May 15, 2021
प्रेम

सेकंड इनिंग-भाग 10

Read Later
सेकंड इनिंग-भाग 10

सेकंड इनिंग-भाग 10 

हॉलवर पोहोचतात ,गाडीतून उतरत असतात ,तेव्हा दुस-या गाडीतून तन्वी आणि तिच्या घरचे उतरत असतात ,प्रथमेशच पूर्ण लक्ष तन्वीकडे असतं,तिने त्याने घेऊन दिलेला गाऊन घातला होता ,हेयर स्टाईल वर टियारा घातला होता ,एकदम प्रिन्सेस दिसत होती ,प्रथमेश ही काही कमी दिसत नव्हता ,चांगला राजबिंडा प्रिन्स वाटत होता . दोघं एकमेकांना बघत होते ,शक्ती भक्तिला खुणावत होती की ,दोघांकडे पाहा .

इकडे सुलभा आणि विश्वास उतरतात आणि तिकडे महेश ,सुवर्णा उतरतात ,त्या दोघी एकमेकींकडे पाहून हसतात ,गाऊन सेम असतात ,फक्त कलर नव-यांच्या टिशर्ट ला मैचिंग होणारे असतात ,दोघी पहिल्या एकमेकींकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतात आणि नंतर आपापल्या नव-यांकडे ,कारण त्यांचे टिशर्ट सेम असतात ,कलर वेगळे असतात .

सुलभा -इतकं कसं सेम होऊ शकत ,तुम्ही दोघे भेटलेलात का?

विश्वास -नंतर सांगतो सगळं,आता उशीर झाला आहे ,आत जाऊया ,कसं वाटलं सरप्राईज.

सुलभा -छान आहे ,असं म्हणत दोघी हसत आत जातात .

सर्वात पहिल्यांदा सुलभा ,सुवर्णा,महेश आणि विश्वास सगळे पुढे जातात .भक्ती ,शक्ती ,तन्वी,संकेत ,प्रथमेश सगळ्यांनाच गेटवर थांबवतात.

पुढे जाऊन महेश हातात माईक घेतो आणि बोलतो -आज माझी प्रिन्सेस तन्वी हिचा वाढदिवस आहे आणि तिचा हा वाढदिवस अविस्मरणीय व्हावा ,म्हणून आम्ही तिची एंगेजमेंट प्रथमेश सोबत करत आहोत ,दोघेही एकमेकांकडे पाहत असतात ,तितक्यात विश्वास माईक हातात घेत बोलतो ,अशा या जोडप्याच आपण सर्व मिळून स्वागत करुया.

सर्व मिळून उभे राहतात आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करतात ,ते दोघे जसे स्टेज कडे जायला लागतात ,तसं समोर दोन मुली फुलांच्या पायघड्या घालत असतात आणि ती दोघं त्या वरून चालत जात असतात आणि गाण लागलेलं असतं.

 

पल पल दिल के पास तुम रहती हो

 

हर शाम आँखों पर तेरा आँचल लहराए

हर रात यादों की बारात ले आए

मैं साँस लेता हूँ, तेरी खुशबू आती है

इक महका-महका सा पैगाम लाती है

मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है

 

पल पल दिल के पास तुम रहती हो

 

कल तुझको देखा था, मैंने अपने आँगन में

जैसे कह रही थी तुम, मुझे बाँध लो बंधन में

ये कैसा रिश्ता है, ये कैसे सपने हैं

बेगाने हो कर भी, क्यों लगते अपने हैं

मैं सोच में रहता हूँ, डर-डर के कहता हूँ

 

पल पल दिल के पास तुम रहती हो

प्रथमेश आणि तन्वी दोघे एकमेकांकडे पाहत चालत असतात ,दोघांसाठी हे खूप छान सरप्राईज होत,खूप आनंदात दिसत होते दोघे.

तन्वी स्टेजवर गेल्यावर ,

महेश- कसं वाटलं सरप्राईज

तन्वी- खूप छान,थँक यू बाबा ,असं म्हणत ती त्याला मिठी मारते आणि बाजुला होते ,नंतर प्रथमेशही थँक यू म्हणत मिठी मारतो .

बाजुला विश्वास उभा असतो ,दोघे त्याच्या पाया पडायला लागतात .

विश्वास -हे काही बरोबर नाही ,इकडे या असं म्हणत ,दोघांना दोन बाजूनी मिठीत घेत ,अभिनंदन बोलतो .

आता स्टेजवर केक येतो ,सगळ्यांना बसण्याची विनंती केली जाते .

