हे हल्ली फार जाणवायला लागलय...
कारण ,
या बदलत्या ऋतूचक्रानुसार तुझ्यातही
दिवसागणिक बदल होताना दिसतोय...
कधी इतका सुन्न भासतोस
जणू काही पानगळीचा ऋतूच सुरू झालाय असं वाटतं...
कधी कधी तर त्या काळ्याकुट्ट ढगांसारखा भासतोस
जणू काही पाऊसधारा बरसतील की काय असं वाटतं...
कधी तर इतका डवरलेला भासतोस
जणू काही हाच तो बहराचा ऋतू असं वाटतं...!!
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा