Login

सेकंड इनिंग-भाग 9

Beautiful relation between husband and wife

सेकंड इनिंग-भाग 9

रात्री बारा वाजता प्रथमेशच्या रुमचा दरवाजा वाजतो ,हातात फोन घेऊनच दार उघडतो,तसं भक्ती ,शक्ती ,सुलभा आणि विश्वास एकत्रच जोरात ओरडतात ,तन्वी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तन्वी दोन मिनीट गोंधळते ,पण लक्षात येताच सगळ्यांना थैंक यू म्हणते.तसं 

विश्वास -चालू द्या तुमचं ,हे दिवस छान एन्जॉय करून घ्या ,लग्न झाल्यावर परत येणार नाही.

असं म्हणत ,सगळे आपापल्या रूम मध्ये निघून जातात.

तन्वी-दोन मिनिटं मी पूर्ण गोंधळून गेले होते,पण नंतर लक्षात आलं 

प्रथमेश - अग त्यांनी तुला फोन लावला असेल ,बिझी लागला असेल म्हणून ते इकडे आले ,त्यांना माहित असणार की,मीच तुझ्याशी बोलत असेल,चांगले ओळखतो मी त्यांना ,म्हणूनच सोडून जायचं जिवावर येत आहे .

तन्वी -मग आपण तिथेच राहूया ना,मला आवडेल सगळ्यां बरोबर राहायला.

प्रथमेश-मलाही ,पण बाबाने सगळ्यांना दिलेले वचन पूर्ण करायचं आहे ,त्याला खोटं नाही पाडायचं आणि आपण जर दुस-या शहरात जॉबला असतो ,तर आपण वेगळे राहिलोच असतो,आता तर आपण एकाच शहरात आहोत ,कधीही एकमेकांकडे येऊ जाऊ शकतो ,त्यांना ही आपल्या शिवाय नाही करमणार.

तन्वी -तू जसं म्हणशील तसं ,मी कायम तुझ्या बरोबर आहे,आता मी फोन ठेवते ,दुसरे फोन येत आहे आणि संकेत दार वाजवतोय,भेटू उद्या सकाळी.

प्रथमेश-बाय ,गुड नाईट आणि वन्स अगेन हैप्पी बर्थ डे,लव्ह यू

तन्वी-लव्ह यू टू ,असं म्हणत दार उघडते.

संकेत-काय मग स्पेशल वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या वाटतं 

तन्वी लाजत -तू जरा जास्त फाजील झाला आहेस

संकेत -बरं चल ,आई बाबा वाट पाहत आहेत हॉल मध्ये ,केक कट करायचा आहे.

दोघंही हॉल मध्ये जातात.

महेश-वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो .

तन्वी-सगळं तुमच्या हातात आहे 

महेश -तुझ्यासाठी संध्याकाळी हॉटेल मध्ये पार्टी ठेवली आहे ,प्रथमेशच्या घरच्यांनाही बोलावलं आहे ,संध्याकाळी लवकर ऑफिस मधून घरी ये.

तन्वी - हो बाबा.

सुवर्णा-वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा 

तन्वी-थैंक यू मम्मा 

संकेत- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 

तन्वी -थैंक्स ब्रो 

मग सगळे मिळून केक कट करतात.सगळे तन्वीला भरवतात ,तीही सगळ्यांना भरवते.

---------------------------------------------------

भक्ती - आपण दादाला सोडून कसं राहणार आहोत ,माहित नाही 

शक्ती-तू तर असं बोलते ,जसं तो वनात जाणार आहे,बाबानी निर्णय घेतला,म्हणजे योग्यच असणार आणि इथेच तर राहणार आहेत,कधीही येऊ शकतात ,थोडी त्यांनाही एकमेकांना समजून घेण्यासाठी प्रायव्हसी मिळेल ,मलाही आवडेल असं 

भक्ती -आधी शिक्षणाचा विचार करा ,नंतर प्रायव्हसीचा ,काय?

शक्ती -हो गं बाई,तुला काय वाटतं की,मी लगेच लग्न करणार आहे का,पहिलं तुझं मग माझं,ते जाऊ दे,तुला कॉलेज मध्ये कुणी आवडतं की नाही .

भक्ती -अगं अजून तरी नाही ,असं कुणी भेटले तर तुलाच सांगेल पहिलं 

शक्ती -कुणी त्रास देत असेल ,तरी सांगू शकते ,हम दो भाई मिलके उसकी अच्छे से खातिरदारी करु ,तो कधी विसरणार नाही.

भक्ती -हं ,ते तर आहेच ,म्हणून तर बोलायला भिती वाटते ,तोंडातल्या तोंडात पुटपुटते.

शक्ती -काय म्हणालीस 

भक्ती -अगं काही नाही ,झोप आता 

शक्ती -उद्या दिप्तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच आपण सगळं जमलं असतं,तर एंगेजमेंट केली असती,मजा आली असती ना ,पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना ,निदान त्यांच्या लग्नाला तिच्या वडिलांकडून संमती मिळू दे ,खूप झालं.

------------------------------------------------------

सुलभा -बरं झालं तुम्ही सरप्राइज द्यायच ठरवलं,मी उद्या सुट्टी घेतली आहे,पण नेहमीच्याच वेळेत घरातून बाहेर पडेल,तसं मी सुवर्णा ताईंना सांगितलं आहे ,दोघी मिळून खरेदी करून  आणि त्या बोलत होत्या ,सर्व लेडीज साठी गाऊनची थीम आहे आणि जेन्टस साठी टि शर्ट जीन्स .

विश्वास -मग तुला घ्यायचा असेल तर घे एखादा गाऊन 

सुलभा -अरे आपण डेट वर घातलेला आहे की ,मग कशाला ,एक छानस्ं जैकेट प्रथमेश साठी घेते ,म्हणजे जरा उठून  वाटेल.

विश्वास- मघाशी प्रथमेशला बोलताना पाहून,आपले दिवस आठवले ,लग्न जमल्यावर आपल्याकडे दोन महिने होते ,त्या दोन महिन्यात रोज दहा वाजता मी ऑफिस मध्ये पोहोचल्या पोहोचल्या पहिलं तुला फोन लावायचो ,जास्त नाही बोलायचो पण ओढ असायची.

सुलभा -एक तर त्या वेळी आई वडिलांकडे फोन नव्हता,म्हणून शेजारच्यांच्या घरात मी दहाला पाच मिनिटे कमी असतानाच जाऊन बसायची ,उगाच त्यांना मला बोलवायचा त्रास कशाला ,मलाही तुझ्या फोनची ओढ असायची ,पण आजुबाजूला सगळे असल्यामुळे नीट बोलता नाही यायचं ,म्हणून मी पण नुसती हो ,नाही ,हं एवढंच बोलायची . तेव्हा नुकतेच मी आपल्या दोघांच नाव एकत्र करुन vishwasul@yahoo.com मेल अकौंट ओपन केलं होतं आणि तुला मेल पाठवायची .

विश्वास- आठवतय ना ,पण रोज मेल नाही करायची ,मी मात्र रोज वाट पाहायचो ,अजून आहे का ते तुझं अकौंट 

सुलभा-हो आहे ना ,रोज काय कारण सांगून सायबर काफेत जाणार होती ,बरं ते काही घराजवळ नव्हतं,गावात जावं लागायचं,आता तर घरोघरी कंप्यूटर झाले आहे.ते दोन महिने एकदम छान वाटत होतं,अगदी स्वर्गासारखे ,मनात नेहमी तुझा विचार असायचा.

विश्वास -माझीही काही वेगळी परिस्थिती नव्हती ,म्हणून तर मघाशी प्रथमेशला बोललो ,हे दिवस एन्जॉय कर ,परत येत नाही .

सुलभा - मी तुला पत्र लिहायच्या ऐवजी मेल लिहायला हवा होता ,लक्षातच आलं नाही .

विश्वास- पत्रामुळे जास्त मजा आली ,मेल मध्ये नसती आली ,ऑफिसच काही तरी वाचतोय असं वाटलं असतं.

सुलभा-बरं बरं,उद्या जरा लवकर ये.

विश्वास -हो मैडम ,चला झोपा आता.

------------------------------------------------------------

सुवर्णा- मला सुलभा ताईंचा फोन आला होता ,आम्ही उद्या जाऊन खरेदी करुन येऊ ,त्यांनी उद्या सुट्टी घेतली आहे.

महेश -हो ,पण तन्वीला तिच्या सरप्राइज बद्दल काही कळता कामा नये .

सुवर्णा- हो ,मी नाही सांगणार ,तुम्हीच सांगू नका म्हणजे झालं 

------------------------------------------------------------------

सकाळी प्रथमेश आणि तन्वी भेटतात ,तो तिला रेड रोज बुके देतो ,दोघे मिळून ज्यूस पितात ,मग तो तिला छान गाऊन घेऊन देतो ,ती नाही म्हणत असते ,पण आईवडिलांनी सांगितल आहे,म्हटल्यावर घेते.

दोघांनीही सुट्टी टाकलेली असते ,गणपतीच्या मंदिरात जाऊन येतात आणि दुपारीच आपल्या घरी जातात.थोडी विश्रांती पण घेतली पाहिजे म्हणून.

आता सगळेच संध्याकाळच्या पार्टीसाठी उत्सुक असतात. प्रथमेशच्या काका काकूलाही निमंत्रण असतं.

------------------------------------------------------

महेश-विश्वासराव मी दुपारीच घरी चाललो आहे,तुम्ही काय घालणार आहात 

विश्वास-ही तर बोलत होती,गाऊन आणि जीन्स टीशर्ट थीम आहे 

महेश -हो ,तुम्ही ब्लू कलर टि शर्ट घाला मी पिंक कलर घालतो, आता जाता जाता छान स्टायलीश खरेदी करतो ,येताय का तुम्ही .

विश्वास -ठिक आहे ,भेटू मॉलमध्ये 

दोघे मॉलमध्ये भेटतात ,दोघांना टी शर्ट फायनल करतात ,नंतर बायकांना त्याच्यावर मैचींग असे गाऊन घेतात आणि त्यावर मैचींग तिथल्या सेल्समनच्या मदतीने सेट घेतात ,त्या सेल्समनला त्यांची मदत करताना खूप छान वाटल,कारण या वयात ते आपल्या बायकोचा एवढा विचार करत आहे ,हे पाहून तिला छान वाटलं.

दोघे सैंडविच खातात आणि मग घरी जातात .

घरी गेल्यावर त्याच्या हातात पिशवी पाहून,

सुलभा -तू काय खरेदी करुन आलास 

विश्वास -तुझ्यासाठी सरप्राइज 

सुलभा -तू जरा जास्त खर्च करतो असं नाही वाटत का तुला 

विश्वास -ते जाऊ दे ,तुला आवडलं का सांग 

सुलभा -अरे काय हे 

विश्वास -आपल्या दोघांच मैचिंग व्हाव म्हणून,तिथे गेल्यावर तुझ्यासाठी अजून एक सरप्राईस आहे ,जे तुला पार्टीत गेल्यावर कळेल.

सुलभा -आता अजून काय नवीन 

विश्वास -कळेल गं  गेल्यावर 

तितक्यात भक्ती येते -काय बाबा फक्त तुमच्या डार्लिंगला गाऊन आणला आणि तुमच्या प्रिन्सेसने काय केलं 

विश्वास -तुमच्याकडे व्हरायटी आहे ,पण माझ्या डार्लिंग कडे एकच होता म्हणून आणि तुला तर माहितच आहे ,एव्हरीथिंग इस फ़ेयर इन लव्ह ऐण्ड वॉर. बरोबर ना प्रिन्सेस.

भक्ती -सही कहा बाबा ,मी तर अशीच मजा करत होते 

सुलभा -चला आवरा पटापट 

सगळे आवरून रेडी होतात .सुलभा पण गाऊन आणि त्यावरची ज्वेलरी घालून येते ,दोघांना असं पाहून तिघे हसायला लागतात.

प्रथमेश -पहिल्यांदा असं तुम्हाला मैचिंग घालताना पाहीलं,नेहमी असचं घालत जा ,छान दिसताय दोघं.

सुलभा -झालं का तुमचं सुरु ,चला उशीर होत आहे .

सगळे गाडीत बसतात ,हॉल मध्ये पोहोचतात .

आता पोहोचल्यावर काय सरप्राईज मिळणार आहे,ते जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.

क्रमशः 

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all