Login

सेकंड इनिंग भाग-23

Beautiful relation between husband and wife.

सेकंड इनिंग भाग-23

सुलभा आणि विश्वास घरी पोहोचतात ,घरी पोहोचल्यावर, भक्ती आणि शक्ती त्यांचं सामान घ्यायला बाहेर येतात, आत गेल्यावर ,

शक्ती -काय मग बाबा ,कसा झाला तुमचा हनिमून.

सुलभा -निर्लज्ज कुठली, तुला विचारायला काही नाही वाटत का ग.

 शक्ती -आता लग्न झालय तुमचं, तर त्यात विचारायला काय वाटायचं.

 विश्वास- तू काय एवढं चिडतेस .

शक्ती- हो ना, मला पण कळत नाही ,त्यात चिडण्यासारखं काय आहे,मला असं विचारायचं होतं, की तुम्ही एन्जॉय केलं ना.

 विश्वास- हो, रिसॉर्ट पण खूप छान होता ,आम्ही खरच खूप एन्जॉय केला आणि याचं सगळं क्रेडिट तुम्हा चौघांना जातो.

 सुलभा- खरच ,आम्ही खूप एन्जॉय केलं, जे आत्तापर्यंत कधी करण्याचा विचार केला नव्हता ,ते सगळं केलं , तुझ्याच भाषेत सांगायचं ,तर असं म्हणू शकतो, चिल आऊट केलं.

 शक्ती -अगं ,मला तुमच्याकडून हेच अपेक्षित होतं आणि आई, आता आम्ही पण मोठे झालो आहोत,या आधी तुम्ही आम्हाला सोडून कधी फिरायला गेला नाही, म्हणून आम्ही ठरवलं, की तुम्हाला दोघांनाही तुमचा वेळ मिळाला पाहिजे .

सुलभा -तुम्ही सगळे कधी इतके मोठे झालात, हे तर मला कळतच नाही ,पण खरच थँक्यू, की तुम्ही आम्हाला हा अनुभव दिला .

भक्ती- अग आई  , थँक्यू कशाला म्हणतेस, असं बोलून, तू आम्हाला परकं करू नको.

 सुलभा- बरं बाई ,तुम्ही म्हणाल तसं ,फ्रेंडशिप में, नो सॉरी ,नो थँक्स.

 शक्ती -आता , कशी माझी आई बोलली ,लव यू डियर, आता सांग बरं ,आमच्यासाठी काय आणलं.

 विश्वास- हो ,आणलंय ना, तुला लोणावळ्याची चिक्की आवडते ना , तुझ्या आवडीचे जेली चॉकलेट पण आणलेत.

शक्ती- बघं ना गं आई, कसे चिडवतात मला, आता काय मी लहान आहे का?

 विश्वास- मुलं कितीही मोठी झाली ,तरी आईवडिलांसाठी लहानच असतात, चल हे घे ,असं बोलत चिक्की आणि चॉकलेटचा पुडा समोर  धरतात .शक्ती तो पुडा घेते.

भक्ती- सुवर्णा काकीला फोन करून कळवते की , तुम्ही दोघे आला आहात. फोन झाल्यावर भक्ती सांगते, काकी येत आहे .

सुलभा -तुम्ही दोघींनी तिला त्रास नाही दिला ना.

 शक्ती -अगं नाही दिला ,शिवाय आम्ही त्यांना म्हणत होतो ,आम्ही राहू ,तुम्ही नाही आलात तरी चालेल ,पण त्यांनी आमचे काही ऐकले नाही.

 सुलभा- पण ती आल्यामुळे ,मला खरंच तुमची काळजी नव्हती.

 सुवर्णा थोड्यावेळाने येते.

 सुवर्णा -कशी झाली मग, राजा राणीची ट्रीप .

सुलभा- काय गं तू ,पण सुरु झालीस का? छान झाली, छान होता रिसॉर्ट, आपण सगळे एकदा जाऊ .

सुवर्णा- तुम्ही जोडीने जायचे आणि आपण का सगळे एकत्र जायचे?

 सुलभा- बरं बाई ,तुम्ही जोडीने जा ,आम्ही सर्वेश कडे लक्ष देऊ. तितक्यात प्रथमेश आणि तन्वीचा व्हिडिओ कॉल येतो.

 तन्वी -कशी झाली आई बाबा तुमची ट्रीप.

 विश्वास -खूप छान झाली ,खूप मजा केली.

 तन्वी- बरं आई आणि बाबा, तुमच्यासाठी काय आणू

 इकडून .

सुलभा- आमच्यासाठी काही नाही आणलं तरी चालेल, पण काकी आणि त्यांच्या मुलांसाठी काहीतरी आण,सुवर्णालाही विचार ना ,तिला काय हवंय.

 तन्वी- बरं बरं ,तुमच्या दोघांसाठीही मला जे आवडेल ते  आणेल, भक्ती आणि शक्तीची लिस्ट आमच्याकडे आधीच आहे .

सुलभा- अगं ,जास्त काय आणत  नको बसू,फक्त तिकडची काहीतरी आठवण असावी ,म्हणून आण काहीतरी.

 प्रथमेश- बाबा, तुम्हा दोघांना काय आणू.

 विश्वास -अरे जे असेल ,ते काकालाही आण बरं ,तो भाडेकरू उद्या रूम खाली करणार आहे, मी जाऊन चावी घेईन आणि दोन-तीन लोकांना सांगतो ,रूमचा रिनोवेशन करायचा आहे.

 प्रथमेश -आपण हे ,आम्ही आल्यावर ही बोलू शकतो.

विश्वास -बरं बरं ठीक आहे ,तुम्ही एन्जॉय करा ,असं म्हणून प्रथमेश आणि तन्वी फोन ठेवतात.

सुवर्णा -मी निघते.

सुलभा -अगं बस ना, जेवून जा.

 सुवर्णा -नको, तन्वीचे बाबा येतील आता

 सुलभा- त्यांनाही जेवायला बोलव.

 सुवर्णा- नंतर येऊ कधीतरी, आता तुम्ही थकून आलात ना ,चल येते मी.

अजून दोन-तीन दिवसांनी ऑफिसला जायचंय, भक्ती मला मदत करशील, सगळं आवरायला, असं सुलभा म्हणते. 

भक्ती -हो ,आई करते ना. दोन-तीन दिवसांमध्ये सगळे मिळून ,घरातल्या सगळ्या वस्तू आवरून ठेवतात. भक्ती आणि शक्ती ,प्रथमेश येणार त्याच्या आधी एक दिवस, त्याची रूम  स्वच्छ करून ठेवतात. विश्‍वासही जाऊन भाडेकरूकडून चावी आणून ठेवतो.

विश्वास- रेनोवेशन करणाऱ्या माणसाला बोलवू का.

सुलभा- प्रथमेश म्हणाला आहे ना, तो आल्यावर पाहील आणि त्यांना राहायला जायचं आहे ,तर त्यांच्या आवडीप्रमाणे सगळं करू दे ,प्रत्येकाचे स्वप्न असते रे, आपल्या घराबद्दल ,त्यांना त्यांच्या आवडीने त्यांचं घर सजवू दे.

भक्ती- हो बाबा, मलाही तसंच वाटतं.

विश्वास -बर चालेल,तुमचं सगळ्यांचं असं मत आहे, तर होऊ दे ,तुमच्या सगळ्यांच्या मनाप्रमाणे.

सुलभा -म्हणजे आम्ही जे बोलतोय, ते तुला पटलेलं नाही.

 विश्वास -असं ,काही नाही ग .

भक्ती - झालं परत तुमचं सुरू.

दुसऱ्या दिवशी प्रथमेश आणि तन्वी संध्याकाळी येतात, त्यांना आणायला एअरपोर्टवर विश्वास जातो .

विश्वास -कशी झाली, मग तुमची ट्रीप मेमोरेबल झाले की नाही .

प्रथमेश -खूपच मेमोरेबल झाली आणि हे सगळं तन्वीच्या बाबांमुळे आणि तुमच्यामुळे पॉसिबल झालं , आम्हाला इतक्या छान मेमरीज देण्यासाठी ,तुमचे खरच खूप धन्यवाद.

