Login

सेकंड इनिंग भाग-21

Beautiful relation between husband and wife

सेकंड इनिंग भाग-21

विश्वास रात्री रिसॉर्टचे नाव टाकून, लोकेशन सर्च करतो.घरापासून त्यांना जायला तीन तास लागणार होते, दोन वाजता चेक-इन टाईम होतं ,त्यांचे दहा वाजता निघायचं ठरलं,सकाळी सगळ्यांनी बरोबरच नाश्ता केला.

भक्ती -आई ,तू काय घालणार आहे जाताना .

शक्ती -आई ,जीन्स आणि टॉप घाल ,काल आणलेला.

सुलभा- मी कितीतरी दिवस झाले ,असं काही घातलं नाही ,मी आपली ड्रेस घालते.

 शक्ती- अगं ,तू नेहमी ड्रेस घालते ऑफिसला जाताना , त्यात वेगळं असं काय करणार आहे ,म्हणून तुला म्हणाले.

 सुलभा -तू माझं थोडीच ऐकणार आहेस, बरं बरं घालते.

भक्ती -तुम्ही आता आवरा बरं ,तुम्हाला निघायचं आहे ना ? 

विश्वास आणि सुलभा दोघेही आपल्या रूममध्ये जातात, रेडी होवून ,बॅगा घेऊनच खाली येतात. दोघे येत असतात, तेव्हा शक्ती शिट्टी वाजवते.

 सुलभा -आता तुला काय झालं ,शिट्टी वाजवायला.

 शक्ती -दोघेही खूप छान दिसत आहे आणि आई ,तू काय म्हणत होती, की तुला चांगला दिसणार नाही ,पण छान दिसते.

 सुलभा- पण, हे पोट बघ ना.

 शक्ती- असू दे की ,आमच्या दोघींची निशाणी आहे, तुला  त्या पोटाचा अभिमान वाटला पाहिजे, हो की नाही रे बाबा, तू काही बोलतोस का तिला.

 विश्वास- मी काही बोलायला ,तिने ऐकून तर घेतला पाहिजे. तसे डोळे वटारुन सुलभा विश्वास कडे पाहते . विश्वास -कशी डोळे वटारते माझ्यावर ,किती धाक आहे ना ,तुमच्या आईचा मला .

भक्ती -म्हणजे ,तुम्हाला काय म्हणायचे बाबा ,आई तुमचा ऐकत नाही .

विश्वास -असं कधी म्हटलं आहे मी, मी फिरायला जातोय, नाहीतर माझा सगळा दिवस बेकार जायचा.

 सुलभा- मला तुझं सगळं माहिती आहे ,नको जास्त बोलू, बरं ,तुम्ही दोघी व्यवस्थित एकमेकींची काळजी घ्या, मी तुम्हाला फोन करत राहिलं ,पहिल्यांदाच दोघं फिरायला जातोय  ,तर असं वेगळ वाटत आहे.

 शक्ती -तसं वाटावं ,म्हणून तर आम्ही तुम्हाला दोघांनाच पाठवत आहे.

 सुलभा- आजकाल तुला जरा जास्तच कळायला लागलंय.

 शक्ती- मुलगी कुणाची आहे मी .

विश्वास -झालं तुम्हा लोकांचे सुरू.

 भक्ती -अरे ,आता सगळे शांत व्हा, आई-बाबा तुम्ही निघा बरं आता आणि आमची बिलकुल काळजी करू नका , तुम्ही छान एन्जॉय करा .

विश्वास- बघु कसे जमते ते, सुलभा देवीची कृपा दुसरं काय .

सुलभा- हो का ,बरं बरं, बॅगा गाडीत ठेवून दोघे गाडीत बसायला जातात.

  शक्ती -बाबा, तू काळजी करू नको ,मी देवाला प्रार्थना करते ,की तुझ्यावर सुलभा देवीची कृपा होऊ दे ,अवकृपा नको ,बोला सुलभा देवी की.

 विश्वास- जय.

 सुलभा हसत -कृपाच होईल ,एवढी काय वाईट नाही मी.

भक्ती-शक्ती ला बाय करून ,आता ते प्रवासाला निघतात.

विश्वास -काय मॅडम ,मग कोणतं गाणं लावू.

 सुलभा -अरे, लाव रे कोणतेही ,तुला जे आवडतं ते लाव. विश्वास -जशी आपली आज्ञा.

 तशी सुलभा त्याच्याकडे बघून हसते, तो गाणं लावतो

आपकी आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं

आपसे भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं

आपकी आँखों में...

लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं

आपकी आँखों में क्या साहिल भी मिलते हैं कहीं

आपकी खामोशियाँ भी, आप की आवाज़ हैं

आपकी आँखों में...

आपकी बातों में फिर कोई शरारत तो नहीं

बेवजह तारिफ़ करना आपकी आदत तो नहीं

आपकी बदमाशियों के ये नये अंदाज़ हैं

आपकी आँखों में...

अशी जुन्या गाण्यांची मैफिल चालू असते, गाणी ऐकता ऐकता, मधून मधून एकमेकांकडे पाहत हसत असतात,आता रिसॉर्ट जवळ आलेला असतो. 

विश्वास -आता दहा मिनीटावर आला.

 सुलभा- लग्न झाल्यानंतर, मला वाटतं फक्त आपण दोघे , पहिल्यांदा चाललो आहोत.

 विश्वास- हो ना ,मुलांना सोडून जायची कल्पना, आपल्या डोक्यात कधीच आली नाही आणि आता मुलांनीच आपल्याला एकट सोडलं.

 सुलभा- आता मुलं खरेच मोठी झाली आहे, पण त्यांनी स्वतःहून आपल्याला पाठवलं ,मला तन्वीच जितकं कौतुक करावं, तितकं कमीच वाटतं ,तिने किती पटकन , आपल्याला सगळ्यांना आपलंसं केलं.

 विश्वास -अगं, नातं दोन्हीकडून असावं लागतं ,तिलाही आपल्यात तिचे आई-वडील दिसले असतील.

 इतक्यात आंबे व्हॅली सिटी सुरू होते, तिचा एंट्रन्स खूपच छान असतो.

 विश्वास -ही सिटी सहारा इंडियाने बनवलेली आहे सुलभा -खरच खूप छान वाटत आहे आणि एरिया पण किती मोठा आहे ना ,अरे ही सिटी इतकी छान आहे, तर प्रथमेश ने बुक केलेला, हॉटेल महाग असणार.

 विश्वास -हे बघ ,समोर दिसतंय ते रिसॉर्ट आंबे व्हॅली . रिसॉर्टच्या  गेटमधून आत एंट्री करतात, रिसॉर्टचा एंट्रन्स खूपच आकर्षक असतो ,त्यातून आत गेल्यावर रिसेप्शनच्या समोर ,तो गाडी उभा करतो .तितक्यात तिथे वॉचमन येतो, तो त्यांचं सामान काढायला मदत करतो आणि गाडीची चावी घेऊन पार्क करायला घेऊन जातो . विश्वास आणि सुलभा रिसेप्शनला जाऊन ,त्यांचं नाव सांगतात.

 रिसेप्शनिस्ट- वेलकम टू आवर हॉटेल सर ,ही तुमच्या रुमची चावी, तुम्हाला काही गरज वाटली, तर इंटरकॉम करू शकता आणि तिथल्या अटेंडंट ला सामान घेऊन रूम दाखवायला सांगते .

दोघेही त्याच्या मागे जातात, तो त्यांना रूम उघडून देतो आणि सामान आत ठेवतो, त्यानंतर तो निघून जातो. सुलभा -किती लक्झुरिअस रूम आहे हा ,याची बाल्कनी खूप छान आहे. 

विश्वास -हो, मी आलो फ्रेश होऊन.

 तो फ्रेश होऊन आल्यावर म्हणतो, बाथरूम तर खूपच छान आणि मोठा आहे बाथटब विथ जॅकोजी आहे ,मला आवडेल ,उद्या सकाळी आंघोळ करायला .

सुलभा -अरे सकाळी काय ,रात्रीही करू शकतो.

 विश्वास- तुझी इच्छा असेल ,तर रात्री ही करतो ,पण तु येणार आहेस का माझ्याबरोबर .

सुलभा -तू जरा जास्तच चावट झालाय .

विश्वास -नशीब म्हटली नाहीस, खारट झालाय ,घाम आला आहे ना म्हणून म्हटलं ग ,बरं बरं, ते जाऊदे ,तु फ्रेश होऊन ये .

सुलभा -एवढा एसी चालू आहे आणि तुला घाम कसला आलाय एवढा.

 विश्वास- बघ ना ,बिचारा मी, तुझ्या तावडीत सापडलो ना म्हणून .

सुलभा- मी काय तुला चेटकीण वाटली की काय.

 विश्वास -नाही गं ,मी अशीच गंमत केली, तू तर खूपच सिरीयस होते.

 सुलभा जाऊन फ्रेश होऊन येते ,मग दोघेही खाली रेस्टॉरंट मध्ये जाऊन चहा पितात ,रिसॉर्टमध्ये असाच फेरफटका मारायला जातात. इथे गोल्फ कोर्स असतो, तिथे काही जण खेळत असतात ,त्यांना खेळताना पाहून, विश्वासला खेळण्याची इच्छा होते ,तो म्हणतो ,मी पण ट्राय करून बघतो.

 सुलभा - ठीक आहे, तू जा, मी बघते तू कसा  खेळतोय.

विश्वास -मी कधी खेळलो नाही आहे ,मी फक्त ट्राय करणार आहे .

विश्वास तिथे खेळत असलेल्या लोकांजवळ जातो, त्यांच्याशी काहीतरी बोलतो, मग त्याला स्टीक दिली जाते, एक जण त्याला कसा बॉल मारायचा ते सांगतो , त्यानंतर विश्वास ट्राय करतो ,पहिल्या दोन वेळी त्याला जमत नाही ,पण तिसऱ्या वेळी तो बरोबर शॉट मारतो, हे पाहून ज्याने शिकवले तो टाळ्या वाजवतो. विश्वासलाही आपल्याला आलं, म्हणून आनंद होतो .विश्वासला आनंदात पाहून ,सुलभा टाळ्या वाजवते, अजून चार-पाच डाव ,त्यांच्याबरोबर खेळल्यावर ,तो त्यांच्याशी हात मिळवत परत येतो .

सुलभा- छान खेळलास 

विश्वास- अगं, ते पण मुंबईचे आहेत, त्यांनी छान शिकवलं, ते म्हणाले, उद्या सकाळी या, आपण परत खेळू.

 सुलभा- मग तू काय म्हणालास, हो नाश्ता झाल्यावर येईल दहा वाजता, पूर्ण रिसॉर्टला फेरफटका मारून ते परत रूमवर येतात. इंटरकॉम वरून त्यांना फोन येतो, की त्यांच्यासाठी एक सेपरेट टेबल बुक केलेला आहे.

विश्वास -माहित नाही ,पोरांनी अजून काय काय प्लान केला आहे .

सुलभा -हो ना, या सगळ्याची काय गरज होती.

 विश्वास -आता असं काही म्हणू नको ,आपण चांगला आनंद लुटू.

सुलभा घरी भक्ती-शक्ती ला फोन लावते आणि त्यांना त्यांची खुशाली विचारते ,आम्ही व्यवस्थित पोहोचलो हे सांगते. भक्ती तिला सांगते, सुवर्णा ऑंटी ,थोड्यावेळाने येणार आहे ,तू आमची काळजी करू नको ,तुम्ही एन्जॉय करा.

 ते आठ वाजता बुक केलेल्या, टेबल वर जेवायला जातात .इथे अजून तीन चार जोडपी असतात, अजून एक जोडपं त्यांच्याच वयाच असतं ,आता कपल गेम सुरू होणार असतो ,एक हार्टशेप बलून पास करत असतात . बलून ज्याच्याकडे येईल, त्याने शेजारचा कपल ,जे सांगेल ते करायच, गेम सुरू होतो ,दुसऱ्यांदा बलून विश्वास आणि सुलभा कडे येतो ,ते शेजारच्या कपल कडे प्रश्नार्थक नजरेने बघतात ,ते त्यांना सांगतात की , विश्वासने सुलभाला लग्नासाठी प्रपोज करायचं. सुलभाला मध्ये उभे राहायला सांगतात आणि विश्वास ला म्हणतात, तुम्ही यांना लग्नासाठी कसे प्रपोज कराल. सुलभा मात्र अवघडून उभी असते, असं पहिल्यांदाच, विश्वास तिला प्रपोज करणार असतो. जी कार्यक्रम ऑर्गनाईज करणारी असते ,ती  सुलभाला विचारते , तुम्हाला या आधी तुमच्या मिस्टरांनी प्रपोज केले आहे काय?

 सुलभा- ही पहिलीच वेळ आहे, मीसुद्धा खूप उत्साहित आहे ,हे बघायला की, मला ते कसं प्रपोज करत आहे . तिकडे विश्वासला मात्र सुचत नसतं ,की कोणत्या प्रकारे प्रपोज करू तो विचार करत असतो, इतक्यात त्याच्या डोक्यात एक कल्पना येते, तो तिच्या जवळ जातो, हातात एक लाल गुलाबाचं फुल घेतो आणि गुडघ्यावर बसतो, तुला पाहताच माझ्या मनात घंटी वाजली आणि कौल मिळाला, तू माझी अर्धांगिनी होशील का?

 तसं सुलभा लाजत म्हणते -हो ,तसं म्युझिक सुरू होतं आणि गाणं लागतं 

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?

माझ्या पिरतीची रानी तू होशील काय?

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?

आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय

आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय

तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?

नाय…

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?

ग तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं

माझं कालिज भोलं, त्यात मासोली झालं

माझ्या पिरतीचा सूटलाय तुफान वारा वारा वारा

रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसुद चोरा

रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसुद चोरा

तुझ्या नजरेच्या जादूला, अशी मी भूलणार नाय

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?

नाय…

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?

रं माझ्या रुपाचा ऐना, तुझ्या जीवाची दैना

मी रे रानाची मैना, तुझा शिकारी बाणा

खुळा पारधी रं, जाळ्यामंदी आला आला

गं तुला रुप्याची नथनी घालीन

गं तुला मिरवत मिरवत नेईन

तुज्या फसव्या या जाल्याला, अशी मी गावनार नाय

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?

आरं संगतीनं तुझ्या मी येणार … हाय

आरं संगतीनं तुझ्या मी येणार हाय

तुझ्या पिरतीची रानी मी होणार हाय

गोमू संगतीनं, आरं संगतीनं

गोमू संगतीनं, आरं संगतीनं तुझ्या मी येणार हाय

दोघेही गाण्यावर छान डान्स करतात ,डान्स संपल्यावर सगळे टाळ्या वाजवतात. नंतर बुफे जेवण होते, आता झोपण्याआधी ,ते दहा ते पंधरा मिनिटांचा फेरफटका मारून येतात. रूम मध्ये आल्यावर पाहतात, तो काय , बेडवर गुलाबाच्या फुलांनी हार्ट शेप काढलेला असतो, सगळ्या रूम मध्ये छान कॅन्डल लावलेल्या असतात,  वास खुप छान येत असतो .