मग केक कटिंग होते ,नंतर दोघांना एकमेकांना अंगठ्या घालायला दिल्या जातात , दोघे एकमेकांना अंगठ्या घालतात ,तसे सगळे टाळ्या वाजवतात . पार्टी साठी फक्त 35 खूप जवळची माणसे होती ,त्यात पाच सहा जण प्रथमेश आणि तन्वीचे मित्र होते , सगळे शिस्तीत उभे राहून त्यांचे अभिनंदन करतात आणि फोटो सेशन होते ,आता त्या दोघांना खाली बसायला बोलावतात . 

महेश - आता आपण थोडी मजा करुयात आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहे डॉली,जी आपल्या सगळ्यांना डोलायला लावणार आहे ,काय मग मंडळी तयार आहात ना ?

सगळे जोरात ओरडतात-हो

डॉली - प्रथमेश आणि तन्वीला साखरपुडयाच्या हार्दिक शुभेच्छा,मग आता तुमच्यातल्ं कोण पुढं येऊन त्यांना वेगळ्या पध्दतीने शुभेच्छा देणार ,त्याला माझ्या कडून सरप्राईज गिफ्ट 

भक्ती आणि शक्ती पुढे येतात ,तिच्या कानात काहितरी सांगतात आणि स्टेजवर उभ्या राहतात ,तितक्यात गाण चालू होते.

 

गोरी गोरीपान फुलासारखी छान

दादा मला एक वहिनी आण

गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी

अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी

चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण!

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी

चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी

हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान!

वहिनीशी गट्टि होता तुला दोन थापा

तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा

बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान!

नाचता नाचता शेवटच्या कडव्यात  दोघी तन्वी जवळ जातात आणि तिला घेऊन नाचतात ,गाण संपल्यावर तिघी मिळून छान मिठी मारतात,तसं सुलभाच्या डोळयातून पाणी येतं आणि ते विश्वास तिला डोळ्यानेच विचारतो ,काय झालं . तसं ती डोळे पुसत काही नाही असं म्हणते.

डॉली- भावाला आणि वहिनीला तुम्ही खूपच छान शुभेच्छा दिल्या ,त्याबद्दल तुम्हा दोघींना माझ्या कडून एक गिफ्ट .

कार्यक्रम चालू असताना वेटर सगळ्यांना बसल्या जागेवर स्टार्टर देत असतात.कोल्ड्रींक देत असतात .

डॉली -आता सगळे कपल एकमेकांसमोर उभे रहा ,तसं कुणीतरी म्हणतं ,आम्हाला कपल नाही तर आम्ही काय करायचं 

डॉली-तुमच्यासाठी पण गेम आहे ,टेन्शन नका घेऊ ,ज्या जोड्या आहेत ,त्यांच्यासाठी टास्क आहे की ,तुम्हाला प्रत्येकाला एक फुगा देण्यात येईल,तो दोघांच्या मध्ये ठेवायचा आणि नाचायच ,जो जास्त वेळ टिकेल ,ती जोडी जिंकली ,मग तयार आहात ना सारे ,तिच लक्ष महेश ,सुवर्णा,विश्वास आणि सुलभा कडे जातं,तुम्ही पण या चला ,तसं भक्ती शक्ती त्यांना जा म्हणतात ,इकडे संकेत महेश आणि सुवर्णाला पाठवतो .

प्रत्येकाला फुगा देण्यात येतो ,प्रथमेशचे काका ,काकी ही असतात ,प्रत्येक जण फुगा ठेवून नाचायला सुरुवात करतात .

विश्वास -आपल्याला जिंकायच आहे ,असं म्हणत सुलभाकडे पाहतो ,फुगा पडणार इतक्यात सुलभा फुगा सावरते.

एक एक जोडी कमी होत जाते ,महेश ,सुवर्णा पण आऊट होतात ,एक तरुण जोडी जुई ,अमित आणि विश्वास ,सुलभा राहतात ,सगळे आता दोघांना चिअरअप करत असतात . दोन्ही जोड्या समोरासमोर असतात ,विश्वास दुस-या जोडीकडे पाहत असतो ,जुईचे विश्वास कडे लक्ष जातं,तसं विश्वास तिला डोळा मारतो ,हे पाहून ती थोडी विचलित होते आणि फुगा पडतो ,तसं सगळे त्यांच्या नावाने ओरडू लागतात ,तसं विश्वास सुलभाला उचलून घेतो ,तशी ती त्याच्या खांद्यावर मारत खाली ठेवायला सांगते ,तो तिला खाली ठेवतो आणि तो ही लाजतो.

डॉली-तर आपले या खेळाचे आजचे विजेते आहेत ,मि. विश्वास आणि सुलभा ,हे घ्या तुमचं गिफ्ट आणि ते दिलं जातं आहे ,तुमच्या मुलाकडून आणि सुने कडून.

ते दोघे गिफ्ट घेतात ,तेव्हा प्रथमेश-तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे,मी बघितलं,तुम्ही काय केलं ते .

विश्वास- हो का,एव्हरी थिंग इस फ़ेयर इन लव्ह ऐण्ड वॉर,असं म्हणून त्याला डोळा मारतो,तसं प्रथमेश हसायला लागतो .

सुलभा-काय चाललय दोघांच कळेल का मला

विश्वास -काही नाही ,अशीच मस्ती ,हो ना रे

प्रथमेश-हो गं,काही नाही 

डॉली -आता इथे असणा-या लोकांमध्ये मी जो कलर बोलेल ,त्याने पटकन जाऊन प्रथमेश आणि तन्वीला जाऊन विश करायचं ,जो पहिलं विश करेल गिफ्ट त्याच 

ती चार पाच रंग बोलते ,सगळे छान मजा करत असतात ,पण प्रथमेशचा काका मात्र खूप चिडलेला असतो ,सगळे विश्वास आणि सुलभाच कौतुक करतात ,ते त्याला पाहवत नसते ,त्याला महेश जास्त महत्त्व न देता विश्वासला देत आहे ,हे त्याला पटत नसतं,आता निळा रंग बोलल्यावर विश्वास आणि सुलभा पटकन जाऊन त्यांच अभिनंदन करतात ,पिंक कलर बोलल्यावर महेश आणि सुवर्णा जाऊन त्यांच अभिनंदन करतात,तेव्हा त्याच्या लक्षात येतं ,ह्या दोन्ही जोड्यांची कपडे सारखी आहे ,मग तर त्याचा तिळपापड होतो आणि बायकोला म्हणतो,चल घरी जाऊया .

काकी -अहो मजा येतेय ,थांबा ना जरा 

काका-मी सांगितलेलं कळत नाही का ,चल म्हटलं ना 

काकी -हो जाऊ ,जेवून घ्या,घरी गेल्यावर मी परत काही करणार नाही आणि जाताना प्रथमेशला भेटून जाऊ,नाहीतर त्याला काय वाटेल 

काका-त्याला काही वाटत नाही,हेच तर दू:ख आहे ,तोंडात पुटपुटतो 

काकी-काही म्हणालात का?

काका-काही नाही ,चल जेवायला .

इकडे डॉली- ज्या जोड्यांनी मैचिंग कपडे घातले आहेत,त्यांना माझ्याकडून गिफ्ट 

पाच जोड्या असतात ,त्या पैकी ती महेश आणि विश्वासच्या जोडीचं कौतुक करते की ,या वयातही हे मैचिंग करतात आणि यावरुन असं म्हणता येईल की,प्रेमाला वयाच बंधन नसत्ं .

डॉली -आता प्रथमेश सगळ्यांसमोर तन्वीला प्रपोज करेल .

तसे सगळे टाळ्या वाजवतात ,दोघे स्टेजवर येतात ,माईक प्रथमेशच्या हातात दिला जातो ,प्रथमेश तिला काहितरी सांगतो ,सगळ्यांच लक्ष आता दोघांकडे असतं.

तन्वी तू माझ्यासाठी काय आहेस ,हे तुला गाण्यातून सांगू इच्छितो आणि मला नाचताना साथ देशील ,अशी अपेक्षा ठेवतो ,तो तिच्या समोर हात धरतो ,ती ही त्याला साथ देत गाण्यावर नाचायला लागते .

मैं तेनु समझावां की, न तेरे बिना लगदा जी

तू की जाने प्यार मेरा, मैं करूँ इंतजार तेरा

तू दिल, तुइयो जान मेरी

 

मेरे दिल ने चुनलईयाने, तेरे दिल दिया राहां

तू जो मेरे नाल तू रहता, तुरपे मेरीया साहां

जीना मेरा, हाए, हुण है तेरा, की मैं करां

तू कर ऐतबार मेरा, मैं करूँ इन्तज़ार तेरा

तू दिल तुइयो जान मेरी

मैं तैनु समझावां की...

 

वे चंगा नईयों कीता बीवा

वे चंगा नईयों कीता बीवा

दिल मेरा तोड़ के

वे बड़ा पछताईयां अखाँ

वे बड़ा पछताईयां अखाँ

नाल तेरे जोड़ के

 

तेनु छड्ड के कित्थे जावां, तू मेरा परछावां

तेरे मुखड़े विच ही मैं तान, रब नु अपने पावां

मेरी दुआ हाय, सजदा तेरा करदी सदा

तू सुन इक़रार मेरा, मैं करूँ इंतज़ार तेरा

तू दिल तुइयो जान मेरी

मैं तैनु समझावां की...

नाचताना आजुबाजूला सगळे आहेत,हे ही विसरून जातात ,नंतर तो तिच्या जवळ जात तिला I love you म्हणतो आणि गुडघ्यावर बसत तिचा हात हातात घेतो आणि तिला विचारतो, तू माझी अर्धांगिनी होशील का ,तशी ती लाजत ,हो म्हणते ,सगळे टाळ्या वाजवतात .

डॉली -खूपच सुंदर प्रथमेश,आता सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्या .

काका आणि काकी ,प्रथमेश जवळ येत ,त्याला म्हणतात ,निघतो आम्ही ,तसं प्रथमेश- जेवलात का ,थांबा ना अजून,लगेच घरातले गेले तर बरं दिसणार नाही 

काका-म्हणजे आम्ही घरातले आहोत तर ,इतक्या वेळ असं वाटत होतं की,विश्वास आणि सुलभाच फक्त घरातले आहेत ,आम्ही असलो काय किंवा नसलो काय ,तुला काही फरक पडत नाही.

प्रथमेश-असं काही नाही,तू स्वत:च काही अर्थ लावतो ,तितक्यात तन्वी त्याचा हात दाबते ,तसा तो शांत होत बोलतो ,ठिक आहे,जायचं असेल तर जा.व्यवस्थित जा ,पोहोचल्यावर फोन कर.

काका-नशीब तुला तेवढी तरी काळजी आहे ,तू तरी शिकव ह्याला ,आपलं कोण आणि परकं कोण ,तन्वी कडे बघत बोलतात .

ती काहीच बोलली नाही,सगळे नंतर गप्पा मारत जेवतात आणि घरी जायला निघतात .

गाडीत शक्ती -काय मग लव्ह बर्डस,आज तर सगळ्या पार्टीत आप छा गये थे 

भक्ती-हो ना ,आई बाबा आणि तुमचे चौघांचे ड्रेस कसे सारखे होते 

विश्वास -अग मी आणि महेश बरोबर खरेदी साठी गेलो होतो

प्रथमेश-आणि आमच्या अंगठ्या कधी घेतल्या ,अगदी परफेक्ट 

विश्वास-ते काम सुवर्णा ताई आणि तुझी आई ह्यांच

सुलभा-आवडल्या का अंगठ्या 

प्रथमेश-म्हणून तू मला त्या दिवशी कोणती डिझाईन चांगली आहे ,हे विचारत होती,जशा आम्हाला हव्या होत्या तशा,यू आर बेस्ट आई ,माझ्या मनातलं कसं काढून घ्यायचं तुला चांगल कळत.

सुलभा -अरे जन्म नाही दिला म्हणून काय झालं,पण तुला चांगली ओळखते मी.

प्रथमेश-आता बोललीस,परत असं बोलू नको ,नाहीतर

सुलभा-नाही तर काय

प्रथमेश-पुढच्या जन्मात तुझ्या पोटी जन्माला येईल 

विश्वास -ये घर आलं,जास्त इमोशनल होऊ नका

शक्ती -आम्ही दोघींनी कसा डान्स केला ,त्या बद्दल तर कुणी काहिच बोलत नाही ,आम्हाला तर कुणी विचारत नाही.

प्रथमेश- खूप छान केला ,पण तुम्ही प्रक्टिस कधी केली 

भक्ती -प्रक्टिस वैगेरे काही नाही ,ही करत होती ,मी तिला फॉलो केलं बस.

सुलभा-छान केला ,असेच नेहमी एकमेकांसाठी उभे रहा ,साथ द्या .

भक्ती -आणि तू कुठे चालली आहेस का ,असं बोलते ,आम्हाला तुम्ही दोघेही आमच्या बरोबर हवे आहात 

विश्वास -आम्ही कुठे जाणार ,आम्ही आमच्या घरट्यात असणार ,तुम्हीच आम्हाला सोडून जाणार ,तुम्ही आकाशात झेप घ्याल ,तेव्हा तुम्हाला उडताना पाहून आम्ही समाधानी राहणार .

सुलभा -पुढच पुढे बघू ,चला उतरा आता ,सगळे दमलेत ,चला झोपा ,सगळे झोपायला जात असतात .

विश्वास -मला माहित आहे,तुला झोप येत आहे ,तरी तन्वीला एक फोन केल्याशिवाय झोपणार नाहीस ,कर फोन ,पण लवकर आवर म्हणजे ती ही झोपेल ,उद्या बोला परत ,आता तर ओफिशीयल परमिशन मिळाली.

क्रमशः 

पुढे काय होईल,हे जाणून घेण्यासाठी हसत रहा,वाचत रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.

रुपाली थोरात 

 

Circle Image

रूपाली रोहिदास थोरात

Assistant professor

I love to read and write , from my college time, I am writing poems, whenever thoughts come in mind ,I wrote it in words, but no platform to share with others . when I saw this site, I got a platform to share my thoughts and views with all, Thanks to Era creators to giving me such a wonderful platform as well inspiring new writers, Hope all of you will enjoy our journey of reading and writing and will give comments to encourage me . also suggestions are welcome by me so that I can improve because always we are learners at the end of our life. Rupali Thorat