Login

सेकंड इनिंग भाग 17

Beautiful relationship between Husband and wife

सेकंड इनिंग भाग-17

सकाळी सोनावणे, विश्वास आणि महेशला बोलावून घेतात आणि त्यांना विचारतात ,प्रथमेश आणि तन्वीच लग्न ,दहा वाजताच आहे. त्यानंतर एक तासाने ,एका जोडप्याचं लग्न लावायचं आहे ,त्यांच्या मुलांनी रिक्वेस्ट केली की ,आमच्या आई-वडिलांचा 25 वा लग्नाचा वाढदिवस आहे ,तर स्टेजवर केला तर चालेल का? दोघेही एकमेकांकडे पाहत विचारतात, कोण आहेत ते? 

सोनावणे- मी तुम्हाला आत्ताच सांगू शकत नाही ,कारण त्यांच्या मुलांना त्यांना सरप्राईज द्यायचे आहे .

विश्वासच्या मनात विचार चमकून जातो, किती लकी आहे ते आई वडील, ज्यांची मुले असा विचार करतात .

दोन मिनिटात तो महेशकडे पाहून विचारतो ,चालेल ना ?तर महेशही म्हणतो ,तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर , मला काहीच प्रॉब्लेम नाही, असंही आपल्या लग्नात येणारी सगळी लोकं ,ही आपली जवळचीच माणसं आहेत .

सोनावणे- ठीक आहे मग, मी त्यांच्या मुलांना तसं कळवतो आणि तुम्ही दोघांनी परमिशन दिल्याबद्दल, धन्यवाद.

 सोनावणे कुणाला तरी फोन करून सांगा की, तुम्ही तुमच्या आई वडिलांचे लग्न करू शकता, मी त्यांची परमिशन मिळवली आहे . फोन ठेवल्यावर सोनावणे म्हणतात ,त्यांनी तुम्हाला धन्यवाद सांगायला सांगितले आहे .

सोनावणे- आवरलं का सगळ्यांचं ,नाश्ता रेडी आहे, परत लग्नाच्या वेळी गडबड नको.

 महेश -हो ,मी साऱ्या पाहुण्यांना सांगितला आहे की , आठ वाजेपर्यंत रेडी होऊन ,नाश्ता करायला जा. सोनावणे- बरं बरं 

विश्वास -तरी महिला मंडळाला, मेकअप करून नाश्ता करायला जायला, नऊ तरी वाजतील.

 महेश -हे बाकी खरं ,आपण आपलं पटकन आवरून मोकळे होऊ, पण या बायकांचं हेअर स्टाईल काय, साडी नेसणे काय ,मग मेकअप ,मग त्यांचा वेळ जाणारच ना. विश्वास- तेही खरं ,पण त्या तयार झाल्या की ,आपल्या मनात ,मात्र फुलपाखरू उडायला नाही लागत का?

 महेश -तुम्ही बाकी खूपच रोमँटिक आहात.

 विश्वास- हो ,आता एवढ्यात झालो आहे ,सांगेल तुम्हाला एक दिवस, ती एक खूप मोठी कहाणी आहे .

महेश -बरं बरं ,आरामात सांगा ,चला जाऊया तयारीला , असं म्हणून दोघेही तयारी करायला निघून जातात .

भक्ती, शक्ती आणि काकाची मुलगी तिघींनी लहंगे घातलेले असतात, आश्रमातल्या सगळ्या मुलींनीही लहंगे घातलेले असतात. भक्ती, शक्ती आणि काकाच्या मुलीने आश्रमातल्या सगळ्या मुलींना मेकअप करून दिला . आश्रमातल्या मुलींना तर ,आज आपण स्वर्गात असल्यासारखेच वाटत होते, त्या सारख्या सारख्या तिघींना ,थँक्यू थँक्यू म्हणत असतात. त्या तिघी हसत वेलकम म्हणतात .आश्रमातल्या सगळ्या मुलांनी कुर्ता पायजमा  आणि त्यावर जॅकेट घातलं होतं, असं पहिल्यांदा सगळे तयार झाले होते , सगळे एकमेकांना छान दिसतोय ,असे बोलत होते .एक-दोघांनी तर एकमेकांना चिमटा काढून पाहिले की ,आपण खरंच कशी कपडे घातले आहेत की ,आपण स्वप्नात आहोत , लग्नात सगळ्या जेन्ट्स मंडळींनी कुर्ता ,पायजमा आणि त्यावर जॅकेट घातलं होतं. सगळ्या मुलींनी लहंगे आणि बायकांनी नऊवारी साड्या घातल्या होत्या, प्रथमेशने लग्नासाठी धोतर, कुर्ता ,त्यावर जॅकेट आणि पगडी बांधली होती. तन्वीने छान आंबा कलरची नऊवारी साडी घातली होती आणि त्यावर नथ व मोत्याचे दागिने घातले होते ,अंबाडा घालून कानात वेल त्याला अडकवले होते, खूपच सुंदर दिसत होती.सगळ्या आजी लोकांनीही  नऊवारी साडी घातली होती, ज्या आजी व्हीलचेअरवर होत्या ,त्यांना गाऊन शिवले होते .सगळे नाश्ता करून मंडपात येऊन बसले, आश्रमातील मुलांनी छान नक्षीदार पिशव्या बनवून, त्यात अक्षता टाकल्या होत्या, त्या पिशव्या सगळ्यांना वाटण्यात आल्या .आश्रमातील मुली आलेल्या सगळ्या पाहुण्यांना, आरतीचे ताट आणि त्याबरोबर गुलाबाचे फुल असे देत होत्या .प्रत्येकजण लग्नामध्ये घरातले लग्न आहे ,असं समजून काम करत होते. जवळच्या आलेल्या पाहुण्यांना तर हा अनुभव खूपच वेगळा होता. आश्रमातल्या मुलांना गणपतीसाठी ढोल ताशे   वाजवायची सवय होती, म्हणून त्यांनी आग्रहाने प्रथमेशला विनंती केली होती की, तुझ्या वरातीत आम्हीच वाजवणार .प्रथमेशनेही ते मान्य केलं होतं .आता नऊ वाजले होते ,सगळेच तयार होऊन बाहेर आले होते , सुलभा आणि काकी यांनी पैठणी नऊवारी घातल्या होत्या, नाकात नथ,  अंबाडा आणि कपाळावर चंद्रकोर ,विश्वास तर सुलभा कडे पाहतच राहिला.

 प्रथमेश ने विश्वासला विचारले ,लक्ष कुठे आहे?

 विश्वास- तुझ्या आईकडे ,साक्षात लक्ष्मी दिसत आहे. प्रथमेश- आई कोणाची आहे ?

विश्वास -हो का, मी असं म्हणू शकतो, की बायको कोणाची आहे ?

दोघेही हसत असतात, तितक्यात काका तेथे येतो आणि म्हणतो चला वरात चालू करायची आहे. वरात चालू होणार म्हणून ,सुलभा आणि विश्वास प्रथमेशला घेऊन , आश्रमातल्या गणपती मंदिरात, पाया पडायला घेऊन गेले. गणपती दर्शन झाले, तसं मुलांनी ढोल ताशे वाजवायला सुरुवात केली, भक्ती ,शक्ती ,काकाची मुलं , आश्रमातील मुली, मुल, सगळेच नातेवाईक वरातीत नाचायला लागले. प्रथमेशला त्याच्या एका मित्राने खांद्यावर उचलून घेतले आणि बेधुंद होऊन नाचले . मुलांनी विश्वास आणि सुलभाला त्यांच्याबरोबर डान्स करायला बोलावले ,वाजत गाजत वरात मांडवापर्यंत येते. तिथे सुवर्णा आणि महेश स्वागतासाठी उभे असतात, सुवर्णा प्रथमेशला ओवाळते आणि त्याचे नाक हातात पकडण्याचा प्रयत्न करते ,प्रथमेश पटकन बाजूला होतो, तसे सगळे हसतात .प्रथमेश सुवर्णाच्या ताटात ओवाळणी म्हणून, हजार रुपये टाकतो आणि सर्व वडीलधार्‍या लोकांच्या पाया पडतो. तितक्यात तन्वीला घेऊन तिच्या मैत्रिणी तिथे येतात, सनई वाजत असते आणि त्यामागून  तन्वी आणि प्रथमेश मंडपात जातात.स्टेज वर गेल्यावर दोघांमध्ये अंतरपाट धरला जातो ,प्रथमेश वर टाचा उचलून तन्वीला पाहण्याचा प्रयत्न करतो.शक्ती त्याला म्हणते, आता पाच मिनिटानंतर, ती कायमची तुझीच होणार आहे. प्रथमेश म्हणतो, पण ,असं वाकून बघण्यात देखील एक थ्रिल आहे, मला ते अनुभवू  दे .शक्ती म्हणते ,बरं बरं. शेवटची मंगलाष्टक होते आणि बाहेर मुलं ढोल-ताशे वाजवायला सुरुवात करतात. प्रथमेश तन्वी एकमेकांच्या गळ्यात हार घालतात, गुच्छ एकमेकांना देतात, आलेले सगळे  पाहुणे  रांगेत उभे राहून त्यांना भेटतात, आता सप्तपदी होम हवन आणि मंगळसूत्र घालण्याचा कार्यक्रम होतो. हे सगळं झाल्यानंतर, प्रथमेश हातात माईक घेतो आणि बोलतो ,आमच्याकडे तुम्हा सर्वांसाठी एक सरप्राईज आहे. इथे अजून एका जोडप्याचे लग्न होणार आहे, तरी तुम्ही सर्वांनी त्या लग्नासाठी उपस्थित रहावे, ही विनंती. लग्नाला अर्ध्यातासातच सुरुवात होईल, आलेले पाहुणे आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात आणि विचारतात , कोणाचं लग्न आहे ?

सोनावणे पुढे येत म्हणतात ,ते एक सरप्राईज आहे आणि मुलांनी त्यांच्या आईवडिलांसाठी अरेंज केलेलं आहे, थोडा धीर धरा समजेल, तोपर्यंत सगळ्यांनी बसल्या जागेवर स्टार्टर आणि कोल्ड्रिंक चा आस्वाद घ्या .आता सगळ्यांनाच उत्सुकता असते ,की कुणाचे लग्न आहे, ते जाणून घेण्यासाठी वाचत रहा, हसत रहा आणि आनंदात रहा .

भाग आवडला असेल  तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

क्रमशः

 रूपाली थोरात

🎭 Series Post

View all