Login

सेकंड इनिंग भाग-24

Beautiful relation between husband and wife

सेकंड इनिंग भाग-24

प्रथमेश आणि तन्वीच्या घराचे रिनोवेशन होतं, ते दोघे तिकडे शिफ्ट होतात. दोघेही अधून मधून एकमेकांकडे जात येत असतात ,आता प्रत्येक जण ,ऑफिसच्या कामामध्ये बिझी झालेला असतो. भक्ती आणि शक्तीचे कॉलेज सुरळीत चालू असते ,दहा पंधरा दिवसांनी सुलभाचा वाढदिवस असतो, विश्वास सगळ्यांना विचारतो, की सुलभाच्या वाढदिवसाला तिला काय सरप्राईज देऊया. मुले एकमेकांकडे बघत राहतात.

 शक्ती- बाबा, एकदा आई तिच्या मैत्रिणीचा बर्थडेला गेलेली, तेव्हा त्या पार्टीचं खूपच कौतुक करत होती , तिच्या मैत्रिणीच्या मिस्टरांनी ,सगळ्या मैत्रिणींना बोलवलं होतं आणि तिला सरप्राईज दिलं होतं, आपणही असंच काहीतरी करूया, तुमच्याकडे तिच्या मैत्रिणींचे नंबर असतील ना.

 विश्वास- माझ्याकडे सगळ्यांचे नंबर नाही आहे, एक-दोन जणींची आहे किंवा एक काम करतो, सुलभा झोपल्यानंतर, तिच्या मैत्रिणींचा व्हाट्सअप ग्रुप वरून सगळ्यांचे नंबर लिहून घेतो.

 तन्वी -खूप छान आयडिया आहे बाबा आणि मला काय वाटतं, आपण आपल्या आश्रमात जाऊन सेलिब्रेट करूया ,त्यानिमित्ताने मुलांनाही भेटणं होईल आणि त्यांनाही एक वेगळा आनंद मिळेल .

प्रथमेश -हो, हवं तर मी फोन करून सोनावणे यांना याची कल्पना देतो.

 भक्ती -एक काम करूया, आईला आपण एक छानसा गाउन घेऊया, त्यावर डायमंड ज्वेलरी आणि क्राऊन पण घेऊया, यावर्षी बाबाने स्वतःहूनच इंट्रेस घेतला आहे, तर तिचा हा वाढदिवस कायमस्वरूपी लक्षात राहायला हवा. विश्वास- याआधी मी फक्त केक घरी घेऊन यायचो, आम्ही सगळे कट करायचो, की झाला तिचा वाढदिवस, मी जर तिला कधी म्हटलं ,की बाहेर जाऊया,  मला म्हणायची, कशाला विनाकारण एवढा खर्च, मी काय लहान आहे का आणि मुलांचे वाढदिवस आपण करतोच ना .नेहमी तुमच्या आनंदात तिने आनंद मानला, यावर्षी तर तिचा पन्नासावा वाढदिवस आहे. 

भक्ती-शक्ती आपसात ठरवतात आणि आश्रमात जाऊन येतात, आईला सरप्राईज देण्यासाठी, त्यांनी तेथील मुलांची हेल्प घेतली, प्रत्येक जण आपापल्या परीने तयारी करत असतो .प्रथमेश आणि तन्वीला एक कल्पना येते ,त्यातून त्यांच्या लग्नातला एक फोटो ते डेव्हलप करून घेतात. सगळेजण सुलभाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या तयारीला लागतात, तिला याची थोडी सुद्धा कल्पना नसते, सगळे मिळून तिला सरप्राईज देणार असतात. पण विश्वास विचार करत असतो, की मी काय सरप्राईज देऊ ,मग त्याला आठवतं ,त्याच्या वाढदिवसाला ,एकदा तिने छान कॅन्डल लावल्या होत्या, केक आणला होता आणि रात्री बारा वाजता त्याला उठवत होती, पण मला झोप इतकी येत होती, कि मी उठलो नव्हतो. सकाळी उठल्यावर ,ते सगळे डेकोरेशन बघून मी विचारलं ,तेव्हा ती नाराजीनेच म्हणाली ,तुला नाही आवडत तर राहूदे ,इथून पुढे नाही करणार आणि खरच त्यानंतर, तिने माझ्या वाढदिवसाला असं काही केलं नाही ,पण तिने केलं म्हणजे, तिला हे सगळं आवडणार ,त्यादिशेने तो तयारी करायला सुरुवात करतो आणि एकदाचा तो दिवस उगवतो. आत्तापर्यंत सुलभाचा वाढदिवस कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला नव्हता ,त्यामुळे तिला कुणाकडूनच काही अपेक्षा नव्हती.नेहमीप्रमाणे ती झोपायला रूममध्ये चालली होती, तर भक्ती आणि शक्ती तिला म्हणाल्या, आज आमच्या रूममध्ये झोप ना ,तू कधीच आमच्याबरोबर झोपत नाही.

 सुलभा म्हणाली, आज कसं काय एवढ्या लहान झाल्या आहात ,ठीक आहे ,चला येते मी तुमच्या बरोबर झोपायला. इकडे विश्वास खूश  होतो ,त्याला सरप्राईज देण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी वेळ मिळतो, रात्री साडे अकरा वाजता भक्ती शक्ती सुलभाला उठवतात , तिला विश करतात, तिच्या हातात एक गिफ्ट देतात , ज्यामध्ये एक छान गाऊन असतो, तिला तो घालायला लावतात, तिची छान अशी एक हेअर स्टाईल करतात, लाइट मेकअप करतात ,मग तिचे डोळे बांधतात , तिला त्यांच्या रूममध्ये नेऊन सोडतात आणि जाता जाता विश्वासला बेस्ट ऑफ लक देतात. विश्वास मागून जाऊन सुलभाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिच्या डोळ्यावरची पट्टी सोडतो ,ती डोळे उघडते ,डेकोरेशन पाहतच राहते ,पहिल्यांदा असं काहीतरी सरप्राईज ,ते पण तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ,विश्वासने तिला दिलेलं असतं. विश्वास तिला विचारतो ,आवडलं का तुला , डेकोरेशनची थोडी माझी कल्पना आणि थोडी यूट्यूब ची कल्पना.

ती म्हणते, खूप छान केले ,ती बघायला सुरुवात करते,खाली सगळ्या जमिनीवर हार्टशेप बलून पडलेले असतात, भिंतीवर हॅपी बर्थडे सुलभा लिहिलेलं असतं,बाजूने सगळे त्यांचे लग्नापासून तर आता पर्यंतचे वेगवेगळे फोटो लावलेले असतात, ती त्या फोटोमध्ये दोन मिनिटं हरवून जाते , सगळ्या रूम मध्ये  डेकोरेटिव्ह कॅण्डल लावलेले असतात, त्यामुळे पूर्ण रूमला एक वेगळाच लुक आलेला असतो,  त्यात तो संथ म्युझिक चालू करतो , तिच्याकडे जात, हात पुढे करतो, दोघे मिळून म्युझिकवर बराच वेळ डान्स करतात आणि एकमेकांच्या डोळ्यात हरवतात. डान्स करता करता,सुलभा त्याच्या छातीवर डोकं ठेवते .

विश्वास विचारतो, आवडलं का तुला सरप्राईज.

 सुलभा म्हणते, हो हे तर माझं स्वप्न होतं ,जे तू सत्यात उतरवलं, त्याबद्दल तुझे खरंच धन्यवाद.

 तितक्यात भक्ती आणि शक्ती केक घेऊन येतात आणि बोलतात ,इट्स केक कटिंग टाईम.

 शक्ती म्हणते, झाला का तुम्हा दोघांचा रोमान्स करून, मग आपण फोटोसेशन करूया पहिले ,मी तुम्हा दोघांचे फोटो काढते आणि नंतर आपण सगळ्यांचे काढू.

