सेकंड इनिंग-भाग 11
सुलभा आणि विश्वास दोघे आपल्या रूममध्ये जातात .
सुलभा-छान झाला ना कार्यक्रम
विश्वास-हो,छोटा आणि सुटसुटीत
सुलभा- पण ,तू मॅचिंग कसं काय झालं ते सांग
विश्वास- अगं, महेश दुपारी माॅलमध्ये शाॅपिंग जाणार होता, त्याने विचारले, येता का ,आता व्याहयाने ते पण आताच झालेल्या विचारले तर, नाही कसं म्हणता येणार, म्हणून गेलो. पण त्यांच्या बरोबर फिरलो तर निदान त्यांना जाणून तरी घेता आले.
सुलभा- काय जाणून घ्यायचे त्यात
विश्वास- असं कसं म्हणू शकते तू ,आता इथून पुढे नेहमीच भेटणार ,तर आवडी निवडी जाणून घेण्यासाठी, दुसर काही विशेष नाही. आज निदान एवढं तरी कळल की, ते आपल्या बरोबर छान मजा करत होते.
सुलभा- आपल्या सारखेच आहे ,हे पाहून मला ही बर वाटलं.
विश्वास- आता लग्नाच्या तयारीला लागले पाहिजे , असही मुलांनी आपलं काम हलकं केले आहे.
सुलभा- माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे, प्रथम ती अंमलात पण आणता येईल का याची चौकशी करून मग सगळ्यांशी सविस्तर चर्चा करता येईल.
विश्वास- मला तर सांग, काय चालले आहे तुझ्या डोक्यात
सुलभा- माहित नाही, तुला ते कितपत योग्य वाटेल.
विश्वास- नसेल सांगायचे तर नको सांगू
सुलभा- माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे की,जर आपण हे लग्न आश्रमात केले, तर तेथील मुलांना आणि वृद्ध लोकांना सामावून घेता येईल, त्यांच्या बरोबर असा वेळ कोणी घालवत नाही, प्रत्येक जण मदत केली म्हणजे खूप काही केले असे वाटते, पण त्यांच्या बरोबर वेळ घालवण्याचा विचार कुणी करत नाही, त्यांनाही कुटुंबात वेळ घालवावा असे वाटते . पण त्यांच दुर्दैव की,त्यांच्या कुटुंबियांमुळे ते अशा परिस्थितीत आहेत.
विश्वास- इतके दिवस मी विचार करत होतो की, तू जरा जास्तच इमोशनल आहे, पण जेव्हा तन्वी आणि प्रथमेश यांनी साध्या लग्नाची मागणी केली, तेव्हा असे लक्षात आले की, हे लहान असून यांचे विचार किती चांगले आहेत, प्रथमेशने ही गोष्ट तुझ्याकडून आत्मसात केली आहे, हया गोष्टीचा थोडा हेवा वाटला, पण नंतर विचार केला तेव्हा, हे लक्षात आले की, तू तर माझी अर्धांगिनी आहे,म्हणून मला तुझा अभिमान वाटतो, हे कळायला थोडा वेळ लागला, पण हरकत नाही, देर आये दुरुस्त आये.
सुलभा- मी एकदा आश्रमात बोलून बघते ,मग तन्वीच्या घरच्यांना बोलावून घेऊन, त्यांच म्हणणं विचारात घेऊ.
विश्वास- हो चालेल ,तू बघ चौकशी करून, मग बघू ,पण एक सांगू, आज तू खूप छान दिसत होती आणि गेम खेळताना तू फुगा पटकन सावरला म्हणून बर झालं, नाही तर पहिल्या फेरीत आपण बाद झालो असतो.
सुलभा- हो ,संसार असाच असतो, एकमेकांनी एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती दोघांकडे असेल, तर संसाराचा रथ व्यवस्थित चालू राहील, पण तू जिंकण्यासाठी जे वागलास, ते खूप चुकीचे होते, असं नाही वाटत का तुला
विश्वास- मी काय केलं ( मनातल्या मनात बोलतो ,हिला कसं कळलं)
सुलभा- तू असा नव्हतास ,मीच तुला बदलण्यास भाग पाडले, त्यामुळे तू जरा जास्तच मनावर घेतलं आहे,जुईने मला सांगितलं की, तू काय केलं ते ,पण ती मुलगी खरंच चांगली ,मला म्हणाली ,काकांना काही बोलू नका ,मला त्यांच्या डोळयात, तुमच्यासाठी खूप प्रेम दिसलं, मला जे दिसत नाही, ते तिला बरं दिसलं.
विश्वास- तू तुझ्या कामात व्यस्त असतेस ,तुला माझ्या डोळयात बघायला कुठे वेळ असतो, की तुला दिसेल.
सुलभा- कुणी तरी दिवसेंदिवस जास्तच रोमँटीक होत चालले आहे, असं म्हणत ती त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात बघत त्याला डोळा मारते ,तसं तो तिच्याकडे पाहत राहतो,ती जवळ जाऊन त्याच्या डोळ्यासमोर हात हालवत.
विश्वास- क्या अदा ,क्या जलवे तेरे पारो
सुलभा- हमने तुमको देखा, तुमने हमको देखा ऐसे ,हम तुम सनम सातों जनम मिलते रहे हो जैसे
विश्वास- बाहों में चली आओ असं म्हणत तो त्याचे दोन्ही हात पसरून उभा राहिला, तशी ती ही त्याला साथ देते आणि त्याच्या मिठीत विसावते.
दुस-या दिवशी सुलभा आश्रमात बोलून घेते ,ते लोक तयार होतात, ती त्यांना सांगते, मी घरच्यांशी बोलून काय आणि कसं करायचं ते ठरवते आणि मग भेटायला येते ,ते चालेल बोलतात, तन्वीच्या घरच्यांना दुस-या दिवशी बोलावून घेतले , सगळ्यांनी विचार विनिमय करून लग्न आश्रमात करण्याचा निर्णय घेण्यात आला, लग्न वैदिक पध्दतीने करायचं ठरवलं, म्हणजे एका दिवसांत लग्नाचे विधी संपन्न होतील ,कसं होतं आगळया वेगळ्या पद्धतीने लग्न हे पाहूया आपण पुढच्या भागात.
क्रमशः
सर्वात अगोदर क्षमस्व, भाग खूप उशीरा पोस्ट केल्याबद्दल , कथा डोक्यात आहे ,पण काही कारणांमुळे लिहायला वेळ मिळत नव्हता, पुढचे भाग दिवाळी नंतर येतील आणि वेळेवर येतील.
भाग आवडला असेल तर, नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या. धन्यवाद.
रूपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा