सेकंड इनिंग भाग-14

Beautiful relation between husband and wife

सेकंड इनिंग भाग-14

हळद आणि संगीतचा कार्यक्रम आश्रमात होणार होता, पण त्याआधी मेहंदीचा कार्यक्रम तन्वीच्या  घरी, सगळे मिळून करणार होते. हळदीच्या आदल्या दिवशी सगळे तन्वीच्या घरी जमले ,मेहंदी काढण्यासाठी पार्लरवालीला बोलावलं होतं. आश्रमातल्या काही मुलीही हौसेने म्हणाल्या होता की ,आम्हाला मेहंदी काढायची आहे , म्हणून आश्रमातल्या मुलांनाही मेहंदी काढण्यासाठी चार ते पाच मुलींना तिकडे पाठवले होते. प्रथमेश तर सुरुवातीला मेहंदी काढायला तयार नव्हता, पण जेव्हा सगळ्यांनी सांगितले की, तू नवरदेव आहेस, थोडी तरी काढावी लागेल, तेव्हा कुठे तयार झाला .आता आलेल्या मुलींनी ,सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात केली होती ,तन्वीच्या हातावर तर आधीच काढून झाली होती ,आता तिच्या पायावर मेहंदी काढत होत्या .

सर्वेश ला सांगून भक्ती आणि शक्ती ने स्पीकरची अरेंजमेंट करून ठेवली होती ,भक्तीने माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली , ती सगळ्यांना म्हणाली, आमच्याकडून प्रथमेश आणि तन्वी साठी एक सरप्राईज डान्स आहे. सगळ्यांच्या मध्ये जाऊन त्या दोघी उभ्या राहिल्या आणि सर्वेश ने गाणं सुरू केलं

मेहँदी है रचनेवाली

हाथों में गहरी लाली

कहे सखियाँ अब कलियाँ

हाथों में खिलनेवाली हैं

तेरे मन्न को जीवन को

नयी खुशियां मिलनेवाली है

मेहँदी है रचनेवाली

हाथों में गहरी लाली

कहे सखियाँ अब कलियाँ

हाथों में खिलनेवाली हैं

तेरे मन्न को जीवन को

नयी खुशियां मिलनेवाली है 

ये हरियाली बन्नो

ले जाना तुझको गुइयाँ

आने वाले है सइयां

थामेंगे आके बाइयाँ

गूंजेगी शहनाई

अंगनाई अंगनाई

मेहँदी है रचनेवाली

हाथों में गहरी लाली

कहे सखियाँ अब कलियाँ

हाथों में खिलनेवाली हैं

तेरे मन्न को जीवन को

नयी खुशियां मिलनेवाली है

गाये मैया और मौसी

गाये बहना और भाभी

के मेहँदी खिल जाए

रंग लाये हरियाली बन्नी

गाये फूफी और चाची

गाये नानी और दादी

के मेहँदी मैं भाये

सज जाए हरियाली बन्नी

मेहँदी रूप सँवारे

 ये  मेहँदी रंग निखारे हो

हरियाली बन्नी के आँचल

में उतरेंगे तारें

मेहँदी है रचनेवाली

हाथों में गहरी लाली

कहे सखियाँ अब कलियाँ

हाथों में खिलनेवाली हैं

तेरे मन्न को जीवन को

नयी खुशियां मिलनेवाली है

गाजे बाजे बाराती

घोडा गाडी और हाथी को

लाएँगे साजन तेरे

आँगन हरियाली बन्नी

तेरी मेहँदी वह देखेंगे

तो अपना दिल रखदेंगे वह

पैरों में तेरे

चुपके से हरियाली बन्नी

मेहँदी रूप सँवारे 

ये मेहँदी रंग निखारे हो

हरियाली बन्नी के आँचल

जशीजशी गाण्यांमध्ये नाना नानी मावशी मामी अशी नावे येत होती त्याप्रमाणे  जे जे पाहुणे आले होते त्यांना घेऊन त्या दोघी नाचत होत्या सगळ्या पाहुण्यांना ही खूप छान वाटत होते, पुढच्या गाण्यावर च्या दोघीच डान्स करतात.