 सुलभा म्हणते, आज प्रथमेश आणि तन्वी ही इथे हवे होते, ती असं बोलत असते ,की बेल वाजते.

 भक्ती म्हणते, घे आला तुझा पोरगा आणि सून.

शक्ती दार उघडून, परत आत येते,तिच्या पाठोपाठ प्रथमेश आणि तन्वी दोघे येतात, त्यांना पाहून सुलभा म्हणते ,म्हणजे तुम्हा सगळ्यांचा आधीपासून प्लान ठरला होता. भक्ती म्हणते ,अगदी बरोबर ओळखला, मग सगळेजण मिळून केक कट करतात ,हसत खेळत थोड्या गप्पा मारतात.

 तन्वी - आई, उद्या तुम्ही माझ्याबरोबर येणार आहात , म्हणून तुम्ही सुट्टी घ्या.

 सुलभा -अगं ,मी माझ्या वाढदिवसासाठी कधी अशी सुट्टी घेतली नाही .

तन्वी -म्हणून तर म्हणते, की तुम्ही उद्या सुट्टी घ्या ,तुम्ही आतापर्यंत जे जे केलं नाही ,ते करणार आहात, तुम्हाला खूप सरप्राईज मिळणार आहे, तर तुम्ही तयार रहा.

सुलभा- बर बाई, तू म्हणशील तसं ,नव्या जमान्याप्रमाणे थोडंसं बदलायला हवं.

 तन्वी -हे कसं अगदी बरोबर बोललात.

 विश्वास- आता खूप उशीर झाला आहे, चला जा सगळ्यांनी ,आपापल्या रूममध्ये झोपायला.

 प्रथमेश- बाबा, तुला जरा जास्तच घाई झाली आहे , काही प्लान आहे का अजून ,जो आम्हाला माहीत नाही. विश्वास- हे बर आहे ,ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं ,मी तुम्हाला उद्या आपापल्या कामाला जाण्यासाठी उशीर होऊ नये, म्हणून सांगत आहे ,तर तुम्ही मात्र मला चिडवतात.

 शक्ती -बाबा, तुझ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या, परत एकदा सगळे सुलभाला विश करतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात.

 सुलभा- अजून काय काय सरप्राईज मिळणार आहे

विश्वास मला.

 विश्वास- कळेलच तुला उद्या, मी का सांगू.

 सुलभा- म्हणजे, तू पण या सगळ्यांमध्ये सामील आहेस.

 विश्वास- तुला जे समजायचे ते समज, तसं सुलभा त्याच्याजवळ जाते आणि लाडाने बोलते ,सांग ना, काय   सरप्राईज आहे.

 विश्वास- मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाही .

सुलभा -तू आधीच  माझ्या जाळ्यात आहेस आणि मला बोलतो अडकणार नाही, बघायचं तुला, असं म्हणत ती त्याच्याजवळ जायला लागते, तर तो मागे मागे  जात भिंतीला लागून उभा राहतो .

सुलभा त्याच्याजवळ जायला लागते, तसा तो ओरडतो,  बचाओ ,बचाओ. सुलभा त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणते, अरे काय चाललंय तुझं, मुलं उठतील ना .

विश्वास -मला नव्हतं माहिती, तू इतकी घाबरतेस.

 तशी सुलभा त्याला मिठी मारते आणि ते एकमेकांच्या मिठीत विरघळून जातात.

 दुसऱ्या दिवशी ,सुलभाला काय काय सरप्राईज मिळणार आहे ,हे जाणून घेण्यासाठी ,वाचत रहा हसत रहा आणि आनंदात रहा .

काही व्यक्तिगत कामांमुळे, भाग टाकायला थोडा उशीर झाला ,पुढचे भाग दोन दोन दिवसांनी येतील.

 हा भाग जर आवडला असेल ,तर अभिप्राय अवश्य द्या.

 क्रमशः

 रूपाली थोरात

🎭 Series Post

View all