सेकंड इनिंग-भाग 8
तन्वी आणि तिच्या घरचे सगळेच गाडीत शांत असतात .घरात आल्यावर
तन्वी- बाबा ,तुम्ही विश्वास काकांना शेवटी जे बोललात ,त्याचा अर्थ मला नाही समजला ,अचानक असं काय झालं तुम्हाला.
महेश- मुलीच लग्न करायचं म्हणजे चौकशी केली पाहिजे ,असं चौकशी न करता लग्न करून दिले आणि पुढे काही झालं तर आपण चूक केली,असं नको वाटायला,म्हणून मी वेळ मागून घेतला,दुसरं काही नाही.
तन्वी-पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टीची कल्पना आधीच दिली होती,मग अचानक तुम्हाला काय खटकलं आणि एक सांगते ,मी लग्न केलं तर प्रथमेश बरोबर ,नाही तर लग्नच नाही करणार.
महेश - मी फक्त विचार करायला वेळ मागितला ,तर तू एवढं बोलुन मोकळी झालीस आणि तुला आम्ही तळहाताच्या फोडासारखं वाढवलं ,असं कुणाच्याही हवाली करु का लगेच
तन्वी -तो कुणीही नाही ,प्रथमेश आहे,मी त्याला चांगली ओळखते .
महेश-पण त्याचे काका ज्या पध्दतीने बोलले ,त्यामुळे मी अस्वस्थ झालो ,सगळ्यां समोर बोलणं चांगल वाटणार नाही,म्हणून मी तिथे काही बोललो नाही ,माझ्या मनात एक दोन शंका आहेत ,त्याचं निरसन झालं की माझी लग्नाला कोणतीच हरकत नाही ,तुझा बाप ह्या नात्याने ,तू मला एवढा अधिकार देशील,अशी अपेक्षा आहे.
तन्वी-काय हो बाबा ,आहे ना तुम्हाला अधिकार ,पण मी प्रथमेश शिवाय आणि तुमच्या शिवाय नाही जगू शकत,दोघांपैकी एकाला निवडायची वेळ येऊ देऊ नका ,म्हणजे झालं
महेश -देव करो आणि तसचं होवो ,माझीही तिच इच्छा आहे.
---------------------------------------------
प्रथमेश- म्हणून मी बोलत होतो की,काकाला बोलवायची काही गरज नाही ,झालं तुमच्या मनासारखं
सुलभा -हे बघ ,आता तेही आपल्या परिवाराचा हिस्सा होणार आहेत ,आज ना उद्या त्यांना कळालच असतं,कोण कसं आहे आणि तू एवढं टेंशन घेऊ नको ,ते नाही म्हणाले नाही ,फक्त म्हणाले ,थोडा वेळ हवा आहे ,मी जर त्यांच्या जागी असते तर असचं वागले असते,शेवटी त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे,तुम्हाला नाही कळणार ,जेव्हा तुम्ही आईवडील व्हाल ,तेव्हा कळेल,आज ते जे बोलले होते,ते असं का बोलले .
विश्वास-प्रथमेश मला पण सुलभा जे बोलली ,ते पटतय ,आपण त्यांच्या उत्तराची वाट पाहू ,त्यांच्या शंकांचे निरसन करू,शेवटी असं करण्यामागे चांगला उद्देश आहे ,आपण तो समजून घ्यायला हवा.
-----------------------------------------------
तन्वी - मला तर कळत नाही,बाबांना अचानक काय झालं
प्रथमेश-मला वाटतं,काका बोलला,त्यावरुन त्यांच माइंड बदललं
तन्वी-पण,ते नाही म्हणाले नाही,फक्त म्हणाले, मला थोडा वेळ हवा आहे ,तेवढा तर देऊ शकतो ना आपण
प्रथमेश-आई बाबाही तेच म्हणाले,ते जर त्यांच्या जागी असते ,तर असच वागले असते ,त्यामुळे तू टेंशन घेऊ नकोस,सगळं व्यवस्थित होईल.
तन्वी-तू मला सांगत आहेस ,पण तुला पण टेंशन आलं आहे ना
प्रथमेश -हो गं, जे होईल ते चांगलं होईल ,नको काळजी करू
तन्वी- हं, गुड नाईट
प्रथमेश-गुड नाईट
पण दोघांनाही टेंशनमुळे झोप येत नसते ,नंतर विचार करता करता झोप लागते.
--------------------------------------------
दुस-या दिवशी महेशचा फोन वाजतो .
काका -हल्लो,मी प्रथमेशचा काका बोलतोय,तुम्हाला काल मी जे बोललो ,त्याचा राग आला असेल ,तुम्हाला माहित नाही ,विश्वास आणि त्याची बायको किती भामटे आहे,प्रथमेश कडून सगळा पगार घेतात ,तो आपला भोळा भाबडा आणि त्यांना त्याच्या घराचं भाडं मिळत आहे ,म्हणून त्याला आपल्याकडेच ठेवून घेतलं आहे ,तुम्ही लग्न करताना त्यांना हिच अट घाला की ,त्यांनी वेगळे राहिले पाहिजे,मी एवढा त्याचा सख्खा काका असून,पाहीलं ना तुम्ही ,माझ्याशी कसा वागतो .
महेश-तुम्ही का नाही सांभाळलं प्रथमेशला ?
काका -मी सांभाळायला तयार होतो , पण प्रथमेश स्वत: त्यांच्या कडे राहायला गेला ,काय जादू केली होती,काय माहित त्या विश्वासने त्याच्यावर माहित नाही आणि मावशी काका म्हणायच्या ऐवजी पोराला जबरदस्ती आई बाबा म्हणायला लावतात .
महेश- बरं बरं,मग मी आता काय करायला पाहिजे ,असं तुम्हाला वाटतं
काका -प्रथमेशला सांगा ,लग्न झाल्यावर एकतर माझ्याकडे राहा किंवा त्याच्या स्वत:च्या फ्लैट मध्ये .
महेश -पण त्यासाठी तर विश्वासराव तयार आहेत ना?
काका - अहो ,तो नुसता तसं म्हणतोय,त्याचा असा काही विचार नाही ,मग त्याला भाडे आणि प्रथमेशचा पगार कसा मिळेल.
महेश- बरं बरं,बरं झालं तुम्ही मला पूर्ण कल्पना दिली.
--------------------------------------------------
महेश -हल्लो,प्रथमेश मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे थोडं
प्रथमेश- हो चालेल ,कुठे भेटायचं
महेश-मी कळवतो तुला,पण आपल्या या भेटीबद्दल तन्वीला आणि तुझ्या आई वडिलांना काही सांगू नको.
प्रथमेश-ठिक आहे ,असं म्हणून तो फोन ठेवतो खरा ,पण त्याला टेंशन येतं थोडं,पण तो विचार करतो ,बघू संध्याकाळी काय होईल ते.
संध्याकाळी प्रथमेश त्यांनी पाठवलेल्या कॉफी शॉपच्या पत्त्यावर पोहोचतो,ते एका टेबलवर बसलेले होते. तो तिथे जात त्यांच्या समोर बसतो.
महेश-तुला आश्चर्य वाटलं असेल ना ,मी तुला असं बोलावलं म्हणून.
प्रथमेश-हं ,तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे,पण बोला तुम्हाला काय बोलायचं आहे.
तितक्यात वेटर येतो ,ते कॉफी ऑर्डर करतात.
महेश-तुझ्या काकांचा फोन आला होता आणि त्यांनी जे सांगितले ,ते सगळं त्याने प्रथमेशला सांगितलं,तू सांग आता मला ,यातलं खरं किती आणि खोटं किती.
प्रथमेश- मीच मावशी काकांबरोबर राहायचा हट्ट केला होता,कारण त्यांच्या डोळ्यांत फक्त मला प्रेम दिसत होतं ,हे खरं आहे की ,माझं घर भाड्याने दिले आहे आणि त्याचे पैसे माझ्या अकाउंटला जमा होतात ,त्यातला एक पैसाही ते दोघे घेत नाही ,मला अजून पर्यंत त्यांनी एकदाही विचारलं नाही की ,मला किती पगार आहे आणि पैसे तर कधीच मागितले नाही,उलट माझ्या काकाला असे वाटत होते की,मी जर त्यांच्या बरोबर राहायला गेलो असतो तर ते माझ्या फ्लैट मध्ये राहणार होते आणि स्वत:चा फ्लैट भाड्याने देणार होते ,मी जे काही सांगत आहे ,ते खरं आहे,आता पुढचा निर्णय तुमचा असेल .
मी तुम्हाला किंवा माझ्या आई वडिलांना दुखवून लग्न करु शकत नाही,आम्हाला तुमचाही आशिर्वाद हवा आहे ,बाकी तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात ,चूक काय आणि बरोबर काय ते तुम्हाला चांगले समजते.
महेश-तू लग्नानंतर वेगळा राहण्यासाठी तयार आहेस का?
प्रथमेश- आधी तयार नव्हतो ,पण बाबानी समजावल्यावर तयार झालो
महेश-असं काय सांगितल बाबानी
प्रथमेश- त्यांनी सांगितल की,मी जर नोकरीच्या निमित्ताने
दुस-या शहरात राहिलो असतो तर त्यांनी मला जाऊ दिले असते आणि त्यांनी काही लोकांना जो शब्द दिला आहे ,तो पाळण्यासाठी मदत कर असं बोलले ,हे घर सदैव तुझं आहे ,तू कधीही येऊ शकतो आणि आपण जरी वेगळे राहिलो ,तरी एकाच शहरात आहोत ,एकमेकांकडे जाऊ येऊ शकतो आणि त्यांनी आता पर्यंत जे काही केलं ,ते निस्वार्थपणे केलं ,त्यांच्याकडे कुणी बोट दाखवलं,तर ते मलाही आवडणार नाही.
महेश -तू माझ्या सगळ्या शंकांच निरसन केले,त्याबद्दल धन्यवाद ,मी तुझ्या बाबांशी फोन करून बोलतो.
----------------------------------------------------
महेश- हल्लो विश्वासराव,मी तन्वीचा बाबा बोलतोय
विश्वास- हो बोला ,महेशराव
दोघांमध्ये बराच वेळ चर्चा होते ,त्यानंतर दोघेही फोन ठेवतात .
घरातले सगळे विश्वास कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत असतात.
विश्वास- असे काय पाहताय सगळे
सुलभा -तन्वीच्या बाबांचा फोन होता ना ,काय बोलले ते ?
विश्वास - थोडा वेळ लागेल ,विचार करायला ,पण उद्या तन्वीच्या वाढदिवसाला आपल्याला एका हॉटेलच्या हॉलवर बोलावले आहे .
सुलभा -किती वेळ घेणार आहे,ते निर्णय द्यायला माहित नाही.
प्रथमेशला वाटत असतं,त्यांच्यात झालेलं सगळं बोलणं सांगाव,
पण तन्वीच्या बाबांनी भेटलो ,हे कुणाला सांगू नकोस,हे आठवतं आणि शांत बसतो .
विश्वास -उद्या रात्री आठ वाजता आपल्याला निघायचं आहे,काय मग चिरंजीव काही गिफ्ट घेतलं की नाही तिला ,ते जेव्हा निर्णय सांगतील,तेव्हाच तेव्हा बघू,सध्या तिला छानसा गाऊन घेऊन दे एखादा ,हवं तर शक्ती ,भक्तीला घेऊन जा सोबत चॉइस करायला.
भक्ती-तन्वीलाच ने आणि काय हो बाबा ,आम्ही कशाला कबाब में हड्डी
प्रथमेश -तसही आम्ही उद्या सकाळी भेटणार आहोत,तेव्हा घेईल.
शक्ती-रात्री बारा वाजता फोन करणार असशील,हो ना.
सुलभा - करु दे ग ,हे दिवसही एन्जॉय करायचे असतात.
शक्ती - बालका,माता सांगत आहे ,तसं एन्जॉय करा.
प्रथमेश - जसा तुमचा आदेश शक्ती माते
काय बोलत असतील महेश आणि विश्वास एकमेकांशी इतक्या वेळ ,हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा आणि अभिप्राय अवश्य द्या .
क्रमशः
रुपाली थोरात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा