सेकंड इनिंग भाग-22

Beautiful relation between husband and wife

सेकंड इनिंग भाग-22

दुपारी थोडासा आराम केल्यानंतर, रिसॉर्टमध्ये जे स्पा सेंटर होते ,दोघे तिथे जातात, सकाळी त्यांनी अपॉइंटमेंट घेतलेली असते .दोघेही आपापल्या सेक्शनमध्ये जातात , सुलभाला तर खूप छान वाटत असतं ,काही कार्यक्रमांना वगैरे ती पार्लर मध्ये गेली होती, पण मसाज करायला कधी वेळच नसायचा, म्हणण्यापेक्षा आवडही नव्हती आणि या आधी कधी स्वतःचा विचार केलाच नव्हता . मसाज झाल्यानंतर, त्यांनी आयुर्वेदिक औषधी स्टीम दिली ,त्याने तिला इतके फ्रेश वाटत होते आणि तिने मनातल्या मनात ठरवले की, इथून पुढे महिन्यातून एकदा तरी मसाज करून घ्यायचा. विश्वासची ही काही वेगळी परिस्थिती नव्हती, त्यालाही खूप छान वाटत होते , विश्वासचा मसाज लवकर झाला होता, त्यामुळे तो बाहेर सुलभाची वाट पाहत थांबला, तोपर्यंत तिथे एक मासिक होते ,ते चाळत बसला ,अर्ध्या तासाने सुलभा आली. विश्वास -कसं वाटलं तुला ,मला तर एकदम फ्रेश वाटले. सुलभा- छान अनुभव होता आणि मी आता ठरवले आहे, महिन्यातून एकदा तरी तिकडे गेल्यावरही मसाज करून घ्यायचा.

 विश्वास -हो ,मलाही असं वाटतं आणि आधीही मी तुला कधीच नाही म्हटलं नव्हतं.

 सुलभा- पण सगळ्या कामाच्या वेळात ,माझ्या मनातही कधी हा विचार आला नव्हता.

 विश्वास- हो, तेही खरंच म्हणा, सुट्टीच्या दिवशीही घरातले काम असायचं ,पण मला आता हे पटत आहे, की आपण थोडा आपला पण विचार केला पाहिजे ,आपल्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे ,स्वतः वर लक्ष दिले पाहिजे आणि हे सगळं तुझ्यामुळे समजलं, त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार ,आतापर्यंत आपण नुसता आयुष्य जगायचं, म्हणून जगत होतो ,त्याचा आनंद कसा घ्यायचा, हे आपल्याला उमगलेच नव्हतं .

सुलभा -आता तर उमगलं आहे ना ,अजूनही वेळ गेलेली नाही, अजून भरपूर काही करायचं आहे ,तू देशील ना मला साथ.

 विश्वास- असं का म्हणते ,मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे आणि राहील,  चल आता भूक लागली आहे ,जाऊन चहा आणि काहीतरी नाश्ता करू.

 दोघे मिळून जातात, चहा आणि नाश्ता करतात ,ते वर रूम मध्ये जात असतात, रिसेप्शनिस्ट त्यांना सांगते, आज रात्री नाईट पूल पार्टी आहे.

 विश्वास- नाईट पूल पार्टी म्हणजे काय असते . रिसेप्शनिस्ट- सर, त्यामध्ये स्विमिंग पूलला डेकोरेशन केले जाते, ड्रिंक्स ,स्टार्टर्स पूल एरियात  सर्व्ह  केले जाते. विश्वास- बघू ,आम्हाला तोपर्यंत काय वाटतं त्यानुसार. रिसेप्शनिस्ट- येण्याचा प्रयत्न करा, तेवढाच वेगळा अनुभव मिळेल .

सुलभा -आम्ही प्रयत्न करू.

 रूममध्ये गेल्यावर थोड्यावेळाने भक्ती शक्ती चा व्हिडिओ कॉल येतो, नंतर त्या प्रथमेश आणि तन्वीला पण  ऍड करतात.

प्रथमेश- कसा वाटला रिसॉर्ट तुम्हा दोघांना.

विश्वास- खूप छान आहे, एकदा आपण सगळे मिळून येऊ .

तन्वी -मग ,तुम्ही काय काय एन्जॉय केलं.

 सुलभा- आज दुपारी मसाज घेतला ,खूप छान वाटलं , विश्वास  गोल्फ कोर्समध्ये खेळला, मी तर खूप वर्षांनी सायकलिंग सुद्धा केले ,आम्ही भुशी डॅमला जाऊन आलो, खूप छान वाटलं ,बर्‍याच दिवसांनी वेगळं काहीतरी केलं.

 प्रथमेश-  पहिल्या दिवशीचे सरप्राईज दिलं, ते आवडलं का ?

विश्वास -होते ना, तेही छान होतं.

 प्रथमेश -बाबा ,तू किती ब्लश होतोय, यावरूनच कळते की ,तुम्ही किती एन्जॉय केलं .

विश्वास -आमचं जाऊ दे रे ,तुम्ही एन्जॉय करताय की नाही .

प्रथमेश- हो ,आज आम्ही झुरिचला आहोत ,इथलं वातावरण तर खूपच छान आहे, इथला लेक खूप छान आहे ,आम्ही खूप सारे स्नो गेम्स पण खेळलो .

शक्ती -तुम्ही दोघे तिकडे आणि हे दोघे लोणावळ्याला छान मजा करत आहात तुम्ही, आमचं काय ?

विश्वास -तुमची ही वेळ येईल आणि आम्ही तुम्हाला म्हणत होतो ,की चला, पण तुम्हीच नाही आल्या .

भक्ती -अरे बाबा, ती अशीच मजा करत आहे .

विश्वास -आज रिसॉर्ट मध्ये नाईट पूल पार्टी आहे,आम्ही विचार करतोय ,की जाऊ की नको.

 तन्वी -अहो, ते रिसॉर्टच्या बुकिंगमध्ये कॉम्प्लिमेंटरी आहे, जाऊन बघा, तुम्हाला आवडलं तर थांबा, नाहीतर निघून या.

 सुलभा -हो ग जाऊ.

 विश्वास- जे कॉम्प्लिमेंटरी असतं ना ,ते तुम्हाला बायकांना आवडतंच, जसं काही त्यावर तुमचा हक्कच असतो ,पण ते कॉम्प्लिमेंटरी मिळण्यासाठी किती पैसे पे केले, त्याचा तुम्ही विचारच करत नाही.

 सुलभा- आवडतं  आम्हाला,  हे मान्य करतो आम्ही,पण तुम्ही काय करता, विचार न करता खूप सारे पैसे देऊन टाकतात, त्याचं काय ?

भक्ती- अरे हे काय, तिथेपण भांडायला लागले तुम्ही , शांत व्हा आणि नाईट पूल पार्टी एन्जॉय करा ,चला बाय, आम्ही फोन ठेवतो .

सुलभा -प्रथमेश आणि तन्वी तुम्ही एन्जॉय करा .

तन्वी -हो आई ,बाय, काळजी घ्या, असं म्हणत फोन ठेवतात .

सुलभा - रिसेप्शनिस्ट ने सांगितलं होतं, की स्विमिंग पूल ड्रेस कंपल्सरी आहे, कारण काही वॉटर गेम पण घेणार आहे ,जाऊया तेवढाच वेगळा एक्सपिरीयन्स.

 विश्वास- जशी आपली इच्छा, मॅडम .

सुलभा- नौटंकी कुठला, मनात जावं असं वाटत होतं, पण निर्णय उगीच माझ्यावर ढकलून मोकळा .

विश्वास- तुला माझ्या मनातलं सगळं कसं कळतं .

सुलभा -उगीच नाही ,इतकी वर्षे आपण बरोबर आहोत. विश्वास -ते ही खरंच म्हणा, स्विमिंग ड्रेस बरोबर घ्यायचे आहे ,पण जेंट्स साठी टी शर्ट जीन्स आणि लेडीज साठी लॉन्ग वन पीस ही थीम आहे .

सुलभा -बघ ,कसं सगळं तू लक्षात ठेवलं ,कारण तुला पार्टीला जायचं होतं ,बरं तिथं गेल्यावर जास्त ड्रिंक घ्यायची नाही.

 विश्वास- हो ग, तू असणार आहेस ना माझ्या बरोबर . नाईट पूल पार्टी रात्री आठला सुरू होणार असते, विश्वास टी-शर्ट आणि जीन्स घालतो, सुलभा जाऊन घालते आणि त्यावर डायमंड इयर रिंग ,डायमंड पेंडंट असलेली चैन घालते, थोडासा लाईट मेकअप ,ती जेव्हा रेडी होऊन बाहेर जाते, विश्वास आ वासून तिच्याकडे पाहत राहतो,तशी ती त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवते ,तो भानावर येत तिला म्हणतो ,खरच खूप सुंदर दिसत आहेस ,कालपासून तर मला तुझे वेगळे रूप दिसत आहे, आय लव यु जानू.

 सुलभा -आता हे काय नवीन, जानू.

  विश्वास- एवढा प्रेमाने बोलतोय नवरा, म्हणजे किती आनंद झाला असता एखादीला, पण इथे आमचं काही कौतुकच नाही आणि मी कसा दिसतोय हे कोण सांगणार?

 सुलभा -तू तर माझा ,वन अँड ओन्ली ,युनिक वन पीस, युनिक म्हटल्यावर, तू समजून घे ना ,असं म्हणत ती लाडाने तीच डोकं त्याच्या छातीवर ठेवते ,तसा तोही तिला आपल्या बाहुपाशात घेऊन,  तिच्या डोक्यावर आपले ओठ टेकवतो.

विश्वास- मी काय म्हणतो, जायलाच पाहिजे का पार्टीला.

सुलभा- म्हणजे काय, मला भूक लागली आहे, पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली आहे. 

विश्वास- मला वाटलं, वेगळ्या प्रकारची भूक, असं म्हणत त्याने डोळा मारला.

सुलभा- आजकाल ,तुझा डोळा जरा जास्तच फडफडत आहे नाही ,अजून काही वेगळे विचार मनात  येण्याआधी,

चल पटकन आणि ती त्याच्या हाताला धरून त्याला बाहेर घेऊन जाते.

ते पूल एरीयात जातात, तेव्हा ही सुलभाचा हात ,त्याच्या हातात होता,तिथे गेल्यावर गेममध्ये भाग घेतला होता, ते कपलही आले होते,त्यातले एक कपल म्हणाले, या वयातही  तुम्ही किती रोमँटीक आहात.

विश्वास- क्रेडिट गोज टू अवर मॅडम 

सुलभा- असं काही नाही ,रूम मधून बाहेर पडण्यासाठी म्हणून मी हात पकडला होता, तो इथे येईपर्यंत तसाच आहे.

 कपल -हो ठीक आहे ,पण तुम्हाला असं पाहून आम्हालाही वाटतं, की तुमच्या वयात, आम्ही पण असाच राहायला हवा .

तितक्यात सगळ्यांना फ्लोअरवर कपलने बोलवतात,म्युझिक सुरु होतं आणि सगळे कपल डान्स करायला लागतात .विश्वास आणि सुलभा दोघेही डान्स करत असतात, थोड्यावेळाने ते जाऊन एका टेबलवर बसतात, तिथे वेटर ड्रिंक घेऊन येतो.

 वेटर सुलभाला विचारतो, मॅडम ,यु वॉन्ट वाईन .

सुलभा -नो, थँक यु .

विश्वास- घे ना थोडी ,मला थोडी कंपनी दे .

सुलभा -मी हवंतर सॉफ्टड्रिंक घेते, तुला कंपनीच हवी असेल तर .

विश्वास -बरं ,मी घेऊन येतो तुझ्यासाठी, असं म्हणत तो तिच्यासाठी सॉफ्ट ड्रिंक आणायला जातो ,थोड्याच वेळात, तो हातात एक  ग्लास घेऊन येतो आणि सुलभाला देतो .सगळ्यांचा डान्स बघत बघत ड्रिंक्स पीत असतात.

 सुलभा- हे सॉफ्टड्रिंक जरा थोडं कडू लागते .

विश्वास -कधीकधी मोसंबीचा ज्यूस थोडा कडू असतो, म्हणून तुला वाटत असेल.

 सुलभा -पण, मला तर हा पायनापल फ्लेवर वाटतं आहे.

 विश्वास -पायनापल मध्ये थोडे काटे राहिले असतील, म्हणून कडू लागत असेल .

इतक्यात स्विमिंग पूल मधल्या गेमची अनाउन्समेंट होते, सगळ्यांना स्विमिंग ड्रेस घालून पाण्यात उतरायला सांगतात ,विश्वास आणि सुलभा दोघेही चेंज करून येतात आणि पाण्यात उतरतात .

सुलभा- असं रात्रीच्या वेळी ,आपण पहिल्यांदाच स्विमिंग पूल मध्ये आलो आहे ना, पण गेम काय आहे माहित नाही.

 विश्वास- समजेल.

 इतक्यात सांगितलं जातं, की तुम्हाला तुमच्या कपलसाठी, दुसर्‍या साईडला जाऊन ,गुलाबाचं फुल घेऊन परत यायचं आहे आणि द्यायच आहे, दोघांपैकी कुणीही जाऊ शकता.

 विश्वास -मी जातो.

 सुलभा- प्रत्येक गोष्ट काय तूच माझ्यासाठी करायची का, मला पोहता येतं ,मी जाणार.

विश्वास -बर बाई ,तु जा .

सगळे आता पोझिशनमध्ये उभे राहतात ,शिटी वाजते, तसे सगळे पोहायला सुरुवात करतात, सुलभाला स्विमिंग चांगली येत असते, ती सगळ्यांच्या पुढे असते ,ती पटकन जाऊन फुल घेते आणि परत रिटर्न येऊन विश्वासला देते. तसे सगळे टाळ्या वाजवतात ,सुलभाला खूप आनंद होतो, ती जिंकल्याबद्दल ,विश्वास तिला अजून एक सॉफ्ट ड्रिंक आणून देतो, सुलभाला ते कडू लागते ,म्हणून ती घटाघट पिऊन टाकते. थोड्यावेळाने ,सुलभाला दोन दोन विश्वास दिसायला लागतात ,तिला काहीच कळत नसते,की असे का होते .

सुलभा -विश्वास, तू मला दोन दोन ठिकाणी का दिसत आहे .

विश्वास- अगं, तुला भास होत असेल.

 सुलभा -नाही रे, विश्वासला कळून चुकतं, कि तिला काय होत आहे.

 विश्वास -चल, आपण जेवून घेऊ, तो तिला घेऊन पूलच्या बाहेर येतो, तिला एका टेबलवर बसवतो आणि सांगतो, की मी जेवण घेऊन येतो.तिकडे म्यूझिकही चालू असतं, विश्वास जेवण घ्यायला जातो, तेव्हा सुलभा तिथून उठते आणि म्युझिक वर डान्स करायला सुरुवात करते. विश्वास जेवण घेऊन आल्यावर, तिला हात धरुन परत घेऊन येतो आणि जेवायला बसवतो. ती परत डान्स करण्यासाठी उठायचा प्रयत्न करत असते ,पण विश्वास तिला एका हाताने बसून ठेवतो आणि दुसऱ्या हाताने तिला जेवायला घालतो ,एक घास तिला आणि एक घास स्वतःला, असं करत दोघे जेवतात. जेवल्यावर दोघेही रूममध्ये जातात, सुलभाला पूर्णपणे गुंगी आलेली असते, विश्वास तिला रूम मध्ये नेऊन बेड वर झोपवतो आणि स्वतः झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता सुलभाला जाग येते, ती इकडे तिकडे पाहते, तर विश्‍वास उठलेला असतो, तो पेपर वाचत असतो. सुलभाला तिचं डोकं जड वाटत असतं, ती विश्वास कडे पाहत म्हणते,डोकं खूप जड वाटतंय रे ,रात्री आपण कधी रूम मध्ये आलो ते मला कळालं नाही .

विश्वास - हे काय ,म्हणजे तू रात्री काय काय वागली , तुझ्या काहीच लक्षात नाही .

सुलभा -म्हणजे, मी असं काय केलं .

विश्वास- तुला मी नको म्हणत होतो ,तरी तू डान्स करत होती ,तुला न पिताही चढली .

सुलभा -आता माझ्या लक्षात येत आहे ,की नक्की काय झालं असेल, तू मला जे कोल्ड्रिंक दिलं, त्यात काहीतरी नक्कीच टाकलं असणार .

विश्वास -अगं, मी तुला फक्त कोल्ड्रिंक दिलं होतं ,माहित नाही, चुकून वेटरने कोल्ड्रिंकच्या ऐवजी कॉकटेल दिल असेल तर .

सुलभा -मला चांगलं माहीत आहे, हे सगळं तुझं कारस्थान आहे ,कारण तुला असं वाटत होतं, मी तुला कंपनी द्यावी ,बरोबर ना.

 विश्वास -हो, पण मला नव्हतं वाटलं ,की तुला एवढी चढेल, आता इथून पुढे असं काही करणार नाही ,पण तू त्या अवस्थेत सुद्धा एक गोष्ट मात्र चांगली केली.

 सुलभा - नक्की, काय चांगलं केले ,मला पण कळू दे, मला तर काहीच आठवत नाही.

 विश्वास -अगं, धीर धर ,सांगतोय ना, तू त्या अवस्थेत सारखं म्हणत होती, विश्वास आय लव यू ,जे तू चांगले असताना कधीच म्हणत नाही ,म्हणून मला तर माझा प्लान सक्सेसफुल झाल्यासारखं वाटलं.

 सुलभा - मला नाही वाटत, प्रत्येक गोष्ट बोलून दाखवली पाहिजे, कधीकधी ती एकमेकांच्या डोळ्यात दिसते आणि प्रेम नसतं, तर इतके दिवस आपला संसार टिकला असता का ?

विश्वास - पण तूच म्हणत असते ना, कधीतरी आपण व्यक्त झालं पाहिजे ,तसे तू काल त्या परिस्थितीत व्यक्त झाली, पण मला आवडलं .