हाथों में इन हाथों में

लिख के मेंहदी से सजना का नाम

लिख के मेंहदी से सजना का नाम

हाथों में इन हाथों में

जिसे पढ़ती हूँ में सुबहो शाम

जिसे पढ़ती हूँ में सुबहो शाम

हाथों में इन हाथों में

लिख के मेंहदी से सजना का नाम

 लिख के मेंहदी से सजना का नाम

याद मुझे जब उनकी आये

हाय रे हाय बड़ा सताए

याद मुझे जब उनकी आये

हाय रे हाय बड़ा सताए

देखूं सूरत में उनकी सुबह शाम

हाथों में इन हाथों में

लिख के मेंहदी से सजना का नाम

लिख के मेंहदी से सजना का नाम

पुढचं गाणं होतं 

ये कुड़ियाँ, नशे दियाँ पुड़ियाँ

ये मुण्डे, गली ते गुंडे

नशे दियाँ पुड़ियाँ

गली दे गुंडे

मेहँदी लगा के रखना, डोली सजा के रखना

लेने तुझे ओ गोरी, आएँगे तेरे सजना

सहरा सजा के रखना, चेहरा छुपा के रखना

ये दिल की बात अपने, दिल में दबा के रखना

उड़-उड़ के तेरी ज़ुल्फ़ें, करती हैं क्या इशारे

दिल थाम के खड़े हैं, आशिक़ सभी कंवारे

छुप जाएँ सारी कुड़ियाँ, घर में शरम के मारे

गाँव में आ गए हैं, पागल शहर के सारे

नज़रें झुका के रखना, दामन बचा के रखना

लेने तुझे ओ गोरी...

त्या दोघी खूप छान डान्स करतात, ते पाहून सगळे टाळ्या वाजवतात. त्या दोघी तन्वी आणि प्रथमेश जवळ जाऊन विचारतात ,तुम्हा दोघांना सरप्राईज आवडला का?

 प्रथमेश - खूप छान डान्स केला तुम्ही दोघींनी ,पण कधी प्रॅक्टीस केली ,मला घरात असूनही कळालं नाही .

भक्ती -अरे तुला सरप्राईज द्यायचं होतं ना ,म्हणून आम्ही सांगितलं नाही ,गुपचुप गुपचुप प्रॅक्टिस करत होतो.

प्रथमेश -तुम्ही दोघी छुप्या रुस्तम आहात

शक्ती -आहोतच आम्ही अशा, नाहीतर आता तुला सरप्राईज कसा देता आला असता.

प्रथमेश -तसंही तू काही आम्हाला बोलून देणार नाहीस.

इतक्यात तिथे सुवर्णा, महेश, विश्वास,सुलभा येतात .

महेश -तुम्ही दोघींनीही खूप छान डान्स केला ,तुम्ही डान्स केल्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली.

भक्ती आणि शक्ती -धन्यवाद काका, तुम्हाला सगळ्यांना आवडला ना, आम्ही केलेल्या मेहनतीचे चीज झाले आणि सर्वेशनेही आम्हाला खूप मदत केली.

सुवर्णा -आता तुम्ही दोघी मेहंदी काढून घ्या, तुम्हीच राहिल्यात.

भक्ती -हो काकू, प्रथमेश, तू तन्वीला जेवायला नाही घालणार का? आज तिने मेहंदी लावली ना, मग खाऊ कसं शकते?

 प्रथमेश- मलापण लावायची आहे ,पण माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही .तसे सगळे हसतात.

 सुलभा- अरे ,तुला मेहंदी लावायची असेल तर ठीक आहे ,मी घालते तिला जेवायला.

 विश्वास- तू कशाला घालते, त्याला घालू दे ना, त्यांना त्याच्यातली मजा लुटू देना.

 शक्ती -बघ ना ,बाबा ,आपण काय बोलतो ,ते कळतच नाही.

सुलभा -बरं बरं, प्रथमेश घाल रे तन्वीला जेवायला .

तशी तन्वी लाजते ,भक्ती म्हणते ,कोणीतरी ब्लश होतय ,तसं प्रथमेश तन्वी कडे पाहतो, तर ती तिची मान खाली घालते आणि  हसते .

शक्ती -जा ना रे, दाद्या पटकन ,तिला जेवण घेऊन ये ,भूक लागली असेल बिचारीला .

प्रथमेश -हो ग बाई ,लगेच आलो मी जेवण घेऊन, असं म्हणत तो जेवण आणायला जातो .

भक्ति तन्वीला म्हणते ,आत्ताच लाड करून घे .

शक्ती -नाही ग वहिनी ,लग्नानंतरही अशीच लाड करून घे.

 तन्वी-वहिनी, काय म्हणते तू मला,तन्वी म्हटले तरी चालेल.

शक्ती -नाही ग  ,मला तुला वहिनी म्हणायला आवडेल.

 तन्वी- बरं तुझी मर्जी ,तुला जे आवडेल त्या प्रमाणे .

इतक्यात प्रथमेश जेवण घेऊन येतो ,तो चमच्याने तन्वीला भरवतो .

भक्ती -तू फक्त तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी जेवण आणलं , आमचं काय रेे ,आम्हाला कोण भरवणार ?

प्रथमेश- मला माहित होतं की ,तुम्ही दोघी असं काहीतरी बोलणार ,म्हणून मी वेटरला अजून एक ताट आणायला सांगितला आहे, थांब तो घेऊन येईल. वेटर ताट घेऊन येतो, मग तो पहिल्या ताटातून तन्वीला भरवतो आणि दुसर्‍या ताटा मधून दोघींना ,त्याची भरवताना मजा बघून ,तिघी हसत असतात

प्रथमेश -काय गं ,तुम्हाला मीच मिळालो होतो का ,बकरा बनवायला?

 शक्ती -तुला कोणी सांगितलं, आम्ही तुला बकरा बनवतो ?

प्रथमेश -मग माझ्याकडे बघून तुम्ही इतक्या हसत आहात ,आता तुमची मेजॉरिटी झाली ना.

 भक्ती -हे मात्र खरं ,इतक्यात विश्वास तिथे येतो, झालंं का प्रथमेश ,तसं तन्वी लाजते .

विश्वास- अगं हेच दिवस आहेत ,तुमच्या एन्जॉय करायचे .

शक्ती -असं काही नाही हा बाबा ,तुम्ही तर या ह्या वयातही एन्जॉय करता.

 विश्वास -म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे ?

शक्ती- आजकाल तुमचे आईवरचे प्रेम खूप जास्त उतू चाललं आहे ,आम्हालाही दिसतं.

 विश्वास- मग तुझं काय म्हणणंं आहे ,मी तुझ्या आईवर प्रेम नको करू का ?

शक्ती -नाही नाही ,मला आवडतं तुम्ही जे करता ते, तुम्ही असेच दोघे छान रहा .

विश्वास- प्रथमेश चल जेवायला, आम्ही तुझ्यासाठी थांबलो आहोत .

प्रथमेश -हो, चला बाबा .

विश्वास -जेवल्यावर मग तुला मेहंदी काढू .

भक्ती -तन्वी उद्या कळेल , तुझी मेहंदी रंगल्यावर की दादाचा तुझ्यावर किती प्रेम आहे .

तन्वी-असं काही नाही, मला माहित आहे की, त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे ,ते काही मेहंदीचा रंगावर अवलंबून नाही

 शक्ती- असं सगळे म्हणतात ,म्हणून आम्ही म्हणतोय, तू काय एवढ सिरीअसली घेऊ नको आणि मला माहिती आहे तुझी मेहंदी रंगणारच .

भक्ती -कशाला एवढ टेन्शन घेतेस .

तन्वी -मी नाही टेन्शन घेत ,कारण माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही .

भक्ती -आमच्या दादा वर तर आहे ना, मग झालं तर .

तितक्यात सगळे जेवण करून येतात, सगळे मिळून जरावेळ गप्पा मारतात आणि नंतर तन्वी च्या घरच्यांचा निरोप घेऊन घरी जातात.

 काय होईल पुढेे तन्वीची मेहंदी रंगेल का?  हळद आणि संगीत च्या कार्यक्रमात काय काय मजा येणार, हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा हसत रहा आणि अभिप्राय अवश्य द्या भाग आवडला असेल तर नावासहित शेयर करू शकता.

 क्रमशः 

रूपाली थोरात

🎭 Series Post

View all