 विश्वास- अरे धन्यवाद कसले, जे मी माझ्या आयुष्यात करू शकलो नाही, याची मला नेहमीच खंत राहिली ,तीच तुला राहू नये, म्हणून हे सगळं करण्याचा आटापिटा.

तन्वी -आम्हाला तुम्हा मोठ्यांचे आशीर्वाद मिळाले , की त्यापुढे सगळं फिकं वाटतं.

 विश्वास- हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण या वयातही , तुम्ही जो मोठेपणा दाखवला ,त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे, असे वाटतं .

घरी पोहोचल्यावर, भक्ती, शक्ती, तन्वीला मिठी मारतात आणि त्या तिघींची खुसुर पुसुर सुरू होते.

 सुलभा- अगं, ती दमून आली आहे ,तुम्ही तिला फ्रेश होऊ द्या ,मग काय तुम्हाला, गप्पा मारायच्या मारा,

तन्वी आणि प्रथमेश जा तुम्ही फ्रेश होवून या ,तो पर्यंत मी छान चहा ठेवते.

तन्वी आणि प्रथमेश फ्रेश होऊन येतात.

 शक्ती- काय मग दादा ,तुझा रूम कसा वाटला?

 प्रथमेश- हं ,बरा आहे.

 शक्ती -म्हणजे, मी साफ करण्यासाठी एवढी मेहनत घेतली आणि बरा आहे, मला वाटलं ,तू छान म्हणशील.

 प्रथमेश- मला नाही वाटतं, तू एकटीन काही केलं असशील ,भक्तीने तुला मदत केली असेल.

शक्ती- हो, केली ना ,सगळ्यांना तीच भारी कौतुक असतं,मी कितीही काही केलं ,तरी मी आपली वेडपट.

भक्ती -अगं ,तुला तो चिडवतो आहे, तुला तेवढे कळत नाही का ?

शक्ती -तुला कळते ना, मग बस झालं.

 प्रथमेश -हे बघा, तुमच्या दोघींसाठी गिफ्ट.

 शक्ती- वाव, किती छान आहे ,मला हवा होता असा मेकअप सेट, थँक्यू तन्वी, थँक्यू दादा.

 प्रथमेश -बाबा ,तुम्हा सर्वांसाठी स्प्रे आणले आहेत , तुझ्यासाठी आणि तन्वीच्या बाबांसाठी घड्याळ आणले आहे.

विश्वास- अरे, मी तुला सांगितलं होतं ना, जे माझ्यासाठी आणशील ,ते काका साठी आन.

 प्रथमेश- पण, हे घड्याळ आम्ही तुम्हा दोघांसाठी, तुम्ही जे आम्हाला सरप्राईज दिलं ,त्याबद्दल रिटर्न गिफ्ट आणि मी ते तुम्हाला आत्ताच देतो, तन्वी पण तिच्या बाबांना देऊन येईल आणि सगळ्यांसमोर तुम्हाला स्प्रे देऊ आणि काकाला वाटलं ,तर वाईट वाटू दे, असंही त्याला माझ्याबद्दल काय वाटतं ,ते मला चांगलं माहीत आहे. 

तन्वी -आई तुमच्यासाठी आणि माझ्या आई साठी छान पर्स  आणल्या आहेत, काकीसाठी पण आणली आहे.

सुलभा - तीन सारख्या आणल्या ना ,कारण पुरुषांचे तेवढं नसतं ,बायका मात्र काय आणले दाखवा, असं म्हणायला, कमी करत नाही.

 तन्वी -हो ,म्हणूनच सारख्या आणल्या, कारण काकी लग्नाच्या वेळेला ज्या पद्धतीने वागत होती ,त्यावरूनच कळालं .

सुलभा -चला ,आता सगळ्यांनी जेवून घ्या, जेवण झालं आहे .

जेवताना सुलभा तन्वीला म्हणते ,तुझ्या आई बाबांना उद्या बोलवायचं असेल, तर बोलव, जेवायला बोलाव हवं तर.

तन्वी -हो ,बोलून बघते ,काय म्हणतात ते

 जेवण झाल्यावर ,प्रथमेश आणि तन्वी तिकडे काय काय छान स्पॉट आहेत ,त्याबद्दल सांगतात.

 विश्वास- चला, जा आता तुम्ही झोपा ,दमून आला आहात.

 तन्वी आणि प्रथमेश झोपायला जातात .दुसऱ्या दिवशी सकाळी, तन्वी घरी फोन करुन विचारते, फोन केल्यावर, ती सुलभाला म्हणते, आई, तुम्ही सगळे तिकडे या, असं म्हणत होती. 

सुलभा -त्यांना इकडे बोलाव जेवायला, आपल्यालाही सुट्टी आहे ना, मग एकदा काय ऑफिस सुरू झालं, की परत वेळ मिळणार नाही लवकर. सुवर्णाला फोन लावून दे ,मी बोलते. तन्वी फोन लावून देते ,सुलभा सुवर्णाशी बोलते, फोन ठेवल्यावर सांगते, की येत आहेत. संध्याकाळी काका आणि काकीला ही बोलावते ,परत त्यांना राग येतो. तन्वी ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा .

सुलभा- संध्याकाळी ,काय मेनू करायचा मग.

तन्वी -तुम्ही म्हणाल ते करू.

दोघी मिळून जेवणाचा बेत ठरवतात.  संध्याकाळी, थोडसं लवकर जेवण बनवायला लागून, सगळं तयार करून ठेवतात. पहिल्यांदा, तन्वीचे आई-बाबा येतात,तेव्हा प्रथमेश त्यांना घड्याळ देतो. काका ,काकी व त्यांचे दोन्ही मुले येतात. सगळ्यांबरोबर छान गप्पा मारतात, सगळे मिळून एकत्र जेवतात.प्रथमेश आणि तन्वी सगळ्यांना आणलेले गिफ्ट देतात, काकी दोघींचे गिफ्ट पाहते ,तसं तन्वी आणि सुलभा एकमेकींकडे पाहून हसतात.

काका-पुढच्या वेळेस आम्हाला तुझ्याच घरी जेवायला यायला आवडेल. 

त्याच्या बोलण्यातला रोख, विश्वास लक्षात घेऊन त्यावर बोलतो,हो आता रिनोवेशनच काम दिल आहे,ह्या महिन्यात ते शिफ्ट होतील.

 काका- तुला कशाची गरज लागली ,तर नक्की सांग. प्रथमेश -का नाही ,तुलाच सांगेल ,असही शिफ्ट करताना गरज लागेल आणि जर गरज पडलीच तर थोडी पैशाची मदत कर.

काका - अरे आताच मयूरीचे एडमिशन घेतले ,नाहीतर आज घेऊनच येणार होतो पैसे बरोबर. 

विश्वास- अरे माझ्याकडून घे ,तुला हवे असेल तर 

प्रथमेश- मला माहित आहे, तू मला देशील, काका स्वतः म्हणाला म्हणून बोललो .

आता विषय वाढू नये ,म्हणून काका बोलतो ,चला आम्ही निघतो आता ,उद्या ऑफिस पण आहे,असं म्हणून ते जातात.

शक्ती- बरं झालं ,तू मागितले ,बरोबर त्याच खरं रूप बाहेर आलं.

प्रथमेश- मला माहित होत, तो असेच काहीतरी उत्तर देईल, म्हणून जाणूनबुजून मागितले.

विश्वास- तुला हवे असेल,  तर माझ्याकडून घे .

प्रथमेश- घेतले असते ,पण भाडं ज्या अकाउंटला जमा होत, ते पैसे तसेच आहेत, उलट जास्त आहेत. 

महेश आणि सुवर्णा पण आता बोलतात, की आम्ही पण निघतो आता उशीर झालाय, तसे सगळे त्यांना निरोप देतात. भाग आवडला असेल, तर नावासहित शेअर करू शकता .


 

क्रमशः

 रूपाली थोरात

🎭 Series Post

View all