सेकंड इनिंग भाग-25

Beautiful relation between Husband and Wife.

सेकंड इनिंग भाग-25

दुसऱ्या दिवशी, सकाळी सुलभाला जाग येते ,तेव्हा आठ वाजून गेलेले असतात ,उशीर झाला ,म्हणून ती  घाईघाईत उठते ,बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन येते, तोपर्यंत विश्वास तिच्यासाठी चहा घेऊन येतो.

विश्वास- बेड टी, मॅडम.

 सुलभा- अरे वा ,आजचा पहिलं  सरप्राईज वाटतं. 

विश्वास- हो बरोबर ओळखलं, सुलभा त्याच्या हातातून चहा घेते आणि पिते, ती चहा पीत असताना, विश्वास  तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव बघत असतो, सुलभाला  ते जाणवते. ती अचानक विश्वासकडे पाहते, तसा तो थोडासा बावरतो.

 सुलभा- काय झालं, असं काय पाहतोय.

 विश्वास -अगं, काही नाही ,चहा कसा झालाय, हे तुझ्या चेहऱ्याकडे बघून समजते की नाही, ते पाहत होतो.

 सुलभा- मग काय समजलं तुला, माझ्याकडे बघून.

 विश्वास- समजत नाहीये गं ,चहा कसा झालाय, म्हणून तर एवढ्या बारकाईने बघत होतो.

 सुलभा हसत म्हणते- छान झाला आहे आणि माझे एवढे लाड केल्याबद्दल ,खरंच धन्यवाद.

विश्वास -अगं धन्यवाद कसले ,एवढी वर्षे झाले तूच आमचा सगळ्यांचा करते बरं ,तुमच्या सुनेचा हुकुम आहे, की तुम्ही लवकर तयार होऊन, नाश्ता करायला डायनिंग टेबल वर या आणि तुला सांगितले आहे की जीन्स आणि टॉप घालून या.

 सुलभा- बरं बरं ,मी येते दहा ते पंधरा मिनिटात तयार होऊन, असं म्हणत सुलभा तयार व्हायला जाते. ती आवरून नाश्त्यासाठी जाते, तेव्हा ती बघते ,तर जवळजवळ पाच ते सहा पदार्थ नाश्त्यासाठी केलेले असतात, सगळे तिच्या आवडीचे असतात.

 शक्ती- मॅडम ,तुम्ही काय नाश्ता करू इच्छिता, वी आर एट युवर सर्विस .

सुलभा- हे माझं दुसरं सरप्राईज वाटतं, सगळं माझ्या आवडीचं आहे, थँक्यू तन्वी आणि भक्ती.

 शक्ती -मी तुला विचारते आणि तू त्यांना का थँक्यू म्हणते.

 सुलभा -मला माहित आहे, हे सगळं त्या दोघींनी मिळून केला आहे, तू फक्त अरेंज केलं असशील.

 शक्ती -तुला सगळं कसं कळतं ग.

 सुलभा -आई आहे मी तुमची, एवढं तर ओळखते.

विश्वास -अरे ,चला लवकर नाश्ता करून घ्या, मला तर भूक लागली आहे.

 प्रथमेश -आज पहिला मान आईचा.

 सुलभा- नाही रे ,आपण सगळे एकत्र बसू, ज्याला जे हवे ते तो आपल्या हाताने घेईल.

 भक्ती -हो ,आई बरोबर बोलते .

सगळे मिळून नाश्ता करतात, नाश्ता झाल्यावर, तन्वी सुलभाला म्हणते, आई ,मला फक्त पंधरा मिनिट द्या, मी लगेच रेडी होऊन येते.

 सुलभा- अगं, आता तरी सांगशील की, आपल्याला कुठे जायचे आहे.

 तन्वी -तुमच्यासाठी ,तेही एक सरप्राईज आहे.

 सुलभा- बरं बाई, ये पटकन जाऊन .

तन्वी जाऊन, रेडी होऊन येते, तिनेही जीन्स आणि टॉप घातलेला असतो.

 सुलभा -भक्ती आणि शक्ती ,तुम्हाला यायचं असेल तर चला .

भक्ती- अगं ,मी आले असते  पण कॉलेजमध्ये थोडं काम आहे .

शक्ती- मलाही थोडं काम आहे ,तुम्ही एन्जॉय करा.

 सुलभा -बरं बरं.

 प्रथमेश आणि विश्वास त्या दोघींना म्हणतात, एन्जॉय करा तुम्ही दोघी.

 तन्वी -हो ,आम्ही त्याच्यासाठी चाललो आहोत ,त्या दोघी घराबाहेर पडतात, तन्वी कॅब बुक करते, ती कॅब एका मॉल समोर येऊन उभी राहते .

सुलभा -अगं, तू मला इथे का आणलेस.

 तन्वी -मला माहीत आहे ,तुम्हाला विंडो शॉपिंग करायला आवडते, पण हे लोक कधी करू देत नाही ,आज मनसोक्त करा आणि जर काही आवडले ,तर घ्या ,पण त्याआधी अजून एक महत्त्वाचे काम आहे .

सुलभा -काय आहे.

 तन्वी- तुम्ही चला तर खरे ,तुम्हाला कळेलच.

तन्वी तिला एका पार्लर मध्ये घेऊन जाते, तिथे तिचं फेशियल, पेडिक्युअर, मॅनिक्युअर आणि थोडीशी  केसांची हेअर स्टाईल चेंज केली जाते ,तिचा पुर्ण मेकओव्हर होऊन जातो, सगळं झाल्यावर ,ती सुलभाला आरशात बघायला सांगते.

 सुलभा- अगं, विश्वास काय म्हणेल ,हे काय केलेस.

 तन्वी- काही म्हणणार नाहीत ,मी आहे ना.

 सुलभा- पण, हे जरा जास्त झाला असं नाही वाटतं, मी आत्तापर्यंत कधीच असं केलं नव्हतं, नाही तर लोकं म्हणतील ,हिला म्हातारचळ लागला.

 तन्वी -लोकं काय दोन्ही कडूनही बोलतात, मी तुम्हाला काय म्हटलं, जे आत्तापर्यंत तुम्ही केलं नाही,  ते करा, मग आता तेच तर केलंय, नका लोकांची पर्वा करू, आम्हाला असं केल्याने, काहीच फरक पडत नाही .आता दोघींनाही भूक लागली होती, त्या फूड कोर्ट मधे जातात .

तन्वी- आई ,तुम्हाला काय खायचं.

 सुलभा -तुला हवं ते मागव ,मला काहीही चालतं.

तन्वी -नाही, आज तुमचा दिवस आहे ,तुम्हाला जे हवं ते ऑर्डर करा .

सुलभा -ठीक आहे ,मला फ्रांकी खावीशी वाटते,विश्वासला कधी म्हटलं ,तर तो म्हणतो ,ते काय खायचं, म्हणून कधी आत्तापर्यंत खाल्लं नाही ,एकदा-दोनदा मैत्रिणींबरोबर खाल्लं ,तर आवडलं मला ते.

तन्वी -मग मी काम करते, दोघींसाठी ही तेच घेऊन येते, दोघी मिळून फ्रांकी खातात, त्यानंतर नॅचरल ची आईस्क्रीम घेतात, ती खातात ,मग विंडो शॉपिंग साठी दुकानांमध्ये फिरतात. एका ठिकाणी सुलभाला शरारा ड्रेस दिसतो, ती राहून राहून त्याच्याकडे पहात असते, ही गोष्ट ,तन्वीच्या लक्षात येते.

 तन्वी -आई, तुम्हाला तो ड्रेस आवडला का? आपण घेऊ या तुमच्यासाठी .

सुलभा- छान आहे गं, पण तो वयोमानानुसार शोभणार नाही, असं एकदा विश्वास म्हणाला होता.

 तन्वी- तुमच्या लक्षात आहे ना, आज आपलं काय ठरलंय ,कोणाचाही विचार करू नका, तुम्हाला आवडला असेल, तर घेऊ, तुम्ही ट्राय करा.

 सुलभा तो ड्रेस ट्राय करते ,बाहेर तन्वीला येऊन दाखवते.

 तन्वी- आई ,छान दिसतोय, मला तर काहीच प्रॉब्लेम वाटत नाही, तुम्ही स्वतःहूनच तुम्हाला, जास्त वय झाले असं म्हणून घेतलं आहे .तन्वी तो ड्रेस पॅक करायला सांगते,  नंतर जाऊन, त्या ज्वेलरीच्या शॉपमध्ये, त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी घेतात ,यातच पाच कधी वाजतात, ते कळतच नाही. तिथल्या एका चेंजिंग रूममध्ये ,तन्वी सुलभाला पाठवते, घेतलेला ड्रेस घालायला सांगते, त्यावरची ज्वेलरी घालायला सांगते, ती चेंज करायला गेल्यावर ,इकडे तिला प्रथमेशचा फोन येतो, किती वेळात पोहोचणार .तन्वी सांगते ,ठरलेल्या वेळेनुसार, साडेसहा पर्यंत घेऊन येते.सुलभा चेंज करून आल्यावर , ती तिला परत पार्लर मध्ये घेऊन जाते . सुलभा -आता परत कशाला पार्लरमध्ये.

 तन्वी -आता जास्त काही नाही करायचा आहे ,फक्त हेअर स्टाईल.

 सुलभा -अगं, पण एवढे कशासाठी .

तन्वी -तुमचा वाढदिवस आहे ना, म्हणून.

 हेअर स्टाईल करून, त्या तिथून बाहेर पडतात, तन्वी कॅब  बुक करते आणि आश्रम शाळेचा ऍड्रेस सांगते.

सुलभा ते ऐकून विचारते ,आपण आश्रमात चाललो का?

तन्वी- हो, खूप दिवस झाले मुलांना भेटून ,चालेल ना तुम्हाला?

 सुलभा -हो ,मला आवडेल.

 ते जेव्हा आश्रमाच्या दारात पोहोचतात, सगळीकडची लाईट गेलेली असते .

सुलभा -शक्यतो, असं कधी होत नाही, का बरं लाईट गेली आहे.

 तन्वी- चला ना ,आपण आत जाऊन पाहू या ,असं म्हणत ती सुलभाला घेऊन आत जाते ,जसे त्या दोघी आत जातात,सगळे लाईट लागतात. सुलभा समोरचा डेकोरेशन पाहतच राहते, सगळेजण जोरात, हॅपी बर्थडे टू यू सुलभा, बोलतात. ती सगळ्यांकडे नजर फिरवते , तन्वीच्या घरचे ,तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणी आणि काही शाळेतल्या मैत्रिणी तिला दिसतात. एकेक जण  पुढे येऊन तिला विश करतात. 

विश्वास -कसं वाटलं मग,आमचं सरप्राईज.

 सुलभा- खूप छान ,तुम्ही सगळ्या आवर्जून वाढदिवसाला आल्या ,मला खूप बरं वाटलं .

त्यातल्या एकीने सांगितलं, भाऊजींनी खूप मनापासून आमंत्रण दिलं बघ, नाही कसं म्हणणार, खूप प्रेम आहे ग त्यांचे तुझ्यावर ,खूप छान वाटलं, आम्हाला इथे येऊन, तसं सुलभा विश्वासकडे पाहते .विश्वासला तिच्या डोळ्यांमध्ये, त्याच्यासाठी खूप प्रेम आणि हे सगळं केल्याबद्दल आनंद दिसत होता. इतक्यात तन्वी तेथे आली, तिने तिच्या हेअर स्टाईल वर क्राऊन घातला.सगळे जाऊन आपापल्या जागेवर बसले. सुलभाला पण चेअर वर बसवण्यात आले, तितक्यात सॉंग सुरू झाले. 

 उंगली पकड के तूने

 चलना सिखाया था ना मा

 यावर भक्ती, शक्ती आणि आश्रमातल्या मुलांनी डान्स केला. तो डान्स झाल्यावर, प्रथमेशच्या लग्नातला पोस्टर मागे लावण्यात आला, जसे ते फोटोमध्ये उभे होते, तसेच त्या फोटो समोर जाऊन उभे राहिले आणि मग प्रथमेशने बोलायला सुरुवात केली,

 ये तो सच है कि भगवान है

 है मगर फिर भी अंजान है 

धरती पे रूप मा बाप का

 उस विधाता की पहचान है 

हे सगळं पाहून, सुलभा च्या डोळ्यात पाणी आले.

इतक्यात शक्ती पुढे आली आणि म्हणाली, अभी तो सरप्राईज बाकी है, तिच्या सगळ्या मैत्रिणी पुढे आल्या आणि त्यांनी, 

यारी है इमान मेरा, यार मेरी जिंदगी

 या गाण्याचे कडवे म्हंटले, सुलभाला मध्ये घेत सगळ्याजणी तिच्याभोवती फेर धरुन नाचल्या, त्यात सुवर्णाही होती.

 शक्तिने आता अनाउन्समेंट केली, की आजचा सगळ्यात शेवटचा परफॉर्मन्स ,बाय युवर लाईफ पार्टनर आणि माझे डॅड विश्वास यांचा,  तर सगळ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करा.

 विश्वास पुढे येतो, सुलभाच्या पुढे जाऊन ,त्याचा हात पुढे करतो ,तीही उठते,त्याला साथ देते. इतक्यात सॉंग सुरू होतं आणि दोघे डान्स करायला लागतात.

यह दुआ है मेरी रब से

तुझे आशिक़ो में सब से

मेरी आशिक़ी पसंद आये

मेरी आशिक़ी पसंद आये

यह दुआ है मेरी रब से

तुझे आशिक़ो में सब से

मेरी आशिक़ी पसंद आये

मेरी आशिक़ी पसंद आये

यह दुआ है मेरी रब से

तुझे दोस्तों में सब से

मेरी दोस्ती पसंद आये

मेरी दोस्ती पसंद आये

यह दुआ है मेरी रब से

तुझे दोस्तों में सब से

मेरी दोस्ती पसंद आये

मेरी दोस्ती पसंद आये

तू हुस्न के रंगों से

लिखी हुई ग़ज़ल हैं

तू हुस्न के रंगों से

लिखी हुई ग़ज़ल हैं

तू प्यार के दरिया में

खिलता हुआ कमल हैं

यह दुआ है मेरी रब से

तुझे शायरो में सब से

मेरी शायरी पसंद आये

मेरी शायरी पसंद आये

यह दुआ है मेरी रब से

मेरे दिल के आईने में

तस्वीर हैं तुम्हारी

मेरे दिल के आईने में

तस्वीर हैं तुम्हारी

अब तुम तो बन गए

हो ज़िंगगी हमारी

यह दुआ है मेरी रब से

तुम्हे सादगी में सब से

मेरी सादगी पसंद आये

मेरी सादगी पसंद आये

यह दुआ है मेरी रब से

तुझे नज़र मिलके

मदहोश ज़िन्दगी हैं

तुझे नज़र मिलके

मदहोश ज़िन्दगी हैं

दिन रात मेरे दिल में

बस तेरी बेखुदी हैं

यह दुआ है मेरी रब से

तुझे दीवानगी में सब से

मेरी दीवानगी पसंद आये

मेरी दीवानगी पसंद आये

यह दुआ है मेरी रब से

तुझे आशिक़ो में सब से

मेरी आशिक़ी पसंद आये

मेरी आशिक़ी पसंद आये

मेरी शायरी पसंद आये

मेरी दोस्ती पसंद आये.

गाण्यावर डान्स करता करता, विश्वास सुलभाला आपल्याजवळ ओढतो आणि दोघेही एकमेकांच्या कमरेवर हात ठेवून डान्स करत असतात ,तेव्हा तो कानात म्हणतो ,आज तो गजहब ढा दिया. तशी ती लाजते, दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून, डान्स करत असतात सुलभाचा आजचा लुक, खरंच तिचा मेकओव्हर असतो. तिने शरारा घातला होता, त्यावर मॅचिंग ज्वेलरी, हेअर स्टाईल, त्यावर क्राऊन, तिच्याकडे बघून बिलकुल असं वाटत नव्हतं, तिचा पन्नासावा वाढदिवस आहे .गाणं संपल्यावर ,ते दोघेही सगळ्यांना वाकून नमस्कार करतात. केक कट करण्यासाठी, आश्रमातील काही मुले केक घेऊन येतात, सगळे टेबल जवळ जाऊन उभे राहतात.

सुलभा केक कट करते,

तसं सगळी मुलं, हॅपी बर्थडे टू यू, हे गाणं म्हणायला सुरुवात करतात आणि असंच गंमत म्हणून शेवटी म्हणतात ,हाथी पादला पू पु, तसे सगळे पोट धरून हसायला लागतात .

विश्वास सुलभाला केक भरवतो, सुलभा, तन्वी, भक्ती, शक्ती, प्रथमेश आणि विश्वासला केक भरवते. तिच्या दोन मैत्रिणी ,पुढे येऊन तिच्या गालाला केक लावतात.

आता सुलभा म्हणते, मला काहीतरी बोलायचं आहे. आज तुम्ही, सर्वजण वेळात वेळ काढून, इथे माझ्या वाढदिवसानिमित्त आलात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे.आश्रमातील मुले आणि माझी मुले, यांनी खूप मेहनत घेऊन, माझा आजचा वाढदिवस स्पेशल बनवला .माझी सून तन्वी, सॉरी मुलगी हिने, आज माझा दिवस, मी आत्तापर्यंत कधीही जगले नव्हते असा बनवला आणि सगळ्यात शेवटी मी  विश्वासचे ही खूप आभार मानते, की त्याने इतक्या दिवसाची सगळी कसर पूर्ण केली आणि आज जो मला आनंद दिला, तो अवर्णनीय आहे.मला आज सकाळपासून सरप्राईज खूप मिळाले, असेच मला तुम्हा सर्वांची साथ आयुष्यभर लाभो आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद नेहमीच मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना .

यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रथमेशने सगळ्यांना विनंती केली, की सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा .आजही बुफे सिस्टिम डिनर ठेवण्यात आले होते, आश्रमातील आजी आजोबांसाठी ,जागेवर वाढण्याची व्यवस्था केली होती. आता सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली, सुलभा आणि विश्वास, प्रत्येकाची जाऊन चौकशी करत होते. तिच्या सगळ्या मैत्रिणी, तर तिच्या फॅमिली चे खूपच कौतुक करत होते, हे ऐकून सुलभाला  खूप छान वाटत होते. सगळे आता निरोप घेऊन जात होते, सगळ्यात शेवटी, एका टेबलवर सगळ्या फॅमिलीसाठी जेवण अरेंज करण्यात आले, त्यात तन्वीची फॅमिली, सोनावणे यांची फॅमिली आणि विश्वासची फॅमिली असा सगळ्यांनी मिळून जेवणाचा आस्वाद घेतला .जेवल्यानंतर सोनावणे यांनी विश्वास आणि प्रथमेश यांचे खूप आभार मानले. सुलभाला काही कळले नाही ,की ते कशाबद्दल आभार मानत आहे, विश्वासने डोळ्याने खुणावलं, की तो नंतर सांगेल .

गाडीत बसल्यावर ,सुलभा म्हणाली, आता तरी सांगशील.

 विश्वास- तुझ्या हे लक्षात आलं नाही का, की तुझ्या एकाही मैत्रिणीने तुला गिफ्ट दिलं नाही, आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं ,की कोणत्याही प्रकारचा गिफ्ट स्विकारला जाणार नाही ,सगळे जमल्यावर ,तू येण्याआधी सोनावणे यांनी आश्रमाची माहिती सांगितली ,त्यानंतर तेथे जमलेल्या सर्वांनी, तुझ्या वाढदिवसानिमित्त ,आपापल्या परीने त्यांना मदत केली, त्याबद्दल ते बोलत होते.

 सुलभा -खरंच हे खूप बरं केलं ,कारण माझ्याकडे सगळं आहे ,तुम्ही सगळे आहात, मला अजून दुसरं काहीही नको, असं म्हणत ,तिने विश्वासच्या खांद्यावर डोकं ठेवलं .

पुढे बसलेले तन्वी आणि प्रथमेश ,एकमेकांकडे बघून ,गालातल्या गालात हसले. शक्ती आणि भक्ती  मागच्या सीटवर बसल्या होत्या.

 शक्ती- मग काय लव बर्ड्स, हॅपी ना.

 सुलभा -खरंच, आजचा माझा वाढदिवस, तुम्ही सगळ्यांनी संस्मरणीय बनवला. 

प्रथमेश -त्याची तू हकदार आहेस.

 विश्वास -याची जाणीव मात्र, तन्वीने करून दिली ,आम्ही खरंच खूप लकी आहोत, की सुनेच्या रूपाने, आम्हाला तुझ्यासारखी तिसरी मुलगी मिळाली.

 शक्ती- खूपच कौतुक चालले सुनेचा, असं नाही वाटत.

सुलभा- कौतुक करण्यासारखे आहे, तर नाही करणार का आणि तुमचेही तर केलंच.

 तन्वी- आई ,ती अशीच म्हणत आहे, मुद्दामून तुम्हाला चिडवण्यासाठी,सगळ्यांना माहित आहे ना, तिचा स्वभाव कसा आहे,असाच हसत-खेळत गप्पा मारत, घर कधी येते, ते कळत नाही. घरी आल्यावर ,सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला निघून जातात .आज रात्री विश्वासच्या कुशीत झोपताना, सुलभाच्या मनात मात्र, खूप छान आठवणींचा ठेवा असतो.

 हा भाग कसा वाटला ,ते अभिप्राय द्वारे अवश्य कळवा.

क्रमशः 

रूपाली थोरात.

🎭 Series Post

View all