Mar 05, 2021
प्रेम

सिक्रेट लव्ह भाग 19

Read Later
सिक्रेट लव्ह भाग 19

सिक्रेट लव्ह.. भाग 19

तिघेही कॅबिनमधून बाहेर आले. दोघे हसत होते. तिसरा वैतागला होता. वैतागलेला माणूस अनन्याच्या डेस्ककडे नजर टाकायला विसरला नाही. ती कामात गुंग होती. मगाशी तिचा झालेला भित्रा ससा आठवून ओठांच्या कडा रुंदावल्या. वैतागल्याने कपाळावर आलेली आठी जाऊन ओठांवर मंद हसू कधी उमटले कळलं ही नाही.

आता पुढे:

आज रियाच्या कॉलेजमध्ये सांस्कृतिक मंडळाचा कार्यक्रम होता. तिला तिथे निवेदन करायचं होतं. सकाळपासूनच तिची गडबड चालू होती. आधी 4 दिवस तयारी करूनही आज गोंधळ होताच. 

"अनु..हे बघ ना..हे छान नाही दिसत. माझ्याकडे कानातले नाहीये कुठलंच चांगलं.." रियाची चिडचिड चालू होती. 

"अगं तू या ड्रेसवर मॅच होतात म्हणून तर घेतलंस ना.? मस्त दिसतंय रियू. तुला का असं वाटतंय..?" अनन्या

"तेव्हा आवडलं होतं. आता नाही चांगलं वाटत.." रिया

"बरं. नाराज नको होऊ अशी. आपण बघू दुसरं काही आहे का.." अनन्या

"आता वेळ पण नाहीये इतका. जाऊ दे. मी जातच नाही कॉलेजला." रिया हुप्पा होऊन बेडवर बसली

अनन्याला हसूच आलं एकदम. रिया होतीच तशी चुलबुली, बडबडी, निरागस. कुणाला आवडेल अशीच होती. लाडावलेली असल्याने नखरे तर ढीगभर असायचे. आर्किटेक्टच्या शेवटच्या वर्षाला होती. दोन वर्षांपूर्वी एका पार्टीमध्ये रोहन सोबत तिची ओळख झाली. मैत्रीने सुरू झालेला प्रवास प्रेमापर्यंत येऊन पोचला कळलं ही नाही. पुढाकार कोणीच घेत नव्हतं. एक वर्ष झाल्यावर रोहनने तिला अखेर लग्नासाठी विचारलं. तिने ही होकार दिला. दोन्ही घरातून लगेच मान्यता मिळाली. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करायचं असं ठरलं होतं. 

"रियू. पोहे केलेत थोडं खा आधी. कॉफी घे. मग आपण आवरूया. आत्ताशी 8.30 झालेत. तुला 10 वाजता जायचं आहे ना.? बराच वेळ आहे. काळजी नको करू. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे मूड नको घालवू. नाहीतर मला परत रोहन सरांना बोलवावं लागेल. तुझा मूड ठीक करायला.." अनन्या हसत म्हणाली

रिया झकासपैकी लाजली.

खाऊन झाल्यावर अनन्याने तिची छान तयारी करून दिली. स्वतःकडचा एक नाजूक सेट तिला घालायला दिला. जो त्या ड्रेसवर मॅच होत होता. तितक्यात बेल वाजली. 

"मी बघते कोण आहे. तू या बांगड्या घाल तोपर्यन्त." अनन्या बॉक्स मधून बाहेर काढलेल्या बांगड्या ड्रेसिंग टेबलवर ठेवत म्हणाली आणि दार उघडायला गेली.

"सर तुम्ही. या ना आत.." अनन्या

"शु..हळू.." रोहन अगदी हळू आवाजात बोलला

अनन्या ही हळू आवाजात सॉरी म्हणून हसली. खुणेनेच आत जा म्हणाली. 

रोहन आवाज न करता रियाच्या बेडरूममध्ये आला. 

"कोण होतं ग..?" रिया हातात बांगड्या घालत होती. तिची नजर खाली होती. 

रोहनने अलगद तिला मागून मिठी मारली आणि तिच्या नाजूक हातात बांगड्या चढवायला लागला. रिया गालातल्या गालात हसत तिरकी मान करून त्याच्याकडे बघत होती. 

"कोणीतरी मला कॉलेजला सोडायला येणार नव्हतं ना..?" रिया

"येणार नव्हतोच. पण म्हटलं तू इतकी छान तयार होशील, कॉम्प्लिमेंट तर द्यायला हवं ना..? रात्रीपर्यंत वाट का बघायची." रोहन हसत म्हणाला

"अस्स..?" रिया

"हं.."रोहन तिच्या गालावर ओठ ठेवणार तोच तिने त्याच्या छातीवर कोपर मारलं आणि त्याला दूर केलं.

"माझी आत्ताची बॅच दुसऱ्या सरांना घ्यायला सांगून आलोय आणि तू असं करणार आहेस का..?" रोहन गाल फुगवत म्हणाला

"हो का..? जास्त लाडात नका येऊ.. चला आता. मला उशीर होतोय." रिया नाक मुरडत म्हणाली

रोहन ही मग तिच्याकडे न बघता बाहेर आला. 

"सर..कॉफी..?" अनन्या

"नको..कुणाला तरी उशीर होतोय.." रोहन

अनन्याला तर काही कळलं नाही. पण मागून ओढणी सावरत येणाऱ्या रियाला हसू आवरलं नाही. अनन्याने खुणेने काय झालं विचारलं. रियाने डोळे मिचकावत असंच गंमत म्हणून सांगितलं. अनन्या ही मग गालातल्या गालात हसायला लागली.

"अनु..कोणी सांगितलं नाही मला मी कशी दिसते..?" रिया

"मी खाली वाट बघतोय.." रोहन तिच्याकडे न बघता म्हणाला

दोघी हसायला लागल्या.

"छान दिसतेस. खूप सुंदर." अनन्या तिच्या कानामागे काजळाचा छोटा टिळा लावत म्हणाली

"थँक्स अनु.." रिया गोड हसत तिला बिलगली

"रोहन सर वाट बघत असतील. नीट जा आणि ऑल द बेस्ट.." अनन्या

रियाने हो म्हणत टाटा केलं आणि खाली आली. रोहन कारमध्ये बसला होता. ती आली तशी त्याने तिच्यावरची नजर हटवली. आणि आपलं लक्ष नाही असं दाखवलं. रिया कारमध्ये बसली. पटकन त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि बाजूला झाली. 

"लव्ह यू.." रिया

त्याची कळी लगेच खुलली. त्याने ही तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. 

"लव्ह यू टू.." रोहन हसत म्हणाला

"आता ही सांगणार नाही मी कशी दिसते..?" रिया क्युट चेहरा करून म्हणाली

"नजर हटवावी वाटत नाही अशी दिसते." रोहनने अलगद तिच्या गालावर बोटाच्या पेराने नक्षी काढली

रियाने लाजून डोळे बंद केले. गुलाबी गाल आणखी गुलाबी झाले. दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सावरलं.

"उशीर होतोय." तिची अजूनही नजर झुकवलेलीच होती

रोहनने गालातल्या गालात हसत कार चालू केली आणि तिच्या कॉलेजचा रस्ता धरला. 

"तुझं झालं की फोन कर. मी घ्यायला येतो. खूप उशीर करू नको. फ्रेंड्स सोबतच राहा." रोहन बरंच सूचना करत होता

तिने हसत त्याच्या गालावर ओठ ठेवले आणि बाय म्हणत खाली उतरली. रोहनने कार चालू करून वळवली. जाताना तिने मागे वळत एक फ्लाईंग किस दिला. त्याने ही तो पकडत हृदयाशी पकडला. ती खुदकन हसली. तिला हसताना बघून तो ही हसला आणि क्लासकडे निघाला.

◆◆◆◆◆

अनन्या तिचं आवरून ऑफिसला आली. लॅपटॉप चालू करणार तोच डेस्क वरचा फोन वाजला. 

"कॅबिन मध्ये ये.." पलीकडून आवाज आला

ती ठीक आहे म्हणे पर्यन्त फोन कट ही झाला. 