सुलभा- बरं बरं, आता पटकन कॉफी किंवा चहा ऑर्डर कर ,माझं खरंच डोकं जड झालं आहे ,तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते, असं म्हणून सुलभा फ्रेश व्हायला जाते. ती फ्रेश होऊन येते, तोपर्यंत कॉफी आलेली असते ,दोघे मिळून कॉफी घेतात .

सुलभा- मग आजचा काय प्लॅन आहे ?

विश्वास -आता तरी आराम करायचा दुपारपर्यंत. जेवल्यानंतर कोरीगड फोर्ट ला जाऊ, तीन वाजता साधारण ते कोरीगड फोर्टला जायला निघतात, कोरीगड फोर्टवर कोराई देवीचे छान मंदिर होते ,भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचीही मंदिरे होती.तिथे आता नव्याने एक मोठी दीपमाला बांधली होती ,तिथेच लक्ष्मी तोफ ठेवलेली होती ,वरून सगळं हिरवगार दिसत होतं,दोघेही किल्ल्यावर सगळीकडे फिरले आणि फोटोसेशन केले. अजून काही लोक आले होते ,त्यातील एका मुलाला दोघांचे फोटो काढायला सांगितले. संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान ,ते परत हॉटेलवर पोहोचले, रिसॉर्टमधे त्यांनी चालत परत फेरफटका मारला.

 सुलभा -छान वाटले ,इकडे येऊन, उद्या परत जायचं आहे ना ,एकदम शांत वातावरण आहे .

विश्वास- हो ,उद्या बारा वाजता चेक आउट करायचं आहे, म्हणून तर लोक म्हणतात ,थोडंसं बाहेर गेलं की माईंड फ्रेश होतं,इथून पुढे सहा महिन्यातून एकदा फॅमिली ट्रिप किंवा कधीतरी दोघे एक-दोन दिवसासाठी जायला पाहिजे. दोघे जेवण करूनच रूमवर जातात ,रूमवर गेल्यावर सुलभा बॅग भरायला घेते ,तसा विश्वास मागून येऊन तिला मिठीत घेतो, ती मागे वळून डोळ्यानेच त्याला विचारते ,काय झालं.

 विश्वास -उद्या सकाळी बॅग भर ना ,एवढी काय घाई आहे, बाहेर बाल्कनीत जाऊन, छान गप्पा मारू.

 सुलभा -एवढ्या गप्पा मारल्या ,तरी अजून काय गप्पा मारायच्या आता .

विश्वास- तु ना एकदम, अनरोमॅंटिक आहे.

 सुलभा बॅग भरायची ठेवून, त्याच्या हाताला धरून बाल्कनीत जाऊन त्याला एका चेअर वर बसवते आणि ती शेजारच्या चेअर वर बसते, त्याचा हात हातात घेत बोलते, काय झालंय ,एवढं तुला काय बोलायच आहे.

 विश्वास- काही नाही गं, तुझा हात हातात घेऊन असच शांत बसावसं वाटतं .सुलभा त्याच्या शेजारी सोफ्यावर बसत, त्याचा हात हातात घेते आणि तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवते ,असेच  बराच वेळ बसून राहतात.

 विश्वास- इथलं वातावरण खरंच खूप  छान आहे.

 सुलभा- हो .

विश्वास -झोप येते का तुला ?

सुलभा -नाही रे ,इतकं निवांत आपण कधी  बसलो होतो, ते आठवत आहे ,आता गेल्यावर ऑफिस सुरू झालं, की परत असा वेळ मिळणार नाही, म्हणून हे क्षण मनात साठवून ठेवत आहे ,माहित नाही, परत हे क्षण अनुभवायला मिळतात की नाही .

विश्वास- असं काय बोलते,परत जर असं बोललीस तर बघ ,पुन्हा पुन्हा आपण असेच क्षण नव्याने जगणार आहोत.

सुलभा- साॅरी, चुकलं माझं, तू बोलतो तसं होईल. 

विश्वास-चल जाऊया आणि झोपूया

दुस-या दिवशी ,सकाळी उठल्यावर बॅगा भरून नाश्ता करून येतात ,परत एकदा रिसाॅर्टमध्ये ते फेरी मारतात ,सगळ्या आठवणी मनात साठवून ते आता परतीच्या प्रवासाला निघतात. 

अजून त्यांच्या आयुष्यात काय उलथापालथ होईल, हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा ,हसत रहा आणि आनंदात रहा. आजचा भाग जर आवडला असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

 क्रमशः

रूपाली थोरात

🎭 Series Post

View all