सेकंड इनिंग-भाग 12
अनाथाश्रमाचे आधारस्तंभ श्री. सोनावणे यांना सुलभा फोन करून लग्न आश्रमात करणार आहोत,हे कळवते.
त्यानंतर सोनवणे म्हणतात, कोणत्या पद्धतीने तुम्ही लग्न करणार आहात काही ठरवलं आहे का ?
सुलभा - एकदा मी घरच्यांशी बोलून घेते आणि तुम्हाला सांगते.
घरी सगळे मिळून चर्चा करतात आणि ठरवतात की लग्न वैदिक पद्धतीने एका दिवसात करायचे. मुलांना माञ संगीत आणि हळदीचा कार्यक्रम करायचा असतो.
सगळे मिळून आश्रमात जातात तिथली पाहणी करतात आणि ठरवतात कि, मंडप कुठे बांधायचा, तिथे छान मैदान असते ,तिथे मंडप बांधायचे ठरते.
सोनावणे सगळ्या मुलांबरोबर प्रथमेश आणि तन्वीची ओळख करून देतात आणि सांगतात की यांचं लग्न आपल्या आश्रमात होणार आहे ,नेहमी जेव्हा आश्रमात लग्न होतं त्यावेळी नुसतं जेवणच असतं ,मुलं एकदम खूष होऊन जातात की आपल्याला छान जेवायला मिळणार.
भक्ति, शक्ति सगळ्या मुलांशी ओळख करून घेतात आणि विचारतात की, तुम्ही कोणत्या प्रकारचे लग्न पाहिलं आहे. त्यावर मुले म्हणतात की , लग्न झालेली जोडपी इथे येतात ,आम्हाला गिफ्ट देतात आणि आमच्यासाठी जेवण असते, प्रत्यक्षात इथं कुणी कधी लग्न केलेलं नाही. तन्वी आणि प्रथमेश म्हणतात की, तुम्हाला आमचं लग्न अटेंड करायला आवडेल का?
त्यावर सगळे मुले जोरात ओरडतात, हो ,का नाही?
भक्ती आणि शक्ती म्हणते, मग आपल्याला दोन टीम करावे लागतील ,एक मुलाकडचे आणि एक मुलीकडचे मग आपण खूप धमाल करू शकतो.
भक्ती,शक्ती एकीकडे प्रथमेश आणि एकीकडे तन्वीला उभे करतात आणि सर्व मुलांना सांगतात तन्वी दीदी च्या समोर जाऊन उभे रहा ते मुलीकडचे आणि प्रथमेश दादाच्या समोर जाऊन उभी राहतील ते मुलाकडचे.
आता काही मुलं आणि मुली तन्वीच्या समोर जाऊन उभे राहतात आणि काही मुलं आणि मुली प्रथमेश समोर जाऊन उभी राहतात. आता दोन-टीम झाल्या.
तिकडे मोठे माणसे मंडप कसा आणि काय बांधायचा हा विचार करत असतात आणि शेवटी एकदाचा मंडप कसा बांधायचा ते त्यांचे ठरते. त्यानंतर सोनावणे विचारतात की, तुमचा अजुन काय मानस आहे.
सुलभा- मुलांनी दोन टीम केल्या आहेत, तर आमची इच्छा आहे की सर्व मुलांना लग्नासाठी कपडे घ्यावीत.
सोनावणे- माझ्या ओळखीत एक व्यापारी आहे त्याच्याकडून आम्ही नेहमी होलसेल भावात कपडे घेतो त्याला बोलवू का मी?
विश्वास- हो चालेल, ना, पण कपड्याची क्वालिटी चांगली हवी.
सोनावणे- त्याची चिंता तुम्ही करू नका कारण आपण नेहमी त्याच्याकडूनच कपडे घेतो. मी त्याला रविवारी बोलावतो म्हणजे तुम्ही सगळे ही इथे येऊ शकाल.
महेश- हो, चालेल.
इकडे भक्ती,शक्ती, तन्वी आणि प्रथमेश मिळून ठरवतात की ,लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा आणि संगीत चा कार्यक्रम होणार आणि लग्नाच्या दिवशी वैदिक पद्धतीने लग्न .काही मुलांना हे ही माहिती नसतं ,की हळद म्हणजे काय ? मग भक्ती त्यांना हळद कशी लावतात ते सांगते.
संगीतच्या कार्यक्रमांमध्ये काय काय धमाल करू शकतो हे पण सांगते.
त्यातील एक मुलगी विचारते ,वैदिक पद्धतीने लग्न म्हणजे काय?
तन्वी त्यांना वैदिक पद्धतीने लग्न कसं असतं, ते समजून सांगते. हे सगळं ऐकून मुलांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झालेला असतो, तुम्हाला लग्नासाठी नवीन कपडे घेणार आहोत, हे सुद्धा ते सांगतात, ते ऐकून तर ,मुलं खूपच खुश होतात.
इतक्यात सोनावणे ,सुलभा, विश्वास, महेश आणि सुवर्णा तिकडेच येतात.
ते आल्यावर, सोनावणे त्यांची चौघांची ओळख करून देतात, सगळी मुलं त्यांना नमस्कार करतात.
सुलभा- हे लग्न आपण इतके एन्जॉय करू की सर्वांसाठी आठवणी अविस्मरणीय ठरतील ,मग यात तुम्ही सगळे आम्हाला साथ देणार ना?
सगळी मुले जोरात हो म्हणतात.
शक्ती विश्वासला खुणवत असते की ,प्रथमेश आणि तन्वीला इथून घेऊन जा.
विश्वास- प्रथमेश आणि तन्वी चला ,आपण तिकडे जाऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेऊ.
असे बोलताच तन्वी आणि प्रथमेश हे दोघेही त्या सगळ्यांबरोबर मोठ्या लोकांकडे आशीर्वाद घेण्यासाठी जातात जातात.
शक्ती- मुलांनो आपल्याला सगळ्यांना ताई आणि दादासाठी सरप्राईज डान्स बसवायचा आहे ,तर तुम्ही सगळे आमच्या बरोबर आहात ना, आम्ही तुम्हाला नंतर डान्स शिकवायला येऊ, पण हे आपल्यामध्ये एक सिक्रेट असेल मान्य आहे का सगळ्यांना?
सगळे मुले जोरात ओरडतात, हो ताई.
भक्ती- लग्न पंधरा दिवसानंतर आहे ,म्हणजे आपल्याकडे फक्त चौदा दिवस आहे ,आम्ही रोज इकडे तुम्हाला दोन तास डान्स शिकवायला येऊ चालेल ना सगळ्यांना?
सगळी मुले जोरात ओरडतात, हो ताई.
त्यातली एक मुलगी पुढे येते तिचं नाव असतं नेहा ,ती भक्तीला म्हणते, याआधी ताई आम्हाला कुणी असं डान्स वगैरे शिकवायला आलं नाही ,आम्हाला खूप मजा वाटते.
भक्ती- तुम्हाला जर आमच्याकडून डान्स शिकायला आवडणार असेल, तर मी आणि शक्ती दीदी आठवड्यातून एकदा नेहमी तुम्हाला डान्स शिकवायला येऊ.
यावर सगळीच मुले खूप खुश होतात आणि लगेच डान्स करायला सुरुवात करतात.
शक्ती- हो हो शिकवणार आम्ही तुम्हाला डान्स, पण सध्या तरी आपले सीक्रेट लक्षात आहे ना सगळ्यांच्या? आणि जर कोणाला काही कल्पना सुचत असेल संगीत साठी, तर ती पण तुम्ही सांगितली तरी चालेल.
भक्ती- चला आता आम्ही जातो ,उद्यापासून आपण आपली प्रॅक्टिस सुरू करू.
सगळी मुलं त्या दोघींना बाय करतात. इकडे सगळ्या वृद्ध लोकांना प्रथमेश आणि तन्वी भेटतात, दोघे सगळ्यांच्या पाया पडतात ,आशीर्वाद घेतात आणि त्यांना लग्नासाठी आमंत्रित करतात. सगळे सोनावणे यांचा निरोप घेऊन त्यांना सांगतात की, कपडे सिलेक्शन साठी आम्ही रविवारी येऊ.
ते सगळे गेल्यानंतर मुले सोनावणे यांच्या कडे जातात आणि त्यांना सांगतात की ते आपल्यासाठी एवढं करत आहे ,तर आम्हाला पण त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे.
सोनावणे- काय करायची इच्छा आहे ,तुम्हा सर्वांची, मी तुम्हाला माझ्या परीने जी मदत करू शकतो ती करेल.
मुले त्यांची आयडिया त्यांना सांगतात .सोनावणे म्हणतात, की तुमची आयडिया छान आहे, तुम्हाला जे काही सामान लागेल ते मी तुम्हाला आणून देतो ,तुम्ही तयारी सुरू करा .मला तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो, की तुमच्या मनामध्ये हा विचार आला.
घरी गेल्यावर विश्वास, सुलभा, प्रथमेश, भक्ती आणि शक्ती सगळे मिळून कसा कार्यक्रम करायचा हे ठरवतात, त्याची रूपरेषा आखतात आणि त्यानुसार खरेदी काय काय करायची हे ठरवतात. या सगळ्या गोष्टींमध्ये तन्वीचे आई-वडील ,महेश ,सुवर्णा आणि तिचा भाऊ सर्वेश यांचेही मत घेतात.
लग्नासाठी फक्त जवळच्या नातेवाईकांना आमंत्रण देण्यात येणार असते, लोकांना आणि जवळच्या मित्रमंडळींना पूजेच्या वेळी आमंत्रण देणार असतात.
विश्वास वर लग्न आश्रमात करणार आहे, हे प्रथमेशच्या
काकाला समजून सांगण्याची जबाबदारी देण्यात येते, या गोष्टीचे त्याला खूप टेन्शन येते, पण त्यांना विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगणे, ही तेवढेच गरजेचे आहे, हेही पटत असते.
दुसऱ्या दिवशी प्रथमेशच्या काकाला फोन करून ,लग्न आश्रमात करणार आहे ,याबद्दल सांगतो.
काका- आश्रमात का ? माझा पुतण्या काही अनाथ नाही आहे, मग असं का?
विश्वास- त्याची आणि तन्वीची इच्छा होती, म्हणून आम्ही असे करत आहोत ,आम्ही आमच्या मनाने काहीच करत नाही.
काका- ते लहान आहेत ,त्यांना काय कळतं ,आपण मोठ्यांनी, त्यांना समजून सांगितलं पाहिजे, त्याची परिस्थिती इतकीही वाईट नाही ,की आपण त्याचे लग्न एका आश्रमात करू ,मी त्याचा काका अजून जिवंत आहे, मी त्याच्याशी बोलतो आणि त्याला समजून सांगतो.
विश्वास- ठीक आहे ,तुला जे योग्य वाटेल ते कर.
काय होईल पुढे ,काका आश्रमात लग्नासाठी तयार होईल का ,मुलं काय सरप्राईज देणार आहेत लग्नात ,हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा ,हसत राहा ,जर हा भाग आवडला असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय मात्र अवश्य द्या.
क्रमशः
रूपाली थोरात