विश्वास  -हे नक्‍की ,मुलांचं काम असणार.

 सुलभा  -हो

 विश्वास  -मग काय विचार आहे .

 सुलभा - काय आणि कशाबद्दल बोलतोस

 विश्वास -आवडलं का तुला ,मी प्रपोज केलेला.

 सुलभा- हो, खरंच छान केला, पण गाणं कसं लावलं त्यांनी.

 विश्वास -अगं ,मी सांगितलं होतं त्यांना, पण तू अचानक छान साथ दिलीस मला डान्स करताना .

सुलभा -अरे, जे बोल होते ,त्याप्रमाणे करत होते.

 विश्वास- मी फ्रेश होऊन येतो, तो फ्रेश व्हायला जातो,थोड्या वेळाने, तो बाथरूम मधून आवाज देतो की, टॉवेल दे.

 सुलभा टॉवेल द्यायला जाते, तर हा मस्तपैकी बाथटब मध्ये असतो ,तिला म्हणतो, इकडे आणून ठेव .

सुलभा -खरच, तू आंघोळीचा मनावर घेतलेले दिसते.

विश्वास- तू कोणती गोष्ट बोलली आणि मी मनावर नाही घेतली, असं होईल का ?

सुलभा तिथे टॉवेल ठेवायला जाते ,तसं विश्वास तिला हाताला धरून हात ओढतो ,तशी  ती बाथटब मध्ये त्याच्या अंगावर जोरात पडते,तो तिच्या अंगावर पाणी उडवत बोलतो, आता कशी तावडीत सापडली ,तीही त्याच्या अंगावर पाणी उडवत असते,ती उठायचा प्रयत्न करते, पण परत पाण्यात पडते, तसे दोघेही हसतात. विश्वास जॅकोजी सुरू करतो ,मग ब-याच वेळ पाण्यात मनसोक्त आनंद लुटतात.

 सुलभा- तू तुझा हट्ट शेवटी पूर्ण केला .

दोघे बाहेर येऊन चेंज करतात.

 विश्वास -पण मजा आली ना.

 सुलभा आरशासमोर उभी राहून, केस पुसत असते, विश्वास मागून जाऊन ,तिला मिठीत घेतो ,तशी ती आरशातून त्याच्याकडे पाहते, तोही आरशात पहात असतो ,दोघांची नजरानजर होते .सुलभाच्या पोटात आता फुलपाखरे  उडायला लागलेली असतात, आज तिला मागून मिठी मारल्यावर ,ती काहीही बोलत नाही,तसा तो तिचा होकार समजतो ,तिला आपल्याकडे वळवतो आणि तिच्या डोक्यावर आपले ओठ टेकवतो. तो तिला फुलवत जातो, ती खुलत जाते  ,कधी ते दोघांच्या मिठीत सामावतात ,हे त्यांनाही कळत नाही. नेहमीप्रमाणे सकाळी पाचला,  सुलभा ला जाग येते, हळूच ती त्याचा हात बाजूला करते आणि उठायचा प्रयत्न करते ,तसा तो तिला म्हणतो ,झोप अजून थोडा वेळ आणि परत तिला आपल्या बाहुपाशात घेतो, तीही आढेवेढे न घेता, त्याच्या कुशीत झोपते .सकाळी सहाचा अलार्म वाजतो ,तसे दोघे उठतात .

विश्वास- मी रिसेप्शनला सांगून ठेवले आहे ,लॉंग रूट सायकलिंगसाठी सायकल अरेंज करायला ,तयार हो पटकन, दोघे जॉगिंग सूट घालून तयार होतात .

सुलभा- खूप दिवस झाले ,मी सायकल चालवली नाही, माहित नाही, मला येईल की नाही ,उगाच सगळ्यांसमोर हसू नको व्हायला.

 विश्वास- अगं, पण तुला येते ना सायकल चालवता आणि मी आहे ना ,इथे कुणीही आपल्या ओळखीचे नाही, त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नको ,बिनधास्त चालव. दोघे खाली जातात.

 रिसेप्शनला विचारतात, सायकली तयार आहेत का, ती सांगते, हो .तसे दोघेही बाहेर जातात ,विश्वास एक थोडी उंच वाली सायकल घेतो आणि हाईटला छोटी असणारी सायकल तू चालव, असे सुलभाला सांगतो .सुलभाची सायकल घेऊन ,विश्वास समोर येतो आणि तिला म्हणतो, तू बस आपण पाहिला ट्राय करू, तसे सुलभा सायकलवर बसते, मागून विश्वास पकडतो .ती चालवायला सुरु करते, पहिल्यांदा हँडल धरायचे जजमेंट तिला येत नाही, दोन राऊंड मारल्यावर तिला कॉन्फिडन्स येतो, तशी ती विश्वासला म्हणते, चल आता ,तू पण तुझी सायकल घे. दोघे मिळून पूर्ण रिसॉर्टला आणि रिसॉर्ट च्या बाहेर पूर्ण सिटी ला राऊंड मारून येतात, दोघेही घामाने ओलेचिंब झालेले असतात, दोघे फ्रेश होतात आणि  रेस्टॉरंटमध्ये  नाश्ता करायला जातात ,तेव्हा  काल गोल्फ  कोर्समध्ये भेटलेली मंडळीही नाश्ता करायला आलेले असतात .विश्वास त्यांना हाय बोलतो, ते विश्वासला विचारतात ,काय मग येणार ना प्रॅक्टिसला . विश्वास ,हो येतो दहा वाजता. विश्वास गोल्फ कोर्स वरून खेळून येतो , अकरा वाजता त्यांना गाडी घ्यायला येणार असते ,भुशी डॅमचा प्लॅन असतो ,दोघे आवरुन खाली येतात ,गाडी येते ,त्यात बसून भुशी डॅमला जातात. पावसाळ्यात तेथे खूपच गर्दी असते, सध्या पाऊस नसल्यामुळे जास्त गर्दी नव्हती, पण त्यामधून पाणी पायऱ्यांवर वाहत होतं .दोघेही पायऱ्या चढत चढत वर पर्यंत गेले, खाली उतरताना सुलभाने पाण्यातच एका पायरीवर बसून घेतले, ते पाहून विश्वास म्हणाला, अगं हे काय?

 सुलभा- तूच तर म्हणाला ना, मनात येईल ते करायचे , मग मला असं वाटलं येथे बसावं पाण्यात ,म्हणून मी बसले  ,मला तर छान वाटते, तुला बसायचं असेल तर बसू शकतो. विश्वासही तिच्याशेजारी बसला, तिथे जवळच एक बुट्टेवाला होता ,सुलभा त्याच्याकडे पाहत होती ,

विश्वास- तुला बुट्टा खायचा  आहे का ?

 सुलभा मानेनेच हो बोलते, विश्वास जाऊन दोघांसाठी दोन बुट्टे घेऊन येतो ,त्यावर लिंबू मीठ आणि लाल तिखट लावलेले असते ,ते पाहून सुलभाच्या तोंडाला पाणी सुटते. दोघेही पाण्यात बसून  खाण्याची मजा लुटतात, ते खाल्ल्यावर गरमागरम वडापावची गाडी असते, त्यावर जाऊन , विश्वास वडापाव घेऊन येतो , खाली थंड पाणी  आणि त्या पाण्यात बसून  ,गरम-गरम वडापाव  खुपच छान लागत होता. आता दुपारचे दोन अडीच झालेले असतात ,ते परत हॉटेलवर येतात ,दोघांनाही भूक नसते. दोघेही टीव्ही पाहत पाहत आराम करतात ,अजून ते काय काय मजा करतात , हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, हसत रहा, आनंदात रहा ,भाग आवडला असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

 क्रमशः 

रूपाली थोरात

🎭 Series Post

View all