तिने नोट पॅड आणि पेन्सिल उचलली आणि अर्जुनच्या कॅबिनमध्ये गेली. अर्थात दार नॉक करूनच. 

"गुड मॉर्निंग सर.." अनन्याने कॅबिनमध्ये आल्याआल्या अर्जुनला ग्रिट केलं.

"गुड मॉर्निंग.." अर्जुन तिच्याकडे बघत म्हणाला

दोघांच्या चेहऱ्यावर किंचित हसूही होतं. आज पहिल्यांदा असं झालं असावं. दोघांनाही असच वाटलं की पहिल्यांदा ते एकमेकांसोबत थोडं का होईना हसून बोलले. आपल्याच विचारांचं त्यांना आणखी हसू आलं. 

त्याने तिला बसायला सांगितलं. कॉफीसाठी ही विचारलं. तिने नम्रपणे हसून नकार दिला. त्याने ही कॉफी घ्यायचा विचार बदलला. 

अर्जुनला एक प्रेझेंटेशन बनवून हवं होतं. त्याचे डिटेल्स तो तिला सांगितले. तिने ही ते व्यवस्थित नोट केले जेणे करून कुठला पॉईंट राहायला नको. 

"ओके सर.. लंचब्रेकच्या आधी मी तयार करून पाठवते." अनन्या

"आणखी एक.." अर्जुन

"हा.." अनन्या

"काही नाही. तू जाऊ शकतेस.." अर्जुनने तिच्यावरची नजर हटवत लॅपटॉपमध्ये बघितलं. 

ती जायला निघणार तोच वेदांत कॅबिनमध्ये आला.

"गुडमॉर्निंग सर.." अनन्याने त्याला ही ग्रिट केलं

"मॉर्निंग गुड. आज ही मस्त दिसतेस
. रोज रोज असं स्पेशल. इस के पिछे का राज क्या है..?" वेदांत फ्लर्ट करत म्हणाला

'किती सहज बोलतो हा..आपल्याला का जमत नाही..' अर्जुन मनात म्हणाला

त्याला तेच तर बोलायचं होतं की छान दिसतेस..पण..हा 'पण' तर नेहमी असतोच चिकटलेला..प्रत्येकवेळी..प्रत्येकठिकाणी.????

"असं काही नाही सर. आज रियाच्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे तिला रेडी करता करता मी पण थोडं तयार झाले. बस. राज वगैरे काही नाही. तसही माझ्याकडे कोण बघणार आहे." अनन्या हसत म्हणाली

किंचितशी वेदना होतीच तिच्या बोलण्यात.

"अनु.." वेदांत मानेने असा विचार करू नको म्हणाला

तिने ही हसत मी ठीक आहे म्हणून सांगितलं.

"बघणारे तर बरेच आहेत. तू हो म्हण फक्त. लडकों की लाईन खडी कर देता हूं मैं..बस तेरे लिये.." वेदांत

इकडे ज्वालामुखीचा स्फोट होण्याच्या मार्गावर होता आणि याचं आपलं फ्लर्ट चालू होतं.

"हे ऑफिस आहे. मॅरेज ब्युरो नाही." अर्जुन नेहमीच्या अँग्री बर्ड सुरात म्हणाला

"कळलं." वेदांत डोळे फिरवत म्हणाला

"अनु डार्लिंग इथे आपण लंच ब्रेकमध्ये कंटीन्यू करूया." वेदांत अनन्याकडे बघत डोळे मिचकावत म्हणाला

डार्लिंग..चक्क असं बोलला हा..डार्लिंग..अर्जुनचे तर डोळेच विस्फारले. 2 मिनिटे तो शॉकमध्ये होता. भानावर येऊन आणखी रागात वेदांतकडे बघायला लागला.

अनन्या खुदकन हसली. तसं त्याचं चित्त विचलित झालं. 

"हाय..ये स्माईल..ये.." वेदांत

"आपल्याला मीटिंग आहे. चल.." अर्जुनने वेदांतला ओढतच बाहेर आणलं..पुढे आणखी काही बोलण्याआधीच..

अनन्याही हसत त्याच्या कॅबिन मधून बाहेर आली आणि अर्जुनने सांगितलेल्या कामाला लागली. लंचब्रेकच्या आधी तिने काम पूर्ण केलं. अर्जुनला इमेल केला. त्याने ते चेक करत काही चेंजेस सांगितले. तिने ही ते लगेच अपडेट केले आणि आपल्या बाकीच्या कामाला लागली. 

3 वाजले असतील की अर्जुनने तिला कॅबिनमध्ये बोलवलं. 

"आत्ता वेदांत नाहीये. तू माझ्यासोबत मीटिंग अटेंड करणार आहेस." अर्जुन 

"काय..? मी..? मी कशी करणार पण..? मला.." अनन्या बोलत होती की अर्जुनच्या रोखून पाहणाऱ्या नजरेने पुढचे शब्द तिच्या घशातच अडकले.

"मला नाही ऐकायची सवय नाही.." अर्जुनने तिच्यावर त्याची करारी नजर रोखली होती.

"सॉरी सर.." अनन्या खाली मान घालून म्हणाली

"आणखी 20 मिनिटे आहेत तुझ्याजवळ." अर्जुन घड्याळात वेळ बघत म्हणाला.

"ओके सर." अनन्या 

ती चुपचाप कॅबिन मधून बाहेर आली. बाहेर आल्यावर मोठा श्वास घेतला. त्याच्या नजर रोखून बघण्याने आपण श्वास घ्यायचं ही विसरलो होतो की काय असं वाटलं तिला. घड्याळात वेळ बघतच ती डेस्ककडे आली. डोक्यातील सगळे विचार आणि भीती बाजूला ठेवत फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेली. 

बरोबर 20 व्या मिनिटाला ब्लेझरचे बटण लावत अर्जुन त्याच्या कॅबिनमधून बाहेर आला. ती त्याची नेहमीची स्टाईल होती. त्याच्या या स्टाईलवर कित्येक जणी जीव ओवाळून टाकत होत्या. अर्थात त्याला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतंच. तो येताच अनन्या गडबडीने उभी राहिली. तिच्याकडे त्याने एक नजर टाकली आणि पुढे गेला. ती ही भानावर येत त्याच्या मागे पळाली. 

मीटिंग छान झाली. क्लाएंट खुश दिसत होता. अनन्याची पहिलीच वेळ होती अशी क्लाएंट मीटिंग अटेंड करायची. ती तिच्या स्वभावानुसार सगळं निरीक्षण करत होती. अर्जुन कसं बोलतो, कसं प्रेझेंट करतो..त्याची बोलण्याची पद्धत..एरव्ही प्रत्येक गोष्टीत चिडणारा तो प्रोफेशनल वागताना किती डिसेंट वागत होता. बोलण्याचा टोन ही किती व्यवस्थित होता. त्याने मधेच अनन्याला ही थोडं एक्सप्लेन करायला सांगितलं. आधी ती जरा डगमगली. अर्जुनने नजरेनेच दिलासा दिला. मग स्वतःला सावरत तिने व्यवस्थित एक्सप्लेन केलं. 

डील फायनल करूनच ते उठले. 7 वाजून गेले होते. आता ऑफिसला जाण्यात काही अर्थ नव्हता. तसं ही आजचं काम ही झालं होतंच. अर्जुनने घरीच जायचं ठरवलं.

"मी घरी सोडतो तुला.." अर्जुन

"इट्स ओके सर. मी कॅबने जाईन.." अनन्या

अर्जुनने फक्त तिला लूक दिला. ती चुपचाप त्याच्या मागे निघाली. विस्तावशी उगाच कोण दोन हात करणार????

◆◆◆◆◆

2-3 दिवस असेच गेले. रविवारचा दिवस उगवला. जयदीप आणि विशाखा यांचा लग्नाचा वाढदिवस होता. अपूर्वा सकाळीच घरी आली. 

"हॅपी ऍनिव्हर्सरी आई बाबा.." अपूर्वाने दोघांना शुभेच्छा दिल्या.

"थँक यू बेटा.." दोघेही एकाच वेळी म्हणाले

अंशुमन आणि अर्जुन ही हॉलमध्ये आले. अंशुमनने पण शुभेच्छा देत विशाखा यांच्या गालावर किस केलं. त्यांनी ती त्याला मायेने जवळ घेत गालावर थोपटलं. दोघाना वाटलं की अर्जुन पण शुभेच्छा देईल. पण तो काहीच बोलला नाही. तो शांतपणे मोबाईल बघत सोफ्यावर बसला होता.

विशाखा यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. जयदीपनी खांद्यावर हात ठेवत त्यांना सावरलं.

"आई बाबा..हे तुमच्यासाठी..संध्याकाळी हे घालायचं आहे.." अपूर्वा विषय बदलत म्हणाली

"सुंदर आहे साडी.." विशाखा

"अर्जुनने सिलेकट केली आहे." अपूर्वा

विशाखा साडीवरून प्रेमाने हात फिरवत मंद हसल्या. आणखी काय करू शकत होत्या त्या. 

"छान आहे. संध्याकाळी नेसेन मी ही साडी.." विशाखा

"बाबा, तुम्ही पण बघा ना काय आहे ते..?" अंशुमन

जयदीपनी बॅग उघडून बघितली. काळ्या रंगाचा 2 पीस सूट होता. 

"छान आहे.." जयदीप हसून म्हणाले

"मग चॉईस कुणाची आहे." अंशुमन कॉलर उडवत म्हणाला

"थँक्स बेटा.." जयदीप

"अर्जुनने पण हेल्प केली आहे.." अपूर्वा

"पण फायनल डिसीजन माझा होता.." अंशुमन

"तरी पण. तुला एकट्याला क्रेडिट नाही." अपूर्वा

"ताई, प्रत्येक वेळी तू अर्जुन दा ची बाजू घेते. माझ्या बाजूने कधीच बोलत नाही. तोच लाडका आहे तुझा. मी नाहीये." अंशुमन गाल फुगवत म्हणाला

"अच्छा..? मग हा शर्ट पण अर्जुनला देऊ का..?" अपूर्वा हसत म्हणाली

तिने बॅग मधून एक मस्त पैकी मरून कलरचा शर्ट बाहेर काढला होता.

"वॉव ताई..हा माझ्यासाठी आहे..? मस्त आहे..कसा दिसतोय..?" अंशुमनने लगेच तो शर्ट आपल्या अंगावर लावून बघितला.

"अम्म. बरा दिसतोय. अर्जुनला जास्त छान दिसेल. हो ना बाबा..?" अपूर्वा 

"हो.." जयदीप पण गंभीर चेहरा करत म्हणाले

"आई..?" अंशुमन

"गप गं. नको चिडवू माझ्या बाळाला." विशाखा

"बाळ म्हणे." अपूर्वा तोंड वाकडं करत म्हणाली

"असुदे.." अंशुमनने पण तिला तोंड वाकडं करून दाखवलं

"पण हे खरं आहे की अर्जुनला जास्त छान दिसेल.." विशाखा हसू दाबत म्हणाल्या

"आई..तू पण असंच कर." अंशुमन रुसला

तसं सगळे हसायला लागले. सगळ्यांना हसताना बघून अंशुमन आणखी नाराज झाला. तो तिथून उठणार तोच अपूर्वाने त्याला हाताला धरून आपल्या जवळ बसवलं.

"गंमत केली बाळाची. लाडका तर तू पण आहेसच ना..? दोघांसाठी शर्टस आणलेत. तुझा आवडता मरून आणि अर्जुनचा आवडता निळा." अपूर्वा

"लव्ह यू ताई.." अंशुने तिला मिठी मारली.

तिने ही हसत त्याच्या डोक्यावर टपली मारली.

या सगळ्यात अर्जुन तिथं असून नसल्यासारखा होता.

क्रमशः

- श्रिया❣️
17-01-2021

भेटू लवकरच..????

कसा वाटला हा भाग नक्की सांगा..आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका..धन्यवाद????????

**सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ©®श्रिया देशपांडे.

Circle Image

Shriya Deshpande

Writer

I Love to Write..