सेकंड इनिंग भाग-26( अंतिम भाग)
आता तर त्यांना जगण्याचा मार्ग समजला होता, एक-मेकांच्या आवडीचे करणे किंवा राहिलेल्या इच्छा पूर्ण करणे, हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनले होते , त्याबरोबरच भक्ती आणि शक्ती यांचे शिक्षणही चालू होते.प्रथमेश आणि तन्वी यांचा संसार सुखाने चालला होता, त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली होती, एक मुलगा आणि एक मुलगी, सगळे त्यांच्यासाठी खूप आनंदी होते.पण सुलभा आणि विश्वास यांचा आजी आजोबा झाल्यावर, आनंद गगनात मावेनासा झाला होता. ते त्यांच्या परीने मुलांना प्रेम देत होते, या सगळ्यात आश्रमाशी मात्र खूप ऋणानुबंध जोडला गेला होता,कोणताही कार्यक्रम असला, की आश्रमात जाऊन सगळ्यांबरोबर आनंद साजरा करायचा, ही त्यांची रीत झाली होती. नातवंडांनाही आश्रमातल्या सगळ्यांबरोबर खेळण्याची खूप सवय झाली होती ,सुट्टी असली की, सगळे मिळून आश्रमात जात होते. आता तर भक्ती आणि शक्तीचे शिक्षणही पूर्ण झाले होते, दोघीही नोकरी करत होत्या, दोघी जॉबला लागल्यावर, त्यांनी दोघींनी मिळून विश्वास आणि सुलभाला स्विझरलँडला पाठवले होते, प्रथमेश आणि तन्वी त्यांना साथ दिली होती ,त्या दोघांबरोबर तन्वी चे आई बाबा महेश आणि सुवर्णा हे गेले होते. चौघांनी मिळून खूप मजा केली होती .भक्तीच ऑफिसमध्ये, तिचा एक मित्र अभिषेक कामाला होता, अभिषेकने रीतसर लग्नासाठी मागणी घातली होती. सुलभा आणि विश्वास यांनी थोडीफार चौकशी करून , अभिषेकच्या घरचे सगळे व्यवस्थित आहे, म्हणून त्यांच्या लग्नाला परवानगी देऊन ,लग्नही छान करून दिले. भक्ती तिच्या घरामध्ये आनंदात आहे, घरातली सगळी मंडळी छान आहेत. भक्तीच्या लग्नाला एक दोन वर्ष झाल्यानंतर, विश्वास आणि सुलभाने शक्तीला विचारले, तुला जर कोणी आवडत असेल तर सांग ,आम्ही तुझं लग्न लावून देऊ .
शक्ती म्हणाली ,अजून तरी ,असं कुणी नाही.
सुलभा म्हणाली, मला तर असं वाटलं होतं, की तू कुणाला तरी पसंत केलं असशील. भक्ती ,असं कुणाला काही पसंत करेल, असं कधीच वाटलं नव्हतं ,पण सगळं उलट झालं .
विश्वास म्हणाला ,अगं, असं काही नाही ,शक्ती एकदम डॉन सारखी राहते ,तिला विचारायला ,ही मुलं घाबरत असतील.
शक्ती म्हणते, बाबा मी इतकीही वाईट नाहीये, पण कोणत्या मुलाची माझ्या समोर बोलण्याची हिंमत नाही, हेही खरं आहे. सुलभा म्हणते, मग आम्ही स्थळ बघायला सुरुवात करू का आणि तुझ्या संमतीशिवाय आम्ही पुढे जाणार नाही, यानंतर एक वर्ष निघून जाते, नंतर शक्तीचाही लग्न जमतं. तिचं राहुल बरोबर लग्न होतं आणि त्याच्याबरोबर ती अमेरिकेलाही जाते, दोघीही जणी ,आपापल्या आयुष्यात ,आनंदात असतात. सुलभा आणि विश्वास दोघेही रिटायर होतात, रिटायर झाल्यानंतर ,प्रथमेश आणि भक्तीची फॅमिली सगळेच शक्तीकडे ही जाऊन येतात. सगळे मिळून छान एन्जॉय करतात ,आता घरामध्ये फक्त सुलभा आणि विश्वासच असतात, पण दोघांचेही वेळापत्रक ठरलेला आहे ,रोज सकाळी उठून योगा करणे, चालायला जाणे, आता ते नित्यनियमाने आश्रमात सुद्धा जाऊन मदत करतात. अधून मधून भक्ती आणि प्रथमेश त्यांच्याकडे येतात, मग नातवंडांमध्ये त्यांचा कसा वेळ जातो ,हे त्यांनाही कळत नाही .अधून मधून चेंज म्हणून ,काहीतरी वेगळं ही करतात ,रिटायर झाले म्हणून काय झाले, तरी ते सारखे काही ना काही तरी कामात व्यस्त असतात ,त्यामुळे ते म्हणतात, मनाला प्रसन्न वाटते .त्यांनी हास्यक्लब जॉईन केला आहे ,ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेतही ते सभासद झाले, ज्या ज्येष्ठ नागरिकांची तब्येत खूप खालावली आहे, त्यांच्या घरी जाऊन, त्यांची विचारपूस करणे, त्यांच्याबरोबर वेळ घालवणे ,अशी कामे ते आनंदाने करतात आणि सेकंड इनिंग मस्त एन्जॉय करतात. त्यांच्या जगण्याचा एकच मंत्र आहे, आपण या जगात आलो आहे ,तर एक दिवस जाणारच आहोत, पण रोज हसत जगणं खूप महत्त्वाचं आहे आणि आयुष्यातील त्रुटी काढत बसण्यापेक्षा ,आपल्याकडे ज्या गोष्टी चांगल्या आहेत, त्याबद्दल देवाचे आभार मानले पाहिजे .
समाप्त
कशी वाटली तुम्हाला ही कथा , अभिप्राय अवश्य द्या . पुढची कथा पूर्ण लिहून झाल्यानंतर, पोस्ट करेल. अधून मधून छोट्या कथा येत राहतील.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद.
रूपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा