सेकंड इनिंग-भाग 1

Beautiful relation between husband and wife

सेकंड इनिंग-भाग 1

ते दोघे रेडी होऊन येतात ,तसा मुलगा प्रथमेश म्हणतो,आई एकदम छान दिसत आहेस ,आज बाबांच काही खरं नाही.

बाबा- पण भाव द्यायला पाहिजे ना ,तुझ्या आईने.

आई-तुमचं आपलं काहितरी,मुलं एवढी मोठी झाल्यावर तुम्हाला चावटपणा सुचतोय

प्रथमेश-अग्ं आता मी मोठा आहे ,मी आता बाबांचा मित्र आहे.

आई-तू जरा जास्तच मोठा झाला आहे ,असं वाटतय ,तुझ्या लग्नाच बघायला हवं,भक्ती आणि शक्ती आल्या की,भक्तीला काहितरी बनवायला सांग ,ती येईलच एवढयात.

प्रथमेश-तू आमची काळजी करू नकोस,आम्ही सगळं व्यवस्थित करू,हे घ्या तुमचं टेबल बुक केलं आहे , आल्यावर सांगा ,कसं होतं ते,मी तुम्हाला फोनवर लोकेशन टाकलं आहे ,जाताना GPS लावून जा.

बाबा -म्हणजे किती लांब आहे असं 

प्रथमेश -जास्त नाही,इथुन पंधरा मिनिटे लागतील,पण शांत आहे ,तुम्हांला आवडेल.

बाबा-तू गेला होतास का आधी?

प्रथमेश- हो ऑफिसची पार्टी होती ,तेव्हा गेलेलो ,छान वातवरण वाटलं,म्हणून बुक केलं,नाहीतर तुम्ही गेले असते ,नेहमीच्याच रेस्टॉरंटमध्ये ,एन्जॉय करा छान .

भक्ती आत येतच विचारते - आज काय विशेष? आज काही लग्नाचा वाढदिवस तर नाही आहे .

प्रथमेश- मी सांगतो तुला सगळं ,त्यांना जाऊ दे 

भक्ती-बरं बरं,जशी आपली आज्ञा दादासाहेब.

आई-जास्त मस्ती करु नका ,आम्ही नाही आहोत तर,काय?

प्रथमेश- नको ,टेंशन घेऊ ,आता जा तुम्ही

बरं बरं,असं म्हणत दोघे जातात .

तो म्हणजे विश्वास आणि ती म्हणजे सुलभा,तो गाडी काढतो.

सुलभा त्याच्या शेजारी पुढे बसते.तो GPS लावतो .

सुलभा -असं मुलांना सोडून किती तरी वर्षांनी चाललोय नाही,मला चुकल्या सारखं वाटत आहे.

विश्वास- हं भक्ती झाल्या पासून नाही ,पण मला प्रथमेशचा अभिमान वाटतो ,खरचं मोठा झालाय, की परिस्थितीनी मोठं बनवलं ते माहित नाही.

सुलभा- हो ना ,ताई आणि भाऊजींचा अपघात झाला,त्यात दोघेही गेले ,किती कोलमडून गेला होता ,त्याच्या काकां कडेही जायला तयार नव्हता,काय माहित तुम्ही त्याच्यावर काय जादू केली होती की,त्याला आपण विचारल्यावर तो तयार झाला,त्याच्या बरोबरच तुमचं वागणं पाहूनच,मला असं वाटलं की,तुम्हाला मुलगा नसल्याची खंत आहे.

विश्वास -आता बोललीस ,परत बोलू नको ,तू दोन्ही वेळी गरोदर असताना ,तुला आठवतं का,की मी कधी तुला म्हटलोय मुलगा होईल की मुलगी .

सुलभा- नाही ,मला ही तुमच्या या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं,पण मी दाखवलं नाही.

विश्वास- अगं माझ्यासाठी दोन्ही समान आहेत ,पण तुला हे ही माहित आहे,मला मुलांची किती आवड आहे,भक्ती या जगात येईपर्यंत ,तुझ्या बहिणीचा मुलगा असला तरी,माझं त्याच्याशी एक वेगळच नातं होतं,मित्रत्वाचं .

सुलभा- हो ,ते मलाही दिसत होतं,मला चांगलं आठवतंय ,त्या दिवशी प्रथमेशचा बारावीचा शेवटचा पेपर होता आणि इकडे काहीतरी वेगळच्ं त्याच्यासाठी वाढून ठेवलं होतं,तो पेपर देऊन घरी आला तर ,त्याला जे चित्र दिसलं त्यामुळे पूर्ण बावरुन गेला होता,खरचं तुम्ही होतात ,म्हणून तो सगळ्यातून लवकर सावरला ,मला कधी ही असं वाटलं नव्हतं की,तुम्ही पुढाकार घेऊन त्याला आपल्या घरी आणाल ,तेव्हा मला तुमचा खूप अभिमान वाटला होता.

विश्वास-मी त्याला असं तुटताना बघू शकत नव्हतो ,तसही त्याच्या आई वडिलांच्या पैशातून त्याची पुढची सगळी सोय झाली ,आपण फक्त त्याला आधार दिला ,पण तुझ्या भावजींना मी खरचं मानतो ,त्यांनी पॉलिसी काढली होती,नाही तर त्याचे हाल झाले असते ,घर विकून घराच लोन द्यावं लागलं असतं आणि उरलेले पैसे त्याच्या शिक्षणाला लागले असते ,पण आता निदान त्याच्या नावावर एक फ्लैट तरी आहे,तसं आपण होतो ,पण त्याला ते आपले उपकार वाटले असते ,त्यांच बघून मीही माझी पॉलिसी लगेच काढली ,कोणाचही काही खरं नसतं,कधी कुणाची वेळ येईल सांगू शकत नाही.

सुलभा-अहो,काही काय बोलताय ,काही होणार नाही तुम्हाला .

विश्वास-नाही होणार मला काही ,पण त्या घटनेमुळे मी पॉलिसी काढली हे मात्र खरे आणि आता तर मला तुझ्या साठी जगायचं आहे ,असं म्हणत त्याने डोळा मारला.

सुलभा -तुमच्यावर पत्राचा जरा जास्तच परिणाम झाला आहे ,असं वाटतंय 

विश्वास-का,तुला माझ्यातला बदल आवडला नाही का,मला तुझं काही कळत नाही,आधी वेळ देत नाही ,म्हणून बोलत होती ,आता देतोय ,तर तेही पटत नाही.

सुलभा - असं काही नाही ,आवडलं ,पण हे भूत किती दिवस राहणार ते पाहायचं आहे

विश्वास-जो पर्यंत जिवंत आहे तोवर 

सुलभा हसतच- हो का 

विश्वास- हो ना , आलं बघ हॉटेल

असं म्हणत त्याने गाडी हॉटेलमध्ये आत नेऊन पार्क केली , हॉटेलच नाव होतं ,नयनरम्य हॉटेल,नावाप्रमाणेच तिथल्ं निसर्ग सौंदर्य खरचं मनाला भुरळ घालत होतं.

दोघेही रिसेप्शनला गेले,तिथे विश्वासने मोबाईल मधून बुकिंग दाखवलं,तिथल्या लेडीने त्यांच्या बरोबर एक वेटर देत ,त्याला सांगितल की ,यांना यांच्या suit मध्ये घेऊन जा .

विश्वास - आम्ही फक्त जेवायला आलोय 

रिसेप्शन लेडी-हो सर,जेवणासाठी आमच्याकडे तशी व्यवस्था आहे ,हा तुम्हाला दाखवेल 

तो वेटर त्यांना बोलतो -वेलकम इन नयनरम्य सर ,तुम्ही कधीच विसरणार नाही आणि परत परत याल.

विश्वास-हो ,आम्ही ठरवू ते नंतर 

तो त्यांना हिरव्या गालिचा वरून घेऊन जातो ,सगळीकडे असे मोठ मोठे काही लहान टेंट होते ,मध्ये एक छान कारंजे होते .

तो त्यांना एका टेंट मध्ये घेऊन गेला ,तिथल्ं वातावरण खुपच छान होतं ,मंद प्रकाश होता ,कँडल लाईट डिनरची व्यवस्था होती ,संथ आवाजात छान जुनी गाणी लावली होती ,जी गाणी काम करताना सुलभा नेहमी रेडिओवर ऐकायची,त्यामुळे तिचं मन अगदी प्रफ़ुल्लित झालं ,ते दोघे समोरा समोर टेबलवर बसले ,मध्ये एक हार्ट शेपची कँडल लावली होती . तो तिच्याकडे पाहत हसत होता.

