Nov 24, 2020
प्रेम

सेकंड इनिंग-भाग 6

Read Later
सेकंड इनिंग-भाग 6

सेकंड इनिंग-भाग 6 

 

शक्ती जेव्हा बोलते ,दोघं काय एकत्र फिरून आलात का,तेव्हा दोघांनी ज्या पध्दतीने एकमेकांकडे पाहिलं ,जसं काय त्यांची चोरी पकडली गेली,पण नंतर शक्ती जे बोलली ,ते असचं बोलली ,असं ती नंतर जे बोलली ,यावरून त्यांनी निष्कर्ष काढला. थिएटर मधून निघताना ,प्रथमेशने त्यांना पाहिलं होतं,तो अजून घरी आला नव्हता . जेवताना प्रथमेश दोघांच निरीक्षण करत असतो ,हे विश्वासच्या लक्षात आलं.

विश्वास-काय झालं रे ,असं काय पाहतो 

प्रथमेश-काही नाही ,आज मी थिएटर मध्ये तुम्हांला पाहिल्या सारखं वाटलं,तुम्ही दोघे आला होतात का ,पिक्चर पाहायला .

विश्वास-नाही ,आम्ही तर आमच्या ऑफिस मध्ये होतो ,पण तू ऑफिस सोडून थिएटर मध्ये काय करत होतास आणि कुणा बरोबर होतास ,तरी माझ्या एका मित्राने ,तुला एका मुली बरोबर पाहीलं,असं तो सांगत होता,तर मी त्याला म्हटलं,अरे तुला काही भास झाला असेल तुझ्या सारखा ,की खरचं कोण मुलगी तुझ्या बरोबर होती आणि ते समजू नये,म्हणून तू आम्हाला असं बोलत आहे .

प्रथमेश- नाही ,नाही ,असं काही नाही,ती तर माझ्या ऑफिस मध्ये काम करत होती ,आज माझा प्रोजेक्ट वर्क पूर्ण झालं,म्हणून आम्ही पिक्चर पाहायला गेलो होतो.

चुकून प्रथमेश खरं बोलून जातो ,म्हणून तो जीभ चावतो.

तसं सगळेच हसायला लागतात . सगळ्यांना हसताना पाहून तो गोंधळला.

सुलभा-अरे ते असचं बोलले आणि तू त्यांच्या ट्रिकला फसला 

प्रथमेश-खरचं 

विश्वास-नाही तर काय,बरं ते जाऊ दे,नाव काय तिचं

प्रथमेश-म्हणजे मी बोलणारच होतो तुमच्याशी ,पण योग्य वेळेची वाट पाहत होतो 

विश्वास-असं समज,ती वेळ आता आली आहे 

प्रथमेश- तिच नाव तन्वी ,ती आणि मी एकाच कंपनीत दोन वर्ष काम करत होतो ,मी कंपनी बदलली ,पण ती तिथेच काम करते,मी ग्रुप लीडर होतो ,तेव्हा ती माझ्या ग्रुपमध्ये होती ,तिथे आमची ओळख झाली ,मग संपर्कात आल्यावर ,त्याचे प्रेमात रुपांतर झाले ते कळालं नाही ,इतके दिवस चांगले मित्र म्हणून होतो ,आजच मी तिला प्रपोज केले ,तिने होकार दिला ,मग आता सांगणार होतो,तर तुम्हीच मला पकडले .

विश्वास- कधी बोलावतो ,तिला आणि तिच्या आई वडिलांना घरी ,सुलभा तू त्या दिवशी बरोबर बोलली होती ,की ह्याचं लग्न करायला पाहिजे.

सुलभा -त्या दिवशी तो ज्या पध्दतीने वागला,मला त्या दिवशीच डाऊट आला होता ,मलाही आता सासू व्हायचं आहे,काय .

इतक्या वेळ शक्ती आणि भक्ती शांत बसल्या होत्या.

आता त्यांची चिवचिव सुरु झाली.

भक्ती-दादा ,तुझ्या लग्नात खूप मजा करणार ,सगळी हौस पूर्ण करणार 

प्रथमेश- कर ,पण थोडा प्रोब्लेम आहे 

विश्वास-काय रे,तिचे घरचे तयार नाहीत का,आम्ही जाऊन बोलू ना.

प्रथमेश- नाही ,तसं काही नाही,तिने अजून घरी सांगितल नाही ,तिच्या भावाला माहित आहे,त्याला काही प्रोब्लेम नाही,पण लग्नाच्या बाबतीत,तिचे विचार थोडे वेगळे आहे .

सुलभा-वेगळे म्हणजे,लग्न न करता ,लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं आहे की काय तिला ,मी आधीच सांगून ठेवते ,असं काही चालणार नाही ,लग्न करावे लागेल,आज कालच्या तुम्हा मुलांच काही खरं नसतं.

प्रथमेश-नाही गं,तसं काही नाही 

सुलभा- मग कसं 

विश्वास- अगं तो काय सांगतो ,ते पहिलं नीट समजून घे आणि नंतर तुझा निर्णय काय आहे ते सांग ,आधीच बिचा-याला घाबरून ठेवते,प्रथमेश बोल तू,काय विचार आहेत तिचे लग्नाबद्दलचे .

प्रथमेश-तिला लग्न साध्या पध्दतीने किंवा रजिस्टर करायचं आहे आणि जे पैसे लग्नाच्या खर्चातून वाचतील ,ते वृध्दाश्रमात किंवा अनाथाश्रमात देण्याची इच्छा तिने बोलून दाखवली आहे.

ही तिची अट आहे .

विश्वास- अरे उलट मला तर ऐकून खूप छान वाटले तिचे विचार,तिच्या घरी कोण कोण असतं आणि तिला तुझ्याबद्दल ,आपल्या बद्दल माहित आहे ना? तिला आणि तिच्या घरच्यांना बोलव घरी या रविवारी दुपारी आणि हो जेवायला बोलाव,हवं तर तिच्या वडीलांचा नंबर दे ,मी बोलावतो,काय गं मी बरोबर बोलतोय ना.

सुलभा-ती अजून तिच्या घरी काही बोलली नाही ,तुम्ही तिच्या घरी फोन करणार . प्रथमेश तू तिला तिच्या घरच्यांना सांगायला सांग ,तू सांगितलं आहे आम्हाला ,हे ही सांगू दे आणि भेटायला बोलावलं आहे,असं सांग ,मग तिच्या घरच्यांना फोन करुन बोलवता येईल,लग्न तुझं आणि गुडघ्याला बाशिंग याने बांधलय ,अजून एक गोष्ट जेव्हा ,ते लोक येतील ,तेव्हा तुझ्या काका ,काकूला पण बोलवू ,नाहीतर ते असही बोलत असतात ,सगळे निर्णय आम्ही घेतो.

प्रथमेश-कुणी काही म्हटलं तरी मला काही फरक पडत नाही,माझ्या बाबतीतचे निर्णय घेण्याचा अधिकार मी फक्त तुम्हाला दिला आहे ,मी सांगतो तन्वीला तिच्या घरच्यांशी बोलायला.

सुलभा-अरे त्यांना मान दिला पाहिजे ,असं कसं बोलतो

प्रथमेश-ठिक आहे ,बोलावं तुला जे करायचं ते कर.

रात्री झोपताना सुलभा-तू असा कसा हवेत दगड मारला आणि लागला पण,खरं सांग तुला यातलं आधीच माहित होतं ना सगळं .

विश्वास- असं काही नाही ,पणअसं वाटतं होतं की,प्रथमेशच नक्की कुठं तरी आहे ,कारण तो रात्री उशिरापर्यंत मोबाईल वर असायचा ,जॉब ला लागायच्या आधी फोन लॉक करत नव्हता ,पण मला वाटते ,तन्वी त्याच्या आयुष्यात आल्यावर त्याने फोन लॉक करायला सुरुवात केली ,त्यावरुन मला असं वाटतं होतं की,नक्की काहितरी गडबड आहे,त्यावरुन मी असचं बोललो ,पण तीर निशाणे पे लगा,हो की नाही ,नाहीतर आपलंच भांड फुटलं असतं.

सुलभा- कदाचित प्रथमेश बद्दल कळायचं असेल म्हणून ,त्याच लग्न झालं की,आपण एका जबाबदारीतून मोकळे होऊ ,त्याच लग्न झाल्यावर आपण सगळ्यांना जे सांगितल आहे ,ते करावं लागेल,आहे ना लक्षात ,परत तुला जर कुणी काही म्हटलं तर मला नाही आवडणार .

विश्वास-म्हणजे दुसरे मला बोलले तर,तुला त्रास होतो आणि तू मला बोलते ,ते चालते का तुला 

सुलभा- हो ,तो माझा हक्क आहे आणि तो मी बजावणार,काय म्हणणं आहे तुमचं 

विश्वास-काही म्हणणं नाही , प्रथमेशच्या लग्नानंतर आपण जे करणार आहोत ,ते थोडं जड जाईल आपल्याला असं नाही का वाटत 

सुलभा-आपल्या पेक्षा मला त्याची जास्त काळजी वाटते,तो काय विचार करेल याची ,तो समजून घेईल ना आपल्याला 

विश्वास-हो ,नक्की घेईल,शेवटी तुझे संस्कार आहेत त्याच्यावर ,तन्वीचे आई वडिल तयार व्हायला हवेत.

सुलभा - होतील ,बी पॉजिटिव 

विश्वास अचानक तिच्या गालावर हळूच आपले ओठ टेकवतो- मला तुझा हाच स्वभाव खूप आवडतो.

तसं सुलभा त्याच्याकडे एकटक पाहत राहते.

विश्वास तिला चिमटा काढत म्हणतो-काय झालं 

सुलभा - कसं आहे ना ,मी असं केलं का तुला राग यायचा आणि आज चक्क ,तू तुझ्या नियमांना तिलांजली दिली.

विश्वास - कधी कधी पुढच्या व्यक्तीला चांगलं वाटत असेल ,तर प्रेम व्यक्त करावं ,तुझ्या कडूनच शिकलो ,बोला सुलभादेवी की जय .

सुलभा-अरे हळू,मुलं येतील तर म्हणतील ,काय चाललय ?

विश्वास-काय चाललय्ं ,म्हणजे रोमान्स चाललाय नवरा बायकोत

भक्ती- चालू द्या ,मी नाही काही पाहीलं,मी नंतर येते

सुलभा -अगं नाही,थांब ,काय काम होतं 

भक्ती -अगं ,परवा कुर्ल्याला एक एक्झिबिशन होतं ,त्या फॉर्म वर सही हवी होती,माझा ग्रुप आमच्या कॉलेज कडून भाग घेत आहे .

विश्वास- दे ,मी करतो सही आणि हे हजार रुपये राहू देत जवळ ,कशाला लागले तर 

विश्वास सही करुन पेपर तिला देतो ,तरी भक्ती तिथेच उभी असते .

विश्वास-काही बोलायचं आहे का तुला ? प्रथमेश सारखं काही नाही ना

भक्ती - बाबा ,तसं काही नाही,असेल तेव्हा तुलाच पहिलं सांगेल आणि सध्या तूच माझा बॉयफ्रेंड आहे ,तुझी परमिशन घेतल्या शिवाय दुस-या बॉयफ्रेंडला हो नाही बोलणार.मला असं वाटतं आहे की,तुम्ही दोघेच पिक्चर बघायला गेला होतात ,कारण माझी मैत्रिण मला म्हणाली की ,तिनेही तुम्हाला बघितलं.

सुलभा- हो ,आम्ही गेलो होतो ,पण कुणाला न सांगता ,कारण तुझ्या बाबाला ती चोरुन चोरुनची मजा अनुभवायची होती ,पण तुम्ही आम्हाला पकडलं,पण यातही मजा आली .

भक्ती- आता हे काय नवीन ,तुम्ही आम्हाला सांगितलं असतं,तरी आम्ही तुमच्या बरोबर नसतो आलो.

सुलभा -अगं ,मी ही त्याला हे सांगण्याचा प्रयत्न केला 

विश्वास- तेव्हा तर तू ही एन्जॉय करत होतीस आणि आता का माझ्यावर ढकलतेस आणि खरं सांगू का,तो प्लान आमचा अचानक ठरला होता.

भक्ती- आता तुम्ही दोघं भांडू नका ,नेहमी खूश रहा आणि असेच एन्जॉय करत रहा ,मला खरचं खूप छान वाटतय ,तुमच्यातला बदल पाहून,I love both of you 

दोघेही एकदम बोलतात-we too,तिघेही एकमेकांकडे पाहत हसतात . 

विश्वास- पिक्चरच त्या दोघांना सांगू नको ,प्लीज

भक्ती-नाही सांगणार ,माझ्या कडे आहेत पैसे 

विश्वास -मला माहित आहे ,विनाकारण तू नाही खर्च करत ,पण,बेटा हे वय तुझंही एन्जॉय करायचं आहे ,तू ही करत जा,नाहीतर नंतर वाटत राहतं,हे जगायचं राहून गेलं,ते दोघे बघ कसे एन्जॉय करतात .

भक्ती - गुड नाईट ,असं म्हणून निघून जाते.

सुलभा- शक्ती किती मस्ती खोर ,तिची नाही काळजी वाटत ,पण ही इतकी सरळ मार्गी आहे ना ,की हिची थोडी चिंता वाटते.

विश्वास-अनुभव सगळं शिकवतो माणसाला ,हो की नाही ,असं बोलत, तो तिच्या डोळ्यांत खट्याळ पणे पाहतो .

सुलभा- तू जरा जास्तच रोमँटीक होतं चालला आहेस

विश्वास- नाही आवडत आहे का तुला 

तसं ती त्याच्या मिठीत जात -असं काही नाही ,म्हणत लाजते .

तो तिला आपल्या कुशीत घेतो आणि दोघेही निद्रेच्या आधीन होतात.

दुस-या दिवशी सकाळी विश्वास गाणं गुणगुणत ऑफिसला पोहोचतो ,त्याच कुणाकडे लक्ष नसतं,पण सगळे त्याच्याकडे पाहत असतात ,तो मात्र त्याच्या जाग्यावर येऊन,काम सुरु करतो.

टी ब्रेक मध्ये त्याचा मित्र येतो आणि त्याला म्हणतो -चल कँटिनला चहा पिऊन येऊ ,मला तुझ्या बरोबर काही बोलायचं आहे 

विश्वास -काही सिरीयस आहे का?

मित्र- तू येतोस ना?

विश्वास-चल जाऊ 

दोघे कँटीन मध्ये जाऊन बसतात ,चहा मागवतात.

विश्वास -बोल, काय बोलायचय

मित्र- तू असा कसा वागू शकतो ,तू वहिनींना का धोका देत आहेस ,अरे त्यांनी तुला किती साथ दिली ,हे विसरलास का?

आता विश्वासच्या डोक्यात काल काय बोलणं झालं ,ते आठवल आणि तो जे बोलतोय ते लक्षात आलं,आता ह्याची थोडी मजा घेऊ ,असं त्याने ठरवलं.

मित्र -अरे, मी काय विचारतोय आणि तू खुशाल हसतोस

विश्वास -तू कुणाबद्द्ल बोलतोय 

मित्र -तू काही दिवसात बदलला आहेस आणि काल कुणाचा तरी फोन आला ,तर तू पिक्चरची तिकिटे काढली आणि हाफ डेनी गेला,असं तू आता पर्यंत कधीच वहिनीं बरोबर तू असं कधी बोलताना पाहिलं नाही ,कोण आहे रे ती ,अरे आता मुलं किती मोठी झाली आपली ,हे असं शोभतं का?

विश्वास-तू ना म्हातारा झाला आहेस आणि तिला माहित आहे ,मी काय करतो ते सगळं,तिच्या परमिशनने करत आहे,तिला कोणत्याही प्रकारचा धोका देत नाही. 

मित्र -काय ? तरी वहिनी तुला काही बोलत नाही,पण तरी मला असं वाटतं,तू त्यांच्या मनाचा विचार करायला हवास ,सकाळी माहित आहे ,तू गुणगुणत येत होतास,तर सगळे तुझ्याकडे पाहत होते ,पण तुझं कुणाकडे लक्षच नव्हतं,परत प्रेमात पडल्या सारखं वाटत आहे.

विश्वास -तिच्याच तर मनाचा विचार करून हे ,सगळे बदल स्वत:त केलेत,आणि तू म्हणतोस ना ,ते अगदी बरोबर आहे,मी परत एकदा प्रेमात पडलो आहे नव्याने  आणि आनंद अनुभवत आहे ,तू प्रेमात पड म्हणजे तुला कळेल.

मित्र -मला तर, तू काय बोलतोय तेच कळत नाही,वहिनींनीच तुला परत प्रेमात पडायला परमिशन दिली ,थांब मीच फोन लावून त्यांना विचारतो ,असं कसं करू शकतात त्या.

विश्वास- विचार ,मी नाही घाबरत

मित्र सुलभाला फोन लावतो - वहिनी ,फ्री आहात का ,बोलायचं होतं थोडं 

त्याचा नंबर तिच्या कडे असतो ,ती उचलत -हं,बोला भावजी ,आज कशी काय आठवण काढली 

मित्र - अहो ,विश्वासच्या वागण्यात खूप बदल झाला आहे ,तुम्हाला जाणवला नाही का ?काल तो कुणाबरोबर तरी पिक्चरला गेला होता आणि प्रेमातही पडलाय त्या व्यक्तीच्या ,वर मला सांगतो ,हे सगळं तुम्हाला माहित आहे ,खरं की खोटं ,हे जाणून घेण्यासाठी फोन केला ,दुसरं काही नाही .

सुलभा-हो भाऊजी ,मला माहित आहे सगळं आणि त्यामुळे मी पण त्याच्या प्रेमात पडली आहे 

मित्र- तुम्ही दोघं काय बोलत आहात ,मला काही समजत नाही ,तुम्हाला सगळं माहित असून तुम्ही परमिशन दिली ,हे अजून धक्कादायक,माझ्या बायकोने,तर मला घराबाहेर काढलं असतं

सुलभा-मी ही तेच केलं असतं 

मित्र- किती कोड्यात बोलत आहात दोघेही 

सुलभा- अहो त्यांच्या बरोबर पिक्चरला जाणारी ,ते जिच्या प्रेमात पडले आहे ,ती दुसरी तिसरी कुणी नसून मीच आहे ,बाकी सर्व सविस्तर विश्वास तुम्हाला सांगेल.

असं म्हणत ती फोन ठेवते.

मित्र -आता तरी सांगशील ,काय ते 

विश्वास त्याला सुरुवातीपासून सगळं सांगतो.

मित्र-जाऊ दे ,मीच माझ्या बायकोला पत्र लिहितो.

विश्वास -नक्की 

दोघेही हसतच ऑफिस मध्ये परत जातात.

 

कसा वाटला हा भाग ,मजा आली का ,आवडला असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या .

क्रमशः 

रुपाली थोरात 

Circle Image

रूपाली रोहिदास थोरात

Assistant professor

I love to read and write , from my college time, I am writing poems, whenever thoughts come in mind ,I wrote it in words, but no platform to share with others . when I saw this site, I got a platform to share my thoughts and views with all, Thanks to Era creators to giving me such a wonderful platform as well inspiring new writers, Hope all of you will enjoy our journey of reading and writing and will give comments to encourage me . also suggestions are welcome by me so that I can improve because always we are learners at the end of our life. Rupali Thorat