं. तसं त्याने खांदे उडवले. नकीच हे चांगलं लक्षण नव्हतं.

'चापटर तर आत्ता कुठे ओपन झालाय. सगळ्यांचे सगळे हिशोब पूर्ण करेन. त्याशिवाय अर्जुन राजाध्यक्ष नाव लावणार नाही.' अर्जुन रागाने धुसपूसत मनातच म्हणाला. सुडाग्नी चांगलाच पेटला होता. त्याच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव असल्याने या दोघांना त्याची कल्पना नव्हती.

"वेदांत, जेवण करून तुला घरी जायचं असेल तर जा. काकू एकट्या असतील. मी बघतो याच्याकडे." रोहन विषय बदलत बोलला.

"नाही. आई आज सकाळीच मावशीकडे गेली आहे. उद्या संध्याकाळी येणार आहे परत. मी सांगायच विसरलो." वेदांत

"ओके. मी आपल्यासाठी जेवण मागवतो. घरी आहे का बघू नाहीतर बाहेरून मागवूया." रोहन

"चालेल रे. तू टेन्शन नको घेऊ त्याचं." वेदांत

"ओके. आलोच मी." रोहन

वेदांत ही फ्रेश व्हायला गेला. तोपर्यंत रोहनने ही जेवायची ऑर्डर दिली. आता जरा वातावरण नॉर्मल होतं. नेहमी सारखी मस्ती चालू झाली.

"अर्जुन राजे, आपल्या समोर ग्लासमध्ये जे लिंबूपाणी आहे ते शो साठी ठेवलं नाहीये. प्या पटकन. कृपा होईल." वेदांत

अर्जुनने त्याला लूक देत लिंबू पाणी घेतलं.

"नशेसारखं राग उतरवायला पण काही औषध मिळतंय का बघायला पाहिजे. नुसता डोक्यात राग घालून घ्यायचा. ज्वालामुखी. मला तो अँग्री बर्ड मधला रेड आठवतो तुला बघून." रोहन

लिंबू पाणी पीत असतानाच त्याला मळमळल्यासारखं वाटलं. तो पटकन बाथरूममध्ये गेला.

"असा काय बघतोयस.. कधी न बघितल्यासारखा..?" रोहन जरा आश्चर्यानेच वेदांतला म्हणाला

याच्या डोक्यात काहीतरी किडे नक्कीच वळवळत असणार याची कल्पना आली होती त्याला.

वेदांत एकटक गंभीर चेहरा करून त्याच्याकडे बघत होता.

"तू अँग्री बर्ड बघितलास..? खरंच..?" वेदांत

"रियूला बघायचा होता म्हणून.." रोहन नजर चोरत म्हणाला

त्याला मुव्हीज अजिबात आवडायचे नाहीत. त्यात ते ऍनिमेटेड तर अजिबात नाही. या मुव्हीचं चुकून तोंडातून निघालं. आता त्याचा फायदा वेदांत घेणार होता.

"चक्...काय दिवस आलेत यार तुझ्यावर..घाबरू नको मित्रा. मी आहे तुझ्या पाठीशी. हे ही दिवस जातील. " वेदांत तर असं बोलत होता की जणू रोहनने काहीतरी मोठा गुन्हा केलाय.

रोहन तर ब्लँक होऊन त्याचं बोलणं ऐकत होता. सुरवातीला त्याला कळलंच नाही तो काय बोलतोय. कळलं तेव्हा त्याने त्याच्या अंगावर उडी मारली. वेदांतने त्याला चुकवलं.

"तुझी गर्लफ्रेंड आल्यावर बघू तू काय करतोस ते. साल्या प्रेमात पडशील ना तेव्हा कळेल." रोहन उशी फेकत म्हणाला

"नको. मी असल्या भानगडीत अजिबात पडणार नाही. तुम्हा दोघांकडे बघुन तर अजिबात नाही. मी आहे असाच मस्त आहे. आझाद पंछि." वेदांत हसत म्हणाला

"ए आझाद पंछ्या. फार उडू नको. काकूंना सांगतो लग्नाचं वय झालंय, मुली बघा म्हणून.." रोहन

"का माझ्या आझादी वर जळतोयस..? तू तुझ्या लग्नाचं बघ आधी. मग बेबीज सोबत अँग्री बर्ड बघ. हा हा हा." वेदांत

रोहनने आणखी एक उशी फेकली त्याच्या तोंडावर. त्याचा चेहरा हलकासा ब्लश करत होता.

"रोह्या..चक्क लाजतोस की लेका. संपलास रे भावा तू.

ये प्यार तुने क्या किया..एक ही पल मैं अचानक बदली इसकी दुनिया.."

वेदांत पुढे काही बोलणार तोच अर्जुन बाहेर आला. तो आल्याने दोघांनी विषय बदलला. त्याच्या समोर ते प्रेम, लग्न या गोष्टी करायचे नाहीत. त्याला अशा गोष्टींनी कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून.

रोहनने जेवण ऑर्डर केलं होतं ते आलं. मग तिघेही जेवायला गेले.

मस्ती करता करता पबमधला किस्सा आता डोक्यातून निघून गेला होता. पण ठिणगी तर पडली होतीच. त्यावर प्रेमाची फुंकर घालून कुणी विझवेल कि त्याचं वणव्यात रूपांतर होईल, हे येणारा काळच ठरवणार होता.

◆◆◆◆◆

रविवारचा दिवस सगळ्यांनी आराम करण्यात घालवला. ते रोहनच्या घरीच होते. संध्याकाळी आपापल्या घरी जायला निघाले. रोहन ही बाहेर जायची तयारी करत होता.

"कुठे दौरा..?" वेदांत

"रिया चिडली आहे माझ्यावर. आज तिला दुपारी मी बाहेर घेऊन जाणार होतो. तुमच्या नादात विसरलो. आता इथेच कुठे घेऊन जातो." रोहन शर्टची कॉलर नीट करत म्हणाला

"कितीला पडणार तिचा राग तुला..?" वेदांत चिडवत म्हणाला

"फार काही नाही रे. 2 प्लेट पाणीपुरी खायला घातली की राग उडन छु होतो तिचा. खोटा राग असतो तिचा. बाकी काही नाही. " रोहन हसत म्हणाला

"हं. तिला आता सांगतोच चांगलं मोठं काही वसूल करायला. भारी त्रास द्यायला शिकवतो तिला." वेदांत

"माझं सुख बघवत नाही का रे तुला..?" रोहन त्याचे केस विस्कटत म्हणाला

"नाही.. अजिबात नाही.." वेदांतने ही त्याचे जेल सेट केलेले केस विस्कटले. आणि त्याचा कंगावा घेऊन पळाला

"अबे..कंगवा दे इकडे. आधीच उशीर झालाय. आणखी चिडेल ती." रोहन ओरडला

त्यांची मस्ती चालू होती आणि इकडे अर्जुन आपल्याच विश्वात रमला होता.

"हाय.." अर्जुन

तो फुटबॉल खेळून झाल्यावर थकून तिच्याजवळ येऊन बसला होता.

"हूं.." ईशानी त्याच्याकडे न बघताच त्याला पाण्याची बाटली देत म्हणाली

"मी हाय म्हटलं. हे हूं काय आहे..?" अर्जुन

"मला नाही माहीत.." ईशानी तुटकपणे म्हणाली

"तू चिडली आहेस का..?" अर्जुन

"लवकर कळलं.." ईशानी

"मी त्याचं कारण विचारू शकतो..?" अर्जुन

"विचारायचं असेल तर विचार पण मी नाही सांगणार.." ईशानी

"ओह. मग काय फायदा विचारून..?" अर्जुन

"कसला आहेस रे तू..? जरा सुद्धा मनवत नाही. जा बोलू नको.." ईशानी त्याला सॅकने फटके मारत म्हणाली

अर्जुन खळखळून हसला. तसं तिने रागाने त्याच्याकडे बघितलं.

"मनवायचं तर मी माझ्या पद्धतीने मनवू शकतो. तुला चालणार आहे का..?" अर्जुन तिच्या नजरेला नजर मिळवत म्हणाला

केसांची बट कानामागे सरकवत तिने लाजून नजर झुकवली.

तो आणखीनच खळखळून हसू लागला.

"चल पाणीपुरी खाऊया..आत्ता तुला तुझ्या पद्धतीने मनवतो. पण लग्नानंतर तू चिडलीस की मी माझ्या पद्धतीने तुल मनवेन हा." अर्जुन गालातल्या गालात हसत बाईककडे निघाला.

ती ब्लश करणारा आपला चेहरा लपवत ती त्याच्या मागून निघाली.

"अर्जुन, कॅच.." वेदांत ओरडला तसं तो भानावर आला

"काय रे.. साधा कंगवा पकडता येत नाही. कुठं लक्ष असतं..?" वेदांत

अर्जुनच लक्ष नसल्याचा फायदा घेत रोहनने कंगावा काढून घेतला होता.

असंच मस्ती करत तिघे घराबाहेर पडले. अर्जुन त्यांच्यात असून नसल्यासारखा होता.

◆◆◆◆◆

सोमवारचा ऑफिसमधला दिवस..

आज नवीन टीम मधल्या लोकांचं प्रेझेंटेशन होतं. टीम लीडर ही ठरवण्यात येणार होता. मागच्या आठवड्याभर रोज त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला होता. प्रोजेक्ट खूप मोठा नव्हता म्हणून नवीन लोकांना संधी देण्यात आली होती.

सकाळ पासून अर्जुन, वेदांत सेमिनार हॉल मधेच होते. 6-7 जणांचे प्रेझेंटेशन झाले होते. 1-2 जण सोडले तर कुणाचे इतके काही खास वाटले नाहीत. लंच ब्रेक मध्ये वेदांत अर्जुन सोबत हेच डिस्कस करत होता. तो फारसा खुश नव्हता आत्ता पर्यंतच्या प्रेझेंटेशन वर. अर्जुन तर काहीच बोलत नव्हता. डोक्यात काय चालू आहे कळायला मार्ग नव्हता. दोघे परत सेमिनार हॉल मध्ये आले. रोहन ही त्यांना जॉईन झाला. आता बाकीच्यांचे प्रेझेंटेशन होणार होते.

सुरवातीचे 1-2 ही तसेच होते.

"नेक्स्ट प्रेझेंटेशन बाय अनन्या परांजपे." तिचं नाव पुकारलं तसं अर्जुनने समोर बघितलं.

बेबी पिंक फॉर्मल शर्ट, नेव्ही ब्लु पेन्सिल स्कर्ट, केसांची पोनी, हातात घड्याळ. फॉर्मल लूक मध्ये ती वेगळीच दिसत होती. आज चष्मा घातला नव्हता. चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता. 'सोबर अँड प्रेझेंटेबल' एका मनाने नोंद केली.

आणि दुसरं चिडक, रागीट मन त्या दिवशी पब मधला किस्सा आठवून दात ओठ खाऊ लागलं.

पार्टीमध्ये जायची अर्जुनला अजिबात इच्छा नव्हती. वेदांत आणि रोहन मागे लागले, म्हणून तो तयार झाला. त्याला कुणासोबत बोलायची इच्छा नव्हती. तो एक कोपऱ्यातील रिकामं टेबल बघून तिथे जाऊन बसला.

वेटरकडे ऑर्डर दिली. सगळी कडे एक नजर टाकली. वेदांत आणि रोहन गप्पांमध्ये रमले होते. दुसरीकडे लक्ष गेलं.

'अनन्या..ही इथे काय करतीये..?'

समोर एका घोळक्यात त्याला अनन्या दिसली. त्याला थोडं आश्चर्य वाटलं. तशी ती शांत बसली होती. मधेच उसन हसू आणुन बोलत होती. 5-6 जण दिसत होते तिच्या सोबत. अचानक ते सगळे उठले आणि डान्स फ्लोअर कडे जायला लागले. अनन्याची इच्छा नव्हती वाटतं. ती नाही म्हणत होती. तेव्हढ्यात एका मुलाने तिचा हात पकडला. जबरदस्तीने ओढत आपल्या सोबत घेऊन गेला. अर्जुनला राग आला. का ते माहीत नाही. पण त्याला ते आवडलं नाही. त्याने रागाने पूर्ण ग्लास रिकामा केला. आणखी एक ऑर्डर दिली. त्याने तिच्यावरून नजर हटवली नव्हती. ती ही आता हसत स्वतःहून डान्स करत होती. तिला ते आवडलं हे स्पष्ट दिसत होतं. त्याला आणखीनच राग आला.

"वोव. व्हॉट ए पलीजंत सरप्राईज.." एक कुत्सित स्वरातलं बोलणं ऐकू आलं तसं त्याची अनन्या वरची नजर हटवली आणि आवाजाच्या दिशेने बघितलं.

समोर तो होता.

रितेश शर्मा.

लास्ट पेपर नंतर आत्ता ते समोर आले होते. साधारण अडीच वर्षांनन्तर.

"बट आय डोन्ट लाईक दिस सरप्राईज." अर्जुन त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला

"ओह. सेम ऍटीट्यूड हा. ग्रेट. तुझ्या जागी मी असतो तर आपल्या अपोनन्टकडे दुर्लक्ष करायची चूक केली नसती मिस्टर अर्जुन राजाध्यक्ष." रितेश हसत म्हणाला

अर्जुन आधीच रागात होता. त्यात हा माणूस त्याच डोकं आणखी खराब करत होता.

"तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्सचं तुला नडला. दॅट्स व्हाय ईशानीने तुला सोडलं..आणि ती.." रितेशने डायरेक्ट त्याच्या दुखऱ्या नसेवर वार केला होता.

हातातला ग्लास टेबल वर आपटत तो झटक्यात उठला. आणि रितेशची कॉलर पकडली.

तेव्हढ्यात रोहन आणि वेदांत तिथे पोचले होते. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला होता. पण त्यांनतर अनन्या त्यांच्या कार समोर आली. त्याचा तो सगळा राग तिच्यावर निघाला होता.

टाळ्यांच्या आवाजाने अर्जुन भानावर आला. अनन्याचं प्रेझेंटेशन संपलं होतं. तिने सगळ्यांना थँक यू म्हटलं आणि आपल्या जागेवर येऊन बसली. थोड्या वेळात बाकीच्यांचेही प्रेझेंटेशन संपले.

15 पैकी 3 जण सिलेक्ट झाले होते. त्यात अनन्या ही होती. त्या तिघांना अर्ध्या तासात एक छोटा प्रोग्राम बनवायला सांगून सगळे जण आपापल्या कॅबिनकडे गेले.

अनन्या आपल्या डेस्कवर आली. पाणी पिऊन कामाला लागली. अर्धा तास झाला तसं त्यांना एका कॅबिन बाहेर थांबायला सांगितलं. एक एक जणांना आत बोलवत होते. दोघांचं झाल्यावर अनन्या आत गेली.

आता अर्जुन, रोहन, वेदांत, आणखी दोघे सिनिअर बसले होते. तिने सगळ्यांना ग्रिट केलं. अर्जुनने आपली करारी नजर तिच्यावर रोकली तसं तिच्या पोटात गोळा आला.

सिनिअर होते त्यांनी तिला प्रोग्रॅम दाखवायला सांगितला. तिने तो दाखवला. ते इम्प्रेस झाल्यासारखे वाटले.

त्यांनी काही प्रश्न विचारले. तिने त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. त्यांनी वेदांतला तिचं नाव सजेस्ट केलं. त्याला ही ते पटलं होतंच. त्याने अर्जुन आणि रोहनकडे बघितलं. रोहन ही हो म्हणाला.

थोडयावेळाने बोलावतो म्हणत वेदांतने तिला कॅबिनबाहेर जायला सांगितलं. ती जायला निघाली तोच करारी आवाज आला

"थांब.. "

क्रमशः

- श्रिया❣️

26-11-2020

कसा वाटला हा भाग नक्की सांगा..आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका..धन्यवाद????????

**सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ©®श्रिया देशपांडे.

Circle Image

Shriya Deshpande

Writer

I Love to Write..