सुलभा-काय झालं हसायला 

विश्वास-काही नाही गं,अजुनही तू किती छान दिसतेस,हे पाहत होतो आणि मेणबत्तीच्या प्रकाशात तर ,तुझ्या चेह-यावर जो प्रकाश पडला आहे ,त्यामुळे मी माझ्या नयनांना तृप्त करत आहे आणि तेही नयनरम्य हॉटेल मध्ये बसून 

सुलभा -ते कसं काय 

विश्वास -तुला पाहाण्याच नयनसुख घेतो आहे ,एकांतात .मुलांसमोर इच्छा असली तरी बघता येत नाही असं,त्यांना काय वाटेल असं वाटतं राहतं 

तितक्यात त्याचा फोन वाजतो ,प्रथमेशच नाव दिसतं,तो फोन उचलत -बोल रे ,का डिस्टर्ब केलं

प्रथमेश-पोहोचलात का विचारायला केला होतात ,पण तुमच्या बोलण्या वरून जाणवतंय की पोहोचलात , एन्जॉय द डेट.

विश्वास फोन ठेवतो .

सुलभा -कुणाचा होता ?

विश्वास-प्रथमेश विचारत होता ,पोहोचलात का? ,हो सांगितलं 

सुलभा-शक्ती आली का घरी 

विश्वास- आली असेल,नाहीतर बोलला असता

सुलभा -एक मिनीट,मी फोन करून विचारते आणि ती फोन हातात घेते.

विश्वास - अगं तेही छान एन्जॉय करत असतील ,तू कशाला फोन लावते.

तो पर्यंत फोन लागतो ,शक्तीच उचलते .

शक्ती- अगं मी पोहोचले,तू एन्जॉय कर ,आम्ही आता लहान नाही आहोत आणि दादा आणि ताई दोघे माझ्या बरोबर आहे ,तू नको टेंशन घेऊ इथलं ,असं म्हणून ठेवते. तसा सुलभाचा चेहरा पडतो.

विश्वास- काय झालं 

सुलभा -काही नाही ,ती पोहोचली ,ती म्हणाली ,तू एन्जॉय कर ,बघता बघता सगळेच मोठे झाले ना ,आता त्यांना आपली गरज नाही 

विश्वास- तसं नाही ग्ं ,तू चुकीचा अर्थ काढत आहेस ,मुलं खरच मोठी झाली आहे ,त्यांना असं वाटतं की,तूही तुझं आयुष्य एन्जॉय करावं ,दुसरं काही नाही ,उगाच मनात भलते सलते विचार आणू नकोस.जिथं तुझ्या बहिणीचा मुलगा स्वत:हून आई म्हणतो ,कारण तितकी सक्षम आई तू आहेस ,त्याला सगळं समजत असूनही ,त्याने स्वत: तुला आई म्हणायचा निर्णय घेतला आणि तुझ्या बरोबर मलाही बाबा म्हणून स्वीकारलं.

सुलभा -हो ,चांगलं आठवतं ,आपण त्या दिवशी त्याला कॉलेजमध्ये बेस्ट स्टूडेंटची अवार्ड मिळालं म्हणून गेलो होतो.त्याच्या टिचरनी त्याच नाव पुकारल्ं आणि त्याचे पालक म्हणून आपण वर गेलो ,तेव्हा टिचरने आपली ओळख काका आणि मावशी असं करून दिली,तर या पठ्ठ्याने माईक हातात घेऊन,ते माझे आई बाबा आहेत , असं सांगितलं ,तेव्हा मन इतकं भरुन आलं होतं आणि घरी गेल्यावर मिठी मारली आणि म्हणाला ,तुला आई आणि काकांना बाबा म्हटलं तर चालेल ना ,त्याच्या डोळ्यांत खूप भावना होत्या ,तेव्हा तू पण त्याला मिठी मारली,किती आनंदाचा क्षण होता तो,तेव्हापासून ते आज पर्यंत रोज पाया पडल्याशिवाय आणि मिठी मारल्याशिवाय तो बाहेर पडत नाही.

विश्वास -हो ,नाही तरी मुलं आईचीच बाजू घेतात ,आज पण नाही का ,कसं बोलत होता.

सुलभा- नाही हो ,तुमच्यावरही त्याचा तेवढाच जीव आहे ,फक्त तो व्यक्त करत नाही ,पण तुमच्या दोघांची कधी कधी जी कुजबूज चालते ,ती मलाही कळते.

विश्वास- माझ्या पोरी असतात ना मला साथ द्यायला ,पण त्याही तुझ्याजवळ येऊन कुजबुज करत असतात ,त्याचं मला नाही वाटत वाईट .

तितक्यात वेटर येऊन त्याच्या कानात काही तरी सांगतो ,तो कागदावर काही लिहून देतो आणि स्टार्टरची ऑर्डरही देतो . पाच मिनिटांनी दोघे जण येतात ,एकाच्या हातात गिटार असते आणि एकाच्या हातात माईक असतो ,माईक असणारा बोलतो ,मैडम हे गाणं तुम्हाला समर्पित केले आहे 

ए मेरे जोहरजबी ,तुझे मालूम नहीं,

तू अभितक हैं हँसी ,और मैं जवां,

तुझपे कुरबान मेरी ,जान मेरी जान 

ती लाजून चूर होते,हे पाहून त्याला खुप हसू येतं.त्यानंतर गाणं गाणारा निघून जातो,गितारवाला गाणं वाजवायला सुरुवात करतो ,

प्यार दिवाना होता है ,मस्ताना होता है ,

हर खुशी से,हर गम से बेगाना होता है,

तो खुर्ची वरून उठत ,त्याचा हात पुढे करतो ,तिला कसं तरी वाटत असतं ,तो परत तिला डोळ्यांनी खुणावतो .मग ती उठते आणि तिचा हात त्याच्या हातात देते ,तसं तो तिला कमरेत पकडतो आणि दुसरा हात हातात घेत डान्स करतात ,मग हलकेच डान्स करता करता ,ती तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवते ,तसच हळू हळू डान्स चालू असतो आणि विश्वासला काहीतरी ओलं जाणवतं,म्हणून तो तिला हळूच बाजुला करत खुर्चीत बसवतो आणि डोळ्यांनीच विचारतो,काय झालं.

तसं ती मानेनेच उत्तर देते ,काही नाही ,टिश्यू पेपरने डोळे पुसत हसते. तो तिला तिचा नॉर्मल होण्यासाठी वेळ देतो .तितक्यात स्टार्टर येतं ,वेटर वाढून निघून जातो .

ती नॉर्मल झाल्यावर विचारतो-अचानक काय झालं 

सुलभा-काही नाही,हे आनंदाश्रू आहे ,आपण भक्ती झाल्यानंतर असं पहिल्यांदाच डान्स केला असेल ना ,ते दिवस आठवले .

विश्वास-ती व्हायच्या आधी ,दोघच्ं घरी असायचो ,त्यामुळे बाहेर जाण्यापेक्षा,घरातच ऑर्डर करून,शुक्रवारी रात्री पार्टी करायचो ,का तर शनिवार ,रविवार सुट्टी असायची,मुली झाल्यानंतर आपलं विश्व बदललं,पण ती काळाची गरज होती आणि आजचा बदल ही काळाची गरज आहे,आजपर्यंत जे करायचं राहून गेलं,ते आता करु ,अजुनही वेळ गेली नाही ,तू माझ्या सोबत असशील,तर आपण जग जिंकू शकतो 

सुलभा -बस, झाली तुझी ड्रामेबाजी सुरु

विश्वास- अगं नाही, मी खरं बोलतोय,मी ठरवलं,तू तुझी बकेट लिस्ट लिही ,मी माझी लिहिणार,सध्या जसं जसं जमेल ,तसं पूर्ण करु ,उरलेली लिस्ट रिटायर झाल्यावर.

सुलभा- बापरे ,एवढी मोठी लिस्ट आहे का तुझी ,माझी तर एक विश प्रथमेश मुळे आज पूर्ण झाली.

विश्वास-मग घरी गेल्यावर,मी पण थैंक्स म्हणणार त्याला ,अजुन एक प्रत्येकाने लिस्ट बनवायची ,पण पूर्ण झाल्यावर सांगायची ,आधीच सांगायची नाही ,काय 

सुलभा -हो बाबा ,हो 

अजून पुढे काय काय होतं ,हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा, नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

क्रमशः 

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all