सेकंड इनिंग-भाग 7

Beautiful relation between husband and wife

सेकंड इनिंग-भाग 7

संध्याकाळी प्रथमेश घरी आल्यावर सांगतो ,ती आज तिच्या आई वडिलांशी बोलणार आहे .

प्रथमेश-बाबा ,ते लोक लग्नाला तयार होतील ना ,टेंशन आले आहे 

विश्वास- अरे त्यात टेंशन काय घ्यायचं,मिया बीबी राजी ,तो क्या करेगा काजी 

प्रथमेश-सगळेच तुमच्या सारखे कुल नसतात ,तिचे बाबा जरा कडक आहेत,म्हणून भिती वाटते .

भक्ती-हो बाबा खरचं ,आम्ही तुमच्याशी सगळं मोकळेपणाने बोलतो,तसं माझ्या मैत्रिणी त्यांच्या आई वडिलांशी नाही बोलत,मी जेव्हा आपल्या बद्दल सांगते ,तेव्हा त्या मला म्हणतात ,यू आर लकी ,तुझे आईवडील तुमचा विचार घेतात ,तुम्हाला हवं ते करून देतात ,तुमच्या वर विश्वास ठेवतात.

विश्वास- अरे असं काही नाही,तुम्ही आता मोठे झाले आहात आणि तुम्ही स्वत:चे निर्णय स्वत: घेतल्याशिवाय,तुमच्यात आत्मविश्वास निर्माण कसा होणार आणि प्रथमेश नको एवढा विचार करू,आम्ही आहोत ना.

प्रथमेश-ते तर आहातच .

जेवतानाही डायनिंग टेबलावर प्रथमेशचे जेवताना लक्ष नव्हते.

भक्ती आणि शक्ती त्याच्या कडे बघत डोळा मारतात .

भक्ती - बाबा,माझ्या क्लास मध्ये एक मुलगा आहे ,त्याने मला प्रपोज केलं आहे,काय सांगू

प्रथमेश-काय सांगू काय विचारतेस ,एक कानाखाली देईल मी त्याच्या ,अजून शिकतोय तो आणि तूही 

शक्ती - अरे विचार तरी कोण आहे ,काय करतो ,बाबा काल तुम्ही पण याला तन्वी बद्दल असचं बोलायला हवं होतं ,असं ती विश्वास कडे डोळा मारत बोलते.

विश्वास-  त्याला उद्या घरी बोलाव ,मी त्याच्याशी बोलतो ,मग ठरवू काय ते .

प्रथमेश- मी पण असेल तिथे ,आज काल मुलं फक्त फिरवण्यासाठी मुलींना प्रपोज करतात ,ते सिरीयस नसतात.म्हणून म्हणतोय मी.

शक्ती -तू केलं की चालतं,मी केलं की नाही चालणार,बाबा तुम्ही तर म्हणता ना की,आपल्या घरात मुलगा मुलगी भेदभाव नाही.

प्रथमेश- हे बघ ,मी स्वत:च्या पायावर आधी उभा राहिलो आणि मग मी या गोष्टिंचा विचार केला ,ते ही तन्वीची संमती होती म्हणून ,आता तुझं जे वय आहे ,त्यात तू करिअर वर फोकस केला पाहिजे.

शक्ती - हो ,मी असचं तुझं मन वळवण्यासाठी विषय काढला ,नको टेंशन घेऊ,तसं काही नाही.

प्रथमेश-थांब ,तुला बघतो मी . तसं ती विश्वासच्या बाजुला जाऊन उभी राहते.

शक्ती -ए बाबा ,दादाला सांग ना

सुलभा -एवढे मोठे झाले,तरी लहान मुला सारखच वागता.

भक्ती येते .

सुलभा -कसं झालं एक्झिबिशन?

भक्ती-छान आणि विशेष म्हणजे आमचे सगळे प्रॉडक्ट संपले,अनुभव छान वाटला .

तितक्यात प्रथमेशचा फोन वाजतो ,तो आत जाऊन बोलतो ,आल्यावर सांगतो ,तन्वीचे आई बाबा रविवारी येणार आहे ,ते बाबाला फोन करतील ,मी नंबर दिला आहे बाबांचा.

विश्वास-मी म्हटलं होतं ना,सगळं व्यवस्थित होईल,उगाचच एवढं टेंशन घेतलं 

प्रथमेश -जो पर्यंत सगळं व्यवस्थित ठरत नाही,तो पर्यंत टेंशन येणारच.

शक्ती- घे टेंशन,मग केस वय होण्याच्या आधीच पिकतील.

प्रथमेश- असं कसं होईल,तुम्ही आहात ना सगळे मला टेंशन फ्री करायला ,मग मला कशाची चिंता आहे .

शक्ती - म्हणून मघाशी येवढा टेंशन मध्ये होता .

सुलभा- आता जेवून घ्या सगळे.

बघता बघता रविवार उजाडतो,सगळीकडे पाहुणे येणार म्हणून सगळ्यांची गडबड असते,ठेवणीतली सगळी काचेची भांडी निघतात ,प्रथमेश आणि विश्वास हॉल मधलं वातावरण छान निर्माण करतात ,भक्ती आणि शक्तीने सोफ्याचे कव्हर ,रांगोळी आणि सुलभाला किचन मध्ये मदत या आघाड्या सांभळल्या होत्या.दहा वाजता प्रथमेशचे काका ,काकू आले ,काकू सुलभाच्या मदतीला किचनमध्ये गेल्या .काका आणि विश्वास हॉल मध्ये गप्पा मारत बसले.प्रथमेश त्यांना कल्पना देतो ,पाच मिनिटात तन्वीच्या घरचे पोहोचतील.

तसं काका आणि विश्वास दोघे त्याला चिडवतात आणि तोही मजा घेत असतो .

तन्वीचे घरचे येतात ,सगळ्यांना भक्ती आणि शक्ती पाणी देतात, तन्वीचे वडील महेश बँकेत मैनेजर आहे ,भाऊ संकेत अजून शिकतोय ,आई  सुवर्णा घरीच असते .

पाणी घेतल्यावर सगळे  एकमेकांशी ओळख करून घेतात.

महेश-खरं तर तुम्ही आमच्या कडे यायला हवं होतं ,पण विश्वासराव तुमच्या आग्रहास्तव आम्ही आलो .

विश्वास-अहो,कुठे जुन्या परंपरा घेऊन बसलात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुला मुलीची पसंती,ती तर झाली आहे नाही का रे.

तसं तन्वी आणि प्रथमेश एकमेकांकडे पाहत हसतात .

महेश- मग तुमच्या काय अपेक्षा आहेत,लग्नाबद्दल 

काका-खरं तर प्रथमेश एकटाच आहे,म्हणून आम्हाला लग्न थोडं थाटात करायचं होत,बाकी आमची काही अपेक्षा नव्हती,परंतु विश्वास दादांनी तिची अट सांगितली ,मग आता काय बोलणार .

महेश -कसली अट

विश्वास-तन्वी तू तुझ्या बाबांना सांगितल नाही का?

तन्वी- तुम्ही हो म्हटल्यावर ,ते नाही म्हणणार नाही

महेश - हे काय आहे तन्वी?

विश्वास -मी सांगतो तुम्हाला ,ह्या दोघांची अशी इच्छा आहे की,लग्न साध्या पध्दतीने करायचं आणि जो खर्च झाला असता तो एखाद्या आश्रमात म्हणजे वृध्दाश्रमात किंवा अनाथाश्रमात द्यायची ,मला तर त्यांची कल्पना आवडली ,ते त्यांची सामाजिक बांधिलकी आता पासूनच जपत आहे .

लग्न इथेच आपण फक्त जवळच्या लोकांना बोलावून करु आणि त्यानंतर पुजेला सगळ्यांना आमंत्रण देऊ ,काय म्हणणं आहे तुमचं 

काका-आता तुम्ही आधीच सारं ठरवलं आहे,तर काय बोलणार.

विश्वास-असं नाही,ज्यात मुलांना आनंद त्यात आपल्याला पण असला पाहिजे नाही का ? तुम्ही काय म्हणताय महेश राव

महेश- मी काय म्हणतो ,सगळं ठिक आहे ,लग्न आमच्या घरी करु ,नाही तरी पुजा तुमच्या कडे होणारच आहे .

काका -लग्नानंतर प्रथमेश त्याच्या फ्लैट वर राहायला जाणार ना ,मग पुजा तिकडेच ठेवू .

महेश- म्हणजे मला नाही समजलं 

विश्वास -तुम्हाला प्रथमेशबद्दल आणि आमच्याबद्दल तन्वीने सगळं सांगितल असेल ना ?

महेश -हो सांगितल,पण लग्नानंतर वेगळे राहणार ,हे नाही सांगितल.

विश्वास-त्याला ही याबद्दल कल्पना नाही आहे,आता विषय निघाला आहे ,तर सविस्तर सांगतो ,प्रथमेशचे आईवडील गेल्यावर, तो आमच्याकडे राहायला आला आणि आमचा मुलगा कधी झाला ,आम्हालाही कळलच नाही .तो जेव्हा जॉबला लागला ,तेव्हाच सगळ्यांच म्हणणं होतं की,त्याने वेगळं रहावं,पण एकटा राहिला तर,त्याचे खाण्याचे हाल झाले असते ,जे आम्हाला दोघांना मान्य नव्हतं,म्हणून त्याला यातलं काही माहित नाही आणि आता अचानक लग्न जमल्यामुळे तो रूम लगेच खाली होणार नाही ,सध्या ते इकडचं राहतील, रूम खाली झाल्यावर ,त्यांच्या दोघांच्या पसंतीने इंटरीयर करु दे आणि मग जातील राहायला.

प्रथमेश -आणि मला जर तुम्हाला सोडून जायचं नसेल तर 

काका -स्वत:च घर असताना ,तू असं किती दिवस उप-या सारखं ह्यांच्या कडे  राहणार आहेस.

प्रथमेश-काका काही काय बोलतोस,म्हणून मी बोलत होतो ,बोलवू नका ,झालं समाधान.

तितक्यात सुलभा बाहेर येत म्हणते ,चला जेवण तयार आहे,जेवून घ्या. सगळे जेवायला बसतात ,प्रथमेश थोडा अपसेट होता ,हे सगळं पाहून,महेशही थोडा विचलित होतो,हे विश्वासच्या लक्षात येतं ,पण सध्या शांत बसणं,त्याने पसंत केलं.

जेवणं होतात ,तन्वी आणि तिच्या घरचे जायला निघतात.

जाता जाता महेश -माफ करा विश्वासराव ,मला लग्नाबद्दल विचार करायला थोडा वेळ हवा आहे ,मी जे काही आहे ,ते तुम्हाला फोन करुन कळवतो.

विश्वास -हो ,आरामात सांगा ,घाईत आपल्याला काही निर्णय घ्यायचा नाही.

काय असेल ,तन्वीच्या वडिलांचा निर्णय,त्यातून सुलभा आणि विश्वास मार्ग काढू शकतील का? हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा आणि अभिप्राय अवश्य द्या. त्यांच्या 

जबाबदा-या  पार पाडत ते कसे एन्जॉय करतात ,हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहे.

क्रमशः 

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all