सेकंड इनिंग-भाग 2

Beautiful relation between husband and wife

सेकंड इनिंग-भाग 2

आता वेटर जेवण घेऊन येतो आणि सर्व्ह करतो आणि जाताना सांगतो-काही हवं असेल तर तीन नंबर दाबा , मी हजर होईन .

विश्वास-हो,नक्की

सुलभा-जेवण बघून तर छान दिसतंय ,जास्त तेल पण नाही 

विश्वास - स्पाइसी पण कमी दिसत आहे,चल जेवून घेऊ 

सुलभा -जेवण खरचं खूप सुंदर आहे ,नाहीतर ते जास्त तेलाच आणि स्पाइसी खाऊन ,परत असिडीटीला सामोरे जावे लागते,ते वेगळंच

विश्वास-खरचं हे माझ्या बाबतीतही होतं 

सुलभा-केलंस ना मान्य की वय झालंय 

विश्वास-ये हल्लो,कुठलाही संबंध कुठेही काय लावते आणि असिडीटी होणे ,वय होणे याचा कुठे तरी मेळ लागतो का 

सुलभा - बरं बरं,तू अजुनही तरुण आहेस आणि चिरतरुण राहणार आहेस.

विश्वास-बरोबर बोललीस ,आता तुझ्यात पॉझिटीव्हिटी आली 

सुलभा -तुझ्या सांगण्याने आली का ?

विश्वास -नाही असच काही नाही

सुलभा -मग कसं 

विश्वास -ओरडणार नसशील तर सांगतो 

सुलभा -आता सांगतो की नाही ,नाही सांगितलं तर ओरडेल 

विश्वास- तू माझ्याबरोबर डेट वर आलीस ना ,म्हणून तरुण झाल्यासारखं वाटलं,पण डेट वर गेल्यानंतर जे करावंस वाटत ,ते राहून गेलं 

सुलभा-आता काय राहिलं 

विश्वास-तुझ्या ओठाला काहीतरी लागलंय,काढू का ?

सुलभा तिच्या ओठांना हात लावून पाहते आणि म्हणते काही नाही .

तसं तो उठून तिच्या बाजुला येतो आणि तिला म्हणतो ,हे काय इथे आहे असं म्हणत जवळ जात असतो ,तर ती त्याला दूर करून,टिश्यू पेपर उचलत तोंड पुसते आणि रागाने त्याच्याकडे पाहते .

तितक्यात वेटर दोन मसाला पान एका तबकात घेऊन येतो आणि निघून जातो .

तसं विश्वास तिच्या समोर आ करून उभा राहतो ,ती विचारते - काय .

तो डोळ्याने खुणावतो की,पान तोंडात घाल.

तसं ती एक पान उचलत, त्याच्या तोंडात कोंबते आणि म्हणते-जास्तच लाडात येत आहेस ,असं नाही वाटतं.

तसं तो दुसरं पान उचलतो आणि तिच्या तोंडात घालत हसतो.

आता दोघांनाही बोलता येत नसते ,दोघे पान खात फक्त एकमेकांकडे पाहत हसतात .

वेटर येतो आणि विचारतो-अजून काही हवं आहे का ?

विश्वास हातानेच नाही म्हणून सांगतो ,कारण तोंडात अजूनही पान होते ,हातानेच बिलासाठी खुणावतो.

वेटर -ओके सर 

आता दोघांचही पान खाऊन झालेलं असतं,वेटर येतो आणि सांगतो ,सर तुमचं बिल पे झालंय.

सुलभा -कुणी पे केलं असेल 

विश्वास - दुसरं कुणी ,प्रथमेशने केलं असेल .

सुलभा - बरं बरं,चला आता उशीर झाला आहे,मुलं वाट पाहत असतील ,त्यांना जाता जाता आइस्क्रीम घेऊन जाऊ

विश्वास - हो चल 

असं म्हणून दोघे तिथून बाहेर पडतात आणि गाडीत जाऊन बसतात .

विश्वास -मी तुला पान प्रेमाने भरवायला सांगितल,तर तू तर माझ्या तोंडातच कोंबलस .

सुलभा- आणि मी केलं, म्हणून तूही माझ्या तोंडात कोंबलस आणि माझी बोलती बंद केली .

विश्वास -माझ्याकडे अजून एक ट्रिक आहे ,बोलती बंद करायची ,घरी गेल्यावर दाखवतो .

तशी सुलभा लाजतच म्हणाली-हो का ? 

विश्वास गाडी थांबवत म्हणतो -थांब ,मी आलोच आइस्क्रीम घेऊन.

तो आइस्क्रीम घेऊन येतो ,पुढे रस्त्यावर एकदम सामसूम असते ,विश्वास अचानकच गाडी थांबवतो .

सुलभा - काय झालं 

विश्वास-काही नाही गं,हवा चेक करतो 

पाच मिनीटं होतात ,तरी तो गाडीत बसत नाही ,म्हणून ती उतरुन गाडीच्या त्या बाजूने त्याला बघायला जाते.

सुलभा- ठिक आहे ना ,सगळं 

विश्वास तिला गाडीवर पकडतो ,ती त्याला डोळ्याने विचारते ,काय झालं.

त्याच्या डोळ्यांत, तिला एक वेगळीच चमक दिसते आणि तो त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवतो ,तीही सगळं विसरून त्याला साथ देते ,तृप्त झाल्यावर दोघे बाजुला होतात ,सुलभाची अवस्था तर अशी झालेली असते ,की लाजत ती पटकन गाडीत जाऊन बसते .

विश्वासही गाडीत येऊन बसतो आणि तिला खोडसाळ स्माईल देतो आणि गाणं लावतो ,तर नेमकं गाणं लागते ,

हमने तुमको देखा,तुमने हमको देखा ऐसे,

हम तुम सनम ,सातों जनम ,मिलते रहे हो जैसे 

दोघेही अधूनमधून एकमेकांकडे पाहत गालातल्या गालात हसत असतात . अशात घर येतं .

गाडीतून उतरल्यानंतर सुलभा-मुलं जागी असतील का ,मला त्यांना सामोरं जायला कसं तरी वाटत आहे.

 विश्वास -अगं,त्यात काय वाटायचं,आपण नवरा बायको आहोत आणि आता त्यांना सगळं कळतं .

सुलभा-म्हणून तर कसं तरी वाटतंय 

विश्वास-मग तू थांब ,मी जातो 

सुलभा-तुम्ही ना ,चला जाऊ 

ते दार उघडून आत जातात ,तर हॉल मध्ये लाईट बंद असतात .

सुलभा-बरं झालं,झोपले वाटतं 

तोवर तिघेही बाहेर येतात , त्यांना चहू बाजूंनी घेरतात आणि विचारतात -कशी झाली तुमची डेट 

तसं सुलभा लाजते ,विश्वास तिच्याकडे पाहतो 

शक्ती -आई ,तू लाजत आहेस ,म्हणजे नक्कीच छान,मला दादा आणि ताईनी  जेव्हा सांगितल,तुम्ही डेट वर गेला आहात ,मला तर हा सुखद धक्का सहन झाला नसता ,पण ताईने चिमटा काढून मला सत्याची जाणीव करून दिली.

भक्ती -अगं तुझं काय चाललंय,ते दमले असतील ,चल आपण झोपायला जाऊ

प्रथमेश-आवडलं ना हॉटेल,एकदा आपण सगळे जाऊ 

विश्वास -काय रे गधड्या,एवढा मोठा झाला की,आई बापाच्या डेटच बील तूच भरलं 

प्रथमेश-माझं लग्न झाल्यावर तुम्ही भरा ,आता माझ्या कडून तुम्हा दोघांसाठी गिफ्ट ,पण तुम्ही एन्जॉय केलं ,हे जास्त महत्त्वाचं,कारण मी केलेला फोनही ,कुणाला तरी उचलायची इच्छा नव्हती .

विश्वास-काय रे ,बापाची खेचतो काय ?

प्रथमेश- तुम्ही तर म्हणता,मुलाला बापाची चप्पल आली की,दोघांत मित्राचं नात असतं,मी त्या नात्याने बोललो.

सुलभा विषय बदलण्यासाठी-अरे आइस्क्रीम आणलं आहे तुम्हाला 

शक्ती -आम्हाला माहित होतं,म्हणून तर जागे होतो 

सुलभा -बरं ,मी चेंज करुन येते ,तोवर भक्ती आइस्क्रीम घे सगळ्यांना 

सुलभा चेंज करायला जाते,ती रात्री झोपतानाचा गाऊन घालते,

आरशात पाहत असताना ,तिला मघाचा क्षण आठवतो आणि तोंडावर हसू येतं,तितक्यात गाऊन वर सूट होणार नाही,म्हणून काढून ठेवलेला गजरा परत केसांत माळते आणि बाहेर जाते .

शक्ती-आई ,आज चक्क तू गजरा घातला आहे ,आज तर काही सण नाही 

भक्तीला वाटते ,आईला ओकवर्ड वाटेल ,म्हणून ती शक्तीला म्हणते ,तू हल्ली खूप बोलते 

शक्ती-ताई ,तू विषय बदलू नको 

विश्वास-मी आणला,तिला आज गजरा 

शक्ती -वाव ,बाबा मी तुम्हाला असं,आईसाठी गजरा आणलेलं पहिल्यांदा पाहिलं ,पण असं अचानक

विश्वास-माझी बायको आहे ,गुन्हा झाला का माझ्या हातून 

शक्ती-अहो बाबा ,तसं नाही ,उलट नेहमी आणत जा ,आम्हाला तुम्हा दोघांना असं बघून छान वाटतंय.

कारण पत्राची गोष्ट दोघांच्यात होती .

सगळे मिळून आइस्क्रीम खातात .

झोपायला जाताना प्रथमेश-मला तुमचा अभिमान आहे की,तुम्ही माझ्या आईची एवढी काळजी घेत आहात ,यंग मैन ,कीप ईट अप

आता विश्वास काही बोलणार ,त्याच्या आधी तो तिथून पसार होतो .

भक्ती ,शक्ती बाबा जवळ जातात आणि बोलतात -लव्ह यू बाबा ,असेच दोघे पुढचं आयुष्य एन्जॉय करा आणि त्याही त्यांच्या रूम मध्ये जातात .

आता ते दोघेही आपल्या बेडरूम मध्ये जातात .

तसं सुलभा लटक्या स्वरात विचारते -तुला अचानक असं काय झालेलं 

विश्वास - अगं काही नाही,बकेट लिस्ट मधली एक इच्छा पूर्ण केली,अशी शांतता परत मिळते नाही मिळते आणि तुला बोललो असतो ,तर तू खूपच आढेवेढे घेतले असते ,म्हणून ही आयडीया ,पण अचानक झाल्यामुळे,तुझे जे हावभाव अनुभवायला मिळाले ,ते पण अनुभवता नसते आले .

सुलभा -पण या वयात असं बरं वाटतं का

विश्वास -तुझं परत तेच आणि मी अजून म्हातारा नाही झालोय ,बघायचं का तुला ,असं म्हणत तो तिच्या डोळ्यांत पाहतो.

तशी ती थोडीशी चलबिचलीत होते.

ते पाहून तो म्हणतो ,टेंशन घेऊ नकोस,मी तुला काही करणार नाही .

दोघेही बेडवर झोपतात ,तो त्याचा हात पुढे करतो ,ती आज किती तरी दिवसांनी त्याच्या हाताच्या उशीवर झोपते ,दोघेही एका अनामिक आनंदाने झोपेच्या आधीन होतात . जरी ते एकत्र राहत होते ,तरी संसाराचा गाडी ओढताना कुठे तरी एकमेकांमधलं नातं विसरून गेले होते,दोघेही आता पर्यंत फक्त मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी एकत्र झटत होते . 

आता तर सुरुवात आहे,अजुन काय गंमत जंमत होते,हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा .

आवडलं असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

क्रमशः